Posts

Showing posts from June 12, 2022

सामाजिक न्याय विभागाच्या अलिबाग येथील मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागास मुलींच्या शासकीय वसतिगृहात सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात मोफत प्रवेश

अलिबाग,दि.17 (जिमाका):-  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थीनींकरिता मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, गोंधळपाडा, अलिबाग येथे कार्यरत आहे. येथे इयत्ता 8वी पासून गरीब, हुशार, होतकरू मागासवर्गीय अनुसूचित जाती- 80% अनुसूचित जमाती – 3%, विमुक्त जाती भटक्या जमाती – 5%, आर्थिक मागास व इतर मागासवर्गीय दारिद्र रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थिनी – 5%, विशेष मागास प्रवर्ग - 2%, अनाथ- 2%, अपंग- 3% यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. वसतिगृहात विद्यार्थीनींकरिता मोफत निवास व्यवस्था असून नाश्ता (दररोज पोहे /शिरा / उपीट इ. पैकी एक, उकडलेली दोन अंडी, सफरचंद, ऋतूमानानुसार एक फळ व दूध) तसेच भोजन व्यवस्थेमध्ये जेवण (डाळ, भात चपाती, भाजी / उसळ, लोणचे, पापड इत्यादीसह आठवड्यातून दोन वेळा मांसाहार देण्यात येते. अभ्यासासाठी लागणारे वह्या, पुस्तके, शैक्षणिक व लेखन साहित्य देखील विनामूल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून दरमहा रु.600 निर्वाहभत्ता दिला जातो. तसेच शालेय व गणवेश पात्र महा. विद्यार्थीनींना दोन संचाकरिता गणवेश भत्ता

सार्वजनिक ग्रंथालय संचालकांनी ग्रंथालयाचा वार्षिक व अंकेक्षण अहवाल जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास सादर करावा

अलिबाग,दि.17 (जिमाका):-  जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालय संचालकांनी आपल्या ग्रंथालयाचा विहीत नमुन्यामधील परिपूर्ण वार्षिक अहवाल दि.30 जून 2022 पर्यंत व अंकेक्षण अहवाल दि.31 ऑक्टोबर 2022 पर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, डोंगरे हॉलच्या वर, पोस्ट ऑफिस समोर, ता.अलिबाग, जि.रायगड येथे सादर करावा, तसेच मिळालेल्या निधीअभावी अनुदान प्राप्त न झाल्यास होणाऱ्या आर्थिक नुकसानीस संबंधित शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे कार्यकारी मंडळ जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी, असे प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित ब. पवार यांनी कळविले आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांनी महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम 1967 व महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये नियम 1970 सहाय्यक अनुदान आणि इमारत व साधनसामग्री मान्यतेनुसार शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना उपलब्ध निधीच्या अधीन राहून परीक्षण विविध पद्धतीने केले जाते. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये 170 अनुदान आणि इमारत व साधन सामुग्री सामान्यतः मधील प्रकरण 6 कलम 25 नुसार शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या संचालक आणि ग्रंथालयाची

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि.21 जून रोजी अलिबाग पोलीस परेड ग्राऊंड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन

  अलिबाग, दि.17 (जिमाका):-  आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि.21 जून 2022 रोजी सकाळी 07.30 वाजता, केंद्रीय संचार विभाग, प्रादेशिक कार्यालय, अहमदनगर, महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातर्फे अलिबाग येथील पोलीस परेड ग्राऊंड येथे एका विशेष प्रचारात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये योग अभ्यासक, मार्गदर्शन, रॅली व महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन्स, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र यांच्यासह प्रिझम सामाजिक विकास संस्था, श्री अंबिका योग कुटीर, ठाणे यांचे प्रतिनिधीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 00000

मिशन वात्सल्य समितीतर्फे कागदपत्र तपासणी शिबीर संपन्न

Image
    अलिबाग,दि.16(जिमाका) : कोविड- 19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांना व कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल, विधवा झालेल्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रांचा पूर्तता करुन त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी “ शासन आपल्या दारी ” या संकल्पनेवर आधारित मिशन वात्सल्य योजनेची राज्यात अमंलबजावणी करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.       त्यानुंषगाने कोविड-19 मध्ये मृत्यू पावलेल्या एकल विधवा महिला व बालके किंवा बालकांचा सांभाळ करणारी पालके यांच्यासाठी आज पेण तहसिल कार्यालय येथे सकाळी 11.00 ते 5.00 या वेळेमध्ये कागदपत्र तपासणी तसेच मिशन वात्सल्य योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांकरिता तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पेण मार्फत 12 वर्षांवरील नागरिकांचे कोविड लसीकरण आणि वैद्यकीय तपासणी शिबीर पेण तहसिलदार तथा मिशन वात्सल्य समिती तालुका अध्यक्षा   श्रीमती स्वप्नाली डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली   संपन्न झाले.    यावेळी तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समितीचे सदस्यही उपस्थित होते. ०००००००००००

केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यांना लाभ द्यावा -राज्य अन्‍न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे

Image
    अलिबाग,दि.16 (जिमाका) : अन्न धान्याच्या योजनेपासून कोणताही लाभार्थी वंचित राहू नये, म्हणून केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबवित आहे. केंद्र व राज्य शासनाच्या या योजनांचा लाभ जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यांना द्यावा, असे प्रतिपादन   राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश सूर्यकांत ढवळे यांनी आज येथे केले.        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासमवेत Aepds अंतर्गत नियतन, उचल वाटपाचा आढावा बैठकीत ते बोलत होते.    यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, सहायक पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी नितीन मंडलिक तसेच पुरवठा विभाग व जिल्हा परिषद विभागाचे इतर अधिकारी कर्मचारी, उपस्थित होते.        यावेळी मार्गदर्शन करताना श्री.ढवळे म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेंमधून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांमधून अन्न धान्याचे वाटप करण्यात येते.जिल्ह्यात काही लाभार्थी असे आहेत की, ज्यांना अद्याप शिधापित्रका मिळाली नाही, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून तो शिधापत्रिका मिळण्यास पात

राज्य अन्‍न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

    अलिबाग,दि.15 (जिमाका) :   राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश सूर्यकांत ढवळे हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.       गुरुवार दि.16 जून 2022 रोजी सकाळी 9:30 वा. मुंबई येथून रायगड येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे रवाना.     सकाळी 11.00 ते दुपारी 12:30 वा. पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा तक्रार निवारण अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासमवेत Aepds अंतर्गत नियतन, उचल वाटपाचा आढावा. दुपारी 1:30 ते दुपारी 3.00 वा.पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिक्षणाधिकारी प्राथमिक व मनपा प्रशासकीय अधिकारी (शापोआ) यांच्यासमवेत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत नियतन, उचल व वाटपाचा आढावा. दुपारी 3.00 ते सायं.4.30 वा.पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा कार्यक्रम अधिकारी व प्रकल्प अधिकारी शहरी व ग्रामीण यांच्यासमवेत महिला व बाल विकास सेवा योजनेंतर्गत नियतन, उचल वाटपाचा आढावा. सायं. 5.30 वा. शासकीय विश्रामगृहाकडे रवाना व मुक्काम.      शुक्रवार, दि. 17 जून 2022 रोजी सकाळी 11.00 ते सायं.6.00 वा.पर्यंत शासकीय धान्

जुलै ते डिसेंबर 2022 या कालावधीतील मोटार वाहन निरीक्षकांचा दौरा कार्यक्रम जाहीर

    अलिबाग,दि.15 (जिमाका) :   उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा माहे जुलै ते डिसेंबर 2022 या कालावधीतील दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. माहे जुलै 2022 : बुधवार, दि.13 जुलै 2022 रोजी, ता.रोहा, मंगळवार, दि.12 जुलै 2022 रोजी, ता.मुरुड, शुक्रवार, दि.15 जुलै 2022 व शुक्रवार, दि.29 जुलै 2022 रोजी, ता.अलिबाग, सोमवार, दि.11 जुलै 2022 व सोमवार, दि.25 जुलै 2022 रोजी, ता.महाड, मंगळवार, दि.26 जुलै 2022 रोजी,ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.27 जुलै 2022 रोजी, माणगाव. माहे ऑगस्ट 2022 : शुक्रवार, दि.12 ऑगस्ट 2022 रोजी, ता.रोहा, गुरुवार, दि.11 ऑगस्ट 2022 रोजी, ता.मुरुड, शुक्रवार, दि.5 ऑगस्ट 2022 व शुक्रवार, दि.26 ऑगस्ट 2022 रोजी, ता.अलिबाग, बुधवार, दि.10 ऑगस्ट 2022 व सोमवार, दि.22 ऑगस्ट 2022 रोजी, ता.महाड, मंगळवार, दि.23 ऑगस्ट 2022 रोजी,ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.24 ऑगस्ट 2022 रोजी, माणगाव. माहे सप्टेंबर 2022 : बुधवार, दि.14 सप्टेंबर 2022 रोजी, ता.रोहा, मंगळवार, दि.13 सप्टेंबर 2022 रोजी, ता.मुरुड, शुक्रवार, दि.16 सप्टेंबर 2022 व शु

अलिबाग पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी 12 तास खुले ग्राहकांनी डाक विभागाच्या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

    अलिबाग,दि.15 (जिमाका) : सर्वसामान्य जनतेसाठी अविरत सेवा देणारा डाक विभाग जनतेला जवळचा वाटत असल्याने पोस्ट ऑफिसमध्ये नेहमी गर्दी दिसते, पुष्कळ वेळा या गर्दीमुळे ग्राहक पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याचे टाळतात. त्याच गोष्टींचा विचार करून ग्राहकांची गैरसोय दूर करण्यासाठी आता रायगड डाक विभागाने अलिबाग मुख्य डाकघर 12 तास ग्राहकांसाठी चालू ठेवण्यास सुरुवात केली आहे.                याची सुरुवात वटपौर्णिमेपासून अलिबाग मुख्य डाकघर येथे झाली आहे. यातून ग्राहकांना आपली वेळ सांभाळून गर्दी नसताना डाक विभागाच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे. बचत बँक आणि बहुउद्देशीय खिडकी रजिस्ट्रर, पार्सेल या सर्व सेवा बारा तास ग्राहकांसाठी सुरू राहणार आहेत.                लोकाभिमुख सरकारी योजना राबविणारे पोस्ट ऑफिस नेहमी ग्राहकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असते त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई क्षेत्रातील ठाणे, पनवेल यासोबत ग्रामीण भागातील अलिबाग मुख्य डाकघर या ठिकाणी सुद्धा ही सेवा उपलब्ध झाली आहे.               यामुळे नोकरदार ग्राहकांनाही आपल्या कार्यालयाच्या वेळा सांभाळून आता पोस्ट ऑफिसच्या योजनांचा लाभ सुल

माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या वतीने शाळा प्रवेशोत्सव साजरा

Image
अलिबाग,दि.15 (जिमाका):-  माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या वतीने आज दि.15 जून 2022 रोजी  “ शाळा प्रवेशोत्सव ”  साजरा करण्यात आला. इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व बालकांचे गुलाब पुष्प, खाऊ व सोबत मास्क देवून स्वागत करण्यात आले.त्याचबरोबर इयत्ता 1 ली ते 4 थी वर्गातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटपही करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षक आणि पालक या कार्यक्रमास उपस्थित होते. येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी, याकरिता पालिका ग्रंथालयात मोफत प्रवेश दिला जाणार असून, बाल साहित्य आणि पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त आवश्यक ग्रंथसंपदा विद्यार्थ्यांसाठी खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षकांना आवश्यक पुस्तकांची यादी पाठविण्याचे आवाहन माथेरान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी केले आहे. 00000

अधीक्षक डाकघर रायगड विभाग अलिबाग येथे दि.30 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन

Image
अलिबाग,दि.15(जिमाका): अधीक्षक डाकघर रायगड विभाग, अलिबाग यांच्या कार्यालयाद्वारे दि.30 जून 2022 रोजी, सकाळी ठीक 11.00 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. या अदालतीमध्ये रायगड विभागातील डाक सेवेसंबंधित तक्रार, समस्या ज्याचे निवारण सहा आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ. असणे आवश्यक आहे. इच्छूक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतीत अधीक्षक डाकघर, रायगड विभाग श्री.डॉ.संजय लिये   यांच्याकडे दि. 24 जून 2022 पर्यंत पोहोचेल अशा रितीने पाठवावी, असे अधीक्षक डाकघर, रायगड विभाग डॉ.संजय लिये   यांनी कळविले आहे. 000000

आरक्षण व सोडतीबाबत हरकत व सूचना स्विकारण्याबाबत आरक्षण अधिसूचना नगरपरिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच नगरपरिषद व इतर कार्यालयाच्या सूचनाफलकांवर प्रसिध्द

              अलिबाग,दि.14 (जिमाका):- मा.राज्य निवडणूक आयोग यांच्या दि.09 जून 2022 रोजीच्या आदेशान्वये नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.       त्यानुषंगाने रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या आरक्षण व सोडतीची कार्यवाही दि. 13 जून 2022 (सोमवार) रोजी पार पडली आहे.       या आरक्षण व सोडतीबाबत हरकत व सूचना स्विकारण्याबाबत आरक्षण अधिसूचना नगरपरिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच नगरपरिषद व इतर कार्यालयाच्या सूचनाफलक इ. वर प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे. ०००००

सागरी मत्स्यव्यवसाय,नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षणाचा इच्छुकांनी लाभ घ्यावा

                  अलिबाग,दि.14 (जिमाका):- मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व   परिचालन या   प्रशिक्षणाच्या   दि.01 जुलै 2022 पासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रायगड-अलिबाग येथे सुरु होणाऱ्या प्रशिक्षण सत्रासाठी रायगड जिल्ह्यातील युवकांकडून दि.29 जून 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.      प्रशिक्षणांतर्गत प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण केंद्राच्या 57 फूट लांबी असलेल्या, 63.35 टनेज क्षमतेच्या सिलेंडर संख्या 6 व 205 अश्वशक्तीचे इंजिन असलेल्या "मत्स्यप्रबोधिनी" नोंदणी क्र. IND-MH-3-MM-4266 या प्रशिक्षण नौकेद्वारे सागरी सफरीवर नेऊन प्रात्यक्षिक व सिध्दांतिक ज्ञान दिले जाते.         त्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे - प्रशिक्षण कालावधी 01 जुलै -2022 ते 31 डिसेंबर 2022 (6 महिने) आवश्यक   पात्रता :- उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे, (आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे), उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक, (शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडणे), क्रियाशील मच्छिमार व किमान एक वर्ष मासे

जिल्हा संसाधन व्यक्ती या पदाकरिता अर्ज सादर करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

अलिबाग,दि.14 (जिमाका):- आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन (PMFME) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्या वतीने जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा, हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तींची नामिकासूची (Panel Resource Persons) तयार करावयाची आहे. त्यासाठी या योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील अटी व शर्तीनुसार बंद लिफाफ्यातून अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्हा संसाधन व्यक्ती या पदाकरिता अटी व शर्ती पुढील प्रमाणे:- शिक्षण-पदवीधर (कोणत्याही शाखेचा) वय- कोणतीही अट नाही, अनुभव-सविस्तर प्रकल्प अहवाल (DRP) बनविणे, अर्ज सादरीकरण, बँक मंजूर पद्धती, प्रक्रिया व अन्नप्रक्रियेतील अत्याधुनिक तंत्रज्ञान इत्यादींची माहिती असणाऱ्यांना प्राधान्य, स्थानिकांना प्राधान्य. या पदाकरिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 20 जून 2022 आहे.  योजनेच्या मार्गदर्शक सूचना, अर्जाचा नमुना, सविस्तर पात्रता परिश्रमिक (मानधन) व इतर अटी शर्ती या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग येथे तसेच कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळा

सप्तसूत्री कार्यक्रम व कातकरी उत्थान कार्यक्रमांतर्गत खालापूर तालुक्यातील मौजे मिळ आदिवासी वाडी येथे शिबिर संपन्न

Image
अलिबाग,दि.13 (जिमाका):-  जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यातील खोपोली मंडळात, मौजे मिळ आदिवासी वाडी येथे  “ सप्तसूत्री कार्यक्रम व कातकरी उत्थान कार्यक्रमांतर्गत ”  सोमवार दि.13 जून 2022 रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये महसूल विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभाग, महिला व बाल संरक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जातीचे प्रमाणपत्रे, शिधापत्रिकांचे अद्यावतीकरण, उत्पन्नाचे दाखले व येथील ग्रामस्थांना आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी बालविवाह रोखण्याकरिता ग्रामस्थांमध्ये जनजागृती व उपाययोजनांबाबतही माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास महसूल विभाग, आदिवासी विभाग इत्यादी विभागातील अधिकारी-कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 00000

जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचयातमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

  मा.राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये राज्यातील 208 नगरपरिषदा व 13 नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम 2022 पुढीलप्रमाणे जाहिर करण्यात आला आहे. प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे-दि. 21 जून 2022, प्रारूप मतदार यादीवर हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी-दि. 21 जून 2022 ते दि. 27 जून 2022, अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी अधिप्रमाणित करून प्रसिध्द करणे-दि. 01 जुलै 2022, मतदार केंद्राची यादी प्रसिध्द करणे आणि मतदार केंद्र निहाय मतदार यादया प्रसिध्द करणे- दि. 05 जुलै 2022. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग , महाड, माथेरान, मुरूड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या प्रारुप मतदार यादीवर प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचना स्विकारण्याकामी संबंधित नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे प्रारुप मतदार यादीवरील हरकती स्विकारण्याचे ठिकाण, वेळ खालील प्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.             नगर परिषदेचे नाव-खोपोली नगर परिषद, प्रारुप व अंतिम मतदार यादी तयार करण

जिल्हा वार्षिक नियोजन निधीच्या माध्यमातून पोलीस विभागाचे बळकटीकरण

Image
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते  1 स्कॉर्पिओ, 16 बोलेरो जीप व 22 मोटारसायकली रायगड पोलीस विभागाकडे सुपूर्द      अलिबाग,दि.13(जिमाका):- जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या 1 स्कॉर्पिओ, 16 बोलेरो जीप व 22 मोटारसायकली पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आज पोलीस कवायत मैदान, अलिबाग येथे पोलीस विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या.      यावेळी आमदार महेंद्र दळवी, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे, अलिबाग उपविभागीय अधिकारी  प्रशांत ढगे, तहसिलदार मिनल दळवी, पोलीस विभागाचे अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.   सर्वप्रथम पोलीस कवायत मैदानात आगमन झाल्याबरोबर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांना पोलीस दलाकडून सलामी देण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते नव्या वाहनांचे  पूजन करण्यात आले व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे नव्या वाहनांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. त्यानंतर वाहनांना हिरवा झेंडा दाखवू

जिल्हा परिषदेच्या शाळांमधून 15 जूनपासून होणार "शाळा प्रवेशोत्सव" साजरा

  अलिबाग,दि.13 (जिमाका):-  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची प्रभावी अमलबजावणी होण्यासाठी 06 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी रायगड जिल्हा परिषद, अलिबाग शिक्षण विभागाकडून दि.15 जून 2022 रोजी  “ शाळा प्रवेशोत्सव ”  हा उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. तसेच सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात दि.15 जून 2022 रोजी सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळामध्ये प्रवेशीत होणाऱ्या विद्यार्थ्याच्या स्वागतासाठी प्रवेशोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. शाळापूर्व दिवशी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह शिक्षकांचे शाळेत आगमन होणार आहे. प्रवेश पात्र बालकांच्या याद्या ग्रामपंचायत व शाळा फलकावर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. प्रवेश पात्र बालकाची यादी लाऊडस्पीकरवर घोषित करून शैक्षणिक पदयात्रा व शिक्षकांच्या गृहभेटी व सरपंच, गावकरी, व्यवस्थापन समिती सदस्य, युवक, बचतगट, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वाच्या गृहभेटींचे नियोजन करण्यात आले आहे. शाळेचा परिसर गावकऱ्यांच्या सहाय्याने स्वच्छ करून सडा-रांगोळी व पानाफुलांनी सुशोभित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शाळेच्या पहिल्या

कोविड काळात पत्रकार उत्कर्ष समितीने केलेले कार्य उल्लेखनीय -पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
अलिबाग,दि.12(जिमाका):- गेली दोन वर्ष संपूर्ण जग कोविडमुळे त्रस्त होते. मात्र या संकटकाळात देखील पत्रकार उत्कर्ष समितीच्या सर्वच पदाधिकारी व सदस्यांनी पत्रकारितेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत जिल्ह्यात, राज्यात उल्लेखनीय कार्य केले, असे गौरवोद्गार माहिती व जनसंपर्कच्या राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज पनवेल येथे काढले. पत्रकार उत्कर्ष समिती, महाराष्ट्र राज्य अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आज पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके सभागृहात संपन्न झाला, त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी मान्यवर म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे निवृत्त सचिव व्ही.एस.म्हात्रे, मराठी इंडियन आयडॉल सागर म्हात्रे, अभिनेत्री अनघा कडू, महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई मुंढे, भावना घाणेकर, उद्योजक व समाजसेवक सुनील कोटीयन, सेंट विल्फ्रेड कॉलेजचे प्राचार्य डॉ.मृत्युंजयकुमार पांडे, समाजसेवक प्रकाशशेठ गायकवाड, धर्मेश दुबे, सतीश पाटील, डॉ.शिवदास कांबळे, पत्रकार   उत्कर्ष समितीचे अध्यक