Posts

Showing posts from December 12, 2021

मुरुड-जंजिराचे प्रसाद चौलकर आणि पनवेलचे अभिजित सिंग कोहली यांनी पूर्ण केली स्वातंत्र्याची अमृत परिक्रमा “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त” 23 दिवसात पूर्ण केली 12 राज्य आणि 7 हजार किलोमीटरची 'बाईक राइड'

  अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका ) :-     भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात “ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” साजरा केला जात आहे. याच उत्सवाचा भाग म्हणून (INDUSEM) इंडिया यूएस इमर्जन्सी मेडिसिन कौन्सिल, जागतिक आरोग्य संघटना   (WHO),   ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS, Delhi) यांच्यातर्फे 'स्वातंत्र्याची अमृत परिक्रमा' आयोजित केली गेली.   या माध्यमातून 12 राज्ये आणि तब्बल 7 हजार किलोमीटरच्या या मोटारसायकल परिक्रमेसाठी रायगड जिल्ह्यातील श्री.प्रसाद प्र. चौलकर (मुरुड जंजिरा) आणि अभिजित सिंग कोहली (पनवेल) या दोन अनुभवी बाईकर्सची विशेष निवड करण्यात आली होती. दि. 8 नोव्हेंबर 2021 रोजी पनवेल, रायगड येथून सुरू झालेली “ स्वातंत्र्याची अमृत परिक्रमा ” महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडीसा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात या 12 राज्यात प्रवास करून दि.30 नोव्हेंबर 2021 रोजी पनवेल येथे समाप्त झाली. या परिक्रमेत 'इजा प्रतिबंध' (Injury Prevention) आणि 'रस्ता सुरक्षा' (Ro

साहसी पर्यटन उपक्रमाची पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करावी-- पर्यटन उपसंचालक श्री.हनुमंत हेडे

    अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका ) :-     महाराष्ट्रात साहसी पर्यटन उपक्रमांना चालना देणे तसेच विविध साहसी उपक्रम आयोजक आणि साहसी उपक्रमांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांनी नोंदणी, विनियमन, सनियंत्रण इत्यादी बाबत राज्य शासनाचे साहसी पर्यटन धोरण जाहीर केलेले आहे. या धोरणानुसार जमिन, हवा आणि पाणी यावर साहसी पर्यटन उपक्रम राबविणाऱ्या संस्था यांच्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आलेल्या असून या धोरणानुसार जमीन, हवा, पाणी यावर साहसी पर्यटन उपक्रम राबवित असलेले, कार्यरत असलेल्या किंवा नवीन उपक्रम सुरु करण्याच्या संस्था, व्यक्ती, व्यक्ती समूह यांनी ही नोंदणी पर्यटन संचालनालयाकडे करावी, असे आवाहन पर्यटन संचालनालयाच्या   कोकण भवन, सीबीडी बेलापूर, येथील प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक श्री.हनुमंत हेडे यांनी केले आहे.     पर्यटन संचालनालयाने साहसी पर्यटन उपक्रमांच्या नोंदणी करण्याची कार्यपध्दती सुरू केलेली असून www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर Menu Registration Forms Adventure Registration   यावर Click करून ऑनलाईन अर्ज व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून नोंदणी करता ये

शासनाचे संकेतस्थळ कार्यान्वित, करोनाने मृत्यू झाला असल्यास मिळणार 50 हजारांची सानुग्रह मदत संबंधितांनी अर्ज करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका):-   कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु.50 हजार इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा.सर्वोच्च न्यायालयाने दि.04 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यपरथापन मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय दि.26 नोव्हेंबर 2021 रोजी निर्गमित केला आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने ऑनलाईन वेब पोर्टल विकसित केले असून, याद्वारे कोविड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास रु.50 हजार सानुग्रह सहाय्य प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने   www.mahacovid19relief.in   या संकेतस्थळावर लॉगिन करणे आवश्यक राहील. याकरिता अर्जदार स्वतः किंवा सेतु केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करु शकेल. हा अर्ज दाखल करताना अर्जदारास खालील कागदपत्रे/माहिती सादर करणे बंधनकारक राहील. 1. अर्जदाराची आधार कार्ड प्रत. 2. मृत व्यक्तींची आधार कार्डची प्रत.3. जन्म आणि मृत्यु नोंदणी कायदा, 1969 अंतर्गत मृत व्यक्तींचे मृत्यु प्रमाणपत्र. 4. अर्जदाराच

तृतीयपंथीयांनी नोंदणी करणे व ओळखपत्राकरिता समाज कल्याण कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा -सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव

  अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका):-   जिल्हयातील तृतीयपंथीयांच्या समस्यांच्या/तक्रारी संदर्भात जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्यानुसार तृतीय पंथीय यांना सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत ओळखपत्र देण्यात येणार आहे. या ओळखपत्रासाठी तृतीयपंथीय व्यक्तींनी www.transgender.dosje.gov.in या पोर्टलवर तात्काळ नोंदणी करावी. तरी तृतीयपंथीय व्यक्ती यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, रायगड, कच्छी भवन, नमिनाथ मंदिराजवळ, सेंट मेरी स्कूल समोरील श्रीबाग रोड, अलिबाग येथे तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे. 00000

अनुसूचित जातीतील नवउदयोजकांनी स्टॅन्ड-अप इंडिया योजनेचा लाभ घ्यावा -सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव

    अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका):-   केंद्र शासनाने स्टॅन्ड - अप इंडिया ही योजना घोषित केली आहे. या योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांतील नवउदयोजक लाभार्थ्यांना मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती साठी असलेल्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउदयोजक यांना 10% स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅन्ड- अप इंडिया योजनेंतर्गत 75% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित Front and Subsidy 15% राज्य शासनामार्फत देण्यात येते.   या योजनेचा लाभ ज्या नवउदयोजकांना घ्यावयाचा आहे, त्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग, कच्छी भवन, नमिनाथ मंदिराजवळ, सेंट मेरी स्कूल समोरील श्रीबाग रोड, अलिबाग-402201 येथे संपर्क तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे. 00000

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कशेळे ग्रामीण रुग्णालयात सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन

  अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका):-   दुर्गम आदिवासी भागातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत व एम.जी.एम.वैद्यकीय महाविद्यालय, कामोठे यांच्या सहकार्याने कर्जत तालुक्यातील कशेळे येथील ग्रामीण रुग्णालय येथे शुक्रवार दि.24 डिसेंबर 2021 रोजी, सकाळी 9 ते दुपारी 3.00 पर्यंत वैद्यकीय व दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सर्व प्रकारचे रोगनिदान करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये 1) भिषक (Physician) 2) शस्त्रक्रिया (Surgery) 3) बालरोग (Peadiatrician) 4) कान, नाक, घसा (ENT) 5)भूलतज्ञ (Anaesthestic) 6) स्त्रीरोगतज्ञ (Obst.& Gynac) 7) अस्थीरोग (Orthopaedic) 8) त्वचारोग (Skin & VD) 9) नेत्ररोग (Eye) 10) दंतचिकित्सा (Dental) अशा विविध वैद्यकीय तज्ञांमार्फत सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांची मधुमेह, हृदयविकार, दमा, वजन कमी होणे, सतत ताप येणे, सतत खोकला येणे, धाप लागणे, अंगावर गाठी येणे, हार्निया, हायड्रोसिल, अॅपेंडिक्स व इतर ऑपरेशन्स, अंगावरून पांढरे जाणे, अनियमित रक्तस्त्राव, कर्करोगाबाबत तपासणी (Papsm

नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक क्षेत्रात (Dry Day) दारू बंदी लागू करणेबाबत

  अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका):-  एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या 81 व डिसेंबर 2021 मध्ये मुदत समाप्त होणाऱ्या 18 तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2020-21 जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने रायगड जिल्ह्यातील पाली, म्हसळा, पोलादपूर, खालापूर, माणगाव व तळा या नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक मंगळवार, दि.21 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. या आदेशाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यातील पाली, म्हसळा, पोलादपूर, माणगाव, खालापूर व तळा या नगरपंचायतींच्या निवडणूकीच्या आधीच्या दिवशी, निवडणुकीच्या दिवशी व मतमोजणीच्या दिवशी निवडणूक कार्यक्षेत्रात मद्य विक्री न होण्याच्या दृष्टीने दारू बंदी (Dry Day) लागू करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. तरी, रायगड जिल्ह्यातील पाली, तळा, माणगाव, खालापूर, पोलादपूर व म्हसळा या नगरपंचायतींच्या निवडणूक कार्यक्षेत्रात मद्य विक्री होणार नाही, यादृष्टीने निवडणुकीच्या आधीच्या दिवशी, निवडणुकीच्या दिवशी व मतमोजणीच्या दिवशी (Dry Days

पाली, म्हसळा, पोलादपूर, खालापूर, माणगाव व तळा नगरपंचायत हद्दीतील मतदान केंद्र असणाऱ्या शाळांना दि.20 व दि.21 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर

  अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका):- माहे एप्रिल, 2020 ते माहे मे, 2021 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या 81 व माहे डिसेंबर 2021 मध्ये मुदत समाप्त होणाऱ्या 18 तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2020-21 जाहीर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने रायगड जिल्ह्यातील पाली, म्हसळा, पोलादपूर, खालापूर, माणगाव व तळा या नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दि.21 डिसेंबर 2021 (मंगळवार) होणार आहे. पाली, म्हसळा, पोलादपूर, खालापूर, माणगाव व तळा नगरपंचायतीच्या मतनोंदणीकरिता मतदानाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच दि.20 डिसेंबर 2021 रोजी मतदान केंद्रावर मतदान अधिकारी/कर्मचारी पोहोचणार आहेत. त्यामुळे दि.20 डिसेंबर व दि.21 डिसेंबर 2021 रोजी पाली, म्हसळा, पोलादपूर, खालापूर, माणगाव व तळा नगरपंचायत हद्दीतील मतदान केंद्र असणाऱ्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जाहीर केले आहे. 00000

मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टीसंबंधीचे आदेश जारी

    अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका):-   माहे एप्रिल, 2020 ते माहे मे, 2021 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या 81 व माहे डिसेंबर 2021 मध्ये मुदत समाप्त होणाऱ्या 18 तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2021-21 जाहीर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने रायगड जिल्ह्यातील पाली, म्हसळा, पोलादपूर, खालापूर, माणगाव व तळा या नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दि.21 डिसेंबर 2021 (मंगळवार) होणार आहे. लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 (भाग-2) मधील नियम 135 (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते. काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र काही निवडणूकांमध्ये असे दिसून आले आहे की, संस्था/आस्थापना इ. भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत. त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे वरील वस्तुस्थिती पाहता जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी पुढीलप्रमाणे आदेश दिले आहेत:- निवडणूक होण

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून आपत्ती व्यवस्थापन विशेष प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील 50 अधिकारी-कर्मचारी भुवनेश्वरला रवाना

  अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका):-  ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे वतीने मधुसूदन दास अकॅडमी ऑफ फायनान्सिंयल मॅनेजमेंट, भुवनेश्वर या संस्थेत चक्रीवादळ सौमिकरण व पूर्वतयारी बाबतचे विशेष प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.                  रायगड जिल्ह्याने मागील काही वर्षात निसर्ग, तौक्ते अशा प्रकारची विविध वादळे व अतिवृष्टी, दरड कोसळणे यासारखी नैसर्गिक संकटे अनुभवली आहेत. याचा विचार करुन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना चक्रीवादळ  सौमिकरण व पूर्वतयारी अंतर्गत प्रशिक्षणाची असलेली गरज ओळखून जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांना  प्रशिक्षण देण्याबाबतचे नियोजन केले. त्यानुसार त्यांनी रायगड जिल्ह्यातील महसूल, पोलीस, ग्राम विकास विभागाच्या 50 अधिकारी/कर्मचाऱ्यांना दि. 15 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत मधुसूदन दास अकॅडमी ऑफ फायनान्सिंयल मॅनेजमेंट, भुवनेश्वर, ओरिसा येथे “ चक्रीवादळ सौम्यीकरण व पूर्वतयारी ” या विषयावरील आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणासाठी पाठविले आहे.              या

राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत इच्छुकांना प्रशिक्षण

  अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका):- केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार यांना राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री Multipurpose Artificial Insemination Worker in Rural India ( MAITRI) अंतर्गत राज्यातील गायी, म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाची व्याप्ती वाढेल व ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार उपलब्ध होईल, यामुळे दुग्ध उत्पादनात वाढ होवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल, यासाठी इच्छुकांना प्रशिक्षण द्यायचे आहे व प्रशिक्षित व्यक्तीची कृत्रिम रेतन व अनुषंगिक कार्य करण्यासाठी नियुक्ती करायची आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम 3 महिने कालावधीचा असून यामध्ये एक महिना अंतर्गत प्रशिक्षण पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये तर 2 महिने प्रात्यक्षिक प्रशिक्षण जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 किंवा तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय किंवा जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय या ठिकाणी देण्यात येईल. हे प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी अर्जदार हा किमान 12 वी उत्तीर्ण झालेला

औरंगाबाद येथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेतील प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचे संचालक (कर्नल) अमित दळवी यांचे युवकांना आवाहन

    अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका):- राज्यातील विद्यार्थ्यांना संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून जास्तीत जास्त संख्येने जाता यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद येथे सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेकडून सैनिकी सेवापूर्व शिक्षण 46 व्या तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी पात्र व इच्छुक विद्यार्थी दि.24 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज दाखल करु शकतात. सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद यांच्याकडून देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी अर्ज करणारा उमेदवार हा अविवाहित मुलगा असावा. उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असावा, त्याचा जन्म 02 जानेवारी 2006 ते 31 डिसेंबर 2007 च्या दरम्यान झालेला असावा. तर मार्च / एप्रिल / मे 2022 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षेला बसणारा असावा. म्हणजेच जून 2022 मध्ये इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा. तसेच उमेदवार हा सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावा. यूपीएससी ने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, पुणे (एन.डी.ए) आणि भारतीय नौसेना प्रबोधिनी, एझिमला, केरळ (आय.एन.ए.) येथील प्रव

कोविड-19 विषाणूच्या “ओमायक्रॉन” व्हेरिएंटचा प्रसार प्रतिबंधित करण्यासाठी शासनाने नव्याने केले निर्देश जारी

    अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका):- कोविड-19 विषाणूच्या “ ओमायक्रॉन ” व्हेरिएंटचा प्रसार प्रतिबंधित करण्यासाठी शासनाने खालीलप्रमाणे निर्देश नव्याने जारी केले आहेत. भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार वेळोवेळी लागू करण्यात येणारे निर्बंध हे किमान निर्बंध म्हणून आंतरराष्ट्रीय व अंतरराज्य विमान प्रवाशांवर लागू राहतील.   तसेच दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, झिम्बाब्वे या देशांना अतिजोखीम राष्ट्र (High Risk Countries) म्हणून घोषीत करण्यात आले आहे. अनुसूचित करण्यात आलेले अतिजोखीम राष्ट्रे ही कोविड-19 च्या ओमायक्रॉन विषाणूच्या प्रादूर्भावानुसार घोषित करण्यात आलेले असून त्यात महाराष्ट्र शासन गरजेनुसार सुधारणा करेल. तर अतिजोखीम राष्ट्रातून महाराष्ट्रात येणारे प्रवासी, महाराष्ट्रात येण्यापूर्वी मागील 15 दिवसात अतिजोखीम राष्ट्रात प्रवास करून आलेले विमान प्रवासी अतिजोखीम प्रवासी (High Risk Air Passengers) म्हणून समजण्यात येतील. केंद्र सरकारने लागू केलेल्या निर्बंधांव्यतिरिक्त अतिजोखीम विमान प्रवाशांकरीता पुढील निर्बंध लागू राहतील:- अतिजोखीम विमान प्रवाशांकरिता सबंधित विमानतळ व्यवस्थापन

पारंपरिक मच्छिमारांच्या उपजीविकेवर संकट येणार नाही यासाठी आवश्यक कार्यवाही निश्चित करणार --‍ जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

Image
    अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :- सध्याच्या नवीन तंत्रज्ञानामुळे मत्स्यउत्पादनावर विपरित परिणाम होत असल्याचे लक्षात येत असून पारंपारिक मच्छिमारांच्या उपजीविकेवर संकट येणार नाही, यासाठी आवश्यक कार्यवाही निश्चित करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज येथे दिले.      जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली पारंपरिक मच्छीमारांसोबत आज (दि. 14 डिसेंबर 2021) रोजी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, कोस्ट गार्डचे श्री.पठानिया,बंदर विभागाचे कॅप्टन लेपांडे,पोलीस निरीक्षक श्री.जगताप तसेच   पारंपारिक मत्स्य सहकारी संस्थेचे पदाधिकारी श्री.नवरीकर व इतर मच्छीमार उपस्थित होते.         यावेळी उपस्थित पारंपारिक मत्स्य सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी एलईडी आणि पर्ससीनद्वारे होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी विभागाने कठोर कारवाई करावी, मत्स्यव्यवसाय विकास, कोस्ट गार्ड, बंदरे, पोलीस, सीमा शुल्क या विभागांनी एकत्र येऊन कारवाई करावी त्य

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा जास्तीत जास्त इच्छुकांनी लाभ घ्यावा --‍ जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

Image
    अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :-   राज्यातील युवक-युवतींच्या सर्जनशीलतेला वाव मिळून राज्यात स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करणे, त्याद्वारे ग्रामीण व शहरी भागात सूक्ष्म, लघु उपक्रमांद्वारे रोजगाराच्या व्यापक संधी निर्माण होण्यासाठी शासनाच्या आर्थिक सहाय्यातून प्रकल्प उभारणीस हातभार लावणे या उद्देशाने शासनाची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही महत्वाकांक्षी योजना कार्यान्वित आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे. मा.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हा कार्यक्रम समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.जी.एस.हरळय्या, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.विजयकुमार कुलकर्णी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री.सुनिल जाधव, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी   श्री.नित्यानंद पाटील, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विभाग पेण श्रीमती शशिकला अहिरराव, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक

कु.अनुराधा अनुसया या निराधार, अनाथ बालिकेच्या नातेवाईक/पालकांना जिल्हा महिला बाल विकास विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

  अलिबाग,जि.रायगड,दि.14 (जिमाका):- ता. पनवेल, (दि. 18 ऑगस्ट 2012) रोजी बाल कल्याण समिती, रायगड यांच्या आदेशाने कु.अनुराधा अनुसया वय 16 वर्षे राहणार कळंबोली, ता.पनवेल या बालिकेस पंचदिप संकुल बालग्राम, पनवेल, जि.रायगड या संस्थेत दाखल करण्यात आले आहे. कु.अनुराधा अनुसया ही सध्या (दि. 18 ऑगस्ट 2012) रोजी बाल कल्याण समिती, रायगड यांच्या आदेशाने स्वप्नालय मुलींचे बालगृह, पनवेल या संस्थेत दाखल आहे. कु.अनुराधा अनुसया ही निराधार असून या बालिकेचे आई-वडील दोघेही रोड अॅक्सिडंटमध्ये मयत झालेले आहेत. रोड अॅक्सिडंट दरम्यान बालिका कळंबोली पोलिसांना मयत आई-वडीलांजवळ सापडली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये कु.अनुराधाचे इतर कोणीही नातेवाईक नसल्याचे समजले त्यामुळे कळंबोली पोलिसांनी बालिकास काळजी व संरक्षणाची गरज असल्याने बाल कल्याण समिती यांच्या आदेशाने पंचदिप संकुल बालग्राम, पनवेल या संस्थेत दाखल केले होते. ही बालिका अनाथ असून (दि. 18 ऑगस्ट 2012) रोजी पासून आजतागत कोणीही नातेवाईक/ पालक भेटण्यास आलेले नाहीत. तरी या बालिकेचे नातेवाईक/पालक असल्यास त्यांनी अधीक्षक, पंचदिप संकुल बालग्राम, प्लॉट नं. 6

निराधार, अनाथ बालकांच्या नातेवाईक/पालकांना जिल्हा महिला बाल विकास विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

  अलिबाग,जि.रायगड,दि.14 (जिमाका):- ता.पनवेल, (दि. 14 ऑक्टोबर 2017) रोजी बाल कल्याण समिती, रायगड यांच्या आदेशाने 1) कु.सनी संजय दिगडे वय 14 वर्षे, 2) शुभम संजय दिगड़े वय 13 वर्षे,  3) संध्या संजय दिगडे वय 16 वर्षे राहणार रुम नंबर 6, विजय सोसायटी, सेक्टर 5, आसुडगाव, ता.पनवेल, जि.रायगड या तीन बालकांस पंचदिप संकुल बालग्राम, पनवेल, जि.रायगड या संस्थेत दाखल करण्यात आले आहे.  कु.संध्या संजय दिगडे ही सध्या दि.18 ऑगस्ट 2021 रोजी बाल कल्याण समिती, रायगड यांच्या आदेशाने स्वप्नालय मुलींचे बालगृह, पनवेल या संस्थेत दाखल आहे. ही बालके निराधार असून या बालकाचे आई-वडील दोघेही मयत झालेले आहेत. बालके यांच्या आजी सोबत राहत होती परंतु त्यांची आजी काहीही कामधंदा करीत नाही तसेच तिला दारुचे व्यसन आहे. या बालकांस त्यांची आजी व मामा हे त्यांचे पालन पोषण न करता उलट त्यांना त्रास देत होते तसेच त्यांचे पालन पोषन करण्यास असमर्थ आहेत. ही बालके ही सौ. वंदना प्रदिप जाधव राहणार रुम नंबर 16, विजय सोसायटी, सेक्टर 5, आसुडगाव, ता. पनवेल, जि. रायगड यांच्यामार्फत खांदेश्वर पोलिस ठाण्यामध्ये आली होती. खांदेश्वर पोलिसांन

ग्रामपंचायत व नगरपंचायत मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीबाबतचे बंदी आदेश जारी

    अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका):- मा.राज्य निवडणूक आयोगाने निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील एकूण 179 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत. तसेच 06 नगरपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक 2021 कार्यक्रमही जाहीर झाला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील एकूण 179 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका व एकूण 06 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता मंगळवार, दि.21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार असून मतमोजणी बुधवार, दि.22 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. रायगड जिल्हयातील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकांसाठी व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक-2021 च्या अनुषंगाने मंगळवार, दि.21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर मतमोजणी बुधवार, दि. 22 डिसेंबर 2021 या दिवशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततेत निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनात

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार प्रत्येक आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समितीचे गठन करणे अनि

  वार्य   अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका):- कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनामध्ये जिथे 10 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत अशा आस्थापनामध्ये तक्रार समितीचे गठन करणे अनिवार्य आहे. जिथे 10 पेक्षा कमी कर्मचारी आहेत किंवा ज्या कार्यालयात/आस्थापनात नियुक्ती प्राधिकार्या विरुध्द तक्रारी आहेत, त्या कार्यालय आस्थापनाने त्यांच्याकडील प्राप्त झालेल्या तक्रारी जिल्हा स्तरावरील कार्यरत स्थानिक तक्रार समितीला सादर करावयाच्या आहेत. याबाबत जिल्ह्यात 10 पेक्षा कमी कर्मचारी असणारे प्रत्येक कार्यालय प्रमुखाने आस्थापनाची माहिती आस्थापना कार्यालयाचे नाव, अधिकारी/कर्मचारी पदाचे नाव,आस्थापनावरील संख्या, समिती गठीत आहे किंवा कसे, ही माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास कळवणे आवश्यक आहे. प्रत्येक शासकीय कार्यालये प्रमाणे निमशाकीय कार्यालये, संघटना, महामंडळे, आस्थापना, संस्था, शाखा स्थानिक प्राधिकरण, शासकीय कंपनी, नगरपरिषद, सहकारी संस्था, संघटना, खाजगी उपक्रम, इंटरप्रायझेस, ट्रस्ट उत्पादक, प