Posts

Showing posts from October 22, 2023

जिल्ह्यातील 17 अमृत कलश दिल्लीकडे रवाना जिल्हाधिकारी डॉ.म्हसे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बास्टेवाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून निरोप

Image
    रायगड(जिमाका),दि.26:- स्वातंत् र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारतर्फे संपूर्ण देशात ‘माझी माती-माझा देश’ अभियान राबविण्यात येत आहे.दिल्ली येथे जिल्ह्यातील 17 अमृत कलश घेऊन जाणाऱ्या स्वयंसेवकांना जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा  देऊन निरोप देण्यात आला.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज जिल्ह्यातील 17 अमृत कलश समारंभ पूर्वक दिल्लीत पाठविण्यात आले याप्रसंगी दिल्ली येथे अमृत कलश घेऊन जाणाऱ्या स्वयंसेवकांना जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड,  यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, नगरपालिका प्रशासन अधिकारी श्याम पोशेट्टी, विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.    जिल्ह्यात ‘माझी माती-माझा देश’ अभियानांतर्गत गावा गावातील माती कलशामध्ये संकलित करण्यात आली. तालुकास्तरावर गावांमधून आलेल्या कलशातील माती एकत्र करण्यात येऊन ता

1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2024 पात्र नागरिकांनी नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदींची दुरुस्ती वा वगळणी करुन घ्यावी

  रायगड(जिमाका),दि.26:-भारत निवडणूक आयोग यांचे कडील दि. 29 मे 2023 रोजीचे पत्रान्वये राज्यामध्ये मतदार यादीचा दि.01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम - 2024 घोषित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमांर्तगत दि.27 ऑक्टोबर ते दि.09 डिसेंबर, 2023 या कालावधीमध्ये नागरिकांकडून नवीन मतदार नोंदणीचे फॉर्म न.नं. 6, मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्ती फार्म न.न.8 मध्ये वा वगळणीचे फॉर्म न.न.7 मध्ये अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. तरी 18 वर्षे पूर्ण झालेले पात्र भारतीय नागरिक त्यांच्या जवळच्या मतदार नोंदणी कार्यालय ( तहसिल कार्यालय) यांच्याशी संपर्क करुन नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदींची दुरुस्ती वा वगळणी करु शकतात किंवा  Voters.eci.gov.in  या संकेतस्थळावरुन तसेच Voter Helpline App द्वारे ऑनलाईन अर्ज करु शकतात.  अधिक माहितीसाठी 1950 या क्रमांकावर संपर्क करु शकता. नवीन मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र पुढीलप्रमाणे :- नवीन मतदार नोंदणी फॉर्म न.न.6 मध्ये अर्ज करणे. समोरच्या बाजूने संपूर्ण चेहरा दिसेल असा पासपोर्ट साईज रंगीत फोटो. वयाचा पुरावा- जन्

मतदार याद्यांतील संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर

    रायगड(जिमाका),दि.26:-   भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडील 25 सप्टेंबर 2023  च्या पत्रानुसार 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून ते पुढीलप्रमाणे आहे. एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे दि. 27 ऑक्टोबर, 2023 (शुक्रवार),दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि. 27 ऑक्टोबर, 2023 (शुक्रवार) ते दि.09 डिसेंबर, 2023 (शनिवार),विशेष मोहिमांचा कालावधी-दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी निश्चित केलेले दि.4 व 5 नोव्हेंबर 2023 व दि.25 व 26 नोव्हेंबर 2023, दावे व हरकती निकालात काढणे, दि.26 डिसेंबर, 2023 (मंगळवार) पर्यंत, मतदार यादीची शुध्दता तपासणी व अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे व डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई दि. 01 जानेवारी, 2024 (सोमवार) पर्यंत, मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे,दि.05 जानेवारी, 2024 (शुक्रवार). पुनरिक्षण उपक्रमानुसार दि.27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येत

रोहा धाटाव औद्योगिक क्षेत्रात रुग्णालयासाठी प्रयत्नशील --पालकमंत्री उदय सामंत पालकमंत्र्यांच्या हस्ते नवीन विश्रामगृहाचे भुमीपूजन

Image
    रायगड (जिमाका),दि.25:-  रोहा तालुक्यातील धाटाव परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र आहे. या औद्योगिक क्षेत्रात सुसज्ज असे रुग्णालय असणे काळजी गरज असून यासाठी केंद्र शासन स्तरावर प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने रोहा औद्योगिक क्षेत्रात नवीन विश्रामगृहाचे  भुमीपूजन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे,अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे-पाटील, रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसिलदार किशोर देशमुख, रोठ सरपंच नितीन वारंगे, धाटाव सरपंच सुवर्णा रटाटे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले की, धाटाव येथील औद्योगिक क्षेत्रात काम करणारा कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असून येथील कामगार वर्गाला आरोग्याच्या दृष्टीने सोयी-सुविधा मिळाव्यात, त्याचबरोबर कामगारांची सुरक्षा महत्वाची असल्याने  येथे रुग्णालय उभारणे ही काळाची गरज आहे.  रुग्णालय उभारणीसाठी आवश्यक असलेली जा

श्री धाविर महाराजांचा पालखी सोहळा! रायगड पोलिसांनी दिली सशस्त्र मानवंदना पालकमंत्री उदय सामंत आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

Image
   रायगड (जिमाका),दि.25 :- जिल्ह्याचे श्रध्दास्थान आणि रोहयाचे ग्रामदैवत श्री धाविर महाराजांच्या पालखी सोहळ्यास बुधवारी पहाटे मोठया उत्साहात सुरूवात झाली. उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी विधिवत पूजा केली. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खा.सुनिल तटकरे, आम.अनिकेत तटकरे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.  रायगड पोलिसांच्या वतीने पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर व पथकाने श्री धाविर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली.  भल्या पहाटे मंगलमय वातावरणात गोंधळ्यांच्या वाद्याने ग्रामदैवताची महाआरती संपन्न झाली. पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर महाराजांची पालखी पारंपारिक वाद्यांच्या गजरात मार्गस्थ झाली.  या सोहळ्यास लोकप्रतिनिधी, अधिकारी  आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 0000000

कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील पात्र पदवीधर मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन

    रायगड (जिमाका), दि.23:- पदवीधर मतदार संघाच्या अनुषंगाने 1 नोव्हेंबर 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत नॉव्हेंबर 2023 या कालावधीत पदवीधर मतदार नोंदणी सुरु आहे. तरी ज्या मतदारांनी दिनांक 1 जानेवारी 2020 पूर्वी पदवी प्राप्त केली आहे. ते मतदार पदवीधर मतदारसंघा करीता नाव नोंदविण्यास पात्र आहेत. पदवीधर मतदार नोंदणीऑनलाईनपद्धतीने संकेतस्थळ  https://ceoelection. maharashtra .  gov.in   यावर लिंकद्वारे  https://ceoelection. maharashtra.gov.in/Downloads/ DownloadForms/Form-18.pdf  नोंदणी अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जे मतदार पदवीधर मतदारसंघामध्ये मतदार नोंदणी करण्यास इच्छुक आहेत. त्यांनी नमुना नं. 18 अर्ज भरुन घ्यावे अथवा ऑनलाईन पद्धतीने नमुना नंबर 18 चा अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रासहीत तहसिलदार कार्यालय पनवेल येथे जमा करावेत.  नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे सदर कागदपत्रांवर राजपत्रिय अधिकारी / पब्लीक नोटरी साक्षांकन असणे आवश्यक आहे. पदवीधर मतदारसंघ नाव नोंदणी मोहीम कोंकण आणि मुंबई विभागासाठी नोंदणी करणारा मतदार हा 30 ऑक्टोबर 2020 पूर्वी पदवीधर झालेला असावा. त्यानंतर पदवीधर झाला अ