Posts

थकीत लाभार्थींनी थकीत मुद्दल व व्याज रकमेचा एकरकमी भरणा करुन कर्ज खाते बंद करावे आणि कर्जमुक्त व्हावे

        रायगड,(जिमाका) दि.13:-  शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग   आर्थिक विकास महामंडळ यांचे जिल्हा कार्यालय रायगड मार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थींना स्वयंरोजगाराकरिता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. त्या लाभार्थींना कर्ज परतफेडीसाठी विहित मुदत देण्यात आली होती. परंतु विहित मुदत संपून गेली असतानादेखील बऱ्याच लाभार्थींनी महामंडळाकडे शिल्लक रकमेची परतफेड अद्याप केलेली नाही त्या सर्व थकीत लाभार्थींनी थकीत मुद्दल व थकीत व्याज रकमेचा एकरकमी भरणा करुन कर्ज खाते बंद करावे आणि कर्जमुक्त व्हावे, जेणेकरुन भविष्यात होणारी संभावित कायदेशीर कार्यवाही टाळावी असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ रायगड-अलिबाग गंगाधर डोईफोडे यांनी केले आहे. थकीत लाभार्थींनी कर्ज खाते बंद केल्यास महामंडळाच्या सध्या सुरु असलेल्या नवीन आकर्षक बिनव्याजी रु.15 लक्ष पर्यंत कर्जाच्या योजनेमध्ये लाभ घेता येईल. ०००००००

रायगड जिल्ह्यातील महिलांची गणेशमूर्ती विक्रीत गरुडझेप

        रायगड,(जिमाका) दि.13:-   उमेद अभियानांतर्गत गणपती मूर्ती व्यवसायात महिलांनी  पाऊल ठेवले आहे. या व्यवसायातून महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. बचत गटातील महिलांनी केल्या 1 लाख  66  हजार  833   गणपतीमूर्ती व्यवसायातून 13 कोटी 13 लाख 87 हजार 200  रुपयांची करण्यात आली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी बचत गटातील महिलांना व्यवसायाच्या दृष्टीने मार्गदर्शन केल्याने ,  जिल्ह्यातील महिला शक्ती गणपती मूर्ती व्यवसायात गरुड झेप घेऊ शकल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील पेण तालुका गणपती मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पेणमध्ये तयार केलेल्या गणपती मूर्तींना देश ,  विदेशात मोठी मागणी आहे. सुबक आखणी ,  नेटकी बैठक ,  सुंदर कोरीवकाम ,  रेखीव डोळ्यांची रचना आणि रंगकाम यामुळे पेणच्या गणपती मूर्तींना स्वतची खास ओळख प्राप्त झाली असून ,  गणपती मूर्तींना गणेशमूर्तीना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. या व्यवसायात पेण तालुक्यातील महिला बचतगट उतरले आहेत.   ...

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना

      राज्यातील इतर मागासवर्गीय समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकासया महामंडळाची स्थापना केली आहे. समाजातील इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी या महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. छोटे व्यवसायिक व स्वयंरोजगाराकरिता रु.1 लाख ची थेट कर्ज योजना नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज नाही  व 20 टक्के बीज भांडवल योजना.  तसेच ऑनलाईन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज योजना परतावा योजना रु.10 लक्ष पर्यंत गट कर्ज व्याज परतावा योजना (रु.10 लक्ष ते 50 लक्ष पर्यंत)  या योजनांचा समावेश आहे.  थेट कर्ज योजना व 20 टक्के बीज भांडवल योजना या योजनांचे अर्ज शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय महामंडळाच्या रायगड जिल्हा कार्यालयात स:शुल्क उपलब्ध आहेत. Ø    रु.1 लक्ष थेट कर्ज योजना :-   सिबिल क्रेडिट स्कोर किमान 500 असलेल्या लाभार्थ्यांना हे कर्ज महामंडळातर्फे दिले जाते.  कर्ज परत फेडीचा कालावधी 4 वर्षे आहे. अर्जदाराच्या वयाची मर्यादा 18 ते 55 वर्षे आहे. ...

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

  रायगड (जिमाका) दि.25:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, असे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग श्रीमती तेजस्विनी निराळे यांनी कळविले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्हयातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी अपिले, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रलंबित प्रकरणे तसेच ग्रामपंचायत यांच्या कडील घरपट्टी, पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, विजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात. तरी दि.13 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व स...

