Posts

Showing posts from August 20, 2023

‘दिव्यांगांच्या दारी’ अभियानामध्ये योजनांचा लाभ घ्यावा -- जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे

  रायगड  (जिमाका) दि. 25:-   दिव्यांग कल्याण विभाग  ‘ दिव्यांगांच्या दारी ’  अभियानानिमित्त मंगळवार दि. 29  ऑगस्ट  रोजी विरुपाक्ष मंगल कार्यालय ,  अशेाक बाग ,  जुना पनवेल येथे सकाळी  10  ते दुपारी  4  या वेळेत जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास दिव्यांग अभियानाचे मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी उपस्थित राहून दिव्यांगासाठीच्या योजनांचा लाभ घ्यावा ,  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे. राज्य शासनाने दिव्यांग कल्याण व पुनर्वसनाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाची निर्मिती केलेली आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या आदेशान्वये दिव्यांगांच्या दारी हे अभियान राज्यातील सर्व महसूल विभागातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात अभियानानिमित्त मेळावा होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय रायगड  , जिल्हा परिषद रायगड आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्याचा भौगोलिकदृष्ट्या विचा

दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, महाड या न्यायालयाचे उद्या होणार उद्घाटन

  रायगड  (जिमाका)   दि. 25:-   दिवाणी न्यायालय ,  वरिष्ठ स्तर ,  महाड या न्यायालयाचा उद्घाटन समारंभ शनिवार दि .26  ऑगस्ट रोजी  दुपारी   12 . 30  वाजता मुंबई उच्च न्यायालय ाचे न्यायमूर्ती   तथा पालक न्यायमूर्ती ,  जिल्हा रायगड  रियाज इ.छागला यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी उच्च न्यायालय ,  मुंबई तथा पालक न्यायमूर्ती ,  जिल्हा रायगड मिलिंद म.साठये आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश ,  रायगड-अलिबाग अजेय श्री. राज ं देकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. भूसंपादन प्रकरणे ,  हिंदू विवाह कायद्यांतर्गत दाखल होणारी प्रकरणे ,  सरकार विरुध्दची प्रकरणे ,  रक्कम रुपये  पाच   लाखावरील दावे व इतर प्रकरणांसाठी महाड व पोलादपूर या महसुली तालुक्यांकरीता पक्षकार व वकीलांना प्रकरणे दाखल करण्यासाठी अलिबाग येथे यावे लागत होते. त्यामुळे पक्षकारांना आर्थिक भुर्दंड पडत होता .    तसेच त्यांचा वेळही वाया जात होता. त्यामुळे या परीसरातील पक्षकार व वकीलांची महाड येथे दिवाणी न्यायालय ,  वरिष्ठ स्तर हे न्यायालय सुरु करण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून प्रल ंबि त होती. महाड व पोलादपूर या महसुली तालुक्यांकरीता महाड , 

रायगड जिल्ह्यात दिव्यांगाच्या दारी’ ’अभियान प्रभाविपणे राबविणार -- निवासी उपजिल्हाधिकारी

    रायगड(जिमाका),दि.22:-दिव्यांग कल्याण विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात ‘दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. रायगड अलिबाग जिल्ह्यात दि.29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 4 यावेळेत पनवेल येथे या अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये दिव्यांग बांधवांच्या तक्रारी, अडचणी सोडविण्या बरोबरच विविध शासकीय योजनाचा लाभ देण्यात येणार आहे. हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावे,अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी ‘दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांगाच्या दारी’ अभियान नियोजन अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक अंबादास देवमाने कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, सहायक आयुक्त समाज कल्याण सुनील जाधव, प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी शाम कदम देशमुख, यांची उपस्थिती होती.  दिव्यांगांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने दिव्यांग कल्याण विभाग हा सामाजिक न्याय विभागापासून वेगळा करून एक नवीन विभाग तयार केला

कृषी पायाभूत सुविधा निधी योजना अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

    रायगड (जिमाका),दि.22:-  केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी योजना सन 2020-21 ते 2032-2033 या कालावधीसाठी राबविण्यात येत आहे. ही कृषी पायाभूत सुविधा निधी योजना शेतकऱ्यांस व इतर पात्र लाभार्थ्यांस लाभदायक असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी योजनेच्या  www.agriinfra.dac.gov.in ,  पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. इतर आवश्यक माहितीसाठी नजिकच्या कृषी विभागाच्या कार्यालयास संपर्क करावा, असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणेखेले व उप विभागीय कृषि अधिकारी खोपोली नितीन वसंत फुलसुंदर यांनी केले आहे. या योजनेंतर्गत शेतकरी व त्यांच्या संस्थांना काढणीपश्चात सुविधा उभारणीसाठी व बाजार संपर्क वाढविण्यासाठी या क्षेत्रातील कर्ज पुरवठयात व्याज दरातून सवलत देण्यात येते. यामध्ये अंतर्भूत घटकांच्या 2 कोटीच्या मर्यादेपर्यंतच्या सर्व कर्जावर कमाल 7 वर्षांसाठी वार्षिक 3 टक्के व्याज सवलत देण्यात येणार आहे. तसेच या कर्जासाठी सुक्ष्म व लघु उद्योग योजनेच्या पल हमी निधी ट्रस्ट मार्फत 2 कोटीपर्यंत कर्जाच्या रकमेवर पत हमी संरक्षण देण्यात येईल व यासाठी

माजी सैनिक/माजी सैनिकांच्या पत्नींसाठी एक दिवसीय मेळाव्याचे आयोजन

    रायगड (जिमाका),दि.22:-  खारघर, कामोठे, तळोजा व पनवेल परीसरामधील माजी सैनिक/माजी सैनिक पत्नी  यांच्या  अडीअडचणी  तसेच  विविध  कार्यालयीन  कामाकरिता मंगळवार, दि.29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10.00 वा जल वायू विहार, खारघर येथे एक दिवसीय मेळाव्याचे   आयोजन केले आहे. या मेळाव्याचा लाभ खारघर, कामोठे, तळोजा व पनवेल परीसरामधील माजी सैनिकांनी घ्यावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (नि.)ले.कर्नल राहुल वैजनाथ माने यांनी केले आहे.   या मेळाव्यामध्ये माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांची ओळखपत्रे बनविणे व वाटप करणे, अवलंबितांची ओळखपत्रे, घरपट्टी प्रमाणपत्रे वितरीत करणे, पेंशनबाबत विवीध कामे  इत्यादी कामांकरीता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  मेळाव्यास जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, (नि.) ले.कर्नल राहुल वैजनाथ माने, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी गोविंदराव मारुति साळुंखे, व कल्याण संघटक पुरुषोत्तम चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. ०००००००

बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कारांसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज मागवले

    रायगड (जिमाका),दि.22 :-  केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दिला जातो. बालशक्ती पुरस्कार सन 2024 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. सदरचे अर्ज हे  www.awards.gov.in  ह्या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. सदर पुरस्कारांची माहिती सदरच्या संकेतस्थ्ळावर देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 31.08.2023 पर्यंत आहे. बाल शक्ती पुरस्कार हा ज्या वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांना हा पुरस्कार दिला जातो. बालकल्याण पुरस्कार (वैयक्तिक पुरस्कार) हा मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. बालकल्याण पुरस्कार (संस्था स्तरावर) हा बालकल्याण क्षेत्रात अपवादात्म्म कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या नि