Posts

Showing posts from October 8, 2023

ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा 2023 चा निकाल जाहीर

      रायगड, (जिमाका) दि.11:- महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालय ,  महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत सन  2023  मध्ये घेण्यात आलेल्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून बसलेले सर्वच्या सर्व परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल  100  टक्के लागला असल्याची ‍ माहिती    अलिबाग जिल्हा ग्रंथालयाचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक यांनी दिली आहे.               रायगड जिल्हा ग्रंथालय संघ आणि सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय ,  डोंगरे हॉल अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षे साठी रायगड जिल्ह्यातून  27  परीक्षार्थी बसले होते. या पैकी सर्व  27              विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून ,  रायगड जिल्ह्याची उज्वल यशाची परंपरा या ही वर्षी कायम राखली आहे.                   या परिक्षेत प्रथम क्रमांक कु.ऋतुजा राजेश बेलोस्कर अलिबाग ,  व्दितीय कु.नम्रता नारायण पाटील ,  पेण ,  तृतीय क्र. कु. श्वेता संतोष कावजी ,  खंडाळे -अलिबाग व चतुर्थ क्रमांक कु.सोनल विलास पाटील ,  उरण यांना मिळाला

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परिक्षा फेब्रु-मार्च 2024 परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करावीत

                 रायगड,(जिमाका) दि.11:- - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र  ( इ .12 वी )  परिक्षा फेब्रु - मार्च  2024  परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्र  (SARAL DATABASE)  वरुन ऑनलाईन पद्धतीने त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत . व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी ,  सर्व शाखांचे पुर्नपरिक्षार्थी विद्यार्थी ,  नावनोंदणी प्रमाणपत्र  (Enrollment Certificate)  प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी  (Private candidate),  तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय  ITI ( औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे  Transfer of Credit  घेणारे विद्यार्थी ) चे विषय घेऊन प्रविष्ठ होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परिक्षा आवेदनपत्रे त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पद्धतीने भरावयाची आहेत .  ही  आवेदनपत्र  www.mahahsscboard.in   या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील  पुढील प्रमाणे आहे . शुल्क   प्रकार :-   उच्च माध्यमिक    शाळा / कनिष