Posts

Showing posts from January 8, 2023

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची संख्या जिल्हा प्रशासनाने केली जाहीर

    अलिबाग,दि.12(जिमाका):-   भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीत मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला होता. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या बैठका घेऊन मतदार नोंदणी करण्यासाठी विविध उपाय योजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांनी पाठपुरावा करून मतदार नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न केले. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे. 188- पनवेल विधानसभा मतदारसंघ –पुरुष मतदार संख्या 2 लाख 90 हजार 260, स्त्री मतदार संख्या 2 लाख 49 हजार 878,  तृतीयपंथी-32, एकूण मतदार संख्या 5 लाख 40  हजार 170. 189- कर्जत विधानसभा मतदारसंघ –पुरुष मतदार संख्या 1 लाख 50 हजार 492, स्त्री मतदार संख्या 1 लाख 47 हजार 213,  तृतीयपंथी -1, एकूण मतदार संख्या 2 लाख 97  हजार 706. 190- उरण विधानसभा मतदारसंघ –पुरुष मतदार संख्या 1 लाख 51 हजार 49, स्त्री मतदार संख्या 1 लाख 48 हजार 452,  तृतीयपंथी

शिक्षक मतदारांना 30 जानेवारी रोजी विशेष नैमित्तीक रजा मंजूर

                 अलिबाग,दि.12(जिमाका):-  कोकण विभागाची शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2022-23 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार शिक्षक मतदारसंघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून मतदानाच्या दिवशी   दि. 30 जानेवारी,  2023 रोजी शिक्षक मतदारांना नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली आहे. कोकण विभागाची शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2022-23 या घोषित कार्यक्रमानुसार कोकण विभाग शिक्षक  मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान सोमवार दि. 30 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत या वेळेत होणार असून शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली असून, ही रजा शिक्षक मतदारांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार असल्याचे उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी, श्रीमती स्नेहा उबाळे यांनी कळविले आहे. 00000000

नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास दि.14 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

    अलिबाग,दि.12(जिमाका):-   नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत दुधाळ जनावरांचा गट, शेळी गट, एक दिवसाची सुधारित जातीच्या कोंबडीची  पिले वाटप, मांसल कुकूट पक्षांसाठी 1 हजार फूट शेड या विविध योजनांचे (50टक्के-75टक्के अनुदान) ऑनलाईन अर्ज करण्याची   दि.14 जानेवारी 2023 पर्यंत वाढविण्यात आला आहे. याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे. ऑनलाईन अर्ज स्वीकारणे, दि.13 डिसेंबर 2022 ते दि.14 जानेवारी 2023 पर्यंत एकूण दिवस/कालावधी 33 दिवस, डाटा बॅकअप करणे, दि.15 व दि.16 जानेवारी 2023 रोजी  एकूण दिवस/कालावधी 2 दिवस, रॅंडमायझेशन पध्दतीने लाभार्थी प्राथमिक निवड, दि.17  ते  दि.21 जानेवारी 2023 पर्यंत  एकूण दिवस/कालावधी 5 दिवस, राखीव, दि.22 जानेवारी 2023 रोजी  एकूण दिवस/कालावधी 1 दिवस, मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे, दि.23  ते  दि.30 जानेवारी 2023 पर्यंत  एकूण दिवस/कालावधी 8 दिवस, राखीव, दि.31 जानेवारी 2023 रोजी  एकूण दिवस/कालावधी 1 दिवस, पशुधन विकास अधिकारी (वि), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्यामार्फत कागदपत्रे पडताळणी करुन निवड पूर्ण करणे, दि.1  ते  दि.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 जिल्हा कार्यकारी समिती आढावा बैठक संपन्न

Image
    अलिबाग,दि.12(जिमाका):-  पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्राने 2023 वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. याचाच एक भाग म्हणून विभागीय आयुक्त कोकण विभाग तथा जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ष 2023 रायगड जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार असून जिल्ह्यातील अतिदूर्गम गावापासून ते पनवेल, नवी मुंबई या मोठ्या शहरापर्यंत पौष्टिक तृणधान्याची लागवड, त्याची प्रक्रिया व आहारातील महत्व याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. पौष्टिक तृणधान्य वर्ष संकल्पनेत अंतर्गत ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोडो, सावा, राजगिरा इत्यादी पौष्टिक तृणधान्य पिकाच्या उत्पादन वाढीबरोबरच या पिकाचे आरोग्यविषयक लाभ व जनजागृती करून लोकांच्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढविणे हे प्रमुख हेतू आहेत. यानुषंगाने विभागीय आयुक्त, कोकण तथा जिल्हाधिकारी रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार (दि. 11 जानेवारी, 2023) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हा कार्यकारी समितीची आढावा सभा संपन्न झाली. य

इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कृती कार्यक्रम स्पर्धेचे आयोजन

  अलिबाग,दि.12(जिमाका):-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत 9 विभागीय मंडळमार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12 वी) या दोन सार्वत्रिक परीक्षाचे आयोजन करण्यात येते. परीक्षेच्या कालावधीत विविध मार्गांनी निष्पन्न होणाऱ्या गैरप्रकारांचा मंडळाला सातत्याने सामना करावा लागतो. त्यादृष्टीने राज्य मंडळाच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील 9 विभागीय मंडळे आपआपल्या स्तरावर विविध उपाययोजना आणि उपक्रम राबवित असतात. तथापि या प्रयत्नात एकसूत्रिपणा असण्याची गरज सातत्याने जाणवत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यासाठी एक नियोजनबद्ध व सर्व समावेशक असा कृती कार्यक्रम तयार करण्याचे मंडळाने ठरविले आहे. यासंदर्भात परीक्षेशी संबंधित सर्व घटकांच्या (विद्यार्थी, शिक्षक, पालक, समाजमाध्यम) इत्यादींच्याकडून परीक्षेतील गैरमार्ग रोखण्यासाठी नाविण्यपूर्ण कृतीकार्यक्रम मागविण्यात येत आहेत.  याकरिता मंडळाने गुगल फॉर्म तयार केला आहे. या गुगल फॉर्मची  https://forms.gle/y/ Tsy21P93W8d4f0AA  ही लिंक असून ती मडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आल

जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान जिल्ह्यातील आणखी 47 ग्रामपंचायतींची आयएसओ मानांकन प्रमाणपत्र मिळविण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू

Image
    अलिबाग,दि.11(जिमाका):- रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील बोरिस गुंजीस, सतिर्जे व सारळ या तीन ग्रामपंचायतीना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले‌ असून, जिल्ह्यातील आणखी 47 ग्रामपंचायतींची आयएसओ मानांकन प्रमाणपत्र मिळविण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. शासन व्यवहारात पारदर्शकता तसेच गतिमानता यावी, यासाठी ई गव्हर्नन्सचा वापर केला जात आहे. ग्रामपंचायतीमधील विविध  रजिस्टर्स,फॉर्मस, दस्ताऐवजांचे संगणकीकरण करून पेपरलेस ग्रामपंचायतींकडे वाटचाल सुरू आहे. बदलत्या परिस्थितीत ग्रामपंचायतींची कार्यपद्धतीचे पुर्विलोकन करून व्यवसाय प्रक्रिया पुनर्निर्मिती करण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकीय कामकाज कार्यक्षम व्हावे आणि कार्यपद्धतीत गुणात्मक सुधारणा करण्यासाठी आयएसओ प्रमाणिकीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने 2019 मध्ये घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन मिळावे यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार

विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी'वर ऑनलाईन अर्ज सादर करावेत--- सहाय्यक आयुक्त श्री.सुनिल जाधव

        अलिबाग,दि.11(जिमाका) :- मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू नये, याकरिता शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्याकडून अर्ज केले जात असून दि.6 जानेवारी 2023 पर्यंत 11 हजार 396 विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केले आहेत. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण, परीक्षा शुल्क आदी योजनांचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी विभागाच्या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. सन-2022-23 या वर्षाकरिता प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.   ऑक्टोबरपासून प्रारंभ:-  सन-2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची प्रक्रिया पहिल्या आठवड्यापासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील 11 हजार 396 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत.   कोणत्या प्रवर्गातील कि

“रस्ता सुरक्षा अभियान- 2023” “सडक सुरक्षा,जीवन रक्षा...” रायगड जिल्हा रस्ता सुरक्षा समिती व अलिबाग राज्य परिवहन आगार यांच्या संयुक्त विद्यमाने “रस्ता सुरक्षा अभियान- 2023” चा उद्घाटन संपन्न

Image
        अलिबाग,दि.11(जिमाका) :-   “ रस्ता सुरक्षा अभियान-2023 ”  चा उदघाटन कार्यक्रम रायगड जिल्हा रस्ता सुरक्षा समिती व अलिबाग राज्य परिवहन आगार यांच्या संयुक्त विद्यमाने आज अलिबाग राज्य परिवहन आगार येथे संपन्न झाला.    यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, मोटार वाहन निरीक्षक शशिकांत तिरसे, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा,अलिबाग श्रीमती सूवर्णा पत्की, राज्य परिवहन रायगड विभागाचे विभाग नियंत्रक पंकज ढावरे, विभागीय वाहतूक अधिकारी प्रशांत खरे, अलिबाग आगार व्यवस्थापक अजय वनारसे, उपप्रादेशिक विभागाचे, मेहुल पाटील, राज्य परिवहन मंडळाचे इतर अधिकारी-कर्मचारी, चालक,वाहक, तांत्रिक विभागाचे कर्मचारी, जेएसएम महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून रस्ता सुरक्षा अभियान, वाहतुकीचे नियम,  वाहतूक सुरक्षा, वैयक्तिक व सामाजिक जबाबदारी, मानसिक व  शारिरीक आरोग्य  आदि विषयांबाबत उपस्थितांचे प्रबोधन केले.      या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनाअपघात सलग 15 वर्षे सुरक्षित सेवा बजावलेल्या चालकांचा मान्यवरांच्या हस्

जिल्ह्यात निवडणूक कालावधीत मतदानाच्या दिवशी कोरडा दिवस जाहीर

    अलिबाग,दि.11(जिमाका) :-  मा . भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या दि.29 डिसेंबर 2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र विधानपरिषदव्दारे कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार दि.30 जानेवारी 2023  रोजी मतदान होणार आहे. या निवडणूका खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत मद्यविक्री करण्यास मनाई, कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 (सी) अन्वये तरतूद आहे. त्याचप्रमाणे Handbook for Returning Officer for Elections to the Council of states and State Legislative Councils, February,२०१६,Document 4,Edition I, Chapter X मधील सूचनांच्या अनुषंगाने मद्यविक्री करण्यास मनाई, कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.  त्यानुसार जिल्ह्यात निवडणूक कालावधीत मतदानाच्या दिवशी कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे, असे उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांनी कळविले आहे. ०००००

नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

    अलिबाग,दि.10(जिमाका) :- कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, मुंबई विभाग, कोकण भवन नवी मुंबई, दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समाज यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. 13 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजता पनवेल-उरण आगरी समाज मंडळाचे महात्मा फुले सभागृह, पनवेल येथे आयोजित केला आहे. जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडील रिक्त पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या रोजगार मेळाव्यात एस.एस.सी.पास, आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर इत्यादी नोकरी इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या विभागीय महारोजगार मेळाव्यास स्वयंरोजगार करु इच्छिणाऱ्या बेरोजगार युवकासाठी जिल्ह्यातील विविध महामंडळे यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांविषयीची उमेदवारांना दिली जाणार आहे. रोजगार मेळाव्यातील रिक्त पदांची माहिती  www.mahaswayam.gov.in  या वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी या विभागीय महारोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मुंबई व

कोकण शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम नामनिर्देशन पत्रे स्वीकारणे व छाननी दरम्यान कालावधीकरिता मनाई आदेश जारी

      अलिबाग,दि.10(जिमाका) :-  मा . भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या दि.29 डिसेंबर 2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र विधानपरिषदव्दारे कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दि.05 जानेवारी ते दि.12 जानेवारी 2023 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत या निवडणूक कार्यक्रमांतर्गत उमेदवार किंवा त्यांच्या कोणत्याही सूचकाकडून निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांचे कार्यालय, पहिला मजला, कोकण भवन नवी मुंबई येथे नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अखेरची तारीख दि.12 जानेवारी 2023 असून नामनिर्देशन पत्राची छाननी दि.13 जानेवारी 2023 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई येथे होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दि.16 जानेवारी 2023 आहे. त्यानुषंगाने विविध राजकीय पक्ष नामनिर्देशन पत्र सादर करतेवेळी उमेदवाराच्या समर्थनार्थ शक्तीप्रदर्शन करणे, विविध वाहनाचा वापर करणे, घोषणाबाजी करणे यामुळे किरकोळ कारणावरून वाद निर्माण होवून पक्ष कार्यकत्यांमध्ये असंतोषाचे वातावरण त

दत्तात्रेय विठठल तांडेल व चिखले ग्रामस्थ यांच्या तक्रारी व मागणीनुसार पनवेल उपविभागीय अधिकारी कार्यालयात दि.16 जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन

    अलिबाग,दि.10(जिमाका) :-   श्री.दत्तात्रेय विठठल तांडेल व इतर ग्रामस्थ चिखले यांनी ग्रुप ग्रामपंचायत चिखले हद्दीतील स.नं.1/1, 10, 13, 23/0, 41/1, 5/0 मध्ये माती, दगड, झाडे व मुरुम अवैधपणे उत्खनन चालू असल्याबाबत उपविभागीय अधिकारी, पनवेल यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रार अर्ज/निवेदनाच्या अनुषंगाने वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे, असे उपविभागीय अधिकारी, पनवेल श्री.राहुल मुंडके यांनी कळविले आहे. मौजे चिखले ता. पनवेल येथील येथील स.नं.1/1, 10, 13, 23/0, 41/1, 5/0 या मिळकती अपर मुख्य सचिव (महसूल) महसूल व वन विभाग यांच्याकडील आदेश क्र.जमीन -2808/प्र.क्र.-62 /ज-4/ दि.24 ऑगस्ट 2009 तसेच  जिल्हाधिकारी रायगड-अलिबाग यांच्याकडील आदेश क्र.मशा/ जमीन/अ-2/175535/09 दि.22 डिसेंबर 2009 अन्वये शासकीय जमिनी कब्जा हक्काने विहीत अटी शर्तीनुसार मे.व्हॅल्यूबल प्रॉपर्टीज प्रा.लि.यांना वाटप करण्यात आलेल्या असून 7/12 मे.व्हॅल्यूबल प्रॉपर्टीज प्रा.लि.यांच्या नावे दाखल आहे. मौजे चिखले ता.पनवेल येथील येथील स. नं. 1/1 मध्ये उपविभागीय अधिकारी, पनवेल यांच्या कार्यालयामार्फत मे. व्हॅल्यूबल प्रॉपर्टीज प्रा.लि. यांच्या वतीने

जिल्ह्यात दि.1 जानेवारी ते दि.31 डिसेंबर 2023 या कालावधीत ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकांचा वापर करण्याची परवानगी

    अलिबाग,दि.10(जिमाका) :-    पर्यावरण विभागाच्या दि.22 ऑगस्ट 2017   च्या शासन निर्णयान्वये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या   ध्वनीप्रदूषण (नियम व नियंत्रण) नियम, 2000 च्या अंमलबजावणी संदर्भात नव्याने निर्देश पारित केले आहेत. यासंदर्भात यापूर्वी पारित दि.5 सप्टेंबर 2016 शासन निर्णय अधिक्रमित करून, केंद्र शासनाच्या दि.10 ऑगस्ट 2017 रोजीच्या अधिसूचनेव्दारे ध्वनीप्रदूषण (नियम व नियंत्रण) सुधारित नियम, 2017 च्या नियम 5 उप नियम (3) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिपणीनुसार ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहीर करण्याकरीता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यात दि.1 जानेवारी 2023 ते दि.31 डिसेंबर 2023 या कालावधीत पुढील दिवस ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2017 च्

जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर येथे इयत्ता सहावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु

  अलिबाग,दि.10(जिमाका) :-  शिक्षा मंत्रालय भारत सरकारव्दारा संचलित जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर, ता. माणगाव या विद्यालयात 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. इयत्ता 6 वी साठी पात्रता :-  विद्यार्थी रायगड जिल्ह्याचा प्रमाणित रहिवासी असावा, सन 2022-23 मध्ये रायगड जिल्ह्यातील शासकीय/शासनमान्य शाळेत इयत्ता 5 वी मध्ये संपूर्ण शैक्षणिक वर्ष  शिकत असलेला विद्यार्थी असावा, जन्म तारीख दि.01 मे 2011 ते दि.30 एप्रिल 2013 मधील असावी, इयत्ता 3 री, 4 थी वर्ग शासकीय शासनमान्य शाळेतून सलग उत्तीर्ण असावा. आवश्यक कागदपत्रे :- नवोदय विद्यालयाच्या संकेत स्थळावर दिलेले प्रमाणपत्र ( STUDY CERTIFICATE) विद्यार्थी ज्या शाळेत 5 व्या इयत्तेत शिकत आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापकाच्या सही शिक्क्यासहित संपूर्ण भरून ते प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे, विद्यार्थी व पालकांची सही स्कॅन करून अपलोड करावी, विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो स्कॅन करून अपलोड करावा.  विद्यालयाची वैशिष्टये :-  इयत्ता 6 वी ते इयत्ता 12 वी पर्यंत सीबीएसी पाठ्यक्रमाप्रमा

अलिबाग येथील पत्रकार भवन कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे अनावरण

Image
    अलिबाग,दि.09(जिमाका):-  जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी अलिबाग प्रेस असोसिएशनला दि.6 जानेवारी 2023 पत्रकार दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा भेट स्वरूपात दिली.         अलिबाग येथील पत्रकार भवन कार्यालयात या प्रतिमेचे अनावरण (दि.6 जानेवारी 2023) रोजी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत अलिबाग प्रेस असोसिएशन कार्यालयात रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार ॲड.वैभव भोळे, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर,   रायगड टाईम्स चे संपादक राजन वेलकर, लोकसत्ता चे जिल्हा प्रतिनिधी हर्षद कशाळकर, लोकमत चे राजेश भोस्तेकर, रत्नाकर पाटील, प्रणय पाटील हे उपस्थित होते. ००००००००

जिल्ह्यातील गावागावात राबविले जाणार “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष”

    अलिबाग,दि.09(जिमाका) :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्राने 2023 वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले आहे. याचाच एक भाग म्हणून विभागीय आयुक्त, कोकण विभाग तथा जिल्हाधिकारी रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ष-2023 रायगड जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार असून जिल्ह्यातील अतिदूर्गम गावापर्यंत पौष्टिक तृणधान्याची लागवड ते प्रक्रियेपर्यंत मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्ज्वला बाणखेले यांनी दिली आहे. भारत हा जगातील पौष्टिक तृणधान्य पिकविणारा व नियमित वापर करणारा एक प्रमुख देश आहे. सध्याच्या जीवनपद्धतीमुळे पौष्टिक अशा तृणधान्याचे क्षेत्र व वापर कमी होत असल्याने चालू वर्षी देश ते गावपातळीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. त्यामधून पौष्टिक तृणधान्यांचे आरोग्य विषयक महत्त्व पटवून दिले जाणार आहे. याबाबतची सर्व कार्यवाही कृषी व कृषी संलग्न विभागांमार्फत केली जाणार आहे.   या अंतर्गत कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, महिला बचतगट, विविध सामाज

जागतिक आरोग्य संघटना व इंडियन कौन्सिल मेडिकल रिसर्च संस्थाच्या पुढाकारातून महात्मा गांधी मेडिकल कॉलेज येथे “जिल्ह्यातील क्षयरोगाचे प्रमाण” विषयावरील चर्चासत्र संपन्न

Image
  अलिबाग,दि.09(जिमाका):-  रायगड जिल्ह्याचे सब नॅशनल सर्टिफिकेट ( SNC ) करिता नामांकन झाले असून त्यासाठी दहा तालुक्यातील स्वयंसेवकांद्वारे याचे सर्व्हेक्षण गेल्या महिन्यापासून सुरू झालेले आहे. हा सर्व्हे जागतिक आरोग्य संघटना ( WHO )  इंडियन कौन्सिल मेडिकल रिसर्च ( ICMR ) या जागतिक दर्जाच्या रिसर्च संस्थाच्या प्रतिनिधींकडून केला जात आहे. हे सर्व्हेक्षण जिल्ह्यातील क्षयरोगाचे प्रमाण किती प्रमाणात कमी झाले आहे, हे जाणून घेण्यासाठी करण्यात येत आहे. यासाठी त्यांच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील खारघर मधील पेंधर, कर्जत, खोपोली, पाली या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी खाजगी मेडिकल, खाजगी हॉस्पिटलचे डॉक्टर, बरे झालेल्या क्षयरुग्णांना गृहभेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधून माहिती जाणून घेतली आहे.  तसेच या कार्यक्रमाचा एक नियोजित भाग म्हणून पनवेल येथील महात्मा गांधी मेडिकल कॉलेज येथे दि.4 जानेवारी 2023 रोजी नामीनल टेक्निकल ग्रुप (NGT) यांच्याकडून गुणवत्तादर्शक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्यक्ष या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अँटी टी.बी.ड्रग विकणारे होलसेल डी