रोहा तालुक्यातील कोकणवासी ग्रामस्थ शेतकरी, जनता-ग्रामस्थांनी शासकीय योजनाबाबत महत्वाचे ई-केवायसी पूर्तता करुन घ्यावे

    रायगड जिमाका दि.25 : रोहा तालुक्यातील कोकणवासी ग्रामस्थ शेतकरी, जनता-ग्रामस्थांनी आपल्या गावी गणेशोत्सवाला आल्यावर स्थानिक तलाठी-तहसिल कार्यालयाशी सपर्क साधून शासकीय योजनाबाबत महत्वाचे ई-केवायसी पूर्तता करुन घ्यावे, असे आवाहन तहसिलदार रोहा डॉ. किशोर देशमुख यांनी केले आहे. महाराष्टाचे सांस्कृतिक वैभव असलेल्या गणेशोत्सवाला बुधवार दि. 27 ऑगस्ट 2025 पासून सुरुवात होत आहे. या सण,उत्सवाला बाहेर गाव, शहरातून मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थ शेतकरी गणेशभक्त येत असतात. महसूल खात्याकडील रोहा तहसिल कार्यालयामार्फत शेतकरी, जनता-ग्रामस्थ यांना वेळोवेळी राज्य/केंद्र शासनाकडून जाहीर होत असलेल्या विविध योजना, नैसर्गिक अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर होत असते. सदरच्या विविध योजना, नुकसान भरपाई लाभार्थी यांना प्राप्त होणे कामी सद्यस्थितीत ऑनलाईन (संगणक प्रणाली) प्रणालीचा वापर होत आहे. करीता लाथार्थी यांना त्यांचे बचतखाते त्यांचे आधारकार्ड नंबर बरोबर जोडले गेले असले पाहीजे.                  त्यामुळे तहसिल कार्यालयाकडून श...

गणेशोत्सव कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर 16 टनापेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या सर्व वाहनांना पूर्णत: बंदी

  रायगड(जिमाका)दि.21:- दि.27 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाचे अनुषंगाने गणेशभक्त कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई, व मुंबई येथून मोठ्या प्रमाणावर कोकण व गोवा या भागात जाण्याकरिता खाजगी व प्रवासी वाहनांचा वापर करतात. त्यामुळे या कालावधीत दोन्ही (पुणे व कोकणमार्गे) मार्गावर प्रचंड प्रमाणात बाहतुकीची वर्दळ वाढते. याकरिता गणेशोत्सव कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर, लॉरी इ. वाहने) अशा वाहनाच्या वाहतुकीस पूर्णतः बंदी सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल निलेश धोटे यांनी लागू केली आहे. दि.23 ऑगस्ट 2025 रोजी 00.01 वाजेपासून ते दि.28 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 23.00 वाजेपर्यंत, दि. 31 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 08.00 वाजेपासून ते रात्री 23.00 वाजेपर्यत आणि दि. 02 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 08.00 वाजेपासून ते रात्री 23.00 वाजेपर्यंत तसेच दि. 06 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 08.00 नंतर ते दि. 07 सप्टेंबर 2025 रोजी 20.00 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर सर्व वाह...

पनवेल येथे उद्योग सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

    रायगड(जिमाका)दि.21:- आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे जिल्हा उद्योग केंद्र रायगड व लघु उद्योग भारती, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील सर्व उद्योजकांसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत शनिवार, दि.23 ऑगस्ट रोजी पनवेल येथे उद्योग सुसंवाद-2025 या कार्यक्रमाचे सकाळी 11.00 वा आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा, उद्योजक यांनी उपस्थितीत राहावे, असे आवाहन  जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळया यांनी केले आहे. या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधिक्षकअ आचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, नेहा भोसले आयुक्त, पनवेल महानगर पालिका, मंगेश चितळे व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळया तसेच जिल्ह्यातील सुमारे 300-400 उद्योजक उपस्थितीत राहणार आहेत. शनिवार, दि.23 ऑगस्ट रोजी पनवेल औद्योगिक सहकारी वसाहत मर्या.पनवेल येथे "हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र" वृक्ष लागवड अभियानांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम सकाळी 10.00 वा. आणि जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक  सकाळी 10:30 वा. होणार आहे...