Posts

Showing posts from June 19, 2022

ग्रामपंचायत साळवे व स्वदेस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती व जिल्हा परिषद मार्फत महापंचायतराज अभियान संपन्न

Image
अलिबाग,दि.24 (जिमाका):-  ग्रामपंचायत साळवे व स्वदेस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासन पंचायत समिती, रायगड व जिल्हा परिषद यांच्यामार्फत महापंचायत राज अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा साळवे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व वाड्या वस्त्या, साळवे आदिवासी वाडी, पानोसे, पानोसे आदिवासी वाडी, पानोसे कोंड इत्यादी ग्रामस्थांनी लाभ घेतला. यावेळी माणगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री.वाय. प्रभे, सरपंच मंगल कोळी, उपसरपंच तटगुरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, विस्तार अधिकारी श्री.गायकवाड, कृषी विस्तार अधिकारी श्री.काप व प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवलीचे कर्मचारी वृंद, अंगणवाडी व आशा सेविका उपस्थित होते. गटविकास अधिकारी श्री.प्रभे आरोग्य, शिक्षण उपजीविका यावर मार्गदर्शन करताना म्हणाले की, कागदपत्रे व शासकीय लाभ मिळण्याकरिता धडपड करून आपण रोजगार हमी व पायाभूत सुविधा परिपूर्ण करून स्वयंपूर्ण व्हावे. महिलांनी हिमोग्लोबिनवर लक्ष द्यावे व आवश्यक तो पूरक आहार खाऊन सुदृढ राहावे. जलअमृत योजनेंतर्गत तलावामधून गाळ काढून घ्यावा. तसेच आपले कोकण सदैव हरित सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकाने निसर्ग जपावा व वृक्

तहसिलदार मीनल दळवी यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न

  अलिबाग,दि.24 (जिमाका):-  येथील तहसिल कार्यालयात (दि.22 जून 2022) रोजी तहसिलदार श्रीमती मीनल दळवी यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार योजनेच्या समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीस अध्यक्ष प्रकाश पाटील, श्रीमती दक्षता राऊत, श्री.हेमनाथ खरसांबळे, श्री.पंडीत ढमढेरे इत्यादी सदस्य व गटविकास अधिकारी श्री.विजय नलावडे, मुख्याधिकारी यांचे प्रतिनिधी श्रीमती माने, नायब तहसिलदार संजय गांधी योजना, श्रीम.मानसी पाटील तसेच कर्मचारी उपस्थित होते. तहसिलदार श्रीमती मीनल दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत करून संजय गांधी निराधार योजनेबाबत सविस्तर माहिती दिली.  या बैठकीमध्ये सर्व प्राप्त अर्जांची पडताळणी करून समिती सदस्यांनी विधवा महिला 6, दिव्यांग 3 असे एकूण 9 अर्ज मंजूर केले आहेत. 00000

विशेष लेख: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत “हर घर झंडा” अर्थात “राष्ट्रध्वजाभिमान” (भाग 2); मार्गदर्शक कृती आराखडा

Image
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त दि.12 मार्च 2021 ते दि.15 ऑगस्ट 2023 या कालावधीत  “ आजादी का अमृत महोत्सव ”  या उपक्रमाचे आयोजन करण्याबाबत केंद्र शासनाने कळविले आहे. त्यानुसार राज्यात या कालावधीमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याबाबत शासन निर्णय/शासन पत्रांद्वारे यापूर्वीच वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाने जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने  “ आजादी का अमृत महोत्सव ”  अंतर्गत दि.11 ऑगस्ट 2022 ते दि.17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये देशभरात  “ हर घर झंडा ”  हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्रे, स्वस्त भाव धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्व सामान्य नागरीकांशी निगडीत यंत्रणांचा वापर करुन हा कार्यक्रम यशस्वी करण्यात यावा. याबाबतचा मार्गदर्शक कृती आराखडा जाणून घेऊ या, या लेखाच्या माध्यमातून.. (अ) कृती आर

विशेष लेख: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत “हर घर झंडा” अर्थात “राष्ट्रध्वजाभिमान” (भाग 1)

Image
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त दि.12 मार्च 2021 ते दि.15 ऑगस्ट 2023 या कालावधीत  “ आजादी का अमृत महोत्सव ”  या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. तशा सविस्तर सूचना केंद्र शासनाने कळविल्या आहेतच. त्यानुसार राज्यात या कालावधीमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याबाबत विविध शासन निर्णय/शासन पत्रांद्वारे यापूर्वीच वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाने जनतेच्या मनात भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे, या उद्देशाने  “ आजादी का अमृत महोत्सव ”  अंतर्गत दि.11 ऑगस्ट 2022 ते दि.17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये देशभरात  “ हर घर झंडा ”  हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना वाचकांसाठी एकत्रितरित्या या लेखाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. 1) सर्व शासकीय / निमशासकीय यंत्रणांनी प्रसारमाध्यमातून देशाभिमान व जाणीव-जागृतीची मोहीम प्रभावीपणे राबवावी. 2) दि.11 त

कोविड-19 च्या वाढत्या रुग्ण संख्येच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क व सजग राहण्याचे आवाहन

  अलिबाग,दि.24 (जिमाका):-  रायगड जिल्ह्यामध्ये करोनाबाधित रुग्ण संख्येत  पुन्हा एकदा सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. दि.24 जून 2022 रोजी 24 तासांमध्ये 317 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच आज रोजी एकूण 1 हजार 097 ॲक्टिव्ह रुग्ण असून सौम्य व माध्यम स्वरूपाची लक्षणे असलेले 13 रुग्ण कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. वाढत्या रुग्ण संख्येच्या अनुषंगाने जिल्ह्याधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी रायगड जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क व सजग राहण्याचे तसेच स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वतःची व इतरांची काळजी घावी तसेच कोविड-19 नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन केले आहे. तसेच सर्व नागरिकांनी SMS (S for सामाजिक अंतर, M for माक्सचा वापर, S for सॅनिटाझरचा वापर) या पॉलिसीचा अवलंब करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी करोनापासून आपला बचाव करण्यासाठी कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करावेत, असेही जिल्हा प्रशासनाकडून आवाहन कर

कृषी उत्पादन निर्यातवाढीकरिता कार्यशाळा संपन्न

Image
  अलिबाग,दि.24 (जिमाका):-  निर्यात केंद्र म्हणून विकसीत करून निर्यात वृध्दीकरिता जिल्हा निर्यात प्रचलन समिती जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशान्वये जिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबाग व कृषी विभाग अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (RSET) अलिबाग येथे (दि.22 जून 2022) रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेकरिता अपेठा (Agricultural and Processed Food Products Export Development Authority) या संस्थेचे सहाय्यक संचालक श्री.प्रशांत वाघमारे, उद्योग सह संचालक कोकण विभाग ठाणे श्री.सतीश भामरे हे उपस्थित होते. जिल्ह्यातील स्थानिक साधन संपत्तीचा व भौगोलिक मानांकित चिन्ह प्राप्त अलिबागचा पांढरा कांदा व आंबा उत्पादन या घटकाच्या निर्यात वाढीकरिता शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन जिल्हा उद्योग केंद्र-अलिबाग मार्फत करण्यात येईल व जिल्हा कृती आराखडयात या गोष्टीचा समावेश करण्यात आल्याची माहिती महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र पी.एस.हरळय्या यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले. तसेच कृषी विभागाकडून कृषी माल निर्यातीकरिता आवश्यक ते सहाय्य करण्या

रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत दि.25 जून ते दि.08 जुलै 2022 या कालावधीकरिता मनाई आदेश जारी

  अलिबाग,दि.24 (जिमाका):-  श्रीम.नुपूर शर्मा व श्री.नवीन जिंदाल, भारतीय जनता पक्ष प्रवक्ता यांनी मोहम्मद पैंगबर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तवाच्या निषेधार्थ रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये मुस्लीम संघटनांकडून विविध आंदोलने करण्यात येत आहेत. केंद्र सरकारने सैन्य भरती संदर्भात नव्याने लागू करण्यात आलेल्या  “ अग्निपथ ”  योजनेच्या अनुषंगाने संपूर्ण देशात युवकांमध्ये संभ्रम असल्याने, ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये जिल्ह्यातील युवकांकडून अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन करण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील काही आमदारांनी बंड पुकारल्याने राज्यासह, रायगड जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटून राजकीय घडामोडींबाबत काही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. तसेच अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत श्रीम.इंदूबाई जयराम तिखंडे, रा.उक्रुळ, ता.कर्जत या सन 2011-12 या सालामध्ये मंजूर झालेल्या घरकुल योजनेचा लाभ अद्यापपर्यंत न मिळाल्याने दि.24 मार्च 2022 रोजीपासून जिल्हाधिकारी रायग

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 10 मि.मी. पावसाची झाली नोंद

अलिबाग,दि.24 (जिमाका):-  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 10.68 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 188.54 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग- 0.00 मि.मी., पेण-4.00 मि.मी., मुरुड- 0.00 मि.मी., पनवेल- 2.80 मि.मी., उरण- 8.00 मि.मी., कर्जत- 18.80 मि.मी., खालापूर- 18.00 मि.मी., माणगाव- 6.00 मि.मी., रोहा- 0.00 मि.मी., सुधागड- 16.00 मि.मी., तळा- 1.00 मि.मी., महाड-0.00 मि.मी., पोलादपूर- 3.00 मि.मी, म्हसळा-0.00 मि.मी., श्रीवर्धन- 1.00 मि.मी., माथेरान- 92.20 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 170.80 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 10.68 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 6.08 टक्के इतकी आहे. 00000

जिल्ह्यात दि.25 जून ते दि.01 जुलै 2022 या कालावधीत होणार कृषी संजीवनी मोहिमेचे आयोजन

Image
  अलिबाग,दि.23 (जिमाका ):- कृषी तंत्रज्ञानामधील एखादी छोटी सुधारणा देखील पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करू शकते. खरीप हंगाम 2022 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्यातील कृषी विभागाचे अधिकारी/ कर्मचारी, कृषी विभाग जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठे/ कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषीमित्र शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत आहेत. त्यानुसार दि.25 जून ते दि.01 जुलै 2022 या कालावधीत प्रत्येक दिवशी महत्त्वाच्या मोहिमांवर विशेष भर देवून  “ कृषी संजीवनी मोहीम ”  साजरा करण्यात येणार आहे. कृषी संजीवनी मोहिमेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:- दि.25 जून 2022 -  विविध पिकांची तंत्रज्ञान प्रसार, मूल्यसाखळी बळकटीकरण दिन,  दि.26 जून 2022-  पौष्टिक तृणधान्य दिवस,  दि.27 जून 2022 -  महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिन,  दि.28 जून 2022 -  खत बचत मोहीम,  दि.29 जून 2022 -  प्रगतशिल शेतकरी संवाद,  दि.30 जून 2022 -  शेती पूरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस,  दि.01 जुलै 2022 -  कृषी दिन साजरा करुन कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप. या मोहिमेच्या कालावधीमध्ये संबंधित विषयांबाब