Posts

Showing posts from September 1, 2024

12 सप्टेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर

  रायगड(जिमाका)दि.05:-   रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरीता 3 स्थानिक सुट्टया जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार दि.24 नोव्हेंबर 2023 अधिसूचना अन्वये सन 2024 या वर्षाकरीता सोमवार, दि.19 ऑगस्ट 2024 रोजी  नारळीपोर्णिमा/रक्षाबंधन, मंगळवार, दि.27 ऑगस्ट 2024 रोजी, गोपाळकाला, गुरुवार, दि.31 ऑक्टोबर 2024 रोजी, नरक चतुर्दशी या दिवशी स्थानिक सुट्टयांचे दिवस म्हणून जाहीर करण्यात आल्या होत्या. तथापि रायगड जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या सणाचा एक भाग म्हणजेच ज्येष्ठा गौरी विसर्जन मोठया उत्साहात साजरे केले जाते. त्यामुळे दि.24 नोव्हेंबर 2023 रोजीच्या अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केलेली गुरुवार, दि.31 ऑक्टोबर 2024 रोजीची नरक चतुर्दशी यासणाची स्थानिक सुट्टी रद्द करुन त्याऐवजी गुरुवार, दि.12 सप्टेंबर 2024 रोजीची स्थानिक सुट्टी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केली आहे. ०००००००

काजू बी शासन अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यास दि.30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

    रायगड (जिमाका) दि.04 :-   राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासनाकडून वित्तिय सहाय्य उपलब्ध करुन दिल्यास, काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल, ही बाब विचारात घेवून सन 2024 च्या काजु हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वीत केली होती. या योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून अर्ज सादर करावयाची मुदत दि. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. अनुदान योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य काजू मंडळ तथा कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ  संजय कदम यांनी केले आहे. राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान देणे या योजनेची अंमलबजावणी बाबतची प्रक्रिया पणन मंडळाच्या  www.msamb.com  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनुदान मागणीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज, संमतीपत्र, 7/12, कृषी खात्याचा दाखला. जी.एस.टी.बील. बँक तपशिल, आधा कार्ड, हमीपत्र इ. कागदपत्रे अनुदान मागणीसाठी आवश्यक आहेत. अधिक माही

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेची सप्टेंबरमध्येही नोंदणी सुरू राहणार -- जिल्हाधिकारी किशन जावळे

   रायगड (जिमाका),दि.3:- 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता  सप्टेंबर 2024 मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. तरी पात्र महिलांनी तात्काळ नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे  यांनी केले.  राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना  सुरू करण्यात आली आहे.  या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.  यापूर्वी दि. 31 ऑगस्ट 2024 पर्यत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. आता ही नोंदणी  सप्टेंबर 2024 मध्येही सुरू राहणारआहे. तरी अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा.             0000