मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
रायगड (जिमाका),दि.9:- राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्याकरीता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली असून नोकरी इच्छुक अधिकाधिक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता उमेदवारांनी https://rojgar . mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोदणी करावी. प्रत्येक तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित शिबीरातही नोंदणी करता येईल. नोंदणीकृत उमेदवारांना शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांमधील रिक्त जागेकरीता योजनेंतर्गत अर्ज करता येणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी महास्वयंम संकेतस्थळावर 'सीएमवायकेपीवाय ट्रेनिंग स्कीम' अंतर्गत असलेल्या जाहिरातींकरीता ऑनलाईन अर्ज करावे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी तसेच वय किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे. तो 12 वी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेलाअसावा. उमेदवाराचे आधार नोंदणी असावी व उमेदवाराचे आधार संलग्न बँक खाते असावे. मुख्यम