माल वाहतुक व्यावसायिकांना नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक



                अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6-  केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार कॅरेज बाय रोड अधिनियम 2007 च्या अनुषंगाने माल वाहतुक व्यवसायायील विविध घटक व्यावसायिकांना नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.  यासंदर्भातील सर्व नियम  केंद्र शासनाच्या www.morth.nic.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. याअंतर्गत माल वाहतुक व्यवसायातील  वाहतुकदार, ठेकेदार, बुकिंग एजंट, दलाल, वाहतूक कंपनी, कागदपत्रे/ पाकिटे/ मालाची घरपोच वाहतुक करणारी कुरिअर कंपनी, मालाची साठवणूक करणारे वितरक, माल जमा करणारे व्यावसायिक यांना कॉमन करिअर म्हणून क्षेत्रीय नोंदणी प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे अर्ज करुन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. तरी रायगड जिल्ह्यातील माल वाहतुक व्यावसायिकांनी  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण यांच्याशी संपर्क साधून  सदरचे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, अन्यथा कॅरेज बाय रोड अधिनियमान्वये कारवाई करण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण जि. रायगड यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक