Posts

Showing posts from May 26, 2024

रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये मनाई आदेश जारी

    रायगड,दि.31(जिमाका):- रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगांव, महाड, नागोठणे, अलिबाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून औद्योगिक कंपन्यांमध्ये कामगार संघटनांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक संप व आंदोलन पुकारण्यात येत असतात. त्यामुळे अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत लोकसभा निवडणूक-2024 च्या मतदानाची मतमोजणी दि.04 जून 2024 रोजी होणार आहे. महाड तालुका पोलीस ठाणे हद्दीत दि.05 जून 2024 व दि.06 जून 2024 रोजी किल्ले रायगड येथे शिवराज्यभिषेक सोहळा पार पडणार आहे. पेण पोलीस ठाणे हद्दीत शेडीशी ग्रामपंचायत येथी क्लिच ड्रग्ज (इंडिया) लि. या कंपनीच्या आरेरावीबाबत निवेदन देवूनसुध्दा अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई न झाल्याने सरपंच ग्रामपंचायत शेडाशी व ग्रामस्थ शेडाशी हे दि.07 जून 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणास बसणार आहेत. वडखळ पोलीस ठाणे हद्दीत ज्येष्ठ पत्रकार रमेश नामदेव देवरुखकर, मुक्त पत्रकार न्युज महाराष्ट्र हे जे.एस.डब्ल्यू. कंपनी हेतुपरस्परपणे हलगर्जी करत असल्याचे विरोधात दि.10 ज

माणगाव व पनवेल येथील दिव्यांग प्रमाणपत्र वितरण शिबीराच्या तारखेत बदल

  रायगड,दि.31(जिमाका):-  किल्ले रायगडावर यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचा 351 वा राज्याभिषेक सोहळा दि. 06 जून 2024 रोजी तारखेनुसार व दि. 20 जून 2024 रोजी तिथीनुसार साजरा होणार आहे. या सोहळयाकरिता किल्ले रायगड येथे दरवर्षीपेक्षा जास्त संख्येने शिवभक्त तसेच मान्यवर, अतिमहत्वाच्या व्यक्ती कार्यक्रमास उपस्थित राहण्याची शक्यता असून या कार्यक्रमासाठी येणारे अतिहत्वाच्या व्यक्ती व शिवभक्तांना तात्काळ परिपूर्ण वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्यामुळे उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दि.06 जून 2024  रोजी नियोजित दिव्यांग प्रमाणपत्र वितरण शिबीर मंगळवार दि.11 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे.  तसेच उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथील दिव्यांग प्रमाणपत्र वितरण शिबीर दि.07 जून 2024  ऐवजी सोमवार दि.10 जून 2024  रोजी होईल, याची सर्व दिव्यांग बांधवांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी केले आहे. ०००००००

मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात मनाई आदेश जारी

  रायगड (जिमाका)दि.31:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूका 2024 च्या अनुषंगाने 32-रायगड लोकसभा मतदार संघासाठी दि.04 जून 2024 रोजी मत मोजणी  जिल्हा क्रिडा संकुल, नेहुली, ता.अलिबाग, जि.रायगड येथे होणार आहे. या सभोवतालच्या 100 मीटर परिसरात मत मोजणीशी संबंधित अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी, उमेदवार, उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी व मतमोजणीच्या कामाकरीता नियुक्त यांना निवडणूक निर्णय अधिकारी 32-रायगड लोकसभा मतदार संघ यांनी अधिकृत ओळखपत्र  दिले आहे. हे अधिकृत ओळखपत्र धारण करणाऱ्या व्यतिरीक्त अन्य व्यक्तीस त्या ठिकाणी प्रवेश करण्यास मनाई आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत मतमोजणी होणार आहे. तरी या परिसरात सर्व पक्षाचे प्रतिनिधी व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने एकत्र जमणार आहेत. त्यामुळे सदर परिसरात जनतेच्या जिवीतास व मालमत्ता, आरोग्यास धोका निर्माण होवून सार्वजनिक शांतता बिघडून दंगल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेऊन सदर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सी. आर. पी. सी. 144 प्

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध प्रशिक्षण योजना इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत

    रायगड,दि.29(जिमाका):-  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जिल्हा कार्यालय अलिबाग-रायगड या कार्यालयास विविध प्रशिक्षण योजनेचे उद्दिष्ट 270 असून, मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील कुटुंबाच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावेत या उद्देशाने सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त झाले इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे. जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम बारा पोटजाती मधील इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी पात्रता, निकष व अटी पुढीलप्रमाणे आहे. विद्यार्थी मातंग समाजातील व तत्सम बारा पोटजातीतील असावा व त्याचे वय 18 ते 50 वर्ष असावे, यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा प्रशिक्षणार्थीने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा. मातंग समाजातील व तत्सम बारा पोट जातीतील त्या विद्यार्थ्यांस प्रशिक्षण योजनेचा

28 मे पर्यंत पदवीधर मतदार नोंदणी-जिल्हाधिकारी किशन जावळे

  वृत्त क्रमांक :- 222                             दिनांक :- 27 मे 2024     रायगड, दि. 27(जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे दि.28 मे 2024 पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची मतदार नोंदणी करावयाची आहे. तरी  जिल्ह्यातील अद्यापही नोंदणी न केलेल्या पात्र पदवीधारक यांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी, असे  आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.   भारत निवडणूक आयोगाने 24 मे 2024 रोजीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची मुदत दि.7 जुलै 2024 रोजी समाप्त होणार आहे. या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.      निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्दी करण्याचा दि. 31 मे, 2024 (शुक्रवार), नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दि. 7 जून, 2024 (शुक्रवार),नामनिर्देशन पत्रांची छाननी दि. 10 जून, 2024 (सोमवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दि. 12 जून 2024 (बुधवार), मतदानाचा दिवस 26 जून 2024 (बुधवार), मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4