Posts

Showing posts from May 13, 2018

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'महाराष्ट्र वार्षिकी 2018' संदर्भग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध

Image
           अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19-   माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘महाराष्ट्र वार्षिकी 2018’ हा ज्ञान व माहितीचा खजिना असलेला संदर्भग्रंथ नवीन आकर्षक स्वरुपात वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. या संदर्भग्रंथात महाराष्ट्राची विविध क्षेत्रातील माहिती आकडेवारीसह देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा इतिहास, वन, नद्या, कृषी, क्रीडा, कला, साहित्य, पुरस्कार आदि घटकांचा यात समावेश करण्यात आला आहे. या वार्षिकीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शासनाच्या सर्व विभागांची कामकाज पध्दती, संरचना, महत्वाचे निर्णय, धोरणे, योजना, दूरध्वनी यांची एकत्रित माहिती अभ्यासकांना उपलब्ध होणार आहे. याशिवाय मंत्रिमंडळाचे निर्णय, महाराष्ट्र शासनाशी संबंधित गेल्या वर्षभरातील घडामोडींचा समावेशही यात केला आहे. भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, उपप्रधानमंत्री, केंद्राचे व महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ, आजवरचे विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती व उपसभापती, महाराष्ट्र विधिमंडळ सदस्य यांची यादी, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांकांची माहिती ही या वार्षिकीत समाविष्ट करण्यात आल्य

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19 -   राज्याचे   महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सा.उ.वगळून) मंत्री ना. चंद्रकांत पाटील हे रविवार दि. 20 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- रविवार दि.20 रोजी सायं.पाच वा. एमटीडीसी विश्रामगृह,माथेरान, जि. रायगड येथे आगमन, राखीव व मुक्काम, सोमवार दि.21 रोजी एमटीडीसी विश्रामगृह, माथेरान, जि. रायगड येथे राखीव व मुक्काम.   मंगळवार दि.22 रोजी सकाळी सात वाजता माथेरान, जि. रायगड येथून वाहनाने मुंबईकडे प्रयाण. ०००००

शस्त्र बाळगण्यास मनाई

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18 - रायगड जिल्ह्यातील कार्यक्षेत्राच्या हद्दीत (नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र वगळून) पोलादपूर, उरण, श्रीवर्धन , कर्जत, खालापूर, महाड,अलिबाग, सुधागड, मुरुड, म्हसळा, पेण, रोहा, पनवेल,तळा,माणगांव या तालुक्यांमध्ये   महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदे असलेल्या ग्रामपंचायतींसाठी पोट निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.   निवडणूका शांततेत, निर्भय व नि:पक्षपाती वातावरणात पार पडण्यासाठी   सोमवार दि.28 पर्यंत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात   शस्त्र परवाना धारकांना त्यांची शस्त्रे ग्रामपंचायत क्षेत्रात आणण्यास तसेच जवळ बाळगण्यास मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. हा आदेश सेवेवरील पोलीस अधिकारी,कर्मचारी,बँकेचे सुरक्षा अधिकारी,कर्मचारी आणि ज्यांना शासकीय कर्तव्याचा भाग म्हणून शस्त्राचा वापर अनुज्ञेय आहे,अशा व्यक्तींना लागू होणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 188 अन्वये कार्यवाही केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे. ०

शोध बचाव पथकांना प्रशिक्षण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18 -शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती निर्माण   झालेल्या आपत्कालीन स्थितीत बचाव व मदत कार्य हाताळण्यासाठी मान्सून -2018 पूर्वतयारी अंतर्गत जिल्हा व तालुकास्तरीय   शोध व बचाव पथके स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकूण 486 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यांतर्गत खालापूर व कर्जत येथे तयार करण्यात आलेल्या पथकांना शुक्रवार दि.19 रोजी   खालापुर येथे सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत प्रशिक्षित केले जाणार आहे. आतापर्यंत पनवेल, उरण, अलिबाग, मुरुड, पेण, रोहा, सुधागड, माणगाव, तळा, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन याठिकाणी प्रशिक्षणे आटोपली आहेत. या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षक एम.के.म्हात्रे सहायक उपनियंत्रक नागरी संरक्षण दल, उरण व सहाय्यक उपनियंत्रक नागरी संरक्षण दल भोईर यांनी प्रशिक्षण दिले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी दिली आहे. ०००००

केंद्रीय मंत्री के.जे.अल्फॉस यांचा जिल्हादौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18 - केंद्रीय पर्यटन,इलेक्ट्रॉनिक व आयटी मंत्री के.जे.अल्फॉस हे शनिवार दि.19 रोजी   जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- शनिवार दि.19 रोजी सकाळी साडे आठ वा. मांडवा जेट्टी येथे बोटीने आगमन.   8 वा. 40 मि. मांडवा जेट्टी येथून रायगड किल्ला   येथे भेट.   दुपारी तीन वा.रायगड किल्ला येथून जसदनवाला बंगल्याकडे प्रयाण. सायं.पाच वा.जसदनवाला बंगला येथे आगमन. सायंकाळी साडे पाच वा.जसदनवाला बंगला येथून   गेट वे ऑफ इंडिया जेट्टीकडे   प्रयाण. ०००००

किटकनाशक हाताळणीः'आत्मा'तर्फे शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18 - शासनाचा कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विज्ञान केंद्र, रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि.17) 'किटकनाशकांची सुरक्षित हाताळणी व वापर' याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी   कार्यशाळा व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्र, रोहाचे शास्त्रज्ञ डॉ. जिवन आरेकर यांनी किटकनाशक, बुरशीनाशक यांचे प्रकार, त्यांचा सुरक्षित हाताळणी व वापर कसा करावा याबाबत सखोल मार्गदर्शन केले. आत्माचे प्रकल्प संचालक मंगेश डावरे यांनी किटकनाशकांचा कमीत कमी वापर करुन पिकांचे संरक्षण जैविक पध्दतीने करुन सेंद्रीय शेती करणेबाबत र्मादर्शन केले. तसेच आरोग्य अधिकारी डॉ. ससाणे यांनी किटकनाशक वापरण्याच्या पध्दती, किटकनाशकांचा शरीरावर होणारा परिणाम व विषबाधा झाल्यानंतर करावयाच्या प्राथमिक उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात शेतकरी मित्र संतोष दिवकर यांनी फवारणी करतांना वापरावयाचे किटचे प्रात्यक्षिक दाखविले. या कार्यक्रमास आत्माचे प्रकल्प संचालक मंगेश डावरे, प्रकल्प उपसंचालक डी. एस. चव्हाण,

वाहन योग्यता प्रमाणपत्र तपासणी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17-   वाहनधारकांनी आपल्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्राची वैधता संपण्याआधी किमान 15 दिवस आधी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण यांच्याशी संपर्क साधून आपल्या वाहनाची सर्व वैध कागदपत्रे सादर करुन ती रितसर योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी अपॉईटमेंट घेऊन वाहन   तपासणी साठी मौजे जिते, ता.पेण, जि.रायगड येथे हजर करावे. अन्यथा मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण, जि.रायगड यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. 00000

मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाकरीता भाडेतत्वावर इमारत पाहिजे

  अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17-   मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाची शासकीय इमारत 1986 पासून कार्यान्वीत आहे. या ठिकाणी 80 विद्यार्थींनी वास्तव्य करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग यांच्या अहवालानुसार इमारत राहण्यास योग्य नसल्यामुळे मुलींच्या वसतिगृहाकरीता पर्यायी व्यवस्था म्हणून भाडेतत्तवावर 6000 चौ.फुट क्षेत्रफळाची इमारतीची आवश्यकता असल्याचे गृहपाल मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह अलिबाग यांनी कळविले आहे. यासंदर्भात गृहपाल मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह अलिबाग यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 0000000

जवान प्रथमेश कदम यांचे पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17-   भारतीय सैन्य दलात सेवा बजावित असताना शहीद झालेल्या शेवते ता. महाड या गावातील लष्करी जवान प्रथमेश दिलीप कदम यांच्या पार्थिवावर शेवते येथील वैकुंठ भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी साश्रूनयनांनी 'प्रथमेश कदम अमर रहे' अशा घोषणांनी या शूर सुपुत्राला अखेरचा निरोप दिला. शेवते ता. महाड या सैनिकी परंपरा असलेल्या गावच्या कदम कुटुंबातील प्रथमेश कदम हे मध्यप्रदेशातील भोपाळ येथील थ्री-ईएमई युनिट मध्ये कार्यरत होते. शनिवार दि. 12 मे रोजी भोपाळ येथे रेल्वेमार्गावर सैनिक दलामार्फत बचाव कार्य करतांना अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले होते. दिल्लीतील लष्करी रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवार दि.15 मे रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव लष्करी विमानाने मुंबई येथे गुरुवारी पहाटे आणण्यात आले. तेथून लष्कराच्या वाहनातून सकाळी शेवते यागावी त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. शेवते येथील वैकुंठ स्मशानभूमीत शहीद प्रथमेश कदम यांच्या पार्थिवावर भारतीय सैन्य दलातर्फे थ्री ईएमई सेंटर भोपाळ युनिटचे सुभेदार मेजर आर.बी.तांबे,

उद्योग मंत्री ना.सुभाष देसाई यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 16- राज्याचे उद्योग, खनिकर्म मंत्री ना. सुभाष देसाई   हे   जिल्हा दौऱ्यावर आलेले असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि.17 रोजी माणगांव जि.रायगड येथून मोटारने मुंबईकडे प्रयाण . ०००००

बेळगाव येथे माजी सैनिक पाल्यांसाठी सैन्यभरती मेळावा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16 -   भारतीय सैन्य् दलात भरती होण्याची सुवर्णसंधी दि मराठा लाईट इनफ्रेन्टी सेन्टर, बेळगांव (कर्नाटक) येथे सोमवार दि.28 मे ते गुरुवार दि.31 मे   दरम्यान युनिट हेडक्वार्टर कोट्यामधून आणि या पदांसाठी सैन्यभरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीसाठी माजी व सेवारत सैनिकांची तसेच   ज्या   व्यक्तिंची मुले आणि सख्खे भाऊ, युद्ध विधवा व विधवा यांची मुले पात्र असणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मेजर प्रांजल पी.जाधव (निवृत्त),जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे. ०००००

युवा प्रशिक्षण शिबीर 24 पासून मुंबईत

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16 - देशातील युवकांना सक्षम बनविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची   ओळख व्हावी म्हणून   राज्यस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या युवा प्रशिक्षण केंद्रात दि.24 मे पासून 10 दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या विनामूल्य प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील युवकांनी दि.17 रोजी जिल्हा क्रीडा संकूल नेहुली संगम, अलिबाग येथे   क्रीडा अधिकारी विशाल बोडके 9890919297 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे. ०००००

दुर्बल घटकांना शाळांमध्ये राखीव प्रवेश सोडत पूर्णः आजपासून प्रवेश सुरु

अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.15 - बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (सी) नुसार आर्थिक दुर्बल व सामाजिक वंचित घटकातील बालकांना खाजगी कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्य शाळांमध्ये 25 टक्के राखीव प्रवेश देण्यासंदर्भात आज   दुसरी सोडत पार पडली. यात   इ. 1 ली साठी 160 शाळांमध्ये 2689 जागा, पूर्व प्राथमिक 06 शाळांमध्ये 29 जागा, शिशु वर्ग 14 शाळांमध्ये 216 जागेकरीता सोडत घेण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांची दुसऱ्या सोडतीत निवड झाली असेल त्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईलवर मेसेज प्राप्त होईल. त्या पालकांनी दि.16 ते 24 या कालावधीत संबंधित शाळेत जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. संबंधित शाळांना सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत कार्यालय सुरु ठेवण्याचे आदेश शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. संबंधित पालकांना वरील प्रक्रियेमध्ये काही अडचण उद्भवल्यास तालुका स्तरावर गट शिक्षणाधिकारी कार्यालयात मदत केंद्र स्थापन केले आहे. सदर केंद्रावर आपल्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. या सोडतीसाठी जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक), उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक), व

जिल्ह्यात 103 दरडप्रवण गावे; जनजागृती मोहिमेस प्रारंभ रचनात्मक, अरचनात्मक उपयायोजनांच्या अंमलबजावणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 - जिल्ह्यात 103 गावे दरड प्रवण असल्याबाबत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग यांनी दिलेला अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला असून येत्या पावसाळ्याच्या आत या गावांमध्ये जनजागृती मोहिम राबविण्यासाठी गावातील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, मुख्याध्यापक, , शिक्षक आदींचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. तसेच भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने शिफारस केल्यानुसार दरडप्रवण क्षेत्रात रचनात्मक, अरचनात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. जुलै 2005 मध्ये दरड कोसळून झालेल्या आपत्तीच्या अनुभवावरुन सदर सर्वेक्षण भारतीय भुवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने केले आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे. धोक्याच्या पातळीनुसार जिल्ह्यातील 9 गावे ही वर्ग 1 ( अतिधोकेदायक) , 11 गावे वर्ग 2 मध्ये तर उर्वरित 83 गावे ही वर्ग 3 या श्रेणीत समाविष्ट करण्यात आली आहेत.   ही गावे तालुकानिहाय या प्रमाणे आहेत. त्यात महाड तालुक्यात 49, पोलादपुर तालुक्यात 15, रोहा तालुका 13, म्हसळा-6, माणगाव 5, सुधागड, खाल

मतदार यादी पुनःरीक्षण कार्यक्रम रंगीत फोटोसह होणार नावनोंदणी आणि मिळणार स्मार्ट कार्ड

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 - आगामी सन 2019 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2019 या अर्हतादिनांकानुसार मतदार याद्या पुनःरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. या कार्यक्रमाअंतर्गत आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांना आपले रंगित छायाचित्र द्यावे, नवीन मतदारांनी , मतदार यादीत नावे नसलेल्या मतदारांनी आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी केले. नवीन मतदार नोंदणी झालेल्या मतदारांना स्मार्ट कार्ड दिले जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.   या पत्रकार परीषदेस उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रतिमा पुदलवाड या उपस्थित होत्या. यावेळी पुनःरीक्षण कार्यक्रम सांगण्यात आला. तो याप्रमाणे-   15 मे ते 20 जून या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरोघरी भेट मोहिम राबवतील. 21 जून ते 31 जुलै मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व इमारत पाहणी, 1 ते 31 ऑगस्ट   पुरवणीसह प्रारुप मतदार यादी तयार करणे,  

सुदृढ-सक्षम भावी पिढीसाठी पोषण आहार स्थिती सुधारणा कार्यक्रम रायगड जिल्ह्यात राबविणार पथदर्शी प्रकल्प- केंद्रीय नीती आयोगाचे सदस्य डॉ. राजू भंडारी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 - देशाची भावी पिढी सक्षम, सुदृढ आणि तंदुरुस्त घडवायची असेल तर माता, गरोदर माता, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषण आहार स्थिती सुधारणा कार्यक्रम राबविणे आवश्यक असून हा कार्यक्रम रायगड जिल्ह्यातील ज्या 22 ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे, तेथे प्रायोगिक तत्त्वावर राबवून संपुर्ण जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल, असे केंद्रीय नीती आयोगाचे सदस्य डॉ. राजू भंडारी यांनी आज येथे सांगितले. जिल्ह्यातील आहार पोषण स्थितीचे अवलोकन करुन त्याआधारे आरोग्य निर्देशांक निश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख यंत्रणांची आज आढावा बैठक झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, 'अरमान' या सामाजिक संस्थेच्या डॉ. अपर्णा हेगडे,जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा उपनिबंधक पी.एम खोडका, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके, प्रकल्प संचालक आत्मा मंगेश डावरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई,   जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अ

सामाजिक न्याय विभागातर्फे जावळी शासकीय निवासी शाळेत मोफत प्रवेश

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21:- रायगड जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्याकरीता जावळी ता.माणगाव येथे सन 2018-19 पासून शासकीय ‍ निवासी शाळेची   इयत्ता 6 वी ते 8 वी   च्या विद्यार्थ्यांकरिता प्रवेशप्रक्रिया दि. 1 एप्रिलपासून सुरु करण्यात आली असून मोफत प्रवेश दिला जात आहे. जावळी माणगाव येथील शासकीय निवासी शाळेमध्ये प्रवेशिताकरीता आरक्षण पुढील प्रमाणे   आहे. अनुसूचित जाती -80%, अनुसूचित जमाती -10%, अपंग प्रवर्ग -3%,वि मुक्त जाती,भटक्या जमाती- 5%, विशेष मागास प्रवर्ग -2% शासकीय निवासी शाळेची वैशिष्ट्ये- शाळा विभाग व निवासाकरता स्वंतत्र इमारती. शासनामार्फत मोफत सोई पुढीलप्रमाणे- राहण्याची, जेवणाची, गणवेश, शैक्षणिक साहित्य्,निवासी साहित्य्,सुसज्ज् ग्रंथालय,प्रयोगशाळा व संगणक कक्ष, भव्य् खेळाचे मैदान व साहित्य् प्रवेशासाठी अर्ज विहीत नमुन्यात भरुन खालील कागदपत्रासह सादर करावा. विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला नसल्यास वडिलांचा,पालकांचा उत्पन्नाचा दाखला,रहिवासी दाखला (सरपंच,पोलीसपाटील), विद्यार्थ्यांच्या आधीच्या वर्षाची मार्कलिस्ट्,पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्ड, अपंग असल्य

पनवेल व पाली-सुधागड येथे मुलींसाठी मोफत वसतीगृह सुविधा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14 :- सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थींनींकरीता अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय वसतीगृह, पनवेल-सेक्टर-10,प्लॉट नं.21,ग्रीन पार्क सोसायटी समोर, पनवेल तसेच पाली सुधागड ,मधली आळी,राम मंदीर रोड,तळ्याच्या शेजारी, पाली सुधागड या शासकीय वसतीगृहात ऑफलाईन प्रवेशाकरिता वसतिगृहात प्रवेश अर्ज विनामूल्य उपलब्ध करुन देणेत आले आहेत.   वसतिगृहात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींनी वसतिगृहात येऊन प्रवेश अर्ज घेवून नाव नोंदणी करावी व   भरलेले प्रवेश अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह वसतिगृहात विहीत वेळेत जमा करावे. वसतीगृहात निवास व भोजन व्यवस्था विनामूल्य आहे. तसेच अभ्यासाकरीता लागणारी वह्या,पुस्तके,शैक्षणिक व लेखन साहित्य् विनामूल्य् पुरविले जाते. भत्ता दिला जातो. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून दरमहा रु.सहाशे निर्वाहभत्ता दिला जातो. शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थिनींना गणवेशाचे दोन संच, रेनकोट, छत्री भत्ता दिला जातो. या व्यतिरिक्त संगणक, ग्रंथालय सुविधा,क्रीडासाहित्य, मनोरंजन इ. अनेक सुविधा उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी अटी            

अलिबाग व महाड येथे सामाजिक न्याय विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह सुविधा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14 :- सामाजिक न्याय विभागाअंतर्गत अनुसूचित जाती मुलांसाठी मोफत वसतीगृह सुविधा शासकीय वसतीगृह,दिव्या अपार्टमेंट, आरसीएफ गेट समोर वेश्वी, अलिबाग, जि. रायगड येथे उपलब्ध आहे. तर महाड येथे    तालुका पोलीस स्टेशनजवळ, नवेनगर महाड जि. रायगड येथे कार्यरत आहे.   या शासकीय वसतीगृहात इयत्ता आठवीपासून   गरीब,   हुशार,   होतकरु, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना (अनु.जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग,आर्थिकदृष्ट्या मागास, अनाथ व अपंग ) गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. त्यासाठी संबंधित इच्छुकांनी संपर्क साधावा. असे आवाहन वसतीगृहाचे गृहपाल यांनी केले आहे. वसतीगृहात विद्यार्थ्यांना निवास व भोजन व्यवस्था विनामूल्य आहे.   तसेच अभ्यासाकरीता लागणारी वह्या,पुस्तके,शैक्षणिक व लेखन साहित्य विनामूल्य पुरविले जाते. भत्ता दिला जातो. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून दरमहा रु.सहाशे निर्वाहभत्ता दिला जातो. शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणवेशाचे दोन संचाकरिता गणवेश, रेनकोट, छत्री भत्ता दिला जातो. या व्यतिरिक्त संगणक, ग्रंथालय स

आपत्ती प्रसंगी प्रतिसादास सर्वोच्च्च प्राधान्य द्या - निवासी उपजिल्हाधिकारी पाणबुडे

Image
  अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14:-   कोणतीही आपत्ती ही सांगून येत नाही हे जरी खरे असले तरी आपत्ती घडल्यानंतर शासकीय यंत्रणांनी आपत्ती निवारण कक्षातून येणाऱ्या माहितीला प्रतिसाद देण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सून पूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित करण्याट आली. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, रोहा उपविभागीय अधिकारी रविंद्र बोंबले,   प्रादेशिक   बंदर अधिकारी कॅप्टन सुरज नाईक, नागरी संरक्षण दलाच्या उपनियंत्रक राजेश्वरी गेरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण उर्मिला पवार तसेच सर्व विभाग प्रमुख, सर्व नगर्पालिकांचे मुख्याधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा सादर केला.   या आराखड्यानुसार,   जिल्ह्यात अतिवृष्टी, पूरस्थिती आणि दरड कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तींना वारंवार सामोरे