Posts

Showing posts from March 17, 2024

अलिबाग वनविभागाच्या कार्यक्षेत्रात वणवे लागण्याच्या घटनांमध्ये मागील वर्षभरात घट

    रायगड , दि.22(जिमाका):  अलिबाग वनविभागाच्या कार्यक्षेत्रात वनविभागामार्फत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे यंदाच्या वर्षात वणवे लागण्याच्या घटनांमध्ये घट झाली आहे. विभागीय कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षामुळे याबाबत तात्काळ कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अलिबाग उपवनसंरक्षक श्री.राहुल पाटील यांनी दिली.            अलिबाग वनविभागाचे निव्वळ क्षेत्र 1074.63 चौ.कि.मी. इतके आहे. मार्च 2023 ते फेब्रुवारी 2024 या मागील वर्षभरात अलिबाग वनविभागाच्या कार्यक्षेत्रात एकूण 155 वणव्यांच्या घटना घडल्या असून 286.984 हेक्टर वनजमिनीचे नुकसान झाले आहे. आग मुख्यतः ग्राउंड फायर स्वरुपातील असल्यामुळे जंगल नष्ट होत नसून जैवविविधतेला धोका पोहचत नाही तसेच जंगलातील आगीमुळे वनस्पतीचे व काजू बागायतींचे नुकसान निदर्शनास आलेले नाही .      अनेक ठिकाणी वनक्षेत्रातून राष्ट्रीय महामार्ग ,  राज्य महामार्ग ,  जिल्हा मार्ग असे विविध रस्ते आहेत. वनकर्मचारी वणवा लागल्याचे निदर्शनास येताच तो तात्काळ विझविण्याकामी त्वरीत पोहचून वणवा आटोक्यात आणतात व त्याप्रमाणे गुन्हा दाखल करुन तातडीने कारवाई केली जा

मतदान ओळखपत्र नसल्यास आधारकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट, पॅनकार्ड देखील पर्याय – जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड,दि.22(जिमाका):- ज्या मतदारांकडे मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र नाही अथवा वेळेत मिळवू शकणार नाहीत, अशासाठी अन्य छायाचित्रासह असणारी ओळखपत्र पर्याय असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.  काही मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसल्यास अथवा त्यांच्या ओळखपत्रामध्ये काही शुध्दलेखनाच्या चुका, छायाचित्र वगैरे जुळत नसल्यामुळे मतदाराची ओळख प्रस्थापित करणे शक्य नसल्यास मतदाराला भारत निवडणूक आयोगाने परिच्छेद 7 मध्ये नमूद केलेली ओळखपत्रे पर्याय असणार आहेत. यात आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड,बँक/पोस्ट ऑफीसने फोटोसह दिलेले पासबुक,कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्राईव्हींग लायसन्स,पॅन कार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआयने दिलेले स्मार्ट कार्ड,भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्ताऐवज, केंद्र/राज्य सरकार/पीएसयू/पब्लिक लिमिटेक कं.कर्मचाऱ्यांने दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदार/एमएलसी यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण भारत सरकारतर्फे मिळालेली दिव्यांग आयडी कार्ड (युडीआयडी) यांचा समावेश आहे.             यापैकी एक मत

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 प्रमाणे बंदी आदेश जारी

रायगड दि. 20 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी दि.१६ मार्च रोजी कार्यक्रम घोषित केला आहे. सदर कार्यक्रमानुसार ३२-रायगड लोकसभा मतदार संघामध्ये दि.०७ मे २०२४ रोजी व ३३-मावळ लोकसभा मतदार संघामध्ये दि.१३ मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. सदर निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता अमलात राहणार असून , निवडणूक खुल्या व निर्भय वातावरणात पार पाडणे तसेच मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावता येणे आवश्यक आहे. तसेच निवडणूक कालावधीत राजकीय पक्षाचे पुरस्कृत उमेदवार प्रभागामध्ये पक्षाचा प्रभाव वाढविण्यासाठी पत्राद्वारे प्रत्यक्ष संपर्क साधून जास्तीत जास्त मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करीत असतात. जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता , १९७३ चे कलम १४४ नुसार त्यांना प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सर्व नियोजित कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पाडावे, मतदान प्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थितपणे पार पाडण्

धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध

रायगड दि.  20 ( जिमाका):  सर्व शासकीय ,  निमशासकीय कार्यालय ,  संस्था या ठिकाणी धरणे आंदोलन ,  मोर्चा ,  निदर्शने ,  उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दि. 6  जून  2024  पर्यंत निर्बंध घालण्यात येत असल्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी लागू केले आहेत. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक  2024  साठी कार्यक्रम दि. 16  मार्च रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत ,  निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हादंडाधिकारी / उपविभागीय दंडाधिकारी/तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय या ठिकाणी मिरवणूक ,  आंदोलन ,  मोर्चा ,  निदर्शने ,  उपोषण करणे तसेच कोणत्याही प्रकारची घोषणा देणे ,  वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे ई. तसेच कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास या आदेशानुसार मनाई करण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी श्री.जावळे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता  1973  चे कलम  144  अन्वये त्यांन

नामनिर्देशनपत्र दाखल करताना तीन पेक्षा जास्त वाहने नकोत शिवाय दालनात पाच व्यक्तींव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नाही

रायगड दि. 20 ( जिमाका):  निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या ,  वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/सभा घेणे ,  कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी लागू केले आहेत. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक  2024  साठी दि. 16  मार्च रोजी कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. जिल्हादंडाधिकारी श्री. जावळे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता  1973  चे कलम  144  अन्वये दि. 16  मार्च ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि.  06  जून  2024  पर्यंत) प्रतिबंधात्

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली माध्यम कक्षास भेट

Image
रायगड  दि.१९  (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता ३२ रायगड लोकसभा मतदार संघासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण समिती आणि आणि माध्यम कक्ष (MCMC) जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग या कार्यालयात स्थापन करण्यात आला आहे. या कक्षास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी आज  भेट देऊन कक्षाच्या कामकाजासंदर्भात माहिती घेतली. जिल्हाधिकारी जावळे यांनी या माध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया  आणि प्रिंट मीडिया विभागांची पाहणी केली व आढावा घेतला. निवडणुकांमध्ये माध्यमांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे माध्यम कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी मोठी असून त्यांनी सतर्क व दक्ष राहून आपल्या जबाबदार्‍या पार पडाव्यात अशा सुचना श्री.जावळे यांनी दिल्या.    यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे उपस्थित होते.  यावेळी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत मतदार जनजागृतीसाठी माध्यम कक्षाबाहेर उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटला जिल्हाधिकारी श्