Posts

Showing posts from May 27, 2018

मोटार वाहन निरिक्षक यांचा शिबीर कार्यक्रम आयोजन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2 -उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण जि. रायगड यांच्या कार्यालयातील मोटार वाहन निरिक्षक यांचा जुलै 2018 ते डिसेंबर 2018 या कालावधीतील दौरा   तसेच तालुका व महिना निहाय शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रोहा - सोमवार दि.16 जुलै2018 रोजी, सोमवार दि.13 ऑगस्ट् -2018, बुधवार दि.5सप्टेंबर -2018, सोमवार दि.15 ऑक्टोबर -2018, बुधवार दि.14 नोव्हेंबर -2018, बुधवार दि.12 डिसेंबर 2018, मुरुड - मंगळवार दि.17 जुलै2018 रोजी,मंगळवार दि. 14 ऑगस्ट् -2018, गुरुवार दि.6सप्टेंबर -2018,मंगळवार दि.16 ऑक्टोबर -2018, गुरुवार दि.15 नोव्हेंबर -2018,गुरुवार दि.13 डिसेंबर 2018,   अलिबाग- बुधवार दि.18 व सोमवार दि.30 जुलै 2018, रोजी, गुरुवार दि.16 व शुक्रवार दि.31ऑगस्ट्   -2018,शुक्रवार दि.7 व 28 सप्टेंबर -2018,बुधवार   दि.17 व मंगळवार दि.30 ऑक्टोबर -2018, शुक्रवार दि.16 व शुक्रवार दि.30 नोव्हेंबर -2018, शुक्रवार दि.14 व शुक्रवार दि.28 डिसेंबर 2018, महाड - शुक्रवार दि.13 व बुधवार दि.25जुलै 2018 रोजी, शुक्रवार दि.10 व सोमवार दि.27 ऑगस्ट् -2018, दि. 4 व सोमवार दि.24 सप्टेंबर -2018, शुक

जिल्हा माहिती कार्यालयातील श्री.हिरामण भोईर यांना स्नेहपूर्ण निरोप

Image
            अलिबाग , दि.31 : जिल्हा माहिती कार्यालय रायगड-अलिबागचे वरिष्ठ लिपिक श्री. हिराम ण भोईर हे नियत वयोमानानुसार   दि. 31 मे 2018 रोजी सेवानिवृत्त होत असल्याने   त्यांना कोंकण विभागीय माहिती कार्यालयातर्फे स्नेहपूर्ण निरोप देण्यात आला. डॉ.गणेश मुळे उपसंचालक (माहिती) यांच्या हस्ते श्री. भो ईर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.             डॉ.गणेश मुळे यांनी श्री.भोईर यांच्या सेवेचे कौतूक करून त्यांना भावी   वाटचालीस शुभेच्छा दिल्या.             श्री. भोईर यांनी आपल्या मनोगतात सेवा काळातील आठवणी सांगून सर्व सहका-यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी सहायक संचालक दत्तात्रेय कोकरे, कर्मचारी सर्वश्री लघुलेखक श्रीमती वनिता कांबळे, लेखापाल गंगाराम बांगरा, वरिष्ठ लिपिक श्री. राजेंद्र मोहिते, लेखा लिपिक श्रीमती राजेश्री वाडेकर, लिपिक टंकलेखक श्री. प्रशांत गावंड,   दूरदर्शन कॅमेरामन श्री. अरुण जाधव, श्री. सचिन पाटील, श्री. वैभव मेहर, श्री. प्रेम शुक्ला, श्री. जितेंद्र यादव,   श्री. संजय कोळी, श्री. प्रल्हाद अभंग, श

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावेत

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.31-  : सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी (शास्त्र) या वर्गात शिक्षण घेत असलेल्या   व जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी या समितीकडे   अर्ज सादर केलेल्या अर्जदारांना आवाहन करण्यात येते की ज्या अर्जदारांना अद्याप जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही,त्यांचे अर्ज त्रुटीपूर्ततेअभावी या समितीकडे प्रलंबित आहेत.   तरी ज्यांना अद्यापपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही त्यांनी या समितीच्या कार्यालयाकडे आपणाकडे उपलब्ध जातनोंदविषयक कागदपत्रांच्या मूळ व सत्यप्रतींसह समक्ष उपस्थित राहून त्रूटींची पूर्तता करावी जेणेकरुन आपली पुढील प्रवेशप्रक्रिया सुलभ होईल.   अधिक माहितीसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र समिती,दुसरा मजला डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ, गोंधळपाडा अलिबाग दूरध्वनी क्रमांक 02141-228603 येथे संपर्क साधावा असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रायगड यांनी कळविले आहे. 0000

मत्स्यव्यवसाय विभागामार्फत प्रशिक्षण इच्छुकांनी अर्ज सादर करावेत

               अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.31-   मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मस्त्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षणाचे 107 वे सत्र 1 जुलै पासून शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, अलिबाग येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षणासाठी दरमहा रु.450/- इतके प्रशिक्षण शुल्क राहिल. दारिद्रय रेषेखालील प्रशिक्षणार्थींना दरमहा रु.100/- इतके प्रशिक्षण शुल्क असेल.             प्रशिक्षणार्थींच्या पात्रतेसाठी निकष पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवाराचे वय 18 ते 35 या मर्यादेत असावे. उमदेवार किमान चौथी पास असणे आवश्यक आहे. उमेदवारास पोहता येणे आवश्यक आहे. उमेदवारास मासेमारीचा किमान 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. उमेदवाराकडे बायोमेट्रीक कार्ड असणे आवश्यक आहे.   विहित नमुन्यात अर्ज व संस्थेची शिफारस आवश्यक आहे. उमेदवार दारिद्रय रेषेखालील असल्यास संबंधित गटविकास अधिकाऱ्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. इच्छुक युवकांनी स्वत:चे हस्ताक्षरात विहित नमुन्यात अर्ज व संस्थेशी शिफारस या कार्यालयाकडे 21 जून पर्यंत कार्यालयी

मासिकपाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृती आवश्यक - मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर

Image
                                                                                         अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28-   मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृतीची आवश्यकता असल्याचे मार्गदर्शन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, यांनी आज केले.   जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन रायगड जिल्हा परिषदेतर्फे मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ही कार्यशाळा   जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.    यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.)   चंद्रकांत वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) पी.एस.साळुंखे उपस्थित होते.             कार्यशाळेत डॉ.प्रणाली पाटील यांनी मासिकपाळी दरम्यान घ्यावयाची काळजी, येण्याची कारणे, गैरसमज याबाबत तर महिलांचे आरोग्य व त्याबाबतच्या समस्या व त्यावरील उपाय याबाबत डॉ.रेखा म्हात्रे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले व शासनाच्या अस्मिता योजने बाबत सविस्तर माहिती दिली.             कार्यक्रमाचे सूत्