Posts

Showing posts from May 8, 2022

प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेंतर्गत सौर कृषी पंपासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या ई-पोर्टलद्वारे ऑनलाईन/धनाकर्षाद्वारे लाभार्थी हिस्सा भरावा

अलिबाग,दि.13 (जिमाका):-  राज्यातील महाकृषी अभियानांतर्गत प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेंतर्गत सौर कृषी पंप आस्थापित करण्यासाठी महाऊर्जाच्या ई-पोर्टलवर प्राप्त झालेल्या अर्जदारांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एस.एम.एस. द्वारे कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार लाभार्थी शेतकऱ्यांनी ऑनलाईन/धनाकर्षाद्वारे लाभार्थी हिस्सा भरावयाचा असल्यास ई-पोर्टलवर धनाकर्षाची (डिमांड ड्राफ्ट) प्रत अपलोड करुन नजीकच्या महाऊर्जाच्या कार्यालयास भेट देऊन जमा करावा.             जिल्ह्यातील सौर कृषी पंपाचा सर्वसाधारण लाभार्थी कोटा संपल्यानंतर काही सर्वसाधारण गटातील शेतकरी अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीच्या घटकांमधून चुकीचे जातीचे प्रमाणपत्र ई-पोर्टलवर अपलोड करुन अर्ज सादर करीत आहेत. संबंधित अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर संबंधित लाभार्थी अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीच्या घटकांमधील नसून सर्वसाधारण लाभार्थी म्हणून लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी महाऊर्जाच्या संबंधित विभागीय कार्यालयामध्ये भेट देऊन अर्ज स्विकारण्यासाठी तगादा लावत आहेत.             तेव्हा सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांनी, अनुसूचित जाती/अनुसूचित जम

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा दि.14 व 15 मे रोजीचा रायगड जिल्हा दौरा

Image
  अलिबाग,दि.13 (जिमाका):- राज्यमंत्री, उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे यांचा शनिवार, दि.14 मे 2022 व रविवार, दि.15 मे 2022 रोजीचा रायगड जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे- शनिवार, दि.14 मे 2022: सकाळी 08.30 वाजता अलिबाग येथून मोटारीने रेवदंडा, ता.अलिबाग कडे प्रयाण. सकाळी 09.00 वाजता रेवदंडा येथे आगमन व पद्मभूषण डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट. सकाळी 09.30 वाजता रेवदंडा येथून मोटारीने श्रीवर्धनकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता श्रीवर्धन येथे आगमन व श्रीवर्धन तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमीपूजन. दांडगुरी येथे रस्ता उद्घाटन, साखरोने येथे रस्ता उद्घाटन, मोहितेवाडी येथे स्मशानशेड उद्घाटन, वाळवटी येथे अंतर्गत रस्ता उद्घाटन. रात्री श्रीवर्धन येथे मुक्काम. रविवार, दि.15 मे 2022: सकाळी 09.30 वाजता श्रीवर्धन बीच बांधकाम कामाची पाहणी. सकाळी 10.00 वाजता श्रीवर्धन शहर विविध विकास कामे- 1.श्रीवर्धन नगरपरिषद जीवनेश्वर कोंड रस्ता कामाचा शुभारंभ, 2.श्रीवर्धन नगरप

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा रायगड जिल्हा दौरा

Image
अलिबाग, दि.13 (जिमाका):- नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री श्री.एकनाथ शिंदे हे शनिवार, दि.14 मे 2022 रोजी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे: सकाळी 10.00 वाजता रिलायन्स कंपनीचे हेलिपॅड कोपरखैरणे येथे आगमन व तेथून खाजगी हेलिकॉप्टरने रेवदंडा, जि.रायगड कडे प्रयाण. सकाळी 10:45 वाजता जेएसडब्ल्यू कंपनीचे हेलिपॅड येथे आगमन व येथून मोटारीने रेवदंडा जि.रायगड कडे प्रयाण. सकाळी 11.15 वाजता रेवदंडा येथील स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती व राखीव. दुपारी 02.00 वाजता रेवदंडा येथून मोटारीने जेएसडब्ल्यू कंपनीच्या हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 2:30 जेएसडब्ल्यू कंपनीचे हेलिपॅड, साळाव येथून खाजगी हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण. 00000

माणगाव तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठी सजा निजामपूर कार्यालयाकरिता शासकीय जागा हस्तांतरित

अलिबाग ,  दि. 13 ( जिमाका):-  तलाठी कार्यालय हे नागरिकांसाठी ग्रामीण स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे कार्यालय मानले जाते. या कार्यालयातून जनतेची महसूलविषयक सर्व प्रकारची महत्त्वाची कामे केली जातात. ग्रामीण भागातील जनतेची महसूलविषयक कामे सुलभ व्हावीत ,  प्रशासन गतिमान व्हावे तसेच येथील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या व या कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने या मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयाची इमारत सुसज्ज व अद्ययावत असणे ,  ही काळाची गरज होती ,  या दृष्टीने पालकमंत्री या नात्याने कु.आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष देण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर माणगाव तालुक्यातील मंडळ अधिकारी निजामपूर व तलाठी सजा निजामपूर या कार्यालयांच्या इमारतींच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी केली होती. याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी  संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मंडळ अधिकारी निजामपूर व तलाठी सजा निजामपूर साठी मौजे निजामपूर ता.माणगाव येथील स.नं. 108/ ब ,0-11-20  हे.आर.क्षेत्र ही शासकीय जमीन महसूल मुक्त व सारामाफीने तहसिलदार माणगाव यांच्याकडे मंडळ अधि

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहे व निवासी शाळेतील मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

  अलिबाग, दि.12 (जिमाका):-   समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्या अधिनस्त मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अलिबाग, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, अलिबाग, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, महाड, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, तळा, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह महाड, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, पनवेल, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, पाली अशी 07 शासकीय वसतिगृहे व अनुसुचित जाती नवबौध्द मुलांकरिता शासकीय निवासी शाळा, जावळी ता.माणगाव ही 01 निवासी शाळा कार्यरत आहे. शासकीय वसतिगृहात गरीब, हुशार, होतकरु, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. याबाबत आरक्षण अनुसूचित जाती- 80 % अनुसूचित जमाती- 03 %, विमुक्त जाती, भटक्या जमाती- 05%, विशेष मागास प्रवर्ग- 02 %, आर्थिकदृष्ट्या मागास- 05 %, अनाथ- 03%, अपंग- 02% मोफत निवास व भोजन व्यवस्था, शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व महाविद्यालयीन प्रवेशितांकरिता लेखन साहित्याकरिता रु.4 हजार शैक्षणिक स

विशेष लेख: गौरव सामाजिक संस्था अन् व्यक्तींचा..पुढाकार सामाजिक न्याय विभागाचा..!

Image
समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व यामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाज सेवक यांना सामाजिक न्याय विभागाकडून दरवर्षी विविध पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. सन 2019-2020, 2020-2021 व 2021-2022 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांकरिता अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे पुरस्कार कोणते, त्याचे स्वरूप काय, निवडीचे निकष कोणते याविषयी जाणून घेवू.. या लेखाच्या माध्यमातून.!   डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार पुरस्काराचे स्वरूप: व्यक्ती- 51 व्यक्तींना प्रत्येकी रु.15 हजार (धनाकर्ष), संस्था- 10 संस्थांना प्रत्येकी रु.25 हजार (धनाकर्ष) पुरस्कारासाठी निवडीचे निकष: व्यक्तीसाठी- अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, दिव्यांग कल्याण शेत्रात उल्लेखनीय कार्याचा पंधरा वर्षाचा अनुभव, संस्थेसाठी- संस्थेमध्ये कोणताही गैरव्यवहार नसावा. संस्थेचे समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आवश्यक. मागील पाच वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल आवश्यक.   साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार पुरस्काराचे स्वरूप: व्यक्ती- 25 व्यक्तींना

संजय गांधी निराधार योजना कमिटीची सभा संपन्न; सभेत सर्व योजनांचे 28 अर्ज मंजूर

अलिबाग, दि.11 (जिमाका):-   अलिबाग तालुका संजय गांधी निराधार योजना कमिटीची सभा दि.09 मे 2022 रोजी संजय गांधी योजना कमिटी अलिबागचे अध्यक्ष श्री.प्रकाश बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अलिबाग तहसिलदार कार्यालय येथे संपन्न झाली. या सभेस श्री.हेमनाथ खरसांबळ, श्री.उत्तम पाटील, श्री.सुनिल पाटील, श्रीमती दक्षता राऊत, श्रीमती निलिमा भगत हे अशासकिय सदस्य तसेच श्री.हरिश्चंद्र कुंडल व श्रीमती रुबिना भगत हे शासकिय सदस्य उपस्थित होते. यावेळी संजय गांधी योजना नायब तहसिलदार श्रीमती मानसी पाटील यांनी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, इत्यादी योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. या सभेत सर्व योजनांचे 28 अर्ज मंजूर करण्यात आले. अलिबाग तालुक्यात मार्च 2022 अखेर संजय गांधी योजनेंतर्गत 1 हजार 163, श्रावणबाळ योजनेंतर्गत 801, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेंतर्गत 336 असे एकूण 2 हजार 300 लाभार्थी लाभ घेत असून या लाभार्थ्यांना वर्षभरात एकूण रु.02 कोटी 62 लाख 72 हजार इतके अनुदान वाटप करण्यात आले आहे. 00000

लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा 24 वा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

Image
महामहिम राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी आणि पालकमंत्री कु.आदिती तटकरे  यांनी दिल्या ऑनलाईन शुभेच्छा   अलिबाग, दि.11 (जिमाका):- लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा 24 वा दीक्षांत समारंभ आज बुधवार, दि.11 मे 2022 रोजी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली चे अध्यक्ष प्रा.डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, विद्यापीठ परीक्षा नियंत्रक प्रा.डॉ.विवेक साठे, कार्यकारी परिषदेचे सदस्य प्राचार्य नागेश आलुरकर, प्रा.एस.एल.नलबलवार, प्राचार्य व्ही.के.रेदासनी, प्राचार्य उल्हास शिंदे, प्राचार्य राहुल बारजिभे, प्राचार्य अभिजीत वाडेकर, प्राचार्य किशोर ओतारी, प्राचार्य नरेंद्र कान्हे, डॉ.श्रीमती एम.डी.लड्डा, डॉ.विवेक वाडके, श्रीनिवास बेंडखळे, राजेश पेडणेकर, प्राचार्य दिनकर घेवाडे, डॉ.अमित शेष, विद्यापीठातील इतर प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी दीक्षांत समारंभास उपस्थित विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करताना महामहिम राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती श्री.भगत

ग्रामीण डाक सेवकांच्या (जीडीएस ) भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे टपाल विभागाचे आवाहन

  अलिबाग, दि.11 (जिमाका):-   इच्छुक आणि पात्र उमेदवारासाठी रायगड डाक विभाग अधीक्षक डाकघराकडून ग्रामीण डाक सेवकांच्या (जीडीएस ) 111 जागांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ,   इच्छुक उमेदवाराला   02 मे 2022   ते   05 जून 2022   या कालावधीत   http://indiapostgdsonline.gov.in   या संकेतस्थळाद्वारे पोर्टलवर स्वतःची नोंदणी करावी लागेल. उमेदवारासाठी असलेल्या अन्य अटी पुढीलप्रमाणे आहेत :-     माध्यमिक शाळा म्हणजे इयत्ता   10 वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ,   जीडीएस   श्रेणींसाठी इच्छुक   उमेदवारांना केंद्र सरकार/राज्य सरकार/विद्यापीठे/मंडळ/खाजगी   संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही संगणक प्रशिक्षण संस्थेकडून किमान   60   दिवसांच्या मूलभूत संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ज्या प्रकरणांमध्ये उमेदवाराने दहावी किंवा बारावी किंवा इतर कोणत्याही उच्च शैक्षणिक स्तरावर संगणक हा विषय म्हणून अभ्यासला   असेल ,   अशा प्रकरणांमध्ये मूलभूत संगणक ज्ञान प्रमाणपत्राची ही आवश्यकता शिथिल असेल अशा प्रकरणांमध्ये वेगळे प्रमाणपत्र जोडण्

चौकशी, प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका (पॅनल) तयार करण्यासाठी अर्ज सादर करावेत

    अलिबाग, दि.11 (जिमाका):-   महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83   व 88 अन्वये चौकशी, प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका (पॅनल)   तयार करण्यासाठी सहकार   खात्यातून निवृत्त झालेले अधिकारी (वयाची 70 वर्षे पूर्ण न झालेल्या) निवृत्त न्यायाधीश, वकील (सनद प्राप्त) चार्टर्ड अकाउटंट यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.   अर्जाचे नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण, जिल्हा उपनिबंधक/सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात दि. 11 मे 2022 ते दि. 10 जून 2022 या कालावधीत कार्यालयीने वेळेत मिळू शकतील.   या अर्जासोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, रहिवासी पुरावा, जन्मतारीख पुरावा, शैक्षणिक अर्हतेसंबंधी कागदपत्रे (पदवी प्रमाणपत्र) वकील असल्यास बार कौन्सिल सर्टिफिकेट जोडावे, अनुभवासंदर्भात आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. याबाबतची जाहिरात सूचना कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ.सोपान शिंदे यांनी कळविले आहे. ०००००००

रायगड जिल्हा पोलीस व स्वदेस फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पोलीस पाटलांचा क्षमता बांधणी कार्यक्रम संपन्न

Image
  अलिबाग, दि.10 (जिमाका):-  रायगड जिल्हा पोलीस व स्वदेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल स्वदेस उपक्रमांतर्गत कृषी विभाग, डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) योजना या विषयावर झूम मीटिंगच्या माध्यमामधून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले व माणगाव तालुका कृषी अधिकारी रवींद्र पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी स्वदेस फाउंडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार, सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते. पोलीस पाटलांचा क्षमता बांधणी कार्यक्रम वर्षभर सुरू राहणार असून त्यामध्ये शासकीय योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम व विविध विषयांवर प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या पुढाकाराने व पोलीस निरीक्षक श्री.केरूभाऊ कोल्हे यांच्या सहकार्याने व स्वदेस फाउंडेशन यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 00000

सखी वन स्टॉप सेंटर चालविण्यासाठी इच्छुक पात्रताधारक स्वयंसेवी संस्थांनी अर्ज करण्याचे महिला व बालविकास विभागाचे आवाहन

अलिबाग, दि.10 (जिमाका):-  केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून रायगड जिल्ह्यासाठी, सखी वन स्टॉप सेंटर मंजूर करण्यात आलेले असून हे केंद्र सारंग विश्रामगृह, अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर येथे कार्यरत आहे. सखी वन स्टॉप सेंटर मार्फत संकटग्रस्त महिलांना वैद्यकीय सुविधा, पोलीस मदत, समुपदेशन, कायदेशीर मदत, तात्पुरता निवारा इ. सेवा एकाच ठिकाणी पिडीत महिलांच्या आवश्यकतेनुसार पुरविल्या जातात. अलिबाग सखी वन स्टॉप सेंटर येथील दैनंदिन कामकाज प्रभावीपणे चालण्यासाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्रताधारक स्वयंसेवी संस्थेची निवड करावयाची आहे. योजनेच्या मार्गदर्शिकेनुसार महिलांच्या क्षेत्रात समुपदेशन, महिलांचे हक्क, सक्षमीकरण, महिलांवर होणाऱ्या हिंसाविरोधी काम करणाऱ्या जिल्हयातील इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी त्यांचे विहित नमून्यातील अर्ज दि.01 जून 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत रायगड जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयात सादर करावेत. विहीत मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. इच्छुक मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांनी विहित नमुन्यातील अर्जासाठी केंद्र शा

बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याबाबत कृषी विभागाचे आवाहन

     अलिबाग, दि.10 (जिमाका):- खरीप हंगाम 2022 सुरुवात होत आहे. विविध कंपन्यांचे विविध प्रकारचे बियाणे कृषी सेवा केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. आपली फसवणूक होवू नये व नुकसान होवू नये, याकरिता शेतकरी बांधवांनी बियाणे खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनी बियाणे खरेदी करताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.      गुणवता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदीस प्राधान्य द्यावे. बनावट/ भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करावी. पावती व बियाण्यांचा संपूर्ण तपशिल जसे पीक, बाण, संपूर्ण लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, किंमत खरेदीदाराचे संपूर्ण नाव व पत्ता, विक्रेत्याचे नाव इत्यादी नमूद करावे तसेच रोख किंवा उधारीची पावती घ्यावी. खरेदी केलेल्या बियाण्याचे वेष्टन/पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. खरेदी केलेले बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्याची पाकीटे सिलबद/मोहरबंद असल्याची खात्री करावी. बिय

राजपुरी येथील हरविलेली व्यक्ती आढळल्यास मुरुड पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन

अलिबाग, दि.10 (जिमाका):-  मुरुड तालुक्यातील रा.राजपुरी येथील पूनम उमेश मोनांक, वय-30 वर्ष, या दि. 16 मार्च 2022 पासून मौजे राजपुरी येथील राहत्या घरातून कपडे धुवायला जाते, असे सांगून घरामधून निघून गेल्या आहेत. त्या अद्यापपर्यंत परत घरी आलेल्या नाहीत, अशी तक्रार दि.18 मार्च 2022 रोजी मुरुड पोलीस ठाणे येथे दाखल झाली आहे. बेपत्ता असलेल्या पूनम उमेश मोनांक यांचे वर्णन पूनम उमेश मोनांक, वय 30 वर्ष, उंची 05 फूट, बांधा सडपातळ, वर्ण गोरा, नेसूस-लाल रंगाची फुले असलेली मोती रंगाची साडी व गुलाबी रंगाचा ब्लाऊज, गळ्यात छोटे बॅन्टेक्सचे मंगळसूत्र, कुडी, नाकात सोनाची चमकी, हातात हिरव्या बांगड्या असे आहे. या महिला इसमाचा आजपर्यंत शोध लागलेला नाही. तरी या बेपत्ता महिला कोणालाही दिसल्यास वा आढळून आल्यास तात्काळ मुरुड पोलीस ठाणे येथे दूरध्वनी क्रमांक 02144-274033 येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक मुरुड पोलीस ठाणे वाय.टी.निकाळे यांनी केले आहे. 00000  

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

अलिबाग, दि.10 (जिमाका):-   उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.श्री.उदय सामंत हे बुधवार, दि.11 मे 2022 रोजी लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे येणार असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे- सकाळी 06.30 वाजता शासकीय निवासस्थान, रत्नसिंधू बंगला, मादाम कामा रोड, मुंबई येथून मोटारीने माणगाव, जि.रायगड कडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह, माणगाव, जि.रायगड येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, माणगाव येथून मोटारीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे कडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जि.रायगड येथे आगमन व राखीव. सकाळी 11.00 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे- 24 व्या दीक्षांत समारंभास उपस्थिती, (स्थळ: डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे जि.रायगड, संदर्भ: कुलगुरू डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जि.रायगड). दुपारी 01.00 वाजता लोणेरे, जि.रायगड येथून मोटारीने मुंबई कडे प्रयाण. 00000

महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा दि.11 मे रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील दौरा

Image
अलिबाग, दि.10 (जिमाका):-  लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा चोविसावा दीक्षांत समारंभ उद्या बुधवार, दि.11 मे 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता महामहीम राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती श्री.भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,  लोणेरे   या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रा.डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे हे तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.श्री.उदय सामंत, पर्यटन, खनिकर्म, उद्योग राज्यमंत्री तथा रायगड पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 00000

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात 133 तरूण नव उद्योजक

10 कोटीचे 67 लाख रुपयांचे कर्ज वाटप,  1 कोटी, 19 लाख रुपयांचा व्याज परतावा   अलिबाग, दि.09 (जिमाका):-  मराठा समाजातील तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध्‍ा करून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने जिल्हयात 133 तरूणांना नवउद्योजक होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. विविध बँकांकडून वेगवेगळया व्यवसायासाठी तब्बल 10 कोटी 67 लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आलेले असून त्यावरील 1 कोटी 19 लाख रूपयांचा व्याज परतावा महामंडळाने लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्यक्ष लाभ दिला आहे. कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांना बँकेकडे कर्जाचा हफ्ता व व्याजाची रक्कम नियमित भरल्यानंतर व्याज परतावा देण्यात येतो. जिल्हा कौशल्य विेकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड अलिबाग या कार्यालयामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. व्यवस्थापकीय संचालक श्री.एम.व्ही. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळाचे कामकाज सुरु आहे, अशी माहिती रायगड जिल्हा समन्वयक श्रीमती अंजली पाटील यांनी दिली. या महामंडळाकडून सन 2017 पासून राज्यभर मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी शून्य टक्के

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व दाखल अशी एकूण 18 हजार 665 प्रकरणे निकाली

9 कोटी 91 लाख 61 हजार 13 रूपयाची  तडजोड रक्कम वसूल   अलिबाग, दि.09 (जिमाका):-  न्यायालयात वर्षानुवर्षवाद करीत वेळ, पैसा आणि ताकद खर्च करण्यापेक्षा दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेवून लोकन्यायालयात समेट घडवावा, असा प्रवाह भारतीय न्यायालयांच्या इतिहासात गेल्या दशकात प्रकर्षाने रूढ झालेला आहे. दि.07 मे 2022 रोजी रायगड जिल्ह्यात झालेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व व दाखल अशी एकूण 18 हजार 665 प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी यांनी दिली आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तसेच न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची प्रकरणे ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील दाखलपूर्व व प्रलंबित अशी एकू