Posts

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील खेळाडुंसाठी पारितोषिक

            अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.23-    केरळ येथे सन २०१५ मध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या राज्यातील खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर रोख बक्षिस देऊन त्यांचा गौरव करण्यास शासनाने घेतला आहे. त्यानुसार संबंधित खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांनी प्राविण्य प्रमाणपत्र, पॅन व आधार कार्ड, बँक पासबुकचे पहिले पान (सर्वांच्या झेरॉक्स प्रत), मुळ रद्द केलेला चेक, मुळ मार्गदर्शक संमती पत्र इ. तसेच मार्गदर्शकांनी रहिवासी दाखला, पॅन व आधारकार्ड झेरॉक्स प्रत, बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, मुळ रद्द केलेला चेक इ. संचालनालयास दि. 25 पर्यंत सादर करावा व आगाऊ प्रत संचालनालयाच्या dsysdesk6@gmail.com या ई-मेल वर पाठवावी. तसेच याबाबत अधिक माहितीकरीता क्रीडा व युवक सेवा संचालनालय, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे किंवा आपल्या जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन उपसंचालक, क्रीडा व य...

'स्वच्छ पनवेल हरित पनवेल अभियान'ना.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रारंभ

Image
अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.23:-    स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत स्वच्छ पनवेल हरित पनवेल अभियानाचा प्रारंभ राज्याचे न महूसल, मदत कार्य व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नवीन पनवेल येथील मल्हार महोत्सवात करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ.कविता चौतमल, उप महापौर चारुशीला घरत, अपर जिल्हाधिकारी भारत शितोळे, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना ना. पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले आहे.  या अभियनामध्ये समाजातील सर्व घटकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. स्वच्छता हा माझा आग्रहाचा विषय आहे. स्वच्छतेमुळे आपले आरोग्य, आपला परिसर चांगले राहते. पनवेल महानगरपालिका स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवित आहे. या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत.  यावेळी ना. पाटील यांच्या हस्ते 'स्वच्छ पनवेल हरित पनवेल' पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. 00000

नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीनिमित्त अभिवादन

Image
अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.23:-    नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.यावेळी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) श्रीधर बोधे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 00000

गाव विकासात विविध कार्यकारी संस्थांचे योगदान वाढविण्यासाठी प्रयत्न-ना.सुभाष देशमुख

Image
                    अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23- शेतकऱ्याच्या दृष्टीने आणि शेतमाल प्रक्रियेवर आधारीत उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी सद्यस्थितीत अडचणीत असलेल्या संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. त्यासाठी विविध कार्यकारी संस्थांचा कार्यविस्तार करुन ग्रामिण भागात समृद्धी आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना. सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.   ना. देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सहकार व पणन विभागाची आढावा बैठक आज पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आ. सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, आ. प्रशांत ठाकूर,  उपजिल्हाधिकारी श्रीधर बोधे, जिल्हा उपनिबंधक पी.एम खोडका, जिल्हा विशेष लेखा परीक्षक यु.जी.तुपे, विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील आदी मान्यवर  तसेच सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.  यावेळी ना. देशमुख म्हणाले की, अटल महापणन विकास अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक खातेदार ...

सायबर विश्वात वावरतांना खबरदारी आवश्यक --जिल्हा पोलीस अधिक्षक पारस्कर

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 23-    इंटरनेटच्या माध्यमातून समाजमाध्यमांत वावरतांना, आर्थिक व्यवहार करतांना खबरदारी आवश्यक आहे. त्याद्वारेच आपण सायबर   विश्वात आपली फसवणूक टाळू शकतो, त्यासाठीच सायबर जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी आज येथे केले. ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत रायगड जिल्हा पोलीस व जिल्हा माहिती कार्यालय, रायगड यांनी संयुक्त पणे माध्यम प्रतिनिधींसाठी सायबर जनजागृती कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे उदघाटन जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या हस्ते आज पोलीस अधिक्षक कार्यालयातील कॉन्फरन्स सभागृहात   करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील, सायबर गुन्हे शाखेचे पी. आय. एन.एम.गवारे, पी.एस.आय. शिवसांभ ईश्वर स्वामी, पीआरओ एपीआय आर.एन.राजे,  प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने, एस.जे.भोईर,जे.व्ही.पाटील तसेच माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. लोकराज्यच्या 'आपले पोलीस आपली अस्मिता' या विशेषांकाचे विमोचन श्री. पारसकर व श्री. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. श्री. पारस्कर ...

सहकार मंत्री ना.सुभाष देशमुख यांचा दौरा (सुधारीत)

          अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22- राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना. सुभाष देशमुख हे मंगळवार दि.23 रोजी जिल्हादौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम याप्रमाणे- मंगळवार दि.23 रोजी सकाळी पावणे नऊ वा. बोटीने मांडवा जेट्टी येथे आगमन व मोटारीने रेवदंड्याकडे प्रयाण, सकाळी पावणे दहा ते सव्वा दहा यावेळात आप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट, स्थळ रेवदंडा, सकाळी सव्वा दहा वा. अलिबागकडे प्रयाण, सकाळी 11 वा. सहकार व पणन विभागाची आढावा बैठक, स्थळःजिल्हाधिकारी कार्यालय,अलिबाग,  दुपारी एक वा. पेण अर्बन सहकारी बॅंकेची बैठक, स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय,अलिबाग, दुपारी दीड ते अडीच वा.दरम्यान राखीव, दुपारी अडीच वा.रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आढावा बैठक स्थळः रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, अलिबाग. दुपारी साडेतीन वा. भाजपा जिल्हा कार्यालयास भेट, दुपारी साडेचार वा. अलिबागहून मांडवा जेट्टीकडे मोटारीने रवाना. तेथून स्पीड बोटीने  मुंबईकडे प्रयाण. ०००००

अनधिकृत वाळु उत्खननःजिल्हाधिकाऱ्यांनी दिले संयुक्त कारवाईचे निर्देश

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22-   जिल्ह्यात वाळूचे अनधिकृत उत्खनन रोखून वाळूमाफियांना पायबंद बसावा यासाठी महसूल प्रशासन कडक कारवाई करीत आहे. त्यासाठी मेरिटाईम बोर्ड, पोलीस, परिवहन विभाग आणि वन विभाग हे महसूल विभागासोबत या कारवाईत सहभागी होतील, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी आज येथे दिले. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात (दि.20 रोजी) एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी भारत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उप वनसंरक्षक अलिबाग मनिष कुमार, प्रांत, तहसिलदार, पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्हा प्रशासनाने आता पर्यंत 13 कोटींचा वाळू लिलाव केला आहे. उर्वरित वाळूचा लिलाव करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये अनाधिकृत वाळू उत्खनन होणार नाही याकरीता जिल्हा प्रशासन दक्षता घेत आहे. अनाधिकृत वाळू उत्खनन करण्याऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. पकडलेले सक्शन पंप व बोटी नष...