Posts

Showing posts from July 11, 2021

जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

  अलिबाग,जि.रायगड दि.18 (जिमाका) :- रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.75 मी.,   अंबा नदी (नागोठणे बंधारा)-5.90 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-4.05 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-18.   50 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-44. 50 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-3.50 मी. इतकी आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 118 मि.मी. पावसाची झाली नोंद

  अलिबाग,जि.रायगड,दि.18 (जिमाका):- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 118.29 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1683.79 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-             अलिबाग- 147.00 मि.मी., पेण- 168.00 मि.मी., मुरुड- 136.00 मि.मी., पनवेल- 182.00 मि.मी., उरण-155.00 मि.मी., कर्जत- 74.40 मि.मी., खालापूर- 113.00 मि.मी., माणगाव- 51.00 मि.मी., रोहा- 184.00 मि.मी., सुधागड-120.00 मि.मी., तळा- 85.00 मि.मी., महाड- 68.00 मि.मी., पोलादपूर- 69.00 मि.मी, म्हसळा- 113.00 मि.मी., श्रीवर्धन- 89.00 मि.मी., माथेरान- 138.40 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 1 हजार 892.60 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 118.29 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 53.58 टक्के इतकी आहे. 00000

जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

    अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :- रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.40 मी.,   अंबा नदी (नागोठणे बंधारा)-4.70 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-3.90 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-18.05 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-44.05 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-3.00 मी. इतकी आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 48 मि.मी. पावसाची झाली नोंद

    अलिबाग,जि.रायगड,दि.17 (जिमाका):- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 48.35 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1565.50 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-             अलिबाग- 29.00 मि.मी., पेण- 53.00 मि.मी., मुरुड- 65.00 मि.मी., पनवेल- 57.00 मि.मी., उरण-46.00 मि.मी., कर्जत- 42.40 मि.मी., खालापूर- 25.00 मि.मी., माणगाव- 45.00 मि.मी., रोहा- 57.00 मि.मी., सुधागड-52.00 मि.मी., तळा- 41.00 मि.मी., महाड- 34.00 मि.मी., पोलादपूर- 49.00 मि.मी, म्हसळा- 75.00 मि.मी., श्रीवर्धन- 68.00 मि.मी., माथेरान- 35.20 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 773.60 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 48.35 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 49.81 टक्के इतकी आहे. 00000

नौकामालकांनी आपल्या नौकेचा पूर्ण जोखमीचा विमा व त्यावर कार्यरत असणाऱ्या प्रत्येक खलाशांचा किमान रूपये 5 लक्ष किंमतीचे विमाछत्र घेणे आवश्यक

  अलिबाग, जि.रायगड, दि.17 (जिमाका):- सागरी मासेमारी करणाऱ्या नौकामालक, मच्छिमार बंधू-भगिनींना गेले निसर्ग चक्रीवादळ व यावर्षीचे तौक्ते चक्रीवादळ यांचा फार वाईट अनुभव आला आहे. समुद्रामध्ये कार्यरत असलेल्या नौकांचे वादळी वारे व सागरी लाटांच्या माऱ्यामुळे अतोनात नुकसान झाले.                या पार्श्वभूमीवर सद्य:स्थितीत अशा नुकसानग्रस्त नौकांकरीता देण्यात येणारी मदत तुटपुंज्या स्वरूपाची आहे. मच्छिमार नौकांचा आपत्ती जोखमीचा विमाही अतिशय तुटपुंज्या स्वरूपाचा असतो. यामुळे अर्थातच वादळामुळे वा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नौकेची हानी झाल्यास पुरेशा स्वरूपाचे विमाछत्र असल्यामुळे नुकसान भरपाई आवश्यकतेप्रमाणे मिळत नाही. यामुळे नौका मालकाचे फार मोठे नुकसान होते.                हे खलाशी सामान्यत: अतिशय गरीब कुटुंबातील असतात. ज्यावेळी नौका मासेमारीसाठी समुद्रामध्ये कार्यरत असते त्यावेळी हे खलाशी नौकेवरच राहतात. तेथेच त्यांचा निवारा व आसरा असतो. नौका जरी बंदरावर आली तरी हे सर्व खलाशी नौकेवरच राहत असतात. बंदरावर त्यांना आवश्यक तेवढा आसरा/सुविधा निश्चितच उपलब्ध नाही.                या सर्व न

"राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून (उत्तराखंड) प्रवेश पात्रता परीक्षा" दि.28 ऑगस्ट रोजी

  अलिबाग, जि.रायगड, दि.17 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी “ राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून (उत्तराखंड) प्रवेश पात्रता परीक्षा ” दि.05 जून 2021 रोजी होणार होती. परंतु एप्रिल व मे 2021 महिन्यातील देशातील व राज्यातील कोविड-19चा प्रादूर्भाव तसेच परिस्थितीचा विचार करुन कमांडंट आर.आय.एम.सी.डेहराडून यांनी दि.05 जून 2021 रोजी होणारी परीक्षा पुढे घेण्याचा निर्णय घेतला होता.      सध्याची देशातील व राज्यातील कोविड-19 चा प्रादूर्भाव तसेच परिस्थितीचा विचार करुन कमांडंट आर.आय.एम.सी. डेहराडून यांनी "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून (उत्तराखंड) प्रवेश पात्रता परीक्षा- जून 2021"   ही दि.28 ऑगस्ट 2021 रोजी घेण्याचे कळविले आहे.     या परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :- दि.28   ऑगस्ट 2021 गणित विषय सकाळी 9.30 ते 11.00 वा., सामान्य ज्ञान दुपारी 12.00 ते 1.00 वा. इंग्रजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 4.30 वा.      तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे चे आयुक्त श्री.तुकाराम तुपे यांनी कळविले आहे. ००००००००

कोविड-19 लसीकरण मोहीम व आरटीपीसीआर कोविड-19 चाचण्यांबाबत जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन आढावा बैठक संपन्न

  अलिबाग, जि.रायगड, दि.17 (जिमाका):- जिल्ह्यातील एमआयडीसी व इतर भागातील औद्योगिक आस्थापनांची कोविड-19 लसीकरण मोहीम व आरटीपीसीआर कोविड-19 चाचण्यांबाबत जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली (दि.15 जुलै) रोजी ऑनलाईन आढावा बैठक संपन्न झाली.               यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग रायगड चे सहसंचालक श्री. एम.आर. पाटील, कामगार आयुक्त पनवेल, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र रायगड, सर्व उपविभागीय अधिकारी, भूसंपादन अधिकारी, काळ प्रकल्प माणगाव तथा समन्वय अधिकारी, जिल्ह्यातील सर्व इंडस्ट्रियल असोसिएशनचे पदाधिकारी व 80 हून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.                यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या की, रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्राकडे एकूण 3 हजार कंपन्यांचे 54 हजार 700 मनुष्यबळ व औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाकडे एकूण 1 हजार 427 कंपन्यांच्या 1 लाख 30 हजार मनुष्यबळासह   एकूण 4 हजार 427 उद्योगांमध्ये 1 लाख 84 हजार 700 मनुष्यबळासह या कंपन्या नोंदणीकृत आहेत.           

विशेष लेख *पशुपालकांनो समजून घ्या....* *जनावरांमधील "लंपी त्वचा रोग" ....*

        रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 झिराड व जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, अलिबाग कार्यक्षेत्रात जनावरांमध्ये लंपी त्वचा रोग (Lumpy Skin Disease) या साथरोगाचा प्रादूर्भाव आढळून आला असून या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.         या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन समिती रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी तातडीने प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 झिराड कार्यक्षेत्रातील आवास व किहीम तसेच जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, अलिबाग कार्यक्षेत्रातील वरसोली (epicenter) या संसर्ग केंद्रापासून 10 कि.मी. परिसर हा बाधित क्षेत्र (infected zone)म्हणून घोषित केला आहे. तसेच बाधित क्षेत्रातील जनावरांच्या शेडचे निर्जंतुकीकरण करून 10 कि.मी. परिघातील परिसरात जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक बाजार व जत्रा प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.         प्रादूर्भाव भागातील जनावरांच्या व त्यांच्या संपर्कातील माणसांच्या हालचालींवर

जनावरांमधील "लंपी स्किन" या साथरोगावरील लसीकरण मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

  अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :- अलिबाग तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 झिराड व जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, अलिबाग कार्यक्षेत्रात जनावरांमध्ये लंपी स्किन डिसिज (Lumpy Skin Disease) या साथरोगाचा प्रादूर्भाव आढळून आला असून या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.   या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन समिती रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 झिराड कार्यक्षेत्रातील आवास व किहीम तसेच जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, अलिबाग कार्यक्षेत्रातील वरसोली (epicenter) या संसर्ग केंद्रापासून 10 कि.मी. परिसर हा बाधित क्षेत्र (infected zone)म्हणून घोषित केला आहे. तसेच बाधित क्षेत्रातील जनावरांच्या शेडचे निर्जंतुकीकरण करून 10 कि.मी. परिघातील परिसरात जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक बाजार व जत्रा प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.   प्रादूर्भाव भागातील जनावरांच्या व त्यांच्या संपर्कातील माणसांच्या हालचालींवर

जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

    अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :- रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.60 मी.,   अंबा नदी (नागोठणे बंधारा)-5.30 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-4.24 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-18.60 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-44.40 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-2.95 मी. इतकी आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 76 मि.मी. पावसाची झाली नोंद

  अलिबाग,जि.रायगड,दि.14 (जिमाका):- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 76.84 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1394.93 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-             अलिबाग- 82.00 मि.मी., पेण- 69.00 मि.मी., मुरुड- 77.00 मि.मी., पनवेल- 117.80 मि.मी., उरण-145.00 मि.मी., कर्जत- 32.60 मि.मी., खालापूर- 39.00 मि.मी., माणगाव- 66.00 मि.मी., रोहा- 72.00 मि.मी., सुधागड-55.00 मि.मी., तळा- 101.00 मि.मी., महाड- 66.00 मि.मी., पोलादपूर- 65.00 मि.मी, म्हसळा- 106.00 मि.मी., श्रीवर्धन- 80.00 मि.मी., माथेरान- 56.00 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 1 हजार 229.40 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 76.84 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 44.39 टक्के इतकी आहे. 00000

रमाई घरकुल योजनेचा गरजू लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा --सहाय्यक आयुक्त, सुनिल जाधव

    अलिबाग,जि.रायगड, दि.13,(जिमाका):- अनुसूचित जाती व नवबौध्द संवर्गातील अल्प, अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी रमाई घरकुल योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येते. जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील गरजू लाभार्थ्यांनी सन 2021-22   मध्ये रमाई घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या अर्जाकरिता ग्रामीण भागासाठी पंचायत समिती आणि शहरी भागासाठी नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचातीमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण रायगड-अलिबाग सुनिल जाधव यांनी केले आहे. ००००००

पोस्को कंपनीच्या सीएसआर फंडातून 2 लाख KF94 मास्क जिल्हा प्रशासनास सुपूर्द

Image
    अलिबाग,जि.रायगड, दि.13,(जिमाका):- येथील माणगाव तालुक्यातील पॉस्को कंपनीच्या सीएसआर फंडातून जिल्ह्यातील शासकीय कार्यालये व इतर घटकांकरिता 2 लाख मास्क आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.       यावेळी पॉस्को कंपनीचे संचालक व्यवस्थापक नाम हैंग हिओ, मॅनेजर सुधीर भोसले, जनरल मॅनेजर कांग हि चोई, डेप्युटी मॅनेजर किशोर पाटील उपस्थित होते.             करोना संकटावर मात करण्यासाठी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून पोस्को कंपनीने केलेले हे योगदान अतिशय मोलाचे आहे. त्यांचा आदर्श घेऊन इतर कंपन्या व सामाजिक संस्था यांनीदेखील आरोग्य यंत्रणेला हातभार लावण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले असून सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून पोस्को कंपनीने केलेल्या योगदानाबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पोस्को कंपनीचे आभार मानले. यापूर्वीही पोस्को कंपनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून महाराष्ट्रातील अनेक प्रसंगात अनेकांच्या मदतीसाठी वेळोवेळी धावून गेली आहे.               जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या म

काशिद पूलाच्या दुरुस्तीचे काम त्वरित करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा ---पालकमंत्री कु.आदिती तटकरे

    अलिबाग,जि.रायगड, दि.13,(जिमाका):- जिल्ह्यातील अलिबाग-मुरूड या राज्य महामार्गावरील काशिद पूल हा मुसळधार पावसामुळे वाहून गेला. या दूर्घटनाग्रस्त भागाची पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी तत्परतेने काल (दि.12 जुलै) रोजी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. त्यावेळी त्यांनी उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल मोरे यांना काशिद पुलाचे दुरुस्तीचे काम त्वरित करून हा रस्ता वाहतुकीसाठी तातडीने खुला करण्यात यावा, अशा सूचना केल्या.   यावेळी पालकमंत्री कु.तटकरे यांच्यासमवेत अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल मोरे, रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात   तसेच बांधकाम विभागाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या दूर्घटनाग्रस्त पुलाची पाहणी केली. त्याचप्रमाणे या दूर्घटनेत मुरूड तालुक्यातील एकदरा येथील वाहून गेलेले मयत श्री.विजय चव्हाण यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देण्यासाठीची कार्यवाही स्थानिक प्रशासनाने तत्परतेने करावी, अशी सूचनाही स्थानिक प्रशासनाला दिली. यावेळी पालकमंत्री कु.तटकरे यांनी या दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्

पेण तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 कामार्ली करिता मौजे कामार्ली येथील शासकीय जागा हस्तांतरित

    अलिबाग, जि.रायगड दि.13 (जिमाका):- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील ग्रामीण स्तरापर्यंतच्या विविध शासकीय यंत्रणा बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यापैकी पशुवैद्यकीय दवाखान्यांना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाहीदेखील प्रलंबित होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत तत्परतेने सुरू केली आहे.   त्याचबरोबर पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी असलेल्या जागांची योग्य निवड व पाहणी करून पशुवैद्यकीय दवाखाने कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही सुरू करण्याबाबतीतही त्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.     या पार्श्वभूमीवर पेण तालुक्यातील येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 कामार्ली या इमारतीच्या बांधकामासाठी शासकीय जमिनीची मागणी होती, याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.     त्यानुसार मौजे कामार्ली, ता.पेण, जि.रायगड येथील गट क्र.65/1 येथील क्षेत्र 0-36-70 हे.आर. या सरकार महार

पेण तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 शिहू करिता मौजे झोतीरपाडा येथील शासकीय जागा हस्तांतरित

    अलिबाग, जि.रायगड दि.13 (जिमाका):- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील ग्रामीण स्तरापर्यंतच्या विविध शासकीय यंत्रणा बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यापैकी पशुवैद्यकीय दवाखान्यांना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाहीदेखील प्रलंबित होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत तत्परतेने सुरू केली आहे.             त्याचबरोबर पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी असलेल्या जागांची योग्य निवड व पाहणी करून पशुवैद्यकीय दवाखाने कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही सुरू करण्याबाबतीतही त्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.               या पार्श्वभूमीवर पेण तालुक्यातील येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 शिहू या इमारतीच्या बांधकामासाठी शासकीय जमिनीची मागणी होती, याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.                त्यानुसार मौजे झोतीरपाडा, ता.पेण, जि.रायगड येथील गट क्र.76/1 येथील क्षेत्र

जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

    अलिबाग,जि.रायगड दि.13 (जिमाका) :- रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.90 मी.,   अंबा नदी (नागोठणे बंधारा)-6.20 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-4.80 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-18.90 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-44.30 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-2.90 मी. इतकी आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 139 मि.मी. पावसाची झाली नोंद

      अलिबाग,जि.रायगड,दि.13 (जिमाका):- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 139.57 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1318.09 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-       अलिबाग- 123.00 मि.मी., पेण- 124.00 मि.मी., मुरुड- 204.00 मि.मी., पनवेल- 83.20 मि.मी., उरण-77.00 मि.मी., कर्जत- 124.50 मि.मी., खालापूर- 145.00 मि.मी., माणगाव- 197.00 मि.मी., रोहा- 150.00 मि.मी., सुधागड-150.00 मि.मी., तळा- 239.00 मि.मी., महाड- 70.00 मि.मी., पोलादपूर- 168.00 मि.मी, म्हसळा- 123.00 मि.मी., श्रीवर्धन- 80.00 मि.मी., माथेरान- 175.40 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 2 हजार 233.10 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 139.57 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 41.94 टक्के इतकी आहे. 00000

सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी

              अलिबाग जि रायगड दि.12 (जिमाका):-   जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये‍ (रिक्त पदे सक्तीने अधिसूचित करणे   कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच कलम 5 (2) अन्वये खाजगी क्षेत्रांतील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष, स्त्री व एकूण   सांखिकी माहिती, प्रत्येक तिमाहीस‍, विषयांकित कायद्यातील तरतूदींनुसार ‍विहित नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.           त्यानुसार जून 2021 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांखिकी   माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड- अलिबाग या कार्यालयाकडून सुरु असून, या सर्व आस्थापनांकडून शंभर टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. यासाठी सर्व आस्थापनांनी आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्डचा वापर करुन या

जिल्ह्यात अतिवृष्टीच्या दरम्यान काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका):- दि.11 ते 15 जुलै, 2021 या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे. या कालावधीत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तरी रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.   आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही, याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित राहावे. या कालावधीमध्ये आवश्यक नसेल तर घराच्या बाहेर पडू नये, घरामध्ये पाणी घुसून पाण्याची पातळी वाढत असल्यास तात्काळ घर सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे, आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरूपाचे असेल तर तात्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेवून स्थलांतरीत व्हावे, घराच्या अवतीभवती पाऊस व वादळामुळे कोणत्या वस्तू वीजेचे खांब किंवा तारा. झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूंपासून लांब राहावे, आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे, आपले जवळ दैनंदिन लागणारे औषधे, केरोसीन

जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

    अलिबाग,जि.रायगड दि.12 (जिमाका) :- रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.10 मी.,   अंबा नदी (नागोठणे बंधारा)-4.20 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-2.75 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-17.70 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-43.65 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-2.65 मी. इतकी आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 80 मि.मी. पावसाची झाली नोंद

      अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका):- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 80.76 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1178.52 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-       अलिबाग- 68.00 मि.मी., पेण- 2.00 मि.मी., मुरुड- 348.00 मि.मी., पनवेल- 0.00 मि.मी., उरण-1.00 मि.मी., कर्जत- 0.50 मि.मी., खालापूर- 14.00 मि.मी., माणगाव- 74.00 मि.मी., रोहा- 49.00 मि.मी., सुधागड-20.00 मि.मी., तळा- 131.00 मि.मी., महाड- 67.00 मि.मी., पोलादपूर- 92.00 मि.मी, म्हसळा- 210.00 मि.मी., श्रीवर्धन- 214.00 मि.मी., माथेरान- 1.60 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 1 हजार 292.10 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 80.76 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 37.50 टक्के इतकी आहे. 00000