Posts

Showing posts from January 14, 2018

बोगस डॉक्टर्सचा शोध घेऊन कारवाई करा- जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी

Image
          अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21- जिल्ह्यातील बोगस पदव्यांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टर्सना शोधून त्यांच्यावर कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी येथे शनिवारी (दि.२०) दिले. जिल्ह्यातील आय.एम.ए., आर.एम.ए., आयुर्वेदिक वैद्यकीय व्यावसायिक संघटना, होमिओपथीक वैद्यकीय संघटनाकडून बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची माहिती घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी यंत्रणांना दिल्या.                यासंदर्भात   जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी   डॉ.सचिन देसाई,अति.शल्यचिकीत्सकडॉ.फुटाणे उपस्थित होते.             यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी म्हणाले की, तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, नगरपालिकास्तरावर मुख्याधिकारी व पनवेल महानगरपालिका आयुक्त यांच्याकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची माहिती मागविण्यात यावी.   तसेच आय.एम.ए., आर.एम.ए., आयुर्वेदिक वैद्यकीय व्यावसायिक संघटना, होमिओपथीक वैद्य

अनधिकृत वाळु उत्खननाविरोधात कडक कारवाई - जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20- जिल्ह्यात वाळूचे अनधिकृत उत्खनन रोखून वाळूमाफियांना पायबंद बसावा यासाठी महसूल प्रशासन कडक कारवाई करीत आहे. त्यासाठी मेरिटाईम बोर्ड, पोलीस, परिवहन विभाग आणि वन विभाग हे महसूल विभागासोबत या कारवाईत सहभागी होतील, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी आज येथे दिले. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी भारत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उप वनसंरक्षक अलिबाग मनिष कुमार, प्रांत, तहसिलदार, पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्हा प्रशासनाने आता पर्यंत 13 कोटींचा वाळू लिलाव केला आहे. उर्वरित वाळूचा लिलाव करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये अनाधिकृत वाळू उत्खनन होणार नाही याकरीता जिल्हा प्रशासन दक्षता घेत आहे. अनाधिकृत वाळू उत्खनन करण्याऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. पकडलेले सक्शन पंप व बोटी नष्ट करण्यात येतील

सहकारमंत्री ना.सुभाष देशमुख यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20- सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना.सुभाष देशमुख हे मंगळवार दि. 23 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. मंगळवार दि. 23 रोजी स्पीड बोटीने सकाळी पाऊणे दहा वाजता मांडवा जेट्टी येथे आगमन. सकाळी नऊ वा. पंचावन्न मि. नी  शासकीय वाहनाने अलिबागकडे प्रयाण. सकाळी पावणे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, रायगडकडे येथे आगमन. सकाळी अकरा ते एक वाजता सहकार व पणन विभाग आढावा बैठक. स्थळ :-जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग. दुपारी एक ते दीड पेण वाजता अर्बन सहकारी बँकेची बैठक. स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड. दुपारी दीड ते अडीच वाजता राखीव. दुपारी अडीच ते साडे तीन वाजता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बैठक. स्थळ:- रायगड जिल्हा मध्यवर्ती सह. बँक रायगड. दुपारी साडे तीन ते साडे चार वाजता भा.ज.पा.जिल्हा कार्यालय भेट. दुपारी साडे चार वाजता अलिबाग येथून शासकीय वाहनाने मांडवा जेट्टीकडे प्रयाण. सायं. सव्वा पाच वाजता आगमन. सांय. साडे पाच वाजता स्पीड बोटीने गेट वे ऑफ इंडियाकडे प्रयाण. ०००००

जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक : विहित मुदतीत निधी खर्च करा-जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19- जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उप वनसंरक्षक मनिष कुमार, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड विश्वनाथ सातपुते, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग आर.एस.मोरे, व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र श्रीम.देवराज तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांचा खर्चाचा आढावा घेतला. विहित मुदतीत जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्च झाला पाहिजे अशा सूचना संबंधित विभागांना दिल्या. ज्या विभागाच्या तांत्रिक व प्रशासकीय मंजूरी प्रलंबित असतील त्यांनी पाठपुरवाठा करुन तात्काळ तांत्रिक व प्रशासकीय मंजूऱ्या मिळवाव्यात. जिल्हा नियोजन समितीचा निधी समर्पित होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश डॉ.सुर्यवंशी यांनी यावेळी दिले. 000000

रायगड जिल्हा महसूल प्रशासनाकडून करदात्यांना आवाहन 31 मार्च, पर्यंत खातेदारांनी कराचा भरणा करावा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18:- प्रशासनाच्या तसेच जमीनधारकांच्या वेळेची व श्रमाची बचत होऊन व्यवसाय सुलभता आणण्याच्या उद्देशाने शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द करण्यात आलेल्या आध्यादेशाद्वारे महाराष्ट्र जमिन महसूल संहिता 1966 मध्ये 42 ब व 42 क ही दोन नवीन कलमे समाविष्ठ करण्यात आली आहेत. कलम 42 ब नुसार शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यांत आलेल्या अंतिम विकास योजनेमध्ये दर्शविलेल्या वापर विभागानुसार त्या अंतर्गत जमिनीच्या अकृषिक वापराकरीता मानीव रुपांतरणाबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि अशा विकास योजनेनुसार अनुज्ञेय असलेल्या वापरासाठी अशा जमिनीच्या वापराकरीता कलम 42 व कलम 44 अन्वये कोणतीही स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता असणार नाही अशी तरतूद करण्यात आली आहे. अधिनियमाच्या अनुषंगाने शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतिम विकास योजनेमध्ये जमीन वापराबाबत जो वापर विभाग दर्शविण्यात आलेला आहे. त्या-त्या वापरास संबंधित जमिनीचे अकृषिक वापरासाठी महाराष्ट्र जमिन महसूल संहिता 1966 मधील कलम 42 ब अन्वये मानीव रुपांतरण होण्याच्या दृष्टीने रुपांतरण कर, आकृषिक आकारणी आणि लागू असेल तेथे नजर

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना अर्ज करण्यास शनिवारपर्यंत मुदत वाढ

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18:- देशातील  शैक्षणिक संस्थामध्ये 2017-18 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळावा, यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत शनिवार दि.20 पर्यंत वाढवण्यात आली आहे. लाभाचे स्वरुप तसेच अटी व शर्ती:- शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेले पूर्ण शैक्षणिक शुल्क,परिक्षा शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक शुल्क इत्यादी देण्यात येईल. महाराष्ट्र राज्यातील अनूसूचित जाती, नवबौद प्रवर्गातील महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. शैक्षणिक संस्थेतील वसतिगृह व भोजन शुल्क याचा त्यांच्या अकारणीप्रमाणे खर्च देण्यात येईल-कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.सहा लाखापेक्षा कमी असावे. शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहात जागे अभावी प्रवेश न मिळाल्यास सदर विद्यार्थ्यांना संस्थेने आकारणी केलेले वसतिगृह व भोजन शुल्क देण्यात येईल- पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा 25 वर्षे व पदव्युत्तर पदवी, पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे इतकी असेल. वसतीगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत

सैनिकी वसतिगृहात अधिक्षक पदावर तात्पुरत्या स्वरुपात पदभरती माजी सैनिकांना आवाहन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 18:- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय , रायगड  कार्यालयाच्या अखत्यारित सैनिकी मुलांचे वसतिगृह महाड येथे  वसतिगृह अधिक्षक या पदावर  रु . 12 हजार 872  इतक्या एकत्रित मासिक मानधनावर निव्वल तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्यात येणार आहे .  यासाठी सैन्यातून  नायब सुबेदार व पुढील हुद्दयावरुन निवृत्त झालेले माजी सैनिक व त्यासाठी शैक्षणिक अर्हता एस . एस . सी . पास असलेल्यांनी आपल्या बायोडाटयासह अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय , रायगड अलिबाग येथे स्वहस्ते किंवा कार्यालयाची ई - मेल आयडी www.raigad@mahasainik.com   वर तात्काळ सादर करावेत. असे आवाहन मेजर प्रांजल प्र . जाधव ( निवृत्त ), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी , रायगड - अलिबाग यांनी केले आहे . 00000

धरमतर खाडीजवळ अनधिकृत रेती उत्खनन, वाहतुकीवर कारवाई

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 18-  धरमतर ता. अलिबाग येथील खाडीतून अनधिकृत वाळू उत्खनन, साठा व वाहतुक केल्याप्रकरणी अलिबाग तहसिल कार्यालयाने कारवाई करुन  सव्वा दोन लक्ष रुपयांचा महसूल  शासन जमा केला आहे. यासंदर्भात संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यांना कळविण्यात आले आहे.  याबाबत तहसिलदार अलिबाग यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, पोर्ट इन्स्पेक्टर  यांच्या सहकार्याने  खाडी पात्रात रेती उत्खनन करणाऱ्या बोटी व सक्शन पंपावर कारवाई करण्यात आली.  याठिकाणी जमा रेतीसाठा जप्त करुन लिलाव करण्यात आला व प्राप्त 2 लाख 25 हजार रुपये शासन जमा करण्यात आले. कारवाई प्रसंगी सापडलेले बेवारस दोन सक्शन पंप व दोन बोटी  काढता येणे शक्य नसल्याने  छिद्रे पाडून बुडवण्यात आल्या. तसेच वाळी साठा करण्यासाठी तयार करण्यात आलेले कुंडे नष्ट करण्यात आले आहेत. यासंदर्भात वडखळ पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला असून  रेती वाहतुकीसाठी वापरला जाणारे वाहन व वाहन चालक- मालकाविरुद्ध कारवाई करण्याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांना कळविण्यात आले आहे. ०००००

जिल्ह्यातील इंधन पंपांवर वेगनियंत्रक पट्ट्या बसवाव्या-जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 18- रायगड जिल्ह्यातील सर्व इंधन पंपांवर (पेट्रोल व डिजेल) वाहनांना आत व बाहेर येण्या जाण्याच्या मार्गावर वेगनियंत्रक पट्ट्या ( Rumbler Strips) बसवाव्या, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी  दिले आहेत. जिल्ह्यातील पंप मालकांनी येत्या महिनाभरात  या पट्ट्या बसवावयाच्या आहेत. यासंदर्भात संबंधित तहसिलदारांनी स्थळ निरिक्षण अहवाल सादर करावा, असे निर्देशही डॉ. सुर्यवंशी यांनी  दिले आहेत.  जिल्ह्यातील सर्व राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, इतर जिल्हा मार्गांवर असणारे इंधन पंपांवर घडलेल्या अपघातांच्या घटना घडल्याचे निदर्शनास आल्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.  अनेकदा इंधन भरून आल्यावर वेगाने बाहेर जातांना रस्त्यावरील वाहनांशी अपघात होतात. त्यासाठी या पंपांच्या आत व बाहेर जाण्याच्या मार्गावर वेगनियंत्रक पटट्या बसविण्यात याव्या, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.  याबद्दल सर्व तहसिलदारांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील पंप मालकांची बैठक घेऊन  त्यांना या बाबीचे महत्त्व पटवून द्यावे व  पंपधारकांनी या पट्ट्या बसवाव्यात . यामुळे पेट्रोल डिजेल

प्लास्टिक बंदी योजना कोकण विभागीय बैठक : प्लास्टिक बंदीसाठी व्यापक जनजागृतीवर भर- ना. रामदास कदम

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 18- प्लास्टिक बंदीसाठी कायदा प्रस्तावित आहे.त्याद्वारे प्लास्टिक बंदी होण्याआधी जनजागृतीवर भर द्यावा, लोकांचे प्रबोधन   करून प्लास्टिक बंदी व्हावी, यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावे,असे निर्देश राज्याचे पर्यावरण मंत्री ना.रामदास कदम यांनी आज येथे दिले. प्लास्टिक बंदी राज्यात येत्या गुढीपाडव्यापासून प्रस्तावित आहे.त्या अनुषंगाने कोकण विभागीय बैठक आज ना.रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली येथील हॉटेल मॅपल आयव्हीवाय मधील सभागृहात पार पडली. याबैठकीस  महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन, प्रभारी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विवेक होमणकर, ठाणे येथील निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कूटे   तसेच विभागातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांचे अधिकारी उपस्थित होते. ना. कदम म्हणाले की, राज्यात प्लास्टिक बंदी करण्यासाठी

किल्ले रायगड प्लास्टिक मुक्ती पॅटर्न संपुर्ण राज्यात राबविणार- ना. रामदास कदम

Image
समुद्र किनारा स्वच्छतेबद्दल पर्यावरणमंत्र्यांनी केले अलिबागकरांचे कौतूक डम्पिंग ग्राऊंडच्या उपल ब्धतेसाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 18- ' संपुर्ण राज्यात अलिबागच्या समुद्र किनाऱ्या इतका स्वच्छ किनारा मी पाहिला नाही. अलिबागकरांनी अलिबाग समुद्र किनाऱ्याची राखलेली स्वच्छता पाहून मला आनंद झाला आहे, या स्वच्छतेबद्दल मी अलिबागकरांचे कौतूक करतो', अशा शब्दात राज्याचे पर्यावरण मंत्री ना.रामदास कदम यांनी अलिबागकरांचे कौतूक केले. जिल्हाप्रशासनाने स्वयंप्रेरणेने पुढाकार घेऊन रायगड किल्ल्यावर प्लास्टिक मुक्ती केली आहे. हा पॅटर्न संपुर्ण राज्यात राबवून राज्यातील सर्व गड किल्ले प्लास्टिक मुक्त करु, अशी घोषणाही ना. कदम यांनी यावेळी केली. अलिबाग शहराच्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने व्हावी यासाठी  नगरपालिकेला डम्पिंग ग्राऊंड मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु असे आश्वासनही ना. कदम यांनी दिले. ना. कदम यांच्या उपस्थितीत आज सकाळी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहिम राबविण्याचे नियोजित होते. त्यासाठी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर ना. कदम यांच्या

मृद व जलसंधारण कामांसाठी मशिनधारकांची नोंदणी

  अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 17:- रायगड जिल्ह्यातील मृद व जलसंधारण काम करण्यासाठी इच्छुक मशिनधारकांचा नोंदणी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रायगड  यांचेकडे करावयाची आहे तरी नोंदणीकृत मशिनधारकांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नोंदणीकृत असणाऱ्या कंत्राटदारांप्रमाणे  मृद व जलसंधारणाची काम करण्यासाठी ई-निविदा प्रक्रीयेत सहभागी होता येईल. मशिनधारकांचे नोंदणी दिनांक 19 जानेवारी 2018 पासून सुरु होणार  असल्याचे मार्च 2018 अखेर मृद व जलसंधारणाचा काम पूर्ण करावयाची असल्याने इच्छुक मशिनधारकांनी   तात्काळ नोंदणी करुन या योजनेची लाभ घ्यावा. मशिनधारकाची पात्रता- मशिनधारक महाराष्ट्रातील रहिवासी असावा. स्वताच्या मालकीची Excavator Brochoe Loader excavator या प्रवर्गामध्ये असणारी तत्सम मशिनरी व इतर असावी. एका आर्थिक वर्षात कामाच्या उपलब्धतेनुसार  एक  मशिनधारक 50 लाखाचे मर्यादेत काम मिळण्यास पात्र असेल, अशा नोंदणीकृत मशिनधारकास फक्त  नाला बांध व वळण बंधारा वगळून अन्य मृद व जलसंधारण कामामध्ये कंत्राटदार म्हणून भाग घेता येईल, कृषी यंत्रणेमार्फत होत असलेले सिमेंट नालाबांध व वळण बंधाऱ्यास काम घ्यावय

महाड येथे शनिवारी कोकण इतिहास परिषदेचे 8 वे राष्ट्रीय अधिवेशन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17- कोकण इतिहास परिषदेचे 8 वे राष्ट्रीय अधिवेशन पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबईचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, महाड येथे शनिवार दिनांक 20 व  रविवार दि.21 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशाचे उद्घाटन दि.20 रोजी मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ.विष्णू मगरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष रविंद्र लाड, बौध्द वाड्:मय व पालीभाषा तज्ज्ञ डॉ.मीना तालीम, जनरल नेटीव्ह लायब्ररी चिपळूण चे अध्यक्ष प्रकाश देशपाडे, सत्राध्यक्ष, अस्मिता कॉलेज विक्रोलीचे प्राचार्य डॉ.एच.एस.गोरगे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र इंदिरा गांधी जनजातीय राष्ट्रीय विश्वविद्यालय मध्यप्रदेशचे अध्यासन प्रमुख डॉ.किशोर गायकवाड, एस.एम.डी.एल. कॉलेज कळंबोलीचे प्राचार्य डॉ.सुधाकर लहुपचांग आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हे अधिवेशन चार सत्रात होणार आहे. पहिले सत्र शनिवार दि.20 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 1.30 स्वागत, मान्यवरांचे मार्गदर्शन, पुस्तक प्रकाशन, जीवन गौरव पुरस्कार, पुरस्कार वितरण, प्रदर्शन उद्घाटन. दुसरे सत्र दुपा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना : कातकरी वाड्यांमध्ये शेल्फवर कामे उपलब्ध

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 17:- जिल्ह्यातील आदिवासी कातकरी समाजास कामे उपलब्ध होण्यासाठी आदिवासी कातकरी उत्थान अभियानांतर्गत जिल्ह्यातील आदिवासी (कातकरी) वाड्या असलेल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी  योजनेंतर्गत कामे शेल्फवर उपलब्ध करुन ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. तरी रायगड जिल्ह्यातील इच्छुक आदिवासी (कातकरी) वाडीतील रहिवाशांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामाची मागणी  करताच त्यांना काम उपलब्ध करुन देण्यात येईल. कातकरी समाज बांधवांनी  याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक (मगांराग्रारोहयो)रायगड अलिबाग यांनी केले आहे. ०००००

जलसमृध्दी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना : अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 17- राज्यातील जलयुक्त शिवार अभियान,जल व मृद संधारणाची कामे करण्यासाठी जलसमृद्धी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना  दि.2 जानेवारी 2018 रोजी सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ज्या सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी गट, बेरोजगार संस्था यांना  अर्ज करावयाचा असेल त्यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा https://eme.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.  यासंदर्भात शासन निर्णयान्वये राज्यात जलयुक्त शिवार अभियान,जल व मृद  संधारणची कामे करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार तरुण,शेतकरी उत्पादन संस्था,नोंदणीकृत शेतकरी गटास, बेरोजगाराच्या सहकारी संस्था,विविध कार्यकारी संस्था यांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन त्यांना उत्खनन यंत्र सामुग्री (अर्थमुव्हर्स) खरेदी करण्यासाठी वित्तीय संस्था कडून उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजाचे दायित्व  शासन तर्फे अदा करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यामध्ये या योजनेचा कालावधी दिनांक 31 मार्च 2018 पर्यंत राहील.रायगड जिल्ह्यासाठभ्‍ 15 लाभार

केंद्रीय मंत्री ना.अनंत गीते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 17- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे शुक्रवार दि.19  रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. शुक्रवार दि.19 रोजी दुपारी एक वाजता एमआयडीसी महाड येथे आगमन.  दुपारी साडे तीन वाजता एमआयडीसी महाड  येथून चिपळूण जि. रत्नागिरीकडे प्रयाण. रविवार दि.21 रोजी दुपारी साडेतीन वाजता दहीवड ता.महाड जि.रायगड येथे आगमन. सायंकाळी पाच वाजता दहिवड ता.महाड जि.रायगड येथून मुंबईकडे प्रयाण . ०००००

पर्यावरण मंत्री ना.रामदास कदम यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 16 :- राज्याचे  पर्यावरण मंत्री  ना.रामदास कदम हे बुधवार दि. 17 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे- बुधवार दि.17 रोजी रात्री बारा वाजता हॉटेल मेपाल आय व्ही वाय, अलिबाग येथे आगमन व मुक्काम. गुरुवार दि. 18 रोजी सकाळी साडेसात वाजता अलिबाग समुद्र किनारी स्वच्छता मोहिमेकरिता आगमन, सकाळी नऊ वाजता अलिबाग चौपाटीवरुन निवास व्यवस्थेकडे प्रयाण.  सकाळी नऊ ते अकरा वाजता राखीव. सकाळी साडे अकरा ते एक वाजता प्लास्टिक बंदी योजनेच्या कोकण विभागीय बैठकीस उपस्थिती.  स्थळ : हॉटेल मेपाल आय व्ही वाय, अलिबाग.  दुपारी एक ते तीन राखीव. दुपारी तीन वाजता अलिबाग येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण. 00000000

राज्यमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16- ना.रविंद्र चव्हाण, राज्यमंत्री बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे 17 व 18 जानेवारी रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. बुधवार दि. 17 रोजी दुपारी एक वाजता पाली-सुधागड येथे आगमन (श्री क्षेत्र गणपती बल्लाळेश्वर दर्शन). दुपारी सव्वा वाजता शासकीय विश्रामगृह पाली येथे आगमन व राखीव. दुपारी दोन वाजता प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक (स्थळ :- शासकीय विश्रामगृह पाली-सुधागड). दुपारी अडीच वाजता पाली-सुधागड येथून माणगांवकडे प्रयाण. दुपारी तीन वाजता शासकीय विश्रामगृह माणगांव येथे आगमन. दुपारी सव्वा तीन वाजता माणगांव तालुक्यातील विविध विभागामार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामाबाबत आढावा बैठक. (स्थळ :- शासकीय विश्रामगृह माणगांव). दुपारी चार वाजता माणगांव येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन. दुपारी साडे चार वाजता माणगांव येथून ता.म्हसळाकडे प्रयाण. सायं. पाच वाजता शासकीय विश्रामगृह म्हसळा येथे आगमन. सायं. सव्वा पाच वाजता म्हसळा तालुक्यातील विविध विभागामार्फत करण्यात येणाऱ्या व

विनामूल्य युवा प्रशिक्षण शिबीर गुरुवारपासून मुंबई येथे नाव नोंदणी करण्याचे आवाहन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 15 - राज्यस्तरीय युवा प्रशिक्षण केंद्राच्या मुंबई विभागामार्फत दहा दिवसीय निवासी राज्य युवा प्रशिक्षण शिबीर न्युझलँड होस्टेल, आरे वसाहत, गोरेगाव पुर्व , मुंबई येथे दि. १८ ते २७ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरासाठी जिल्ह्यातील १८ ते ३५ वयोगटातील व सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असणाऱ्या ५० युवक/युवतींना विनामुल्य प्रवेश देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. शिबीरामध्ये प्रवेश दिलेल्या युवक व युवतींची निवास व भोजन व्यवस्था आयोजन समितीच्यावतीने विनामूल्य करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ज्या युवक/युवतींना प्रशिक्षण शिबीरात सहभाग घ्यावयाचा आहे, त्यांनी दि. १७ पर्यंत जिल्हा क्रीडा संकुल,नेहुली संगम,अलिबाग येथे क्रीडा अधिकारी विशाल बोडके (९८९०९१९२९७) यांचेशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.महादेव कसगावडे यांनी केले आहे. 00000

गुणवंत खेळाडू,क्रीडा मार्गदर्शक गुणवंत संघटक पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15:- क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगडद्वारा जिल्ह्यातील उत्कृष्ट क्रीडापट्टू (महिला-एक, पुरुष-एक, दिव्यांग-एक खेळाडू) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक एक व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता-एक यांच्या कार्याचे,योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने  जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2002 पासून देण्यात येतो.   जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू, मार्गदर्शक व क्रीडा संघटक,कार्यकर्ता यांना हा पुरस्कार 26 जानेवारी रोजी देण्यात येणार आहे.  सन 2017-18 च्या पुरस्कार वितरणासाठी या कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात येत आहे. पुरस्कारामध्ये प्रमाणपत्र,स्मृतिचिन्ह आणि रोख रुपये दहा हजार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.  पुरस्काराकरिता  30 जून 2017 पर्यंतची कामगिरी,कार्य ग्राह्य धरले जाईल.    पुरस्काराचे निकष पुढीलप्रमाणे आहेत.  गुणवंत खेळाडू : या पुरस्कराअंतर्गत तीन पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून एक महिला खेळाडू, एक पुरुष खेळाडू, एक दिव्यांग खेळाडू यांना सदरचा पुरस्कार देण्यात येणार  आहे.   संबधित

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार : छाननी अहवालावर हरकती मागवल्या

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 15 -   महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतीवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. सन २०१४-१५, सन २०१५-१६ व सन २०१६-१७   या तीन वर्षासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसंदर्भातील प्राथमिक छाननी अहवाल www.mumbaidivsports.com   या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे. त्यासाठी www.xlroots.com वर क्लिक करावे. या अहवालावर ज्यांना हरकत नोंदवावयाची असेल त्यांनी  20 जानेवारी पर्यत विहित नमुना डाऊनलोड करुन हरकत नोंदवावी व नोंदवलेली हरकत पुन्हा अपलोड करावी, असे आवाहन   जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, यांनी केले आहे. ०००००

जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचा उपक्रम :शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी चोंढी येथे 26 रोजी महाशिबीर

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग व वकील संघटना अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे चोंढी येथे शासकीय योजनेचा लाभ नागरीकांपर्यंत पोहोचविण्यासाठी  शुक्रवार दि.26 रोजी सकाळी 11 वाजता महाशिबीर आयोजित करण्यात आले आहे.  या शिबिरात चोंढी व परिसरातील गावांतील  ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे  सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्या. हुली  यांनीकेले आहे.  या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, महिला व बालविकास विभाग, समाज कल्याण विभाग व आरोग्य विभाग यांच्याकडे असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येईल. या महाशिबीरात शासकीय योजनांचे लाभ मिळविण्याकरीता आवश्यक असणाऱ्या अटी पूर्ण करणाऱ्या नागरीकांना त्याचा लाभ मिळणार आहे. महाशिबीरात इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना, पंतप्रधान मातृवंदना योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषिस्वावलंबन योजना इत्यादी