Posts

Showing posts from December 25, 2016

झाडांचे संगोपन करुन ती झाडे जगविणे आवश्यक-- जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

Image
 झाडांचे संगोपन करुन ती झाडे जगविणे आवश्यक                                 -- जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले             अलिबाग दि.29:- (जिमाका)  रायगड जिल्ह्याला झाडे लावण्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणे व लावलेल्या झाडांचे संगोपन करुन ती झाडे जास्तीत जास्त प्रमाणात जगवावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे दिले.             जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा वर्षनिहाय नियोजन आराखडा व कृती कार्यक्रम तयार करुन अंमलबजावणी करणे याबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या.             या बैठकीला रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक विद्याधर झुकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) उमेश पाटील, रोहा विभागाचे सहाय्यक वन संरक्षक दिपक सावंत, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.             जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या की, वृक्षलागवड कार्य

ग्राहकांनी सदैव जागरुक असणे आवश्यक --जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

Image
ग्राहकांनी सदैव जागरुक असणे आवश्यक                                                       --जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग दि.28:- (जिमाका :  ग्राहक म्हणून असलेला आपला हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक ग्राहकाने सदैव जागरुक राहिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे केले. राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो.  या ग्राहक दिनाच्या निमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होत्या.  या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त एस.आर.साळुंखे, जिल्हा पुरवठा अधिकारी लिलाधर दुफारे, ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य मकरंद जोशी, भगवान ढेबे, मानवतावादी ग्राहक परिषदेचे अध्यक्ष मुस्ताक घट्टे  तसेच परिषदेचे सदस्य, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले म्हणाल्या की, आपण सगळेच ग्राहक आह

पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

Image
दिनांक:- 27/12/2016                                                                                                               वृत्त क्र. 833  पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे                                                                                            ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले         अलिबाग दि.27 :- (जिमाका) जिल्ह्यातील बँकांनी  त्यांना दिलेले पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित केलेल्या  जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीच्या त्रैमासिक बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.  या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, रिजर्व्ह बँकेचे व्यवस्थापक सी.कार्तिक, बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रिय व्यवस्थापक गिरीशकुमार सिंग, लिड बँकेचे व्यवस्थापक टी.मधूसुदन, नाबार्ड बँकेचे असिटंड जनरल मॅनेजर सुधाकर रगतवान, रायगड जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक तसेच विविध बँकाचे प्रतिनिधी उपस्थित