Posts

Showing posts from August 11, 2024

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ संपन्न मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही ---जिल्हाधिकारी किशन जावळे

Image
    रायगड (जिमाका) दि.17:-  मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना हा राज्य शासनाचा क्रांतिकारी निर्णय आहे. महिलांचे आरोग्य, पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, यासाठी यंत्रणांनी दक्ष राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण"योजनेचा"जिल्हास्तरीय शुभारंभ होरायझन सभागृह अलिबाग येथे संपन्न झाला.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अतिरिकत्‍ मुख्य कार्यकारी सत्यजित बडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार विक्रम पाटील, जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे, जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी जि.प.निर्मला कुचिक आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की,"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेच्या अंमलबजासाठी शासनाकडून निर्देश प्राप्त होत

राज्यपालांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेचा 26 वा दीक्षान्त समारंभ भारत देशाची 2047 पर्यंत विकसित भारत ओळख निर्माण होईल.-- राज्यपाल

Image
    रायगड (जिमाका)दि.16:-  भारतामध्ये सेवा क्षेत्रातील नेतृत्वासोबतच जागतिक उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता आहे. 2047 पर्यंत विकसित भारत ही आपली ओळख असणार आहे. या काळात तरुणांना मोठया प्रमाणावर संधी निर्माण होणार आहे. प्रत्येक युवकाने आपले ध्येय निश्चित करावे. कठोर आणि प्रामाणिक मेहनत आणि सर्वोत्तम सातत्यपूर्ण कामगिरी ही यशस्वी होण्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती  श्री.सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे च्या 26 व्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर, अध्यक्ष राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, उपमुख्य कार्यकारी डॉ.भरत बास्टेवाट, विद्यापीठ कुलगुरू डॉ.कारभारी काळे, कुलसचिव डॉ.अरविंद किवळेकर, परीक्षा नियंत्रक डॉ.नरेंद जाधव आदी उपस्थित होते. राज्यपाल श्री.राधाकृष्णन म्हणाले, नव्या पिढीने तंत्रज्ञान, संशोधन, विचार आणि अर्थ अंमलबजावणी यावर लक्ष

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

Image
  रायगड(जिमाका) दि.15:- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनाच्या 77 व्या वर्धापनदिनी ध्वजारोहण जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हाधिारी भारत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे,जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसिलदार विक्रम पाटील यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ०००००

जनतेच्या जीवनात परिवर्तन घडविणारे काम करण्यासाठी कटीबद्ध -- महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे स्वातंत्र्य दिनानिमित्त अलिबाग येथे कु.तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Image
    रायगड (जिमाका) दि.15:-  शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक अशा समाजातील सर्व घटकांसाठी राज्य सरकार अव्याहतपणे कार्य करीत आहे. हेच कार्य जोमाने पुढे घेऊन जाऊ आणि जनतेच्या जीवनात दृश्य परिवर्तन घडवू, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिली. भारतीय स्वातंत्र्याच्या 77  व्या वर्धापन दिनानिमित्ताने महिला व बालविकास मंत्री कु.आदिती वरदा सुनिल तटकरे  यांच्या हस्ते अलिबाग येथील पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, उप वनसंरक्षक राहुल  पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, कार्यकारी अभियंता, सां.बा.अलिबाग जगदीश सुखदेवे, नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मनिषा पिंगळे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस मुख्यालय मैदानावर महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न होणार ध्वजारोहण

  रायगड , दि. 13  (जिमाका):- भारता च्या 78   व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ  गुरु वार ,   दि. 15 ऑगस्ट   2024 रोजी  महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे  यांच्या हस्ते अलिबाग पोलीस मुख्यालय मैदान येथे सकाळी 9. 0 5 वा.संपन्न होणार आहे.              तरी नागरिकांनी ,   प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी या समारंभासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ,   असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ००००००

निर्लेखित साहित्याच्या विक्रीसाठी इच्छुक जी.एस.टी.नोंदणीधारक खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात

  रायगड(जिमाका)दि.13:-  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड या संस्थेतील वापरुन निर्लेखित झालेल्या साहीत्याची विक्री जसे आहे त्या स्थितीत निविदा पध्दतीने करणे प्रस्तावित आहे. यामध्ये निर्लेखित झालेले हत्यारे, उपकरणे व लाकडी फर्निचर इत्यादी साहित्याचा समावेश असून इच्छुक जी.एस.टी. नोंदणीधारक खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड एन.एस.पुरकर यांनी केले आहे. या निविदा प्रक्रियेकरिता लिफाफा पध्दतीने निविदा सादर करावयाची आहे. त्यासाठी फक्त जी.एस.टी. नोंदणीधारक खरेदी दारांकडून सिलबंद निविदा मागविण्यात येत आहेत. विक्री करावयाच्या वस्तू संस्थेतील संबंधित विभागामध्ये दि. 16 ऑगस्ट  ते दि.30 ऑगस्ट 2024 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 11.00 ते सायं.5.00 वाजेपर्यंत पहावयास मिळतील. याच कालावधी दरम्यान सादर करावयाच्या विहीत नमुन्यातील निविदा अर्ज रु.300/- (अक्षरी रुपये तीनशे मात्र) ना परतावा किंमतीत संस्थेच्या कार्यालयामधून विकत घेता येईल. या नमुन्यातीलं पूर्ण माहिती अचूकपणे भरलेली निविदा अर्जासोबत रु. 5 हजार अनामत रक्कम जमा करणे गरजेचे असेल सद

घरोघरी तिरंगा” अभियानाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनातर्फे आपत्तीसंदर्भात जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

    रायगड(जिमाका)दि.13:-  जिल्हा प्रशासनच्या वतीने जिल्ह्यात उद्भवणाऱ्या विविध आपत्ती संदर्भात जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथून मॅरेथॉन जनजागृती स्पर्धा रॅलीला जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हिरवा झेंडा दाखवून  मार्गस्थ केले. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसीलदार विक्रम पाटील उपस्थित होते.  या मॅरेथॉन जनजागृती स्पर्धा रॅलीचा मार्ग कन्या शाळा, राम मंदिर, महावीर चौक, बालाजी मंदिर, हनुमान मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा होता. मॅरेथॉन मध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते  बक्षिस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठा सहभाग घेतला होता. ०००००००