Posts

Showing posts from December 31, 2017

ओबीसी महामंडळ कर्जवसूलीसाठी दोन टक्के व्याज सवलत

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 7:- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत (ओबीसी महामंडळ) विविध लाभार्थ्यांना देण्यात आलेले कर्ज वसूलीसाठी महामंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे. येत्या 31 मार्च अखेर थकित मुद्दल व व्याज एकरकमी भरल्यास थकीत व्याज रकमेवर दोन टक्के सवलत देण्यात येणार, असल्याचे शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे रायगड जिल्हा व्यवस्थापक एन. व्ही नार्वेकर यांनी कळविले आहे. यासंदर्भात शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे रायगड जिल्हा कार्यालयामार्फत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त्‍ आणि विकास महामंडळ  मर्यादित, मुंबई यांचे जिल्हा कार्यालय, रायगड या कार्यालयामार्फत विविध कर्ज योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे.सद्यस्थितीत रायगड जिल्ह्यातील वितरीत कर्जाची एकूण थकीत रक्कम 37.94 लक्ष रुपये इतकी आहे. कर्जवसूलीसाठी थकीत लाभार्थी, त्यांचे जामिनदार, हमीपत्र,पगारपत्र धार

जिल्हास्तरीय विज्ञानप्रदर्शनाचा समारोप

              अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6- रायगड जिल्हा परिषद, शिक्षण मंडळ, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गो.म.वेदक विद्यामंदिर व ज्यु.कॉलेज तळा, जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक मंडळ रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रायगड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व ग्रंथमहोत्सवाचा  आज तळा येथे समारोप झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी जाहीर झालेली पारितोषिके या प्रमाणे. जिल्हा विज्ञान शैक्षणिक साहित्य :- प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर प्रथम क्रमांक :-  प्रतिभा गणेश जाधव-को.ए.सो.स.रा.तेंडुलकर विद्यालय, रेवदंडा, अलिबाग द्वितीय  क्रमांक :-  भिकूराम मनोहर गोरेगांवकर-अब्दुलसत्तार ई अंतुले हायस्कूल, दिघी, श्रीवर्धन तृत्तीय क्रमांक :-  वासुदेव जर्नादन पाटील,- रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल,खारघर, पनवेल जिल्हा विज्ञान लोकसंख्या शिक्षण :- प्राथमिक शिक्षक गट प्रथम क्रमांक :- रमेश बाळकृष्ण धुमाळ-रा.जि.प.शाळा करंज विरा, रोहा द्वितीय क्रमांक :- दयानंद सिताराम मोकल-रा

किटकनाशक विक्री नियंत्रण धोरण :नागरिकांकडून सुचना अभिप्राय मागवल्या

  अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 6 - कीटकनाशके फवारणीमुळे होणारी मनुष्य व प्राण्यांच्या जीवीत हानीबरोबरच, शिफारस नसलेली कीटकनाशके व त्यांचा अयोग्य प्रमाणात वापरामुळे पर्यावरणहानी,अन्न घटकांमध्ये कीटकनाशकांचे हानीकारक अंश सापडून आरोग्य समस्या देखिल निर्माण झालेल्या आहेत. यासाठी राज्य शासनामार्फत यापुढे जिल्हानिहाय / विभागनिहाय पिक पद्धतीनुसारच केवळ नोंदणीकृत व शिफारस केलेल्याच कीटकनाशकांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठीचे धोरण निश्चित करण्यात येत आहे. त्यासाठी या क्षेत्रातील सर्व नागरीकांकडून यावर सुचना / अभिप्राय मागविण्यात आल्या आहेत. यासंदर्भात मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्फत आवाहन करण्यात आले आहे की, खरीप हंगाम 2017 मध्ये कीटकनाशकांची हाताळणी करतांना राज्यात विशेषत: यवतमाळ व राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये शेतमजूर / शेतकरी यांचे विषबाधेमुळे जीवित हानी झालेली आहे. कीटकनाशकांची काळजीपुर्वक हाताळणी करण्यासाठी कृषि विभागाने जनजागृती मोहिम राबवून मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी केलेली आहे. शेतमजूर / शेतकरी यांना भविष्यात कीटक

शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना : पालकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ

              अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 6 - राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासासाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती  योजना राबविली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकांची उत्पन्न मर्यादा ही सहा लाख रुपये इतकी होती ती आता शासनाने आठ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यास मान्यता दिली आहे. नुकतेच दि,1 जानेवारी 2018 रोजी शासन निर्णय जारी करुन शासनाने हा निर्णय जाहीर केला आहे.   यासंदर्भात  शासन निर्णय इबीसी-2017/ प्र.क्र.27/शिक्षण दि.1 जानेवारी 2018 मध्ये देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खाजगी विनानुदानित व कायम विनानुदानित महाविद्यालये, तंत्र निकेतने आणि शासकीय विद्यापीठात  विनानुदान तत्वावर सुरु असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी  प्रवेश घेतलेल्या  विमुक्त जक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक  शुल्क प्रतिपुर्ती योजनेअंतर्गत पालकांची वार्षिक उत्पन्न  मर्यादा ही 6 लक्ष रुपयांवरुन 8 लक्ष करण्यात आली आहे. ही सुधारीत उत्पन्न मर्यादा सन 2017-18 या शैक्षणिक वर

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी गुरुवार दि.11 पर्यंत प्रस्ताव मागविले

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4:-   क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगडद्वारा देण्यात येणाऱ्या   जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व कार्यकर्त्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. हे प्रस्ताव येत्या गुरुवार दि.11 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी  कार्यालयात पाठवावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यात सन 2002 पासून हा पुरस्कार देण्यात येतो.    जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू, मार्गदर्शक व क्रीडा संघटक,कार्यकर्ता यांना हा पुरस्कार प्रजासत्ताक दिनी दि.26 रोजी देण्यात येणार आहे.   सन 2017-18 च्या पुरस्कार वितरणासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात आले आहे. पुरस्कारामध्ये प्रमाणपत्र,स्मृतिचिन्ह आणि रोख रुपये दहा हजार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.   पुरस्काराकरिता   30 जून 2017 पर्यंतची कामगिरी,कार्य ग्राह्य धरले जाईल.        पुरस्कारासाठीचे निकष याप्रमाणे- गुणवंत खेळाडू :   या पुरस्काराअंतर्गत तीन पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून एक महिला

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा जिल्हादौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 4- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे दिनांक रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- शनिवार दि.6 रोजी  रात्री साडे आठ वाजता महाराष्ट्र सिमलेस,सुकेळी,नागोठणे जि.रायगड येथे आगमन व  मुक्काम. रविवार दि.7 रोजी सकाळी नऊ वाजता  महाराष्ट्र सिमलेस, सुकेळी, नागोठणे जि.रायगड येथून दापोली जि.रत्नागिरीकडे प्रयाण. ०००००

जिल्हास्तरीय विज्ञानप्रदर्शन व ग्रंथोत्सवास तळा येथे उत्साहात प्रारंभ : विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभा अविष्कारातून 90 प्रयोगांचे सादरीकरण

Image
              अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4- रायगड जिल्हा परिषद, शिक्षण मंडळ, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गो.म.वेदक विद्यामंदिर व ज्यु.कॉलेज तळा, जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक मंडळ रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व ग्रंथमहोत्सवाला आज तळा येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. जिल्हाभरातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेच्या अविष्काराचे दर्शन घडविणाऱ्या या प्रदर्शनात तब्बल 90 प्रयोगांचे सादरीकरण बाल वैज्ञानिकांनी केले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे यांच्या हस्ते व आ. बाळाराम पाटील, आ.सुभाष पाटील यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. शनिवार दि.6 पर्यंत हे प्रदर्शन व ग्रंथोत्सव सुरु राहणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, आमदार बाळाराम पाटील, आमदार सुभाष  उर्फ पंडितशेट पाटील,  नगराध्यक्ष श्रीमती रेश्मा मुंढे, जि.प. चे शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील, पंचायत समितीचे सभापती रविंद्र नटे, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विद्याधर धामणकर, मुख्याध्यापक बी.जे.धुमाळ, जि.प.चे उपमु

अलिबाग पं. स.ची मासिक सभा शनिवारी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3:-   अलिबाग पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा शनिवार दि.6रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती अलिबाग सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे.या सभेस सर्व सदस्य,सदस्या यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन पं.स.सभापती प्रिया नथुराम पेढवी, यांनी केले आहे. 00000

बेरोजगारांच्या सेवा संस्थांकडून कंत्राटी कामांचे प्रस्ताव मागविले

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 3:- बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने  रोजगार व स्वयंरोजगार विभाग, जिल्हा स्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यांत आली आहे. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांकडून या सोसायट्यांना तीन लाख रुपये मर्यादेपर्यंत रकमेची कामे विनानिविदा उपलब्ध करुन देण्यासाठी काम वाटप समितीकडे पत्रे प्राप्त झाली आहेत. ज्या सेवा सोसायट्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग या कार्यालयाकडे नोंदणीकृत झाल्या आहेत अशा संस्थांनी ही कंत्राटी कामे मिळण्यासाठीचे प्रस्ताव बुधवार दि.10 रोजी सायं.5 वाजेपर्यंत सादर करावेत. अपूर्ण माहिती असलेले व उशीरा प्राप्त झालेले अर्ज अपात्र ठरविण्यात येतील, असे सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे. 0000

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सव आजपासून तळा येथे

        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3- जिल्हा विज्ञान प्रदर्शन व ग्रंथमहोत्सव 2017-18 चे आयोजन  गुरुवार दि.4 ते शनिवार दि. 6  या कालावधीत तळा येथे तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या गो.म.वेदक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये करण्यात आले आहे. रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग, रायगड-अलिबाग व तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गो.म.वेदक विद्यामंदिर व ज्यु.कॉलेज तळा जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक मंडळ, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले आहे.  ग्रंथदिंडीने शुभारंभ  गुरुवार दि.4 रोजी सकाळी 10 वा. जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे यांच्या हस्ते ग्रंथपूजन करुन  तळा नगरपंचायत येथून ग्रंथदिंडीस प्रारंभ होईल. यावेळी तळा पंचायत समितीचे सभापती  रविंद्र नटेव डॉ. नंदिनी देशमुख यांचीही उपस्थिती राहणार आहे. उद्घाटन सत्र विज्ञान प्रदर्शन व ग्रंथमहोस्तवाचे उद्घाटन विधान परिषद सदस्य आ. सुनिल तटकरे व आ. जयंत पाटील यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता कार्यक्रमस्थळी होईल. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे या उपस्थित राहतील. यावेळी विधान परिषद सदस्य आ. अ

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Image
        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे व सर्व विभागप्रमुख तसेच कर्मचारी, महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ०००००

सिद्धी 2017-संकल्प 2018 :सर्वांगिण विकासासाठी प्रशासन कटीबद्ध- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.2- जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासन राबवित असतांना  ते अधिकाधिक लोकाभिमुख  असावे यासाठी दक्षता घेत असतांनाच जिल्ह्याचा होत असलेला विकास हा सर्वांगिण असावा यासाठी प्रशासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले. 'सिद्धी 2017- संकल्प 2018' या पत्रकार परिषदेप्रसंगी  जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी हे पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी तसेच प्रशासकीय यंत्रणांचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांनी उपस्थित पत्रकारांना जिल्ह्यातील गेल्या वर्षभरातील प्रमुख उपलब्धतांची माहिती दिली. त्यात प्रामुख्याने शेतकरी हिताच्या योजना व ग्रामविकासाच्या विविध योजनांमधील कामगिरीची माहिती त्यांनी सादरीकरणाद्वारे उपस्थितांसमोर मांडली. तसेच आगामी  काळात जिल्ह्यात कातकरी उत्त्थान अभियान , आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी कायापालट अभियान,  बोट ॲम्ब्युलन्स सेवा, पर्यटन विकास तसेच ग