Posts

Showing posts from April 23, 2023

राष्ट्रीय/राज्य आपत्ती प्रतिसाद दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व रायगड रोप-वे प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड रोप-वे येथे आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम संपन्न

      अलिबाग,दि.28(जिमाका):-  रायगड रोप-वे, पाचाड, ता.महाड येथे संभाव्य दुर्घटना झाल्यास त्या ठिकाणी बचाव कार्य कशा पध्दतीने करावे, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.योगशे म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली व निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पद्दश्री बैनाडे यांच्या पुढाकारातून तसेच महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाड तहसिलदार सुरेश काशिद यांच्या नियोजनातून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ),  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड व रायगड रोप-वे प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम आज (दि.28 एप्रिल 2023)  रोजी सकाळी 7 ते 10 या कालावधीमध्ये संपन्न झाली. या आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीममध्ये एनडीआरएफ चे डेप्युटी कमांडट दिपक तिवारी, असिस्टंट कमांडट निखिल मुधोळकर व त्यांचे 25 अधिकारी व जवान, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), नागपूरचे श्री.बादल व त्यांचे 4 अधिकारी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), धुळे चे श्र

"गरुडझेप स्पर्धा परीक्षा केंद्र" उपक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा--विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर “एमपीएससी गट 'ब' व गट 'क' संयुक्त पूर्वपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन पहिल्याच दिवशी 350 हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला कार्यशाळेचा लाभ

  अलिबाग,दि.27(जिमाका):-  रायगड जिल्ह्यामधील महाविद्यालयीन तरुण-तरुणींना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अधिकाधिक प्रोत्साहित करण्यासाठी "गरुडझेप स्पर्धा परीक्षा केंद्र" हा उपक्रम तत्कालीन रायगड जिल्हाधिकारी तथा कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विनामूल्य राबविला जात आहे. तसेच रायगड जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम रायगड जिल्ह्यात पुढे सुरूच राहणार आहे.  हा उपक्रम माध्यमातून सर्वांना ज्ञात व्हावा आणि आपल्या परिसरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.  विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकारातून  “ एमपीएससी गट 'ब' व गट 'क' संयुक्त पूर्वपरीक्षा 30 एप्रिल 2023 ”  च्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे जिल्हाधिकारी कार्यालय,रायगड तसेच जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या फेसबुक पेज व

शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी व शालेय शिक्षण विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी निवासी कार्यशाळेचे आयोजन

    अलिबाग,दि.27(जिमाका):-   शालेय शिक्षण विभागाच्या वतीने स्टार व समग्र शिक्षा प्रकल्प ,  निपुण भारत ,  नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व राज्यातील मनपा आयुक्त ,  मुख्य कार्यकारी अधिकारी व शालेय शिक्षण विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी  लोणावळा येथील द अँम्बी व्हॅली सिटी येथे दि . 28 एप्रिल ते  दि. 29 एप्रिल 2023 दरम्यान दोन दिव शी य निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत  राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर अध्यक्षस्थानी असतील. कार्यशाळेत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल ,  शिक्षण आयुक्त सूरज मांढरे , महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे ,  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच राज्याच्या मनपाचे आयुक्त , जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी ,  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण  मंडळाचे अध्यक्ष ,  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष ,  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचा

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला सामावून घ्यावे --जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे

    अलिबाग,दि.27(जिमाका):  जनसुरक्षा मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये सामावून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी ग्रामपंचायत प्रशासन व जिल्ह्यातील बँकर्सना केले.       भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत स्तरावर जन सुरक्षा मोहीम राबवण्याबाबत विशेष जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली काल (दि.26 एप्रिल रोजी) जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृह येथे घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बँक ऑफ इंडिया रायगड च्या विभाग प्रमुख श्रीमती शंपा बिस्वास, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (ग्रामपंचायत) राजेंद्र भालेराव, प्रकल्प संचालक श्रीमती प्रियदर्शनी मोरे, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी, जिल्हा विकास अधिकारी नाबार्ड तर्फे प्रदीप अपसुंदे आणि विविध बँकांचे जिल्हा प्रतिनिधी,आर्थिक समावेशन विभागाचे प्रमुख उपस्थित होते.              दि.1 एप्रिल ते दि.30 जून 2023 दरम्यान जनसुरक्षा मोहीम राबविण्य

जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी घेतला मान्सून-2023 पूर्वतयारीचा सविस्तर आढावा

    अलिबाग,दि.26(जिमाका):-   रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत मान्सून-2023 पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हा नियोजन भवन येथे दि.25 एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती.  यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ. योगेश म्हसे यांनी हा आढावा घेतला.      या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, नवी मुंबई वाहतूक उपायुक्त तिरूपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पदमश्री बैनाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सत्यजित बडे, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, पनवेल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, तहसिलदार सचिन शेजाळ, विशाल दौंडकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच विविध शासकीय विभागांचे विभाग व कार्यालय प्रमुख, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीस निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.

रोहा वन विभागातील म्हसळा येथे सागरी वन्यजीवाचा अवैध साठा जप्त

    अलिबाग,दि.26(जिमाका):-   उपवनसंरक्षक रोहा अप्पासाहेब निकत यांना दि.04 एप्रिल 2023 रोजी मौजे देवघर, ता.म्हसळा येथील सर्व्हे क्रमांक 1/3 येथे कॅपिझ शेल (Placenta Placenta ) या सागरी वन्यजीव प्राण्याच्या अवशेषांचा अवैध व्यापार चालू असल्याबाबतची  माहिती  मिळाली. त्यावरुन वनक्षेत्रपाल म्हसळा श्री.पांढरकामे, व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी तेथे  धाड टाकली असता घटनास्थळी RJ22 GB2387 या क्रमांकाच्या ट्रकमध्ये मुद्देमाल प्लॅस्टिक गोणीमध्ये भरून ठेवलेला आढळून आला. याबाबत अधिक चौकशी केली असता त्या ठिकाणी काही लोक समुद्रजीवाच्या अवशेषांचा खरेदी विक्री व्यवहार करीत असताना आढळून आले.   “ सागरी वन्यजीव ”  वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील सूची क्र. IV अन्वये प्रतिबंधित केलेला आहे. त्यामुळे घटनास्थळी खरेदी विक्री व्यवहार करणाऱ्या श्री.मुरलीधर महादेव महामूणकर, श्री.धनंजय मारुती बनसोडे, श्री.रोहित अरविंद सादरे, श्री.गोपालसिंग पिरसिंज राजपूत, श्री.प्रेमदास श्रवणदास (रा.राजस्थान) यांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9,39,44,48, 48A, 50 (1) C 51 नुस

“सामाजिक न्याय समता पर्व”अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, अंधश्रध्दा निर्मूलन कायदा व व्यसनमुक्ती कायद्याबाबत जनजागृतीपर कार्यशाळा संपन्न

  अलिबाग,दि.26(जिमाका):-  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  “ सामाजिक समता पर्व ”  कार्यक्रमांतर्गत पोलीस मुख्यालय येथील जंजिरा हॉल येथे सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 या वेळेत  अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, अंधश्रध्दा निर्मूलन कायदा व व्यसनमुक्ती कायदा या विषयावरील कार्यशाळा दि.25 एप्रिल 2023 रोजी संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा या विषयावर सेवानिवृत्त न्यायाधीश डॉ.यशवंत चावरे, अंधश्रध्दा निर्मूलन या विषयावर श्री.नितीन राऊत, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सदस्य व्यसनमुक्ती जनजागृती या विषयासाठी नागोठणे एन.पी.जैन ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक श्री.सुनिल देवरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच अंधश्रध्दा निर्मूलन बाबत श्रीमती सुप्रिया जेधे, अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रात्यक्षिकद्वारे अंधश्रध्दा निर्मूलनाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करुन महापुरुष

“ब्लॅक स्पॉट” वरील अपघात कमी करण्याकरिता तात्काळ व दीर्घकालीन उपाय करावेत-- खासदार श्रीरंग बारणे

    अलिबाग,दि.26(जिमाका):-   रायगड जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात 22 अपघात प्रवण क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. या निश्चित करण्यात आलेल्या  “ ब्लॅक स्पॉटस् ”  ची संबंधित विभागांनी तातडीने पाहणी करून  “ ब्लॅक स्पॉटस् ”  वरील अपघात कमी करण्याकरिता तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश  खासदार श्रीरंग बारणे यांनी संबंधित विभागांच्या उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा नियोजन भवन येथे संसदीय रस्ते सुरक्षा समिती आढावा बैठक (दि.25 एप्रिल 2023) रोजी खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार सुनिल तटकरे  यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.             यावेळी आमदार महेंद्र दळवी, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महामार्ग वाहतूक सुरक्षा पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, नवी मुंबई वाहतूक उपायुक्त तिरुपती काकडे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सत्यजित बडे, कार्यकार

केंद्र शासनाच्या योजना जिल्ह्यातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवा-खासदार श्रीरंग बारणे

    अलिबाग,दि.26(जिमाका):-  केंद्र शासन व राज्य शासन जनतेच्या कल्याणासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवित असते.  त्यानुषंगाने केंद्र शासनाच्या जनतेच्या हितासाठी असलेल्या विविध लोकोपयोगी योजना जिल्ह्यातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात, त्यांना कमीत कमी वेळेत त्या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश खासदार श्रीरंग बारणे यांनी उपस्थित संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.  जिल्हा नियोजन भवन येथे  जिल्हा विकास  समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) आढावा बैठक (दि.25 एप्रिल 2023) रोजी खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.    यावेळी आमदार महेंद्र दळवी, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, विभागीय उपवनसंरक्षक (अलिबाग) आशिष ठाकरे, विभागीय उपवनसंरक्षक (रोहा) अप्पासाहेब निकत, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सत्यजित बडे, प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे तसेच विविध शासकीय विभाग

महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यासाठी इच्छुक संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत

    अलिबाग,दि.24(जिमाका):-  महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणारे अभ्यासक्रम चालविण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता मंडळाचे अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यासाठी इच्छुक पंजीकृत संस्थांकडून/व्यवस्थापनाकडून तसेच यापूर्वी मान्यता दिलेल्या संस्थाकडून अर्ज मागविण्याबाबतची जाहिरात मंडळाचे संकेतस्थळ  www.msbsde.gov.in  वरुन प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी इच्छुक संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, रायगड श्री.नि.के.चौधरी यांनी केले आहे. प्रवेश सत्र 2023-24 पासून मंडळाचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या नवीन संस्थाना व अस्तित्वात असलेल्या संस्थामध्ये नवीन अभ्यासक्रम/तुकडीवार सुरु करण्यास मान्यता घेण्यासाठी इच्छुक संस्थांनी मंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन प्रस्ताव सादर करावा तसेच संबधित जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, रायगड यांच्याकडे प्रस्तावाच्या 4 नस्ती दि.30 एप्रिल 2023 च्या पूर्वी सादर कराव्यात. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे जिल्हा व

पनवेल बसस्थानकात रंगला जागर समतेचा “सामाजिक समता पर्व” कार्यक्रमांतर्गत पथनाट्याच्या माध्यमातून स्वयंसिद्धा संस्थेच्या कलाकारांनी केली समाज कल्याण विभागाच्या योजनांची जनजागृती

   अलिबाग,दि.24(जिमाका):- डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.1 एप्रिल ते दि.1 मे 2023  या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन  “ सामाजिक समता पर्व ”  कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने समाज कल्याण विभागाच्या विविध योजना मागासवर्गीय जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पनवेल बसस्थानकात समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री.सुनिल जाधव, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली  “ जागर समतेचा ”  या पथनाट्यातून सामाजिक न्याय विभागाच्या अनूसूचित जातीतील नवउद्योजकांना स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत मार्जिन मनी, पद्दश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे, वृध्दाश्रम योजना, कन्यादान योजना, रमाई आवास घरकुल योजना अशा विविध लोकोपयोगी योजनांबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात आली. या पथनाट्यात विनोद नाईक, सार्थक गायकवाड, तुषान मढवी, हर्षदा होगाडे, समृद्धी पाटील, नेहा पाटील, श्वेता खारकर,निशांत नवाखा

“सामाजिक समता पर्व” कार्यक्रमांतर्गत पथनाट्याच्या माध्यमातून प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी केली समाज कल्याण विभागाच्या योजनांची जनजागृती

    अलिबाग,दि.24(जिमाका):-  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.1 एप्रिल ते दि.1 मे 2023  या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन  “ सामाजिक समता पर्व ”  कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने समाज कल्याण विभागाच्या विविध योजना मागासवर्गीय जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पेण बस स्थानकात समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री.सुनिल जाधव, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली  “ जागर समतेचा ”  या पथनाट्यातून सामाजिक न्याय विभागाच्या अनूसूचित जातीतील नवउद्योजकांना स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत मार्जिन मनी, पद्दश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे, वृध्दाश्रम योजना, कन्यादान योजना, रमाई आवास घरकुल योजना अशा विविध लोकोपयोगी योजनांबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात आली. पथनाट्यात विनोद नाईक, सार्थक गायकवाड, तुषान मढवी, हर्षदा होगाडे, समृद्धी पाटील, नेहा पाटील, श्वेता खारकर,निशांत नवाखारकर