31 मार्च साठी प्रशासनाची सज्जता; 30 रोजी सुटीच्या दिवशीही कोषागार कार्यालय सुरु
अलिबाग,जि. रायगड,(जिमाका)दि.15- मार्च 2018 अखेरीस देयके सादर करण्यासंदर्भात सुसूत्रता यावी व बिम्स या संगणकीय प्रणाली व ट्रेझरी नेट प्रणाली सुस्थापित रहावी यासाठी प्रशासनाने सज्जता केली आहे. यासंदर्भात शासनाच्या वित्त विभागाने परिपत्रकाद्वारे सुचना निर्गमित केल्या असून सर्व विभागांनी त्यांचे पालन करुन देयके विहित मुदतीत सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज ई मुल्ला यांनी केले आहे. यासंदर्भात परिपत्रकान्वये सुचना जारी करण्यात आल्या आहेत की, विविध विभागांनी त्यांच्याकडे उपलब्ध अनुदानानुसार प्रवास भत्ता देयके, आस्थापना विषयक पुरवणी देयके, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती देयके ही 23 मार्च पर्यंतच सादर करावयाची आहेत. सुधारीत अंदाजपत्रक व पुरवणी मागण्यांद्वारे प्राप्त अनुदानाची देयके ही वर्षाअखेरीस उपकोषागार कार्यालयात सादर न करता शक्यतो जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावे. उपकोषागार कार्यालयात दि.31 मार्च रोजी सायं. सहा वाजेनंतर देयके स्विकारली जाणार नाहीत. सायं. सहा नंतर जिल्हा कोषागार कार्यालयात देयक...