बेळगाव येथे माजी सैनिक पाल्यांसाठी सैन्यभरती मेळावा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16-  भारतीय सैन्य् दलात भरती होण्याची सुवर्णसंधी दि मराठा लाईट इनफ्रेन्टी सेन्टर, बेळगांव (कर्नाटक) येथे सोमवार दि.28 मे ते गुरुवार दि.31 मे  दरम्यान युनिट हेडक्वार्टर कोट्यामधून आणि या पदांसाठी सैन्यभरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीसाठी माजी व सेवारत सैनिकांची तसेच  ज्या  व्यक्तिंची मुले आणि सख्खे भाऊ, युद्ध विधवा व विधवा यांची मुले पात्र असणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मेजर प्रांजल पी.जाधव (निवृत्त),जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक