Posts

Showing posts from October 21, 2018

इयत्ता 10 वी, 12 वी परीक्षाः खाजगी विद्यार्थ्यांना प्रविष्ठ होण्यासाठी विलंब शुल्कासह मुदतवाढ

अलिबाग,जि. रायगड, दि.26,(जिमाका)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं.17 भरुन परीक्षेस प्रविष्ठ होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रकटनानुसार, फेब्रुवारी –मार्च 2019 मध्ये होऊ घातलेल्या इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षांसाठी  फॉर्म नं.17 ऑनलाईन भरुन  प्रविष्ठ होण्याची मुदत संपली आहे. त्थापि विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी विलंब व अतिविलंब शुल्क भरुन  ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची मुदत खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या याप्रमाणे- इयत्ता 10 वी शंभर रुपये विलंब शुल्कासह शुक्रवार दि.26 ऑक्टोबर ते मंगळवार दि.6 नोव्हेंबर. इयत्ता 12 वी 25 रुपये विलंब शुल्कासह शुक्रवार दि.26 ऑक्टोबर ते मंगळवार दि.6 नोव्हेंबर. तर अतिविलंब शुक्ल   प्रतिविद्यार्थी 20 रुपये भरुन बुधवार दि.7 ते बुधवार दि.14 नोव्हेंबर. असे महाराष्ट्र राज्य मा

चारा पुरवठ्यासाठी वैरण बियाणे वितरण योजना

अलिबाग,जि. रायगड, दि.26,(जिमाका)- राज्य शासनाने 180 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर केली आहे. या तालुक्यांमध्ये असलेल्या 1 कोटी  95 लाख 73 हजार 428 पशुधनाला आवश्यक चारा पुरवठा करता यावा यासाठी चारा पुरवठ्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत वैरण बियाणे वितरण योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत   दुष्काळ सदृष्य परिस्थितीतील तालुक्यांमध्ये सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकरी, पशुपालकांना वैरणीची बियाणे, खते 100 टक्के अनुदानावर  वितरीत करण्यात येणार आहेत.  या योजनेद्वारे 8.7 लक्ष मेट्रिक टन हिरव्या वैरणीचे उत्पादन अपेक्षित आहे. या योजनेची अंमलबजावणी नोव्हेंबर महिन्यात करण्यात येणार असून  योजनेच्या लाभासाठी  पशुपालकांनी आपल्या नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखाना, पंचायत समिती कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त 31 रोजी राष्ट्रीय एकता दौड

अलिबाग,जि. रायगड, दि.26,(जिमाका)- देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिन हा राष्ट्रीय एकता, अखंडता व राष्ट्राची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी साजरा केला जातो. नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना जोपासण्याकरिता पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड-अलिबाग यांच्या वतीने बुधवार दि . 31 रोजी सकाळी सात वा . क्री डा भ वन , अलिबाग बीच येथुन राष्ट्रीय एकता दौड (5 कि.मी अंतर) आयोजित केली आहे. सदर एकता दौडमध्ये शालेय  विद्यार्थांचा गट व खुला गट असे दोन गट तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येक गटात प्रथम तीन विजेत्यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे.  तसेच सदर एकता दौड कार्यक्रमाच्या ठिकाणी जे 500 स्पर्धक  प्रथम  हजर राहतील त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालया कडून टी-शर्ट देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी , नागरिकांनी व स्पर्धकांनी यात सहभागी होवून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश द्यावा. एकता दौड मध्ये सहभा गी घेण्यासाठी इच्छुक असलेल्या स्पर्धकांनी आपले नाव नोंदणी करीता पोलीस निरीक्षक संजय

पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26:- राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे  शनिवार दि.27 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- शनिवार दि.27 रोजी सायं. साडेसात   वा. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विश्रामगृह, मुरुड येथे आगमन व राखीव. रविवार दि.28 रोजी सकाळी साडे सहा वा. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विश्रामगृह, मुरुड येथून मुरुड जंजिरा किल्ल्याकडे प्रयाण.   सकाळी सात वा. जंजिरा किल्ला येथे आगमन व जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरुपी राष्ट्रध्वज लावण्याच्या कार्यक्रमास उपस्थिती. सव्वा सात वाजता जंजिरा किल्ला येथून आगरदांडा जेट्टीकडे प्रयाण. साडेसात वा. आगरदांडा जेट्टी येथे आगमन व रो-रो सेवेने दिघी जेट्टीकडे प्रयाण.सकाळी आठ वाजता दिघी जेट्टी येथे आगमन व मोटारीने वडवली ता. श्रीवर्धन कडे प्रयाण.सकाळी साडेआठ वाजता मौजे वडवली ता. श्रीवर्धन येथे आगमन व स्थानिक शेतकऱ्यांच्या भातशेतीची पाहणी.सकाळी   आठ वा.पंचेचाळीस वाजता मौजे शिस्ते ता. श्रीवर्धन येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या भातशेत

कृषी विभाग आढावा बैठकः भातशेती दुरुस्तीची कामे मनरेगातून घ्यावीत- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

Image
अलिबाग,जि. रायगड, दि.26,(जिमाका)- जिल्ह्यात कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना एकात्मिक पद्धतीने शेती करण्याबाबत चालना द्यावी. तसेच भात शेतीच्या दुरुस्तीची कामे ही महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून घेण्यात यावी, जेणे करुन शेतकऱ्याला या कामांचा मोबदला मिळेल, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी (दि.25) सायंकाळी दिले. कृषि विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी उपवनसंरक्षक मनिषकुमार, जिल्हाअधिक्षक कृषि अधिकारी पी.बी शेळके, आत्मा प्रकल्प उपसंचालक एस.एच. बोऱ्हाडे, उपजिल्हाधिकारी रोहयो मठपती तसेच सर्व उपविभागीय व तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी   परंपरागत कृषी तंत्रज्ञान विकास योजना (सेंद्रीय शेती) ,   कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा), गटशेती प्रोत्साहन योजना, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, एकात्मिक पा

आधारभूत किंमत भात खरेदी योजनाः जिल्ह्यात केंद्र सुरु; प्रति क्विंटल 1770 रुपये दर

अलिबाग,जि. रायगड, दि.26,(जिमाका)- आधारभुत किंमत भात खरेदी योजने अंतर्गत जिल्ह्यात जिल्हा मार्केटींग रायगड व  आदिवासी उपयोजना क्षेत्रात धान खरेदीसाठी  महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांच्या मार्फत नियुक्त  प्रादेशिक व्यवस्थापक, प्रादेशिक कार्यालय जव्हार या संस्थेकडील मंजूर भात खरेदी केंद्रांमार्फत कर्जत तालुक्यात भात खरेदी केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी या खरेदीकेंद्रांवर आपले धान विक्री करुन 1770 रुपये प्रतिक्विंटल या दराने धान विक्री करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा शाखेमार्फत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, आधारभुत किंमत भात खरेदी योजने अंतर्गत मार्केटींग फेडरेशन मुंबई यांनी नियुक्त केलेल्या अभिकर्ता संस्था जिल्हा मार्केटींग रायगड यांचेमार्फत खरीप व रब्बी   पणन हंगाम 2018-19 मध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर, कर्जत, सुधागड, महाड, माणगाव, रोहा, श्रीवर्धन, पोलादपूर   या तालुक्यातील मंजुर धानखरेदी केंद्रावर खरेदी केंद्र सुरु करण्यात येत आहे. जिल्हा मार्केटींग

पत्रपरिषद : नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवावे- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड, दि.25,(जिमाका)- आगामी निवडणूकांसाठी 1 जानेवारी 2019 रोजी वयाची 18 वर्षे पुर्ण करणाऱ्या   व्यक्तिंची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरु आहे. येत्या 31 तारखेपर्यंत त्याची मुदत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, उद्योग क्षेत्रात आदी ठिकाणी तसेच घरोघरी जाऊन निवडणूक कर्मचारी नाव नोंदणीसाठी आवश्यक फॉर्म क्रमांक 6 भरुन घेत आहेत. तरी सर्व नवमतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी आपल्या नजिकच्या मतदार नोंदणी कर्मचाऱ्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.   आगामी निवडणूकांसंदर्भात सुरु असलेल्या मतदार नोंदणी अभियान तसेच मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम व मतदान यंत्र,VVPAT मशिन यांची प्रथमस्तरीय चाचणी याबाबत माध्यमांना माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी   (निवडणूक) वैशाली माने उपस्थित होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी माहिती दिली की, जिल्ह्यातमतदार पुनरिक्षण