Posts

Showing posts from November 11, 2018

राज्य लोकसेवा आयोगामार्फत 2019 या वर्षातील परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

नवी मुंबई, दि. 16  :   राज्य लोकसेवा आयोगामार्फत 2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या   www.mpsc.gov.in   या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे , सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2018 जाहिरात नोव्हेंबर 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुख्य परीक्षा दिनांक 19 जानेवारी 2019 रोजी होणार आहे.   राज्य सेवा परीक्षा 2019 जाहिरात डिसेंबर   2018 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पूर्व परीक्षा दिनांक 17 फेब्रुवारी 2019 रोजी होणार आहे.   मुख्य परीक्षा दिनांक 13,14 व 15 जुलै 2019 रोजी होणार आहे.    महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2019 जाहिरात जानेवारी 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पूर्व परीक्षा दिनांक 24 मार्च 2019 रोजी होणार आहे.    महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर क्रमांक -1   मुख्य परीक्षा दिनांक 28 जुलै 2019 रोजी होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर क्रमांक -2 पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा दिनांक 04 ऑगस्ट 2019 रोजी होणार आहे.   महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 20

राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिनः नाचणी, वरी चे क्षेत्र वाढविण्यासाठी नियोजन करा- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
             अलिबाग, जि. रायगड, दि.16 (जिमाका)- नाचणी वरी यासारख्या पोषणमूल्य असणाऱ्या तृणधान्याचे आहारातील महत्त्व खूप आहे. आहारात या धान्यांचा समावेश व्हावा यासाठी रायगड जिल्ह्यात नाचणी, वरी सारख्या तृणधान्य पिकांखालील क्षेत्र वाढविण्याची गरज आहे, त्यासाठी कृषि विभागाने गावपातळीवर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले. राष्ट्रीय पौष्टीक अन्नधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके, आहारतज्ज्ञ   डॉ. शंकर फुलवाले, उपशिक्षणाधिकारी सुनिल गवळी   तसेच कृषि विभागाचे अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. केंद्र शासनाने सन 2018- 19 हे वर्ष राष्ट्रीय पौष्टिक अन्नधान्य वर्ष घोषित केले आहे. ज्वारी, बाजरी, रागी व अन्य लघु अन्नधान्ये या पिकांना त्यांचे आहारातील महत्त्व लक्षात घेता पौष्टीक अन्नधान्य कार्यक्रमात रागी

पत्रकारितेचे स्वरुप बदलले मात्र महत्त्व कायम- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
             अलिबाग, जि. रायगड, दि.16 (जिमाका)- डिजीटल युगात पत्रकारितेत अनेक बदल झाले असले तरी पत्रकारांनी बाळगावयाचे सामाजिक जबाबदारीचे भान तितकेच महत्त्वाचे आहे, त्यामुळेच पत्रकारितेचे महत्त्व टिकून आहे, असे प्रतिपादन जिल्हा सरकारी वकील ॲड. संतोष पवार यांनी आज येथे केले. लोकशाही प्रणालीत असलेले पत्रकारितेचे स्वरुप डिजीटल क्रांतीमुळे बदलले असले तरी   महत्त्व  मात्र कायम आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अध्यक्षीय समारोप करतांना केले. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात ‘डिजीटल युगातील पत्रकारिताः आचारनिती आणि आव्हाने’ या विषयावर चर्चासत्राचे अयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर, ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील, विजय चवरकर, दैनिक रायगड टाईम्सचे संपादक राजन वेलकर, दैनिक लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक जयंत धुळप, ईनाडू  दै. सामना  रा जेश भोत्सेकर, झी मिडीय

दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 - उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण येथे दुचाकीसाठी नवीन मालिका MH-06-BZ सोमवार दि. 19 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे.   मालिका सुरु होण्याची दिवशी अर्ज कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी अडीच पर्यंत स्विकारले जातील.   प्रथम तीनपट रक्कम भरणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल   एकाच दिवशी एकाच पसंतीच्या क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सदरचा पसंती क्रमांक बंद लिफाफ्यात विनिर्दिष्ट केलेल्या शुल्कापेक्षा जास्त रकमेचा धनाकर्ष (Demand Draft) सादर केल्यानंतर जाहीररित्या जास्तीत जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्याला देण्यात येईल यांची नोंद घ्यावी.   पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची पध्दतीची माहिती कार्यालयीन सूचना फलकावर उपलब्ध आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांनी कळविले आहे. 00000

पत्रकार दिनानिमित्त आज चर्चासत्र

            अलिबाग, जि. रायगड, दि.15 (जिमाका)- राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त शुक्रवार दि.16 रोजी  जिल्हा माहिती कार्यालय, रायगड यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे . ‘डिजीटल युगातील पत्रकारिताः आचारनिती आणि आव्हाने’ हा चर्चासत्राचा विषय असून यासंदर्भात जिल्हा सरकारी वकील ॲड. संतोष पवार हे मार्गदर्शन करणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व पत्रकार, माध्यमकर्मींनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले आहे. 00000

करंजा बंदराची प्रधानसचिवांनी केली पाहणी : मूल्यवर्धनासाठी मासेमारी सोबत प्रक्रियाही आवश्यक- प्रधानसचिव अनुपकुमार यांनी मच्छिमारांशी साधला संवाद

            अलिबाग, जि. रायगड, दि.15 (जिमाका)- जिल्ह्यातील उत्तम मासळीला चांगली मागणी आहे. मात्र मिळणारे बाजारमूल्य वाढवायचे असेल तर मासेमारी करतांना त्यासोबत मासे प्रक्रिया-साठवणूकीलाही चालना देणे आवश्यक आहे. त्यासाठी करंजा बंदरात आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव द्यावा, असे निर्देश राज्याचे कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधानसचिव अनुपकुमार यांनी  आज करंजा ता. उरण येथे करंजा बंदर भेटी प्रसंगी दिले.              प्रधानसचिव अनुपकुमार यांनी आज करंजा येथे बंदर पाहणी केली व त्यानंतर मच्छिमार बांधवांशी चर्चा केली. यावेळी त्यांचे समवेत  जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, प्रादेशिक उपायुक्त युवराज चौगुले, सह आयुक्त मत्स्यव्यवसाय राजेंद्र जाधव,  जेएनपीटी विश्वस्त महेश बाल्दी,  महाराष्ट्र मेरीटाईम  बोर्डाचे मुख्य अभियंता डॉ. महेश डेकाटे, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रायगड  अभयसिंह शिंदे इनामदार तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. तसेच करंजा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष शिवदास नाखवा यांचीही यावेळी उपस्थिती होती.  यावेळी सदस्य सहकारी संस्थांचे चाळीसहून

चारा उत्पादन, बांधणी व साठवणुकीवर भर द्या- प्रधानसचिव अनुपकुमार : जिल्ह्यातील 29 पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ मानांकीत

Image
            अलिबाग, जि. रायगड, दि.15 (जिमाका)- राज्यातील दुष्काळी स्थिती पाहता चारा टंचाई निर्माण होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्याकरीता जिल्ह्यात चारा उत्पादन, तसेच उपलब्ध चाऱ्याची उत्तम बांधणी व साठवणूकीचे डेपो तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची क्षमता बांधणी   करुन भर द्या, असे निर्देश राज्याचे कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधानसचिव अनुपकुमार यांनी   आज येथे दिले. यावेळी जिल्ह्यातील 29 पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल त्यांना अनुपकुमार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय   विभागाचे प्रधानसचिव अनुपकुमार हे आज जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय   विभागाचा आढावा एका बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, मत्स्य व्यवसाय विभागाचे उपसचिव विजय चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुभाष म्हस्के, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बंकट आर्ले, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय अभयसिंह शिंदे इनामदार त

पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्त उद्या कार्यक्रम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14 - राष्ट्रीय पौष्टीक अन्नधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्य दिन शुक्रवार दि.16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र शासनाने सन 2018- 19 हे वर्ष राश्ट्रीय पौष्टिक अन्नधान्य वर्ष घोषित केले आहे. ज्वारी, बाजरी, रागी व अन्य लघु अन्नधान्ये या पिकांना त्यांचे आहारातील महत्त्व लक्षात घेता   पौष्टीक अन्नधान्य कार्यक्रमात रागी (नाचणी) या पिकासाठी रायगड जिल्ह्याची निवड केली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शेतकरी उत्पादक गट, , कृषि प्रक्रिया उद्योग उभार्णी, पौष्टिक अन्नधान्य   मूल्यवृद्धीसाठी उत्प्दन निर्मिती साखळी तयार करणे, जनजागृती करणे अशा   विविध बाबींचा समावेश आहे. त्यादृष्टीने जनजागृतीपर कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात शुक्रवार दि.16 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे, या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

पत्रपरिषदः गेल्या चार महिन्यात 3 कोटी 98 लाख रुपयांच्या धान्य व केरोसिनची बचत- जिल्हा पुरवठा अधिकारी दुफारे

                         अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14 - राज्यात End to End  Computerization प्रकल्पांतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणीकीकरण प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत सर्व रास्त भाव धान्य दुकानांत ई-पॉस  मशीन बसविण्यांत आल्या असून त्याद्वारे पात्र लाभर्थ्यांची बायोमेट्रीक ओळख पटवून शिधा वस्तूंचे वितरण करण्यांत  येत आहे. या मुळे वितरण व्यवस्थेत आमुलाग्र बदल झाला असून वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक होत आहे. रायगड जिल्ह्यात या बदलामुळे गेल्या चार महिन्यात 6057.2 मेट्रिक टन धान्याची  व 3 लाख 62 हजार लिटर केरोसिनची बचत झाली आहे. त्यामुळे तब्बल 3 कोटी 98 लाख 20 हजार रुपयांची बचत झाली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी एल.एम दुफारे यांनी दिली. पुरवठा शाखेमार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची व त्यामुळे झालेल्या बदलांची आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा पुरवठा अधिकारी दुफारे यांनी पत्रकारांना माहिती दिली. आधार संलग्न वितरण यावेळी ते म्हणाले की, रास्त भाव धान्य दुकानांत Aadhar enabled Public Distribution System (AePDS) प्रणाली सुर

माथेरान इको सेन्सेटीव्ह झोन सनियंत्रण समितीची बैठक शनिवार दि.17 रोजी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14- माथेरान इको सेन्सेटिव्ह झोन संनियंत्रण समितीची बैठक शनिवार दि.17 नोव्हेंबर रोजी होणार आहे.   या क्षेत्रात करावयाच्या विकास कामांचे प्रस्ताव   तसेच या समितीकडे करावयाच्या तक्रारींसाठी नागरिकांनी आपले अर्ज या समितीचे सदस्य सचिव जिल्हाधिकारी रायगड यांचेकडे तात्काळ सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. भारत सरकार, पर्यावरण भवन, नवी दिल्ली यांच्या परिपत्रकान्वये सेवा निवृत्त भा. प्र. से अधिकारी वासुदेव जी.गोरडे यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 9 सदस्यांची सनियंत्रण समिती दोन वर्षाकरीता गठीत करण्यात आली असून जिल्हाधिकारी रायगड हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. या समितीची आठवी बैठक   येत्या शनिवार दि. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा   वा. माथेरान नगरपरिषदेचे सभागृह, माथेरान ता.कर्जत, जि.रायगड येथे आयोजित करण्यात आली आहे. या संदर्भात भारत सरकारच्या पर्यावरण व वन विभागाकडील दि.4 फेब्रुवारी 2003   च्या अधिसूचनेन्वये रायगड व ठाणे जिल्हयातील एकूण 89 (काही पूर्ण व काही भागत:) गावांचा प्रदेश संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.यात रायगड जिल्ह्यातील कर्जत त

सामाजिक न्याय मंत्री ना. बडोले आज साधणार ई-संवाद : नागरिक-विद्यार्थ्यांना थेट प्रश्न विचारण्याची सुविधा

अलिबाग, जि. रायगड, दि.14 (जिमाका)- राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री ना.राजकुमार बडोले ,   हे राज्यातील जनतेशी गुरुवार दि.   15   रोजी सकाळी   साडे अकरा   वा. लाईव्ह ई-संवाद साधणार आहेत.    महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून गेल्या चार वर्षांच्या कालावधीत राज्यातील अनुसूचित जाती ,   विमुक्त आणि भटक्या जमाती ,   इतर मागासवर्ग ,   दिव्यांग , आणि निराश्रीत इत्यादी समाजघटकांसाठी कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणी बरोबरच सामाजिक प्रबोधनाचे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. ई-संवादद्वारे जनतेच्या विविध प्रश्नांची उत्तरे श्री. बडोले देणार आहेत.    या कार्यक्रमात   elearning.parthinfotech.in   लिंक द्वारे सहभागी होऊन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची अंमलबजावणी ,   त्यांची यशस्विता ,   याबाबतचे प्रश्न , 83 84 85 86 85   या क्रमांकावर व्हॉटसअॅप द्वारे श्री. बडोले यांना विचारावेत ,   असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे करण्यात आले आहे. हे प्रक्षेपण दिलेल्या लिंकवरुन स्मार्ट फोन, टॅबलेट इ. वर ही पाहता येणार आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांचे शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती प्रदान डीबीटीद्वारे

अलिबाग, जि. रायगड, दि.14 (जिमाका)- शालांत परीक्षोत्तर   शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थी लाभार्थ्यांना त्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रदान हे   थेट बॅंक खात्यात (डीबीटी द्वारे) जमा होणार आहे. यासंदर्भात शासनाने शालांत परीक्षोत्त्तर   शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थी लाभार्थ्यांना त्यांच्या आधार क्रमांक संलग्नित केलेल्या   बॅंक खात्यात   शिष्यवृत्ती व देय शैक्षणिक शुल्क अदा करतांना ते थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा करावे असे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने   http://mahadbt.gov.in   या संकेतस्थळावर दि.30 नोव्हेंबर पर्यंत भरावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे. 00000

दिव्यांगांना फिजिओथेरपी, स्पीच थेरपी : उपचारांसाठी जिल्हा परिषद देणार अर्थसहाय्य

अलिबाग, जि. रायगड, दि.14 (जिमाका)- रायगड जिल्हा परिषदेने विविध अपंगत्वावर केले जाणारे फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ॲक्युपंक्चर थेरपी याउपचारांसाठी अर्थसहाय्य देण्याची योजना कार्यान्वित केली आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. रायगड जिल्हा परिषद आपल्या स्व उत्पन्नाचा 5 टक्के निधी दिव्यांग कल्याणासाठी राखून खर्च करीत असते. दिव्यांग व्यक्तिंना गरजेनुसार फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, स्पीच थेरपी आदी उपचार करणे आवश्यक असते. मात्र या उपचारांचा खर्च   अल्प उत्पन्न गटातील व्यक्तिंना परवडणारा नसतो. म्हणून या उपचारांसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. त्यासाठी ज्या कुटूंबांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत असलेल्या व अशा उपचारांची आवश्यकता असलेल्या व्यक्तिंना हे अर्थसहाय्य दिले जाईल. त्यासाठी   समाजकल्याण विभागात दूरध्वनी 02141-222079 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी, रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी केले आहे. 00000

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजना : ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसहाय्य : 30 नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव मागविले

            अलिबाग, जि. रायगड, दि.14 (जिमाका)- भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता यांच्या असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात.    सन 2018-19 पासून प्रतिष्ठानकडून असमान निधी योजना सुधारित करण्यात आल्या आहेत.   सदर असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार सन 2018-19 साठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.   त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.gov.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी तो या संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा.               या योजनेतून खालील प्रयोजनासाठी अर्थसहाय्य दिले जाते. ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी ‘ राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा ’ विकसित करण्यासाठी.   महोत्सवी वर्ष जसे 50/60/7

विशेष लेखः-नाचणीः सत्वयुक्त तृणधान्य

केंद्र शासनाने   सन 2018-19 हे वर्ष राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले आहे. त्याअनुषंगाने शुक्रवार दि.16 नोव्हेंबर रोजी पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातही विविध कार्यक्रमांचे आयोजन कृषि विभागामार्फत करण्यात येणार आहे. त्यानिमित्त ‘नाचणी’ या पारंपारिक पौष्टिक तृणधान्याची माहिती देणारा हा विशेष लेखः-               नाचणी हे महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे तृणधान्य आहे. या तृणधान्याच्या सेवनाची मोठी परंपरा आपल्या राज्यात आहे. या धान्याच्या सेवनामुळे होणारे आरोग्याचे लाभ पाहता हे पिक म्हणजे सत्वयुक्त तृनधान्य आहे असेच म्हणावे लागेल. या पिकाची लागवड प्रामुख्याने घाट व उप - पर्वतीय विभागातील ठाणे , रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , कोल्हापूर , सांगली , सातारा , पुणे , नाशिक , अहमदनगर , धुळे , नंदुरबार या जिल्ह्यामध्ये , तसेच कोकणविभागातील जिल्ह्यामध्ये केली जाते. नाचणी पीक मुख्यत्त्वेकरून डोंगर उतारावरील हलक्या जमिनीत घेतले जाते दुर्गम प्रदेशात राहणा ऱ्या आदिवासी             लोकांचे नाचणी हे प्रमुख अन्न आहे. आहाराच्या दृष्टीने नाचणी