Posts

Showing posts from March 18, 2018

ग्राहक शिबिरात ग्राहकांच्या हक्कांविषयी मार्गदर्शन

Image
      अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.23- जिल्ह्यातील ग्राहकांसाठी आज पुरवठा शाखेतर्फे आयोजित ग्राहक शिबिरात ग्राहकांच्या हक्कांविषयी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात आले.         येथील जिल्हाधिकारी कार्यालय रायगड आणि भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्ह्यातील ग्राहकांसाठी कर्नाळा सभागृह, पोलिस कवायत मैदान   येथे ग्राहक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.        यावेळी भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेचे सचिव डॉ. एम.एस. कामत यांनी तसेच संतोष आढाव, श्रीमती तृप्ती राऊळ,   विक्रांत जिंदाल यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा पुरवठा अधिकारी एल.एम. दुफारे हे यावेळी उपस्थित होते. यावेळी ग्राहकांना प्रत्येक खरेदीच्या वेळी जागरुक राहण्याविषयी   तसेच संभाव्य फसवणूकीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. हक्क व नुकसान भरपाईबाबत टोल फ्री क्रमांक 1800222262 वर संपर्क करण्याबाबत सांगण्यात आले.   तसेच विविध प्रकारच्या गुंतवणूक, म्युच्युअल फंड, पोस्ट, जमिन , एलआयसी याबाबत सविस्तर मार्गद्र्श करण्यात आले. तसेच अन्न पदार्थ व त्यातील भेसळ याबाबतही ग्राहकांना मार्गदर

पनवेल येथील आगग्रस्तांची पालकमंत्र्यांनी केली विचारपूस

Image
पनवेल येथील तक्का झोपडपट्टीत दि.21 रोजी मध्यरात्री आग लागून सुमारे चाळीस झोपड्या जळून खाक झाल्या. या आगग्रस्त नागरिकांची काल (दि.22) सकाळी राज्याचे बंदरे, वैद्यकिय शिक्षण व माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी भेट देऊन विचारपूस केली. सकाळी पनवेल ना. चव्हाण यांनी महापौर डॉ.कविता चौतमल, आमदार प्