Posts

Showing posts from July 1, 2018

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 133.09 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 133.09 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 1386.29 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 37.00 मि.मि., पेण-80.00 मि.मि., मुरुड-98.00 मि.मि., पनवेल-135.20 मि.मि., उरण-22.00 मि.मि., कर्जत-231.40 मि.मि., खालापूर-221.00 मि.मि., माणगांव-250.00 मि.मि., रोहा-81.00 मि.मि., सुधागड-115.00 मि.मि., तळा-171.00 मि.मि., महाड-244.00 मि.मि., पोलादपूर-140.00 म्हसळा-142.80 मि.मि., श्रीवर्धन-50.00 मि.मि., माथेरान-111.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 2129.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 133.09 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   44.11   टक्के इतकी आहे. 00000

जिल्ह्यात 14 रोजी लोकअदालत

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7 -    महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यामध्ये शनिवार दि. 14 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, 138 एन.आय. ॲक्ट खालील प्रकरणे, दिवाणी अपिले, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे व अपिले या लोकअदालतीत ठेवली जाणार आहेत. तसेच नगरपालिका, ग्रामपंचायत भारत दूर संचार निगम यांच्या पाणीबिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे , राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था यांच्याकडील थकबाकीबाबत वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. लोकन्यायालयात प्रकरणे तडजोडीने निकाली केल्यास लोकांचा पैसा   आणि वेळ यांचा अपव्यय होत नाही. पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो. त्यामुळे जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी   लोकअदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश रायगड अलिबाग तथा अध्यक्ष विधी सेवा प्राधिकरण मु.गो.सेवलीकर यांनी केले आहे. 00000

गेल इंडिया तर्फे सोमवारी स्वच्छता अभियान

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7 -   भारत सरकारचा उपक्रम असलेल्या गेल (इंडिया) लिमिटेड,उसर ता. अलिबाग यांच्यातर्फे सोमवार दि. 9 रोजी सकाळी 11 वा . वरसोली समुद्र किनारा येथे   स्वच्छता अभियान उपक्रमाअंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात गेल इंडियाचे कर्मचारी व अधिकारी मिळून श्रमदान करुन वरसोली समुद्र किनाऱ्याची स्वच्छता करणार आहेत. या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी सहभागी असे आवाहन गेल इंडियाचे   वरिष्ठ प्रबंधक एन.आर. ऱाव यांनी केले आहे. 00000

आरसीएफ विद्यालयात वृक्ष दिंडी व वृक्षारोपण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7 -    महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत सामाजिक वनीकरण विभाग रायगड, परीक्षेत्र अलिबाग आणि आर.सी.एफ.   शाळा कुरुळ, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आर.सी.एफ. शाळा कुरुळ येथे आज वृक्ष दिंडी व वृक्षरोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आर.सी.एफ. शाळा कुरुळ मुख्याध्यापिका आर.एच.ठाकरे, वनक्षेत्रपाल श्रीमती जी.एम.देवराज, वनपाल एच.आर.जुईकर, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. आर.सी.एफ. शाळा कुरुळच्या विद्यार्थ्यांनी आर.सी.एफ. शाळा ते पिंपळभाट अशी वृक्षदिंडी काढली. 000000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 60.58 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 60.58 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 1253.20 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 7.00 मि.मि., पेण-17.00 मि.मि., मुरुड-16.00 मि.मि., पनवेल-28.06 मि.मि., उरण-15.00 मि.मि., कर्जत-146.20 मि.मि., खालापूर-98.00 मि.मि., माणगांव-90.00 मि.मि., रोहा-44.00 मि.मि., सुधागड-29.00 मि.मि., तळा-97.00 मि.मि., महाड-48.00 मि.मि., पोलादपूर-85.00 म्हसळा-17.04 मि.मि., श्रीवर्धन-8.00 मि.मि., माथेरान-194.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 969.30 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 60.58 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   39.88% इतकी आहे. 00000

येत्या 24 तासात अतिवृष्टिचा इशारा

  अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7 -    रायगड जिल्ह्यात येत्या 24 तासात अतिवृष्टी (7 ते 12 सेमी) चा   तर काही ठिकाणी   जास्त अतिवृष्टी (12 ते 24 सेमी) चा इशारा देण्यात आला आहे.   या काळात समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार असून   दरडग्रस्त व नदी काठावरील   भागातील नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने जिल्ह्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षांना सतर्क राहण्याचे कळविण्यात आले आहे.   अतिवृष्टीमुळे जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी   सर्व विभागांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. अतिवृष्टीमुळे झाड पडणे, पाणी थांबबे, माती खचणे दी घटना घडू शकतात. अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी   बचाव पथक, बचाव साहित्य,   रुग्णवाहिका, रुग्णालये   आदी सुविधा तत्पर व सतर्क ठेवा. जुन्या व धोकादायक   पुलांवरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे. पुलांवरुन पाणी वाहत असल्यास रहदारी पूर्णपणे थांबवावी. सखल भागातून पाण्याचा निचरा व्हावा यासाठी   नैसर्गिक प्रवाहातील अडथळे दूर करावे, वादळामुळे झाड पडल्यास रहदारी सुरळीत होण्यासाठी तात्काळ उपा

माल वाहतुक व्यावसायिकांना नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक

                 अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6 -    केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार कॅरेज बाय रोड अधिनियम 2007 च्या अनुषंगाने माल वाहतुक व्यवसायायील विविध घटक व्यावसायिकांना नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.   यासंदर्भातील सर्व नियम   केंद्र शासनाच्या www.morth.nic.in   या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. याअंतर्गत माल वाहतुक व्यवसायातील   वाहतुकदार, ठेकेदार, बुकिंग एजंट, दलाल, वाहतूक कंपनी, कागदपत्रे/ पाकिटे/ मालाची घरपोच वाहतुक करणारी कुरिअर कंपनी, मालाची साठवणूक करणारे वितरक, माल जमा करणारे व्यावसायिक यांना कॉमन करिअर म्हणून क्षेत्रीय नोंदणी प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे अर्ज करुन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. तरी रायगड जिल्ह्यातील माल वाहतुक व्यावसायिकांनी   उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण यांच्याशी संपर्क साधून   सदरचे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, अन्यथा कॅरेज बाय रोड अधिनियमान्वये कारवाई करण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण जि. रायगड यांनी कळविले आहे. 00000

अल्पसंख्याक शाळांसाठी पायाभूत सुविधा अनुदान; प्रस्ताव मागविले

                 अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6 -    राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागामार्फत धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान दिले जाते. रायगड जिल्ह्यातील इच्छुक शाळांनी सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरीता विहित नमुन्यातील अर्जासह परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड- अलिबाग यांच्याकडे दि.14 ऑगस्ट   पर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती सुनिल जाधव यांनी केले आहे. 000000

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

  अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6 -    इयत्ता 11 वी, 12 वी नंतरच्या व्यावसायिक   तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विविध संस्था, महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश घेणे अथवा स्वाधार योजनेचा लाभ घेणे असे पर्याय उपलब्ध असतील. शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतू शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या , शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध   विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. या विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शैक्षणिक   साहीत्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करण्यासाठी रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यावर थेट जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सन 2018-19 मध्ये विविध महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या , पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रविकिरण पाटील यांन

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 42.80 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 42.80 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 1192.62 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 9.00 मि.मि., पेण-35.40 मि.मि., मुरुड-12.00 मि.मि., पनवेल-16.80 मि.मि., उरण-6.50 मि.मि., कर्जत-27.60 मि.मि., खालापूर-29.00 मि.मि., माणगांव-44.00 मि.मि., रोहा-18.00 मि.मि., सुधागड-60.33 मि.मि., तळा-34.00 मि.मि., महाड-138.00 मि.मि., पोलादपूर-111.00 म्हसळा-49.20 मि.मि., श्रीवर्धन-43.00 मि.मि., माथेरान-51.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 684.83 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 42.80 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   37.95% इतकी आहे. 00000

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे निर्देश

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5 -    समाज कल्याण, आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावरील सर्व प्रवर्गाचे प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी रायगड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी अर्ज तपासणीची शिबीरे आयोजित करण्यात आली होती. परंतु अद्यापही सन 2017-18 या वर्षातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांकडून अप्राप्त आहेत. तथापि अनु.जाती, इमाव, विजाभज, विमाप्र या प्रवर्गाच्या भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण फी, परीक्षा फी या योजनांचे सन 2016-17 या वर्षातील महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज (Renewal Applications) व सन 2017-18 या वर्षातील सर्व नवीन अर्ज (Fresh/Ofline Applications) आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, समाज कल्याण रायगड-अलिबाग या कार्यालयाकडे 15 जुलै, 2018 पर्यंत सादर करावे. तसेच महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित पात्र विद्यार्थ्यी शिष्यवृत्ती/शिक्षण फी, परीक्षा फी या योजनेपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयांची तसेच प्राचा

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 105.97 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 105.97 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 1149.82 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 98.00 मि.मि., पेण-128.00 मि.मि., मुरुड-65.00 मि.मि., पनवेल-108.40 मि.मि., उरण-84.30 मि.मि., कर्जत-90.80 मि.मि., खालापूर-68.00 मि.मि., माणगांव-119.00 मि.मि., रोहा-129.00 मि.मि., सुधागड-106.00 मि.मि., तळा-126.00 मि.मि., महाड-102.00 मि.मि., पोलादपूर-132.00, म्हसळा-110.00 मि.मि., श्रीवर्धन-64.00 मि.मि., माथेरान-165.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1695.50 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 105.97 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   36.59% इतकी आहे. 00000

जिल्हास्तरीय बॅंक समन्वय समिती बैठक : जिल्ह्यात 106 कोटी रुपयांचे कृषि कर्ज वाटप : शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5 -    जिल्ह्यात सन 2018-19 या वर्षातील कृषि हंगामांसाठी   246 कोटी   रुपये   कृषि कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यापैकी यंदाच्या खरीप हंगामात अद्यापपर्यंत (4 जुलै अखेर)105 कोटी 99 लाख 78 हजार रुपयांचे कृषि कर्ज वाटप झाले आहे, अशी माहिती आज जिल्हास्तरीय बॅंक समन्वय समितीच्या बैठकीत देण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिप हंगामासाठी पिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी नजिकच्या बॅंकेत संपर्क साधावा व बॅंकांनी शेतकऱ्यांना हंगाम पुर्ण होण्याच्या आत कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहनही यावेळी जिल्हा उपनिबंधक पी.एम. खोडका यांनी केले. जिल्हास्तरीय बॅंक समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीस   बॅंक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक   सी.के. पराते, रिजर्व बॅंकेचे सहाय्यक प्रबंधक   बी.एम. कोरी,   नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक सुधाकर रघतवान,   बॅंक ऑफ इंडियाचे   मुख्य व्यवस्थापक शरद जोशी,   जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पी.एम खोडका तसेच सर्व विभागांचे विभागप्रमुख, सर्व बॅंकांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी खरीप हंगामासाठी बॅंकांनी द्य

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 72.69 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 72.69 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 1043.85 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 70.00 मि.मि., पेण-190.00 मि.मि., मुरुड-28.00 मि.मि., पनवेल-79.40 मि.मि., उरण-120.00 मि.मि., कर्जत-71.80 मि.मि., खालापूर-81.00 मि.मि., माणगांव-55.00 मि.मि., रोहा-59.00 मि.मि., सुधागड-32.66 मि.मि., तळा-26.00 मि.मि., महाड-53.00 मि.मि., पोलादपूर-35.00, म्हसळा-87.20 मि.मि., श्रीवर्धन-68.00 मि.मि., माथेरान-107.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1163.06 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 72.69 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   33.22% इतकी आहे. 00000

अतिवृष्टीचा इशारा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3- भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने दिलेल्या अनुमानानुसार येते तीन दिवस (दि.4,5 व 6 जुलै) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.   जुलै महिन्यातील 4.50 मीटर पेक्षा उंच भरतीचे वेळापत्रक याप्रमाणे- 1.) गुरुवार दि.12- सकाळी 11 वा.27 मि. (4.65 मिटर.) 2.) शुक्रवार दि.13- दुपारी   12 वा.13 मि. (4.85 मिटर) 3.) शनिवार दि.14- दुपारी 1 वा.2 मि. (4.96 मिटर) 4.) रविवार दि.15-दुपारी 1 वा.49 मि. (4.97 मिटर) 5.) सोमवार दि.16- दुपारी 2 वा.37 मि. (4.89 मिटर) 6.) मंगळवार दि.17- दुपारी 3 वा.25 मि.(4.70 मिटर) 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 43 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 43.31 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 971.16 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 53.00 मि.मि., पेण-34.20 मि.मि., मुरुड-30.00 मि.मि., पनवेल-73.40 मि.मि., उरण-52.00 मि.मि., कर्जत-48.40 मि.मि., खालापूर-27.00 मि.मि., माणगांव-26.00 मि.मि., रोहा-22.00 मि.मि., सुधागड-15.33 मि.मि., तळा-61.00 मि.मि., महाड-33.00 मि.मि., पोलादपूर-31.00, म्हसळा-90.60मि.मि., श्रीवर्धन-50.00 मि.मि., माथेरान-46.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 692.93 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 43.31 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   30.90 % इतकी आहे. 00000

13 कोटी वृक्ष लागवड: दोन दिवसांत 3 लाख रोपांची लागवड

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2 -    राज्य शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड अभियानात या वर्षी 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात यावर्षी 31 लक्ष वृक्ष लागवड करायचे उद्दिष्ट आहे.   तर प्रत्यक्षात 37 लक्ष वृक्ष लागवड करता येतील याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. जिल्ह्यात रविवार दि. 1 जुलै रोजी सुरु झालेल्या वृक्ष लागवड अभियानात दोन दिवसांत (काल दि.2 जुलै अखेर) 3 लाख 6 हजार 706 रोपांची लागवड करण्यात आली आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक अलिबाग वन विभाग, अलिबाग यांच्या कार्यालयातील नियंत्रण कक्षातून प्राप्त झाली आहे. येत्या 31 जुलै पर्यंत हे अभियान सुरु असून त्यात नागरिकांनी सहभागी होऊन एक तरी रोप लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 00000

रायगड पोलीस दलातर्फे नागरीकांना जाहीर आवाहन

            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2-   मागील काही दिवसांपासून काही समाज कंटक व्हॉटसप, फेसबुक आदि सोशल मिडीयाचे माध्यमातून मुले पळविणारी टोळी जिल्ह्यात आली, किंवा चोर आले अशा प्रकारच्या अफवा पसरवित आहेत. अशा अफवांमुळे इतर जिल्ह्यात जमावाकडून बहुरुपी, वाटसरु, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले आहेत. तर काही घटनांत खून झाले आहे. त्यातून अशा जमावावर खुना सारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यातही अशा अफवा पसरविल्या जात असून लोकांमध्ये भिती पसरली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलीस अधिक्षक रायगड व जिल्हा पोलीसांनी जनतेस आवाहन केले आहे की, लोकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. अशी माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. जर कोणी अशा प्रकारचे अफवा पसरवित असेल तर त्याचे नाव पोलिसांना कळवावे. खात्री केल्याशिवाय सोशल मिडीयावर आलेला कोणताही मॅसेज अन्य ठिकाणी फॉरवर्ड करु नये. सोशल मिडीयातून आलेल्या मॅसेजवर डोळे झाकून विश्वास ठेऊ नये.             अफवा पसरविणाऱ्या तुमच्या प्रत्येक पोस्टवर पोलिसांचे लक

13 कोटी वृक्ष लागवड हरित रायगडचा संकल्प करु या- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1 -    राज्य शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड अभियानात या वर्षी 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात यानिमित्त 31 लक्ष वृक्ष लागवड करायचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांने एक झाड लावून ते जगवण्याचा निर्धार करावा व हरित रायगड साकारण्याचा संकल्प करु या, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज  मौजे कार्ला, कं.नं. 160, ता.अलिबाग येथे आयोजित मुख्य शासकीय  वृक्ष लागवड कार्यक्रमात बोलतांना केले. राज्य शासनाच्या वनविभागातर्फे 13 कोटी वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची जिल्ह्यातील सुरुवात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, उपवनसंरक्षक मनिष कुमार,   उपजिल्हाधिकारी रोहयो विश्वनाथ वेटकोळी, जयेश पाटील, सागर जंगम, रोहिणी संतोष पाटील,   विलास पाटील,   मोनिका म्हात्रे   आदी स्थानिक झिरड, नेऊली व वाडगाव येथील सरपंच,   संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,ग्रामस्थ आदी मोठ्या संख़्येने उपस्थित होते.   यावेळी दीपप्रज्वलन करुन कार्यक्रम

खरीप हंगामासाठी पिक कर्ज उपलब्धः शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1 -    जिल्ह्यात 18 हजार 73 पात्र शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत कर्ममाफी देण्यात आली आहे.  तरी खरीप हंगाम 2018 साठी  सर्व पात्र शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप सुरु आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पिक कर्जासाठी  विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, बॅंकांकडे आपली पिक कर्जाची मागणी नोंदवावी, व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.  पिक कर्ज मिळण्यासंदर्भात काही अडचणी आल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुका सहाय्यक निबंधक किंवा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था  रायगड- अलिबाग यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांचा दूरध्वनी क्रमांक 02141-222013. व्यापारी बॅंकांमधून पिक कर्ज मिळण्यास अडचण आल्यास व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, तथा बॅंक ऑफ इंडिया रायगड –अलिबाग यांच्या कार्यालयाशी समक्ष अथवा 02141-222344 /222895 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना एक वेळ समझोत्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

  अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1 -    कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी   शासनाने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज    शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांपेक्षा जादा थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता ( one time settlement ) या योजनेला 30 सप्टेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयामार्फत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार एकवेळ समजोता योजनेखाली  पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम    भरण्याचा कालावधी दिनांक 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2018 पर्यंत वाढविण्यात आला आहे.    यापूर्वी ही मुदत 30 जून पर्यंत होती.  यासंदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  तालुज्का उपनिबंधक/ जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा व शासनाने वाढवलेल्या मुदतीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.