Posts

Showing posts from December 4, 2016

आदिवासी संवाद जिल्हा माहिती कार्यालयाचा नाविण्यपूर्ण उपक्रम

Image
दिनांक:- 08/12/2016                                                                                       वृत्त क्र. 788 आदिवासी संवाद जिल्हा माहिती कार्यालयाचा नाविण्यपूर्ण उपक्रम                                                                                               अलिबाग दि.08:- (जिमाका) आदिवासींच्या कल्याणासाठी  विविध योजना शासनामार्फत राबविण्यात येतात.  या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी आदिवासी संवाद हा नाविण्यपूर्ण उपक्रम जिल्हा माहिती कार्यालय रायगड-अलिबाग मार्फत  राबवण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. नुकतीच या उपक्रमाची सुरुवात जेएसएम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या सहयोगाने करण्यात आली.   जेएसएम महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत ग्रामस्वच्छता, जनजागृती तथा विशेष श्रमसंस्कार, सात दिवसीय निवासी शिबीर तळवली ता.अलिबाग येथे 5 ते 11 डिसेंबर 2016 या कालावधीत आयोजित  करण्यात आले आहे.  या कार्यक्रमांतर्गत आदिवासी संवाद हा उपक्रम जिल्हा माहिती कार्यालय रायगड-अलिबाग जेए

हवामानावर आधारित फळपिक विमा योजना

दिनांक :- 07 डिसेंबर 2016                                                     लेख क्र.62 हवामानावर आधारित फळपिक विमा योजना कमी, जास्त पाऊस,पाऊसाचा खंड,वेगाचा वारा, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठिण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित रहावे. या उद्देशाने हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे.  या योजनेची माहिती देणारा लेख.. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा विमा संरक्षित रक्कमेच्या 5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जी कमी असेल ती रक्कम  असा मर्यादित ठेवण्यात आला  आहे.  पंतप्रधान पिक विमा योजना रायगड जिल्ह्यात बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स या कंपनी मार्फत राबविण्यात येणार आहे.  सर्व कर्जदार, बिगर कर्जदार शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र राहतील.    या योजनेत आंबा व काजू ही पिके अधिसूचित करावयाची आहेत.  या योजनेअंतर्गत पुढील कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस नमूद कालावधी पर्यंत विमा संरक्षण देण्यात येईल. फळपिके :- काजू- समाविष्ट धोके -अवेळी

दैनंदिन व्यवहारात नागरिकांनी कॅशलेस पध्दतीचा अवलंब करावा ---------------------------- सुरुवातीला किमान 25 गावे कॅशलेस करण्याचा निर्धार ----जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

Image
दिनांक:- 6/12/2016                                                                                                वृत्त क्र. 778 दैनंदिन व्यवहारात नागरिकांनी कॅशलेस पध्दतीचा अवलंब करावा ----------------------------   सुरुवातीला किमान 25 गावे कॅशलेस करण्याचा निर्धार                                                                             ----जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग दि.6 :- (जिमाका)  देशात 500  आणि रु.1000 रुपयांच्या निश्चलीकरण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला  आहे.  आर्थिक व्यवहार कॅशलेस करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे.  या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी आपले दैनंदिन व्यवहार कॅशलेस  करावे.  या कामात जिल्ह्यातील बँकानी पुढाकार घ्यावा सुरुवातीला  जिल्ह्यातील किमान 25 गावे कॅशलेस करण्याचा निर्धार असून यासाठी बँकांनी योग्य नियोजन करावे अशा सूचना  जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे दिल्या. जिल्ह्यात कॅशलेस आर्थिक व्यवहारांना चालना मिळावी.   कॅशलेस व्यवहार करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना करण्याच्या संदर्भात