जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 19 मे रोजी




अलिबाग,जि. रायगड, दि.15-(जिमाका) भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पुढील शैक्षणिक वर्षासाठीची 09 विद्यार्थ्यांच्या रिक्त जागांसाठी निवड चाचणी 19 मे 2018 रोजी जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर येथे घेण्यात येणार आहे.
            चालू शैक्षणिक वर्षात (2017-18) इ.8वी मध्ये रायगड जिल्ह्यातील  शासनमान्य शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.  इच्छुक विद्यार्थ्यांनी 5 एप्रिल 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत.  यासाठीचे माहितीपत्रक व अर्ज  www.nvshq.org आणि www.invraigad.org  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय निजामपूर ता.माणगाव जि.रायगड  यांचेशी संपर्क साधावा. संपर्कासाठी 02410-268236  हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध आहेत.  तरी अधिकाधिक विद्यार्थी-विद्यार्थीनींनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय, यांनी केले आहे. 
०००००

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक