Posts

Showing posts from September 26, 2021

बीच शॅक्स (चौपाटी कुटी) उभारणीकरिता अलिबाग तालुक्यातील मौजे वरसोली तर श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिवेआगर येथील शासकीय जागा हस्तांतरित

    अलिबाग,जि.रायगड दि.30 (जिमाका):- संचालक, पर्यटन संचालनालय यांच्या पत्रान्वये शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटन वाढीसाठी बीच शॅक्स धोरण जाहीर करण्यात आले असून रायगड जिल्ह्यातील दिवेआगर, ता.श्रीवर्धन व अलिबाग तालुक्यातील वरसोली समुद्र किनाऱ्यावर बीच शॅक्स उभारण्यात येणार आहे.                 पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील पर्यटनवाढीसाठी ध्यास घेतला आहे. त्यापैकी दिवेआगर, ता.श्रीवर्धन व अलिबाग तालुक्यातील वरसोली समुद्रकिनाऱ्यावर बीच शॅक्स प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाहीदेखील प्रलंबित होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत बीच शॅक्ससाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत तत्परतेने सुरू केली आहे.             त्याचबरोबर बीच शॅक्स उभारणीसाठी असलेल्या जागांची योग्य निवड व पाहणी करून बीच शॅक्स कार्यान्वित करण्याच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर व अलिबाग तालुक्यातील वरसोली समुद्रकिनाऱ्यावर बीच शॅक्स उभारणीसाठी शासकीय जमिनीची

उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार अलिबाग यांच्या निवासस्थानाकरिता तालुक्यातील मौजे वरसोली येथील शासकीय जागा हस्तांतरित

    अलिबाग,जि.रायगड दि.30 (जिमाका):- उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालय ही नागरिकांसाठी क्षेत्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाची कार्यालये मानली जातात. या कार्यालयातून जनतेची महसूलविषयक सर्व प्रकारची महत्त्वाची कामे केली जातात. त्याचप्रमाणे अलिबाग हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असून नैसर्गिक आपत्ती, निवडणूक कालावधीत रात्री-अपरात्री तसेच इतर महत्वाच्या कामानिमित्त रात्रंदिवस शासकीय कामकाज करावे लागते. या कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबतीतील ही वस्तुस्थिती लक्षात घेता त्यांच्याकरिता सुस्थितीतील शासकीय निवासस्थाने असणे, ही बाबही तितकीच महत्वाची आहे.                 या उद्देशाने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाचा पाठपुरावा करुन जिल्हा प्रशासनास त्याप्रमाणे निर्देश दिले आहेत.             या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्या निवासस्थानाकरिता मौजे वरसोली, ता.अलिबाग येथील स.नं./हि.नं.238/2/अ2/1 क्षेत्र 0.19.80 हे.आर.इतके क्षेत्र 08   ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयानुसार भोगाधिकार मूल्यरहित व महसूल मुक्त किंमतीने कब्जा

नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी केली जे.एन.पी.टी.-सिडको परिसराची पाहणी बेलापूर-जे.एन.पी.टी. रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडी व पार्किंग प्रश्नाबाबतच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात संबधित विभागाला दिले आदेश

    अलिबाग,जि.रायगड,दि.29 (जिमाका) :- बेलापूर-जे.एन.पी.टी. रस्त्यावर वाहनांची होणारी वाहतूक कोंडी व पार्किंग प्रश्न यावर लवकरात लवकर उपाययोजना करून याबाबतच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात संबधित विभागाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे निर्देश दिले. नगरविकास मंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी आज बुधवार, दि.29 सप्टेंबर 2021 रोजी शिवस्मारक, जे.एन.पी.टी., उरण येथील दास्तान फाटा, द्रोणागिरी सीएफएस येथील पार्किंगच्या जागेची पाहणी केली.   त्यावेळी त्यांनी संबंधित विभागाला ठाणे-बेलापूर रस्त्यावरील सिडको व जे.एन.पी.टी. कडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची होणारी ट्राफिक कोंडी तसेच पार्किंग प्रश्न यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत आवश्यक ते निर्देश दिले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सिडको, जेएनपीटी आणि वाहतूक पोलीस यांच्या मदतीने नियोजन करणे आवश्यक आहे. याकरिता टप्य्याटप्प्याने वाहने सोडण्यात येणार असून सीएफएस आणि तालुक्याबाहेर जाणाऱ्या वाहनांना कलर कोड स्टिकर देण्यात येतील. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास भेडसावत आहे. मात्र वाहतूक कोंडीची समस

रायगड जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता सहावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    अलिबाग,जि.रायगड,दि. 29 (जिमाका):- शिक्षा मंत्रालय भारत सरकारद्वारा संचलित निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालय, ता. माणगाव, जि.रायगड या विद्यालयात सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.                यावर्षी प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सूचना नवोदय विद्यालय समितीद्वारा प्राप्त झाली आहे. प्रवेश प्रक्रियेबाबतची सर्व माहिती https://cbseitms.nic.in/registrationClass 6 /registrationClass 6 व http://www.navodaya.gov या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.                 प्रवेश अर्ज निःशुल्क ऑनलाईन भरण्यासाठी पालकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालकांनी नवोदय विद्यालय समितीच्या वेबसाईटवरील प्रमाणपत्र डाऊनलोड करून घेऊन इंटरनेटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. हा अर्ज भरत असताना पालकांची सही विद्यार्थ्यांची सही, फोटो आवश्यक आहे.               सहावीसाठी निवड चाचणी प्रवेश परीक्षेस बसणारा विद्यार्थी सलग तिसरी व चौथी पास असावा. पाचवीत संपूर्ण वर्ष रायगड जिल्हयात शिकणारा असावा. त्याचा जन्म 1 मे 2009 ते 30 एप्रिल

बँक सखींसाठी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रातर्फे आयोजित सात दिवसीय प्रशिक्षण समारोप कार्यक्रम संपन्न

    अलिबाग,जि.रायगड,दि.29 (जिमाका) :- ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र, रायगड अलिबाग येथे बँक सखींसाठी आयोजित सात दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप दि.28 सप्टेंबर रोजी संपन्न झाला.   या कार्यक्रमात रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी या प्रशिक्षणातील 39 बँक सखींना बहुमूल्य मार्गदर्शन केले व बँक सखींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.   यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजयकुमार कुलकर्णी, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चव्हाण, जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचे (RSETI) संचालक श्री.राठोड, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रातील इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राच्या मिना माळी यांनी केले. शेवटी प्रशिक्षणार्थी बँक सखींना मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.      00000000

राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती प्रजातींबाबत जनजागृतीपर ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

    अलिबाग,जि.रायगड,दि.29 (जिमाका):- राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती लागवड साहित्य निर्मिती (औषधी वनस्पती रोपवाटिका), औषधी वनस्पती लागवड काढणोत्तोर व्यवस्थापन प्रक्रिया व मूल्यवर्धन इ. घटकांसाठी तालुका कृषी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. तथापि अशा शेतकऱ्यांना या घटकांचा लाभ घेण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन व्हावे, यासाठी एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प व्यवस्थापक आत्मा श्रीम.उज्ज्वला बाणखेले यांनी दि.28 सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 या वेळेत आयोजित केली होती. या कार्यशाळेच्या माध्यमातून औषधी वनस्पती लागवड साहित्याची निर्मिती कशी करावी, औषधी वनस्पतींचे फायदे व कोणत्या वातावरणात या वनस्पती लागवड केल्यानंतर आपणास त्यापासून भरघोस उत्पन्न मिळू शकते, याबाबतचे मार्गदर्शन डॉ. दिगंबर मोकाट, प्रमुख शास्त्रज्ञ, विभागीय औषधी वनस्पती प्रोत्साहन केंद्र, पुणे विदयापीठ, पुणे यांनी केले आणि इतर काही महत्वाच्या मुद्यांवर प्रशिक्षणही दिले. तसेच औषधी वनस्पतींची लागवड, काढणी पश्चात व्यवस्थापन व प्रक्रिया व मूल्यवर्धन याबाबत म

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग उद्योजकांना सूवर्णसंधी.... नव उद्योजकांनी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घ्यावा

  विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग उद्योजकांना सूवर्णसंधी....   नव उद्योजकांनी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घ्यावा   अलिबाग,जि.रायगड,दि.29 (जिमाका):- राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने या महामंडळाची स्थापना केली आहे. महामंडळामार्फत छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगाराकरीता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10.00 लक्ष पर्यत) व गट कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10.00 लक्ष ते 50. 00 लक्ष पर्यंत) या ऑनलाईन योजना राबविण्यात येतात. सन 2021-22 या वित्तीय वर्षाकरीता विविध कर्ज योजनांचे रायगड जिल्हा कार्यालयास उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (भौतिक उद्दीष्ट 100) व गट कर्ज ब्याज (भौतिक उद्दीष्ट 10) या योजनांकरीता महामंडळाच्या www.vint.in या संकेतस्थळाला भेट देवून ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10.00 लक्ष पर्यंत) :- ही योजना संपूर्णपणे संगणीकृत आहे. या योजनेमध्ये बँकेने रु.10.00 लाखापर्

झेनिथ धबधबा येथे घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केली तातडीची पाहणी पोलिस यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाने केल्या तातडीच्या उपाययोजना

  अलिबाग,जि.रायगड, दि.29 (जिमाका):- काल (दि.28सप्टेंबर) रोजी खोपोली नजीकच्या झेनिथ धबधबा या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज (दि. 29 सप्टेंबर 2021) रोजी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व खोपोली नगरपालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी संयुक्तपणे "झेनिथ धबधबा"   व आजूबाजूच्या परिसरास भेट देवून काल घडलेल्या दुर्घटनेच्या अनुषंगाने संयुक्त पाहणी केली.      त्यांनी झेनिथ धबधब्याकडे जाणाऱ्या नियमित व छुपे मार्ग आणि पायवाटांची पाहणी केली. त्यानुसार धबधब्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर बॅरिकेटिंग   करण्यात आले आहे. तसेच 02 पोलीस कर्मचारी व खोपोली नगरपालिकेचे 02 कर्मचारी यांना मुख्य मार्गावर नेमण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रांताधिकारी,कर्जत यांच्या मनाई आदेशाचा सूचना फलकही या ठिकाणी लावण्यात आलेला आहे.      जिल्ह्यात अतिवृष्टीबाबत देण्यात आलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, तसेच धबधबा, समुद्रकिनारे, गड किल्ले, धरण या क्षेत्रात पर्यटनासाठी जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी नागरिकांना केले आ

राज्य परिवहन बसेसमधून प्रवासाकरिता ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्टकार्ड नोंदणी करणे आवश्यक

    अलिबाग,जि.रायगड,दि.29 (जिमाका):- राज्य परिवहन महामंडळाकडून दि.01 जानेवारी 2022 रोजी पासून राज्य परिवहन बसेसमधून प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना स्मार्टकार्ड असणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्टकार्ड नोंदणी करून घेण्यात यावी. दि.31 डिसेंबर 2021 रोजी पर्यंतच आपल्या जवळ असलेली प्रचलित ओळखपत्र (आधारकार्ड ) ग्राह्य धरण्यात येवून प्रवास करण्यास मुभा देण्यात येईल.             दि.01 जानेवारी 2022 पासून हे प्रचलित ओळखपत्र (आधारकार्ड) राज्य परिवहन प्रवासाकरिता ग्राह्य धरण्यात येणार नाही.   दि.31 डिसेंबर 2021 रोजी पर्यंतची देण्यात येणारी मुदतवाढ ही अंतिम असून यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे राज्य परिवहन महामंडळ, पेण कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. ००००००

कर्जत तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 वैजनाथ करिता मौजे गौळवाडी येथील शासकीय जागा हस्तांतरित

    अलिबाग, जि.रायगड दि.29 (जिमाका):- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील ग्रामीण स्तरापर्यंतच्या विविध शासकीय यंत्रणा बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यापैकी पशुवैद्यकीय दवाखान्यांना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाहीदेखील प्रलंबित होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत तत्परतेने सुरू केली आहे.   त्याचबरोबर पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी असलेल्या जागांची योग्य निवड व पाहणी करून पशुवैद्यकीय दवाखाने कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही सुरू करण्याबाबतीतही त्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.   या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 वैजनाथ या इमारतीच्या बांधकामासाठी शासकीय जमिनीची मागणी होती, याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.     त्यानुसार मौजे गौळवाडी, ता.कर्जत, जि.रायगड येथील स.नं.120/0, क्षेत्र 0-92-0 हे.आर.या गुरचरण ग्रामपंचायत

मुरुड तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 वळके करिता मौजे सातिर्डे येथील शासकीय जागा हस्तांतरित

  अलिबाग, जि.रायगड दि.29 (जिमाका):- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील ग्रामीण स्तरापर्यंतच्या विविध शासकीय यंत्रणा बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यापैकी पशुवैद्यकीय दवाखान्यांना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाहीदेखील प्रलंबित होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत तत्परतेने सुरू केली आहे.             त्याचबरोबर पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी असलेल्या जागांची योग्य निवड व पाहणी करून पशुवैद्यकीय दवाखाने कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही सुरू करण्याबाबतीतही त्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.               या पार्श्वभूमीवर मुरुड तालुक्यातील येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 वळके या इमारतीच्या बांधकामासाठी शासकीय जमिनीची मागणी होती, याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.                त्यानुसार मौजे सातिर्डे, ता.मुरुड, जि.रायगड येथील गट.नं.141, एकूण क्षेत्र 0-

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 48.00 मि.मी. पावसाची झाली नोंद

      अलिबाग,जि.रायगड,दि.29 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 48.68 मि.मी इतक्या पावसाची नोंद झालीआहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3632.55 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग- 70.00 मि.मी., पेण- 64.00 मि.मी., मुरुड- 37.00 मि.मी., पनवेल- 58.60 मि.मी., उरण-31.00 मि.मी., कर्जत- 75.20 मि.मी., खालापूर- 88.00 मि.मी., माणगाव- 15.00 मि.मी., रोहा- 44.00 मि.मी., सुधागड-32.00 मि.मी., तळा-35.00 मि.मी., महाड- 17.00 मि.मी., पोलादपूर-22.00 मि.मी, म्हसळा- 17.00 मि.मी., श्रीवर्धन-38.00 मि.मी., माथेरान- 135.00 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 778.80 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 48.68 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 112.94 टक्के इतकी आहे. 00000000

नागरिकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे --जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

  अलिबाग,जि.रायगड,दि.28 (जिमाका) :- गणेशोत्सवानंतर रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अलिबाग, पनवेल , (ग्रामीण), पेण आणि कर्जत या तालुक्यांमधील पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांची संख्या काही प्रमाणात वाढीस लागल्याचे आरोग्य यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे.    या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी जनतेला आवाहन केले आहे की, नागरिकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता शासनाने कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, जास्त गर्दी करू नये, मास्क वापरावा, हात वारंवार स्वच्छ धुवावेत, ताप, खोकला, तीव्र डोकेदुखी, अंगदुखीसदृश्य कोणतीही लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, कोविड चाचणी करून घ्यावी, त्याचप्रमाणे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणही करून घ्यावे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा जनतेची काळजी करण्यासाठी पूर्णपणे सज्ज व सतर्क आहे, याची नोंद घ्यावी. 000000

जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार-2020-21, 2021-22 कार्यक्रम संपन्न होणार दि.1 ऑक्टोबर रोजी

  अलिबाग,जि.रायगड,दि.28 (जिमाका) :- जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार-2020-21,2021-22 साठी जिल्हा पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना दि.01 ऑक्टोबर 2021 रोजी कर्जत शेळके हॉल, नेरळ-किरवली रोड येथे गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, दि. 01 ऑक्टोबर 2021 रोजी दु.12.05 वा. नियोजित आहे. या कार्यक्रमाबाबत करोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा विचार करता संवर्गनिहाय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी वेळेचे नियोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम राज्यमंत्री, उदयोग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कु.आदिती सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते व रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष कु.योगिता पारधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. तरी रायगड जिल्हा परिषदेतील व पंचायत समितीतील सर्व सन्माननीय पदाधिकारी, सदस्य तसेच सर्व अधिकारी, शिक्षणतज्ञ, सर्व पुरस्कारमूर्ती प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना या कार्यक्रमास उपस्थित राह

आर्मी स्पोर्टस इन्स्टिटयूट बॉईज स्पोर्टस कंपनी पुणे यांच्याकरिता क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन

    अलिबाग,जि.रायगड,दि.28 (जिमाका) :- जिल्हयातील आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करणे आवश्यक आहे. याचबरोबर क्रीडा क्षेत्रात खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करण्यासाठी लहात वयात मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, आर्मी स्पोर्टस इन्स्टिटयूट व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने बॉईज स्पोर्टस कंपनी पुणे येथील प्रवेशाकरिता क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे:- जिल्हास्तरीय चाचण्या दि.04 ऑक्टोबर 2021 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली संगम, ता.अलिबाग येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.   वयोगट :- 8 ते 14 वर्षाखालील (फक्त मुले) (दि. 1.1.2022 रोजी वय 8 ते 14 वर्ष असणे आवश्यक राहील), खेळ- अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती, तलवारबाजी, वेटलिफ्टिंग, मुले- वयोगट 10 ते 14 वर्षे.   दिलेल्या मुदतीत कोणत्याही प्रकारची वाढ केली जाणार

खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रासाठी कुस्ती खेळाडूंची निवड व मार्गदर्शकाची नियुक्ती यासाठी सूचना जाहीर

    अलिबाग,जि.रायगड,दि.28 (जिमाका) :- जिल्हयातील कुस्ती मार्गदर्शकाच्या नियुक्तीसाठी दि.30 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 01.00 वा. जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली संगम, ता.अलिबाग येथे निवड चाचणी होणार आहे.   तसेच कुस्ती खेळाडूंच्या निवड चाचणी करिता बुधवार, दि.29 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10.00 वा.कै.भाऊसाहेब कुस्ती संकुल, खोपोली ता. खालापूर, या ठिकाणी कुस्ती खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राकरिता निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. कुस्ती खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राकरिता निवड चाचणीसाठी वयोमर्यादा 8 ते 12 वर्षे (मुले,मुली) असून खेळाडूंनी चाचणीला येताना संपूर्ण कुस्ती किट सोबत आणणे आवश्यक आहे. प्रशिक्षक नियुक्ती निवड चाचणीकरिता वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे असून यामध्ये अति उच्च कामगिरी / गुणवत्ता असल्यासच समितीच्या मान्यतेने 50 वर्ष पर्यंत उमेदवारांना संधी देण्यात येईल. ऑलिंपिक / एशियन गेम्स/ जागतिक अजिंक्यपद अधिकृत स्पर्धा सहभाग / पदक प्राप्त व प्रशिक्षण, जागतिक करंडक स्पर्धा / एशियन चॅम्पियनशिप / साऊथ एशियन स्पर्धा / संबधित खेळातील अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभाग / पदक प्राप्त खेळाडू प्रशि

जिल्ह्यात 01 ते 07 ऑक्टोबर या कालावधीत अन्न परवाना व नोंदणी विशेष मोहीम

      अलिबाग,जि.रायगड,दि.28 (जिमाका) :- अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार दि. 01 ते 07 ऑक्टोबर 2021 या कालावधीत संपूर्ण राज्यात अन्न परवाना व नोंदणी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने रायगड जिल्ह्यातही दि. 01 ते 07 ऑक्टोबर 2021   कालावधीत अन्न परवाना व नोंदणी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. दि.05 ऑगस्ट 2011 पासून अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 संपूर्ण राज्यामध्ये लागू झालेला असून त्याची अंमलबजावणी या प्रशानातर्फे यशस्वीपणे करण्यात येत आहे. सर्व जनतेस सकस, ताजे गुणवत्तापूर्ण व निर्भेळ अन्न पदार्थ उपलब्ध झाले पाहिजे, हा या कायदयाचा मुख्य उद्देश आहे. कोणत्याही प्रकारच्या अन्न पदार्थाचे उत्पादन/साठवणूक/वितरण/आयात/विक्री करण्यापूर्वी अन्न व्यावसायिकाने अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006, नियम व नियमन 2011 चे कलम 31 (1) व (2) सहवाचन कलम अन्न सुरक्षा व मानदे ( अन्न व्यवसाय परवाना व नोंदणी ) नियमन 2011 चे विनियम 2.1.2(1) नुसार अन्न परवाना/नोंदणी घेणे बंधनकारक आहे. कोणत्याही अन्न व्यावसायिकाने विनापरवाना/विनानोंदणी व्यवसाय केल्यास

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 5.00 मि.मी. पावसाची झाली नोंद

      अलिबाग,जि.रायगड,दि.28 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5.16 मि.मी इतक्या पावसाची नोंद झालीआहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3583.88 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग- 16.00 मि.मी., पेण- 0.00 मि.मी., मुरुड- 6.00 मि.मी., पनवेल- 0.00 मि.मी., उरण-0.00 मि.मी., कर्जत- 2.20 मि.मी., खालापूर- 7.00 मि.मी., माणगाव- 2.00 मि.मी., रोहा- 0.00 मि.मी., सुधागड-4.00 मि.मी., तळा-0.00 मि.मी., महाड- 1.00 मि.मी., पोलादपूर-3.00 मि.मी, म्हसळा- 10.00 मि.मी., श्रीवर्धन-23.00 मि.मी., माथेरान- 8.30 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 82.50 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 5.16 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 111.43 टक्के इतकी आहे. 00000000

ष्ट्रीय लोक अदालतीत सांमजस्याने प्रकरणे मिटविण्याच्या कामात महाराष्ट्रात अव्वल येण्याची जिल्ह्याची हॅट्रिक 34 हजार 562 प्रकरणे सामंजस्याने मिटवून संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्हा ठरला अव्वल

  रा   अलिबाग,जि.रायगड,दि.28 (जिमाका):- न्यायालयात वर्षानुवर्षे वाद करीत बसून वेळ, पैसा आणि ताकद खर्च करण्यापेक्षा दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेवून लोकन्यायालयात समेट घडवावा, असा प्रवाह भारतीय न्यायालयांच्या इतिहासात गेल्या दशकात प्रकर्षाने रूढ झालेला आहे. नुकत्याच (दि.25 सप्टेंबर 2021) रोजी अलिबाग येथे झालेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून 34 हजार 562 प्रकरणे सामंजस्याने मिटवून संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्हा अव्वल ठरला आहे. अशा प्रकारे राष्ट्रीय लोकअदालतीत सांमजस्याने प्रकरणे मिटविण्यात जिल्ह्याने महाराष्ट्रात अव्वल येण्याची हॅट्रिक साधली आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तसेच न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची प्रकरणे ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती विभा प्र.इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायग

माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वरसई व मैत्री बोध परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

    अलिबाग,जि.रायगड,दि.28 (जिमाका):- शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वरसई ता.पेण व मैत्री बोध परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी 115 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.   या कार्यक्रमास एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.शेरमकर, विस्तार अधिकारी श्रीमती वाघ, वरसई ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीमती निराताई वीर, उपसरपंच रुपेश जाधव, माजी सरपंच श्री.होजगे, शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष जयंत सुतक, पेण आदिवासी ठाकूर संघटनेचे अध्यक्ष जोमा दरवडा, वरसईचे ग्रामस्थ श्री.योगेश पाटील, श्री.सुभाष शिंदे, मैत्री बोध परिवाराचे सदस्य ऋग्वेद सावंत, शाळेचे मुख्याध्यापक श्री.जानकर, अधीक्षक किरण वारे,   शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते. 000000

राज्य उत्पादन शुल्क विभाग रायगड-ठाणे पथकाच्या संयुक्त कारवाईत रु.3 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

  अलिबाग,जि.रायगड,दि.28 (जिमाका):- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्य आयुक्त श्री.कांतीलाल उमाप यांच्या आदेशानुसार कोकण विभाग ठाणे चे विभागीय उपायुक्त सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे, ठाणे उपअधीक्षक श्री.चारुदत्त हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.25 सप्टेंबर 2021 रोजी रोहा तालुक्यातील कोपरी व कोपरी दापोली येथील खाडी किनारी व खाडीमधील बेटावर अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुरुड, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक अलिबाग, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क   अलिबाग यांचे   दुय्यम निरीक्षक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक   व जवान स्टाफसह यांनी छोट्या बोटी मधून जावून केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल 3 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.    या धाडीदरम्यान एकूण चार गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी (0 वारस) गुन्हे आहेत. तसेच नवसागर मिश्रित रसायन - 14000 लिटर हातभट्टी दारू , एकूण मुद्देमाल किंमत- रु.3 लाख 41 हजार सर्व नवसागर मिश्रीत रसायन जागीच नाश करण्यात आले आहे, अशी माहिती श्री.आनंद अं.पवार, निरीक्षक, राज्य उत्पादन

आजादी का अमृत महोत्सव” व “स्वच्छता ही सेवा” स्वच्छ भारत अभियानासाठी सायकल रॅली कार्यक्रम संपन्न

  “   अलिबाग,जि.रायगड,दि.28 (जिमाका):- इंफिनिटी फाउंडेशन पनवेल, महानगरपालिका, रायगड जिल्हा परिषद, आदई ग्रुप ग्रामपंचायत व नेहरू युवा केंद्र संघटन अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमानाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीचे उद्दिष्ट “ आजादी का अमृत महोत्सव ” व “ स्वच्छता ही सेवा ” स्वच्छ भारत अभियान हे होते.   या सायकल रॅलीमध्ये पनवेल क्षेत्रातील पाच सायकलिंग क्लब म्हणजे पनवेल सायकलिंग क्लब, पुश न पेडल, पेडल सिटी, के के सी सी व रनथॉन क्लबने सहभाग घेतला. या कार्यक्रमांमध्ये 100 सायकलींनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री.विधाते, पनवेल पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती मोहिते,   पनवेल महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, इंफिनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.आयुफ अकुला, उपाध्यक्ष मुगदा म्हात्रे, सरचिटणीस पवित्र शेरावत व आदी मान्यवर उपस्थित होते.   या कार्यक्रमाची सुरुवात पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयापासून होवून सांगता जिल्हा परिषद शाळा आदई या ठिकाणी सहभागी क

जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून सर्वांनी मिळून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देवू या --पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
                    अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका):- सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 करिता रु. 275.00 कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असून त्यापैकी रु. 89.90 कोटी निधी प्राप्त झाला आहे. वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार एकूण तरतूदीपैकी 30 टक्के निधी कोविड- 19 वरील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राखीव ठेवण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त निधीपैकी रु. 27.92 कोटीच्या कामांना मंजूरी देण्यात आली असून रु. 18.19 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. विकास आराखड्याचे नियोजन करताना जिल्ह्यात राबवावयाच्या विकासकामांसाठी राज्य व केंद्राकडून मिळणाऱ्या निधीला अधिकाधिक प्राधान्य दिले जाईल, जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून सर्वांनी मिळून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देवू या, असे प्रतिपादन   राज्याच्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी उपस्थित सदस्यांना दिली. येथील जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. या बै