Posts

Showing posts from December 27, 2020

पाली ग्रामपंचायतीचे होणार नगरपंचायतीमध्ये रूपांतर अधिसूचना झाली प्रसिद्ध

    अलिबाग,जि.रायगड दि.01 (जिमाका) :- जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेल्या पाली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याची अधिसूचना शासनाच्या नगरविकास विभागाने प्रसिध्द केली आहे.   गेल्या कित्येक दिवसांपासून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.               पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर होण्यासाठी येथील ग्रामस्थांची मागणी प्रलंबित होती, त्यांनी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याकडे याबाबत लवकर निर्णय व्हावा, यासाठी विनंती केली होती. त्यानुषंगाने पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर दि. 31 डिसेंबर 2020 रोजी पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्याबाबतची अधिसूचना शासनाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे. 000000

पेण मळेघरवाडी प्रकरणी आवश्यक चौकशी प्रक्रिया पूर्ण करून जलद गतीने आरोपपत्र दाखल करणार---गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पीडित बालिकेच्या कुटुंबियांना मनोधैर्य व दक्षता समिती योजनेमधून तात्काळ मदत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश

Image
    अलिबाग,जि.रायगड दि.31 (जिमाका) :- पेण मळेघरवाडी प्रकरणामध्ये आवश्यक ती चौकशी करून, जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल, जेणेकरून आरोपीस जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल, असे प्रतिपादन राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे केले.   आज सकाळी त्यांनी पेण येथे पीडित बालिकेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी गृह (ग्रामीण), वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई हे पीडित बालिकेच्या कुटुंबियांच्या घरी आले असता ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार,आदिवासी प्रकल्प अधिकारी श्रीमती अहिरराव,पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव,पेण तहसिलदार अरुणा जाधव उपस्थित होते.   यावेळी गृह (ग्रामीण), वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पेण मळेघरवाडी येथील घटना ही निश्चितच अत्यंत दुर्दैवी   घटना आहे. या प्रकरणाचा तपास

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना प्रशिक्षणासाठी भ्रमणध्वनी/व्हाट्सअॅप क्र. 9860964323 नंबरवर नोंदणी करावी

  अलिबाग,जि.रायगड दि.31 (जिमाका) : - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने दिव्यांग आणि वयोवृद्ध व्यक्तींचे आयुष्य आनंदी कसे करता येईल. यासाठी सावली, सीएफआर, हेल्पेज इंडिया, फेस्कॉम व ए एससीओपी या संस्थेमार्फत ज्येष्ठत्वाची ओळख, ज्येष्ठ व्यक्तींना भेडसावणाऱ्या समस्या व उपायोजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या कायद्यांची ओळख, ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या योजनांची ओळख या विषयांवरील प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  हे प्रशिक्षण मर्यादित 30 व्यक्तींना देण्यात येईल. इच्छुक ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना या प्रशिक्षणासाठी भ्रमणध्वनी/व्हाट्सअॅप क्र. 9860964323 या नंबरवर आपली नोंदणी करावी व प्रशिक्षणाचा लाभ लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,अधिकारी सुनिल जाधव यांनी केले आहे ००००००

ऑगस्ट 2020 चे प्रवेश अर्ज नव्याने ऑनलाईन पद्धतीने दि.4 जानेवारी 2021 पर्यंत भरावेत

    अलिबाग,जि.रायगड दि.31 (जिमाका) : - औद्योगिक प्रशिक्षण संस्था, म्हसळा, जि.रायगड ही शासकीय संस्था असून या संस्थेत एक वर्ष मुदतीचे संधाता, नळकारागिर व (स्युईंग टेक्नॉलॉजी फक्त मुलींसाठी) आणि दोन वर्षे मुदतीचे जोडारी व इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या व्यवसायात ऑगस्ट 2020 चे प्रवेश अर्ज नव्याने ऑनलाईन पद्धतीने भरण्याचा दि.1 जानेवारी ते 4 जानेवारी 2021 या कालावधीमध्ये सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. तरी   इच्छुक उमेदवारांनी प्रवेशापासून वंचित राहू नये याकरिता आपले अर्ज नव्याने ऑनलाईन पध्दतीने भरावेत, असे आवाहन प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, म्हसळा पी.एम.बिरार यांनी केले आहे. 000000

पेणच्या बालिका अत्याचार प्रकरणी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार -पालकमंत्री कु.आदिती तटकरे पीडित बालिकेच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजनेमधून तात्काळ मदत करण्याचे प्रांताधिकऱ्यांना दिले आदेश

Image
               अलिबाग , जि.रायगड दि. 30 ( जिमाका) :- पेण येथील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आर ो पी विरोधातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार असल्याची माहिती पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी पेण येथे दिली.              आज दुपारी त्यांनी पेण येथे पीडित बालिकेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला , त्यावेळी त्या बोलत होत्या . यावेळी पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते , पोलीस अधीक्षक अशोक दुधे , प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार , पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव उपस्थित होते .               यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणे गरजेचे असून हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासंबधी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते व रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांना दिल्या. तर पीडितेच्या कुटुंबियांना या घटनेतून सावरण्यासाठी समुपदेशन होणे गरजेचे आहे , शासनाच्या मनोधैर्य योजनेतून पीडित बालिकेच्या कुटुंबाला तात्काळ मदत करण्याचे आदेशही त्यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना दिले.   ००००००

रायगड जिल्हा परिषदेचा डासमुक्त व कचरामुक्त गावांचा संकल्प कंपोस्टखड्डे व शोषखड्डे बांधकामासाठी विशेष मोहिम

  अलिबाग,जि.रायगड दि.30 (जिमाका) :- जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची आता निर्मल प्लसच्या दृष्टीने वाटचाल सुरु आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कु.योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे विषया समित्यांचे सभापती व जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांचे सक्रिय योगदानातून शाश्वत स्वच्छतेसाठी प्रयत्न होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गावामधील स्वच्छतेत सातत्य राहून जिल्ह्यातील प्रत्येक गावात डासमुक्त व कचरामुक्त व्हावे यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियानातर्फे दि.5 ते दि.12 जानेवारी 2021 या कालावधीत कंपोस्टखड्डे व शोषखड्डे बांधकामासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.             ज्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूका आहेत अशा ग्रामपंचायती व्यतिरिक्त इतर ग्रामपंचायतमध्ये ही मोहिम राबविली जाणार आहे. कचरा उघड्यावर पडल्यामुळे गावांना बकाल स्वरुप प्राप्त होवून रोगजंतू वाढीस लागतात, उघड्यावरचा कचरा मानवी आरोग्यास व पर्यावरणास ही धोका निर्माण करतो. यावर पर्याय म्हणून ओला कचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावात कंपोस्टखड्डयांची निर्मितीवर भ

मोटार वाहन निरीक्षकांचा जानेवारी महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर

    अलिबाग,जि.रायगड दि.30 (जिमाका) :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा जानेवारी-2021 महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर झाला असून शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे- सोमवार, दि.11 व दि.18 जानेवारी 2021 रोजी ता. महाड.   मंगळवार, दि.12 जानेवारी 2021 रोजी ता.श्रीवर्धन.   बुधवार, दि.13 जानेवारी 2021 रोजी माणगाव.    शुक्रवार, दि.15 व 22   जानेवारी 2021 रोजी ता.अलिबाग.   मंगळवार, दि.19 जानेवारी 2021 रोजी ता.रोहा. बुधवार, दि.20 जानेवारी 2021 रोजी ता.मुरुङ ००००००

आवश्यक उपाययोजना करण्याच्या अधीन राहून जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला

अलिबाग,जि.रायगड दि.29 (जिमाका) :- कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव व संक्रमण रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने मुरुड तालुक्यातील जंजिरा किल्ल्यावर दि 25 डिसेंबर 2020 ते दि. 02 जानेवारी 2021 या कालावधीत पर्यटकांच्या प्रवेशास मनाई असल्याचे आदेश जारी केले होते. जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 व 30 तसेच महाराष्ट्र कोविड -19 उपाययोजना नियम 2020 मधील नियम 10 अन्वये प्राप्त अधिकारानुसार कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना काटेकोरपणे करण्याच्या अधीन राहून जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याचे आदेश जारी केले आहेत.  तसेच एका दिवसात चारशेपेक्षा अधिक पर्यटक मुरुड-जंजिरा किल्ल्यास भेट देणार नाहीत, तिकीट घेताना व बोटीत बसताना गर्दी होणार नाही, याबाबतचे पोलीस विभाग व स्थानिक प्रशासनाने योग्य ते नियोजन करण्याची दक्षता घ्यावी,असेही निर्देश पोलीस विभाग व स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.  मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकां

ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काही ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) प्रमाणे मनाई आदेश जारी

    अलिबाग,जि.रायगड दि.29 (जिमाका) :- माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यामुळे दि 11 डिसेंबर 2020 रोजीपासून आचारसंहिता अंमलात आली आहे.   नवी मुंबई पोलोस आयुक्तालय हद्दीत- परिमंडळ 2 मधील पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत केवाळे, वलप, वाकडी, वारदोली, उमरोली, हरिग्राम, वाजे, बारवाई, खानावळे, मोर्बे, खैरवाडी, खानाव, पालेबुद्रुक, साई, पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत - उसर्ली खूर्द, सांगुर्ली , देवळोली, नानोशी, कोळखे, खादेश्वर पोलीस ठाणे हद्दीत- आकुर्ली, पालीदेवद, न्हावाशेवा पोलीस ठाणे हद्दीत - फुंडे गाव, उरण पोलीस ठाणे हद्दीत - चाणजे, नागाव, म्हातवली, वैश्वी, मोरासागरी पोलीस ठाणे हद्दीत - केगाव एकूण 27 ग्रामपचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका होणार असन दि. 15 जानेवारी 2021 रोजी मतदान व   दि .18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ-2   पनवेल विभागातील पनवेल तालुका, पनवेल शहर, खा

ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काही ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 134 नुसार मनाई आदेश जारी

    अलिबाग,जि.रायगड दि.29 (जिमाका) :- माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदती संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यामुळे दि. 11 डिसेंबर 2020 रोजीपासून आचारसंहिता अंमलात आली आहे.   नवी मुंबई पोलोस आयुक्तालय हद्दीत- परिमंडळ 2 मधील पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत केवाळे, वलप, वाकडी, वारदोली, उमरोली, हरिग्राम, वाजे, बारवाई, खानावळे, मोर्बे, खैरवाडी, खानाव, पालेबुद्रुक, साई, पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत - उसर्ली खूर्द, सांगुर्ली , देवळोली, नानोशी, कोळखे, खादेश्वर पोलीस ठाणे हद्दीत- आकुर्ली, पालीदेवद, न्हावाशेवा पोलीस ठाणे हद्दीत - फुंडे गाव, उरण पोलीस ठाणे हद्दीत - चाणजे, नागाव, म्हातवली, वैश्वी, मोरासागरी पोलीस ठाणे हद्दीत - केगाव एकूण 27 ग्रामपचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून दि. 15 जानेवारी 2021 रोजी मतदान व दि .18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी मतदान शांत, निर्

नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करु या जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

    अलिबाग,जि.रायगड दि.28 (जिमाका) :- राज्यात दि. 22 डिसेंबर, 2020 ते 05जानेवारी, 2021 या कालावधीत रात्री 11.00ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता त्याचप्रमाणे शासनाने दिलेल्या सूचना विचारात घेता 31 डिसेंबर, 2020 व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने करोनाच्या अनुषंगाने दि. 31 डिसेंबर, 2020 रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरीदेखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व दि. 01 जानेवारी, 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे,31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठया संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टंन्सिंग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल, याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे,  विशेषतः मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्येदेखील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते,