Posts

Showing posts from July 14, 2019

मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम नवमतदार व नागरिकांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी --प्र.मा.जिल्हाधिकारी दिलीप हळदे

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20 -    नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 मध्ये मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा नवमतदार व    वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी एक संधी मिळावी म्हणून मा.भारत निवडणूक आयोग व मा.मुख्य निवडणूक अधिकारी   महाराष्ट्र राज्य   यांनी दि.1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर     (Qualifying Date) आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्र.मा.जिल्हाधिकारी दिलीप हळदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली .    मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण    कार्यक्रमाविषयी माहिती देण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.              यावेळी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती वैशाली माने, उपविभागीय अधिकारी अलिबाग श्रीमती शारदा पोवार तसेच पत्रकार उपस्थित होते.              यावेळी मार्गदर्शन करताना प्र.जिल्हाधिकारी श्री.हळदे म्हणाले की, जास्तीत जास्त मतदारांना मतदार नोंदणी करता

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

अलिबाग, जि. रायगड, दि.20 (जिमाका)- राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक तथा पालकमंत्री रायगड हे   जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.             बुधवार दि.24 जुलै रोजी   सकाळी सहा वा. डोबिंवली निवासस्थान येथून मुरुड जि.रायगडकडे प्रयाण.   सकाळी दहा वा. काशिद ता.मुरुड येथे आगमन व प्रवासी जेट्टीच्या कामाचे भूमिपुजन.   सकाळी अकरा वा. काशिद येथून साळावकडे प्रयाण.   साडेअकरा वा.जे.एस.डब्ल्यू,विश्रामगृह साळाव येथे आगमन व मुरुड तालुक्यातील विकास कामांबाबत आढावा बैठक.   स्थळ : जेएसडब्ल्यू, विश्रामगृह साळाव.   दुपारी एक वा. साळाव येथून अलिबागकडे प्रयाण.   दु.दीड वा. शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे आगमन व राखीव.   दु. अडीच वा. मान तर्फे झिराड ग्रामपंचायत अंतर्गत सिमेंट बंधारे लोकार्पण व जलपूजन स्थळ : मानीगाव ता.अलिबाग.    दु.तीन वा. अलिबाग तालुक्यातील विकास कामांबाबत आढावा बैठक स्थळ : राजस्व सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग.   सायं.चार वा. भारतीय जनता पार्टी मेळावा स्थळ : गणेश मंगळ कार्यालय, सह

हिरकणी-नवउद्योजक योजनेचा जिल्ह्यातील बचत गटांनी लाभ घेण्याबाबत

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20 : महिला बचत गटांच्या नाविण्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना आवश्यक   ते मार्गदर्शन, तालुका व जिल्हा स्तरावर स्तरावर मंच उपलब्ध करुन देणे व उत्कृष्ट   नाविण्यपूर्ण संकल्पनांना पायाभूत सुविधा निर्माण करून अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाची   हि र कणी-नवउद्योजक योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.               राज्यातील राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान व महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत किमान एक वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेले व राष्ट्रीय जीवनोन्नती अभियानातील पंचसूत्रीचे पालन करणारे महिला बचत गट हे या योजनेचे लाभार्थी असणार आहेत.    या व्यतिरिक्त राज्य व केंद्र शासनाचे इतर विभागाद्वारे राज्य किंवा केंद्र शासनाची इतर काही योजनेंतर्गत किमान एक वर्षापूर्वी तयार करण्यात आलेली व पंचसूत्रीचे पालन करणाऱ्या महिला बचत गटांचा समावेश करण्याविषयी जिल्हा नाविन्यता परिषद निर्णय घेऊ शकेल.             ही योजना प्रत्येक जिल्ह्यात चार टप्प्यात राबविण्यात येणार असून अंमलबजावणीचे टप्पे पुढील प्रमाणे- पहिला टप्पा ताल

मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17 -    मा.मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडून मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर झाला असून तो पुढीलप्रमाणे आहे.   प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी सोमवार दि.15 जुलै. 2019   दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी सोमवार दि. 15 जुलै ते मंगळवार 30 जुलै. 2019    विशेष मोहिमेचे दिनांक (Special Compaign) शनिवार दि. 20 जुलै 2019 रविवार दि.21 जुलै 2019   शनिवार दि.27 जुलै 2019 रविवार दि.28 जुलै 2019 पर्यवेक्षक / सहा. मतदार नोंदणी अधिकारी/मतदार नोंदणी अधिकारीद्वारा तपासणी सोमवार दि.05 ऑगस्ट 2019 पर्यंत.   दावे व हरकती निकाली काढणे मंगळवार दि.13 ऑगस्ट 2019 पर्यंत.   उपजिल्हा निवडणूक अधिकारी/जिल्हा निवडणूक अधिकारी/मतदार यादी निरीक्षक यांचेद्वारा मतदार यादीची विशेष तपासणी, डाटाबेसचे अद्यावतीकरण, पुरवणी याद्यांची छपाई इत्यादी शुक्रवार दि.16 ऑगस्ट 2019 पर्यंत.   अंतिम मतदार यादी प्रसिध्दी   सोमवार दि.19 ऑगस्ट 2019 रोजी असणार आहे. असे मतदार नोंदणी अधिकारी   अलिबाग विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी, अलिबाग यांनी प्रसिध्दी प

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 32 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 32.50 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 1562.63 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 8.00 मि.मि., पेण-30.20 मि.मि., मुरुड-40.00 मि.मि., पनवेल-4.60 मि.मि., उरण-5.00 मि.मि., कर्जत-13.20 मि.मि., खालापूर-17.00 मि.मि., माणगांव-60.00 मि.मि., रोहा-7.00 मि.मि., सुधागड-40.00 मि.मि., तळा-68.00 मि.मि., महाड-67.00मि.मि., पोलादपूर-61.00, म्हसळा-34.00मि.मि., श्रीवर्धन-25.00 मि.मि., माथेरान-40.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 520.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 33.49 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   49.72 टक्के इतकी आहे. 0000

अनुकंपा प्रतिक्षा यादी प्रसिध्द 25 जुलै पर्यंत हरकती मागविल्या

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 -    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या एकत्रित गट- क संवर्गातील सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या उमेदवारांची प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर, संबधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयाच्या व जिल्हा संकेतस्थळ www.raigad.nic.in यावर प्रसिध्द करण्यात आली आहे.      सदर यादीतील नाव व क्रमांकाबाबत उमेदवारांची कोणतीही हरकत,आक्षेप असल्यास उमेदवारांनी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्यामार्फत आपले हरकत अर्ज दि.25 जुलै पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत.   दि.25 जुलै नंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद् मश्री बैनाडे यांनी कळविले आहे. 000000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 33 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 33.49 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 1511.52 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 48.00 मि.मि., पेण-27.00 मि.मि., मुरुड-18.00 मि.मि., पनवेल-3.80 मि.मि., उरण-7.00 मि.मि., कर्जत-5.80 मि.मि., खालापूर-26.00 मि.मि., माणगांव-37.00 मि.मि., रोहा-56.00 मि.मि., सुधागड-33.00 मि.मि., तळा-35.00 मि.मि., महाड-43.00मि.मि., पोलादपूर-24.00, म्हसळा-91.00मि.मि., श्रीवर्धन-58.00 मि.मि., माथेरान-23.20 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 535.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 33.49 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   48.10 टक्के इतकी आहे. 0000

माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन वास्तूचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14-   माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवीन विस्तारित इमारतीचे उद्घाटन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री   ना.रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी (दि.१३) करण्यात आले. माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या सहकार्यातून अशोकदादा साबळे विद्यालय माणगाव या नूतन इमारतीचे ना. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. आमदार भरतशेठ गोगावले हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. या कार्यक्रमास कृष्णा कोबनाक, संस्थापक ॲड. राजीव साबळे सेक्रेटरी कृष्णा   दोशी, स्कूल कमिटी चेअरमन राजनभाई मेथा, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, माणगाव पं.स. सभापती सुजित शिंदे, रोह्याचे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, रा.जि.प सदस्या अमृता हरवंडकर, माणगाव उपनगराध्यक्षा शुभांगी जाधव, नगरसेविका स्नेहा दसवते, नीलम मेहता, माजी   उपसरपंच नितीन दसवते, नगरसेवक सचिन बोंबले, स्वीकृत नगरसेवक नितीन बामुगडे, प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षकवर्ग पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी   बोलता