Posts

Showing posts from May 18, 2025

कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन,भरारी पथके व तक्रार निवारण समित्यांची स्थापना तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक 8830264335

  रायगड दि. 23 (जिमाका) : कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन, भरारी पथके व तक्रार निवारण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. निविष्ठांबाबत काही तक्रारी असल्यास तालुकस्तरीय तक्रार निवारण समितीकडे किंवा जिल्हा स्तरावरील तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक 8830264335 ला संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.         जिल्हयात खरीप हंगाम 2025-26 करीता बियाणे, खते व कीटकनाशके या कृषि निविष्ठांचा दर्जेदार तसेच सुरळीत व वेळेवर मुबलक पुरवठा होण्यासाठी कृषि विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. निविष्ठांबाबतच्या गुणवत्ता नियंत्रणाकरिता जिल्हा स्तरावर व प्रत्येक तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन केलेली आहेत. जिल्हास्तरीय भरारी पथकाचे कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद हे पथक प्रमुख तर  जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हे सदस्य सचिव आहेत आणि तालुकास्तरीय भरारी पथकाचे तालुका कृषि अधिकारी हे पथक प्रमुख असून पंचायत समितीचे कृषि अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी तक्रार निवारण समिति ...

एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमात सहभागी व्हा

    रायगड दि.23(जिमाका):- एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या नजिकच्या आपले सरकार  ई-सेवा केंद्रामधे जाऊन किंवा  https://mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी गावपातळीवरील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त शेतक-यांनी फलोत्पादनाशी निगडीत योजनांचा लाभ घ्यावा,  असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  यांनी केले आहे.  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2025-26 अंतर्गत फळे, फुले, मसाला लागवड, अळिंबी उत्पादन प्रकल्प व जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन हे घटक राबविण्यात येत आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा या फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करणे तसेच अळिंबी उत्पादन प्रकल्प उभारणी करणे या बाबीचा समावेश आहे.  जिल्हयामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे य...

आत्मविश्वासाने उद्योजक बनण्यासाठी प्रयत्न करा, जिल्हा प्रशासन आपल्या पाठीशी खंबीर --जिल्हाधिकारी किशन जावळे

Image
रायगड (जिमाका) दि.23:-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षीत युवक-युवतींना व्यवसाय उभारणीसाठी  प्राधान्याने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. शासनाने या योजनेत अमूलाग्र बदल केला असून कोकणातील स्थानिक बाबींचा यामध्ये समावेश केला आहॆ. तरी जास्तीत जास्त युवकांनी या योजनेचा लाभ घेऊन उद्योजक बनावे. यासाठी जिल्हा उद्योग केंद्र व बँक यांनी सर्वोतोपरी सहाय्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गुरुशांत हरळय्या, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय कुलकर्णी, उद्योजक लक्ष्मण जाधव यांसह जिल्ह्यातील प्रमुख बँकर्स उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी जिल्ह्यात उद्योगधंदे उभारणी झाली तरच रोजगार निर्मिती होईल हे लक्षात घेऊन  या कार्यक्रमांतर्गत सुशिक्षीत युवक-युवतींना कर्ज उपलब्ध करुन त्यांना व्यवसाय उभारणीसाठी...

वनविभागाचे सौंदर्यीकरण,सशक्तीकरण आणि मजबुतीकरणावर विशेष भर --- वनमंत्री गणेश नाईक

      रायगड(जिमाका)दि.22: -वनपरिक्षेत्र अधिकारी, माथेरान कार्यालय व तपासणी नाका या नूतन इमारतीचे उदघाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले. वनमंत्री या नात्याने वनविभागाचे सौंदर्यीकरण, सशक्तीकरण आणि मजबुतीकरण करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कर्जत येथील माथेरान वन क्षेत्रपाल कार्यालय आणि शेलू येथील तपासणी नाका यांचे उद्घाटन सोहळ्यास आ.महेंद्र थोरवे ,राज्याचे प्रधान सचिव वन बाल प्रमुख शोमिता विश्वास, मुख्य वन संरक्षक ठाणे के प्रदिपा, उप वनसंरक्षक राहुल पाटील, प्रांताधिकारी प्रकाश संकपाल, पनवेल माजी नगराध्यक्ष सुनील घरत आदी मान्यवर उपस्थित होते.    यावेळी वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, माझे वन ही शासनाची नाविन्यपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून  प्रत्येक रेंजमध्ये सुरंगी आणि बहाडोली या जांभळाच्या  जातीची झाडे 100 एकर मध्ये  लावा. या योजनेमध्ये प्रत्येक कार्यरत वन कर्मचारी यांनी वन विभागाचे कार्यक्षेत्रातील वनांपैकी कोणतेही 1 एकर क्षेत्राची निवड करुन सन 2025 चे पावसाळयांत, स्वेच्छेने व स्वखर्चाने त्यांच्या प...

उद्योजकतेची नवी पहाट, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंमलबजावणी मध्ये बदल

   रायगड जिमाका दि. 22- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत आता  दुहेरी फायदा आणि मोठ्या संधी मिळणार आहेत. या योजनेच्या तरतुदीमध्ये बदल करण्यात आला असून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहॆ.             प्रकल्पाची कमाल मर्यादा वाढली! आता उत्पादन क्षेत्रातील प्रकल्पांसाठी रु. 1 कोटी  आणि सेवा व कृषी पूरक व्यवसायांसाठी रु.50 लाख  पर्यंत कर्ज मिळवण्याची संधी! तुमच्या स्वप्नातील व्यवसायाला मिळेल मोठा आर्थिक पाठिंबा. खेळत्या भांडवलाची चिंता मिटली! सेवा उद्योगांसाठी आता प्रकल्प खर्चाच्या 60%  आणि उत्पादन उद्योगांसाठी 40%  पर्यंत खेळत्या भांडवलासाठी निधी उपलब्ध. व्यवसायाची रोजची गरज सहज भागवा!  नवीन व्यवसायांचा समावेश! कुक्कुटपालन, अंडी उबवणी केंद्र, मधुमक्षिकापालन, मत्स्यपालन, रेशीम उद्योग, हॉटेल/ढाबा (शाकाहारी/मांसाहारी), होम-स्टे, क्लाऊड किचन, जलक्रीडा, मासेमारी, प्रवासी वाहतुकीकरिता बोट व्यवसाय आता योजनेतंर्गत पात्र असतील.तुमच्या आवडीनुसार व्यवसाय निवडा! शैक्षणिक पात्रतेत शिथिलता! 10 लाख...

माझे वन" नाविन्यपूर्ण योजनेचा शुभारंभ

    रायगड(जिमाका)दि.21:- अलिबाग वन विभागातील अवनत वन क्षेत्राचे शासकीय निधीचा वापर न करता वनीकरण करण्यासाठी अलिबाग वन विभागाचे उप वनसंरक्षक राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून  “ माझे वन ”  ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा शुभारंभ वनमंत्री श्री.गणेश नाईक यांच्या शुभहस्ते मौजे जुमापट्टी, ता. कर्जत (माथेरान परिक्षेत्र) येथील राखीव वन कक्ष क्र. 50 अ येथे 1 एकर अवनत क्षेत्रावर वृक्ष रोपण करुन आज दि. 22 मे रोजी करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये प्रत्येक कार्यरत वन कर्मचारी यांनी वन विभागाचे कार्यक्षेत्रातील वनांपैकी कोणतेही 1 एकर क्षेत्राची निवड करुन सन 2025 चे पावसाळयांत, स्वेच्छेने व स्वखर्चाने त्यांना वाटणारे वृक्षांची लागवड करावयाची आहे. तसेच निश्चित केलेल्या क्षेत्रातील वृक्षांचे संपूर्ण संरक्षण व संगोपन करण्याचे आहे. या योजनेंतर्गत वनीकरण केल्यास एकूण कार्यरत पदांप्रमाणे साधारणतः 338 एकर क्षेत्रावर सन 2025 चे पावसाळयात वनीकरण होणार आहे "माझे वन" योजनेमुळे वनीकरणावर वैयक्तिक दृष्ट्या लक्ष दिले जाणार असल्याने, अवनत वनांचे वनीकरण होऊन वृक्षाच्छादन वाढण्यास भरीव मदत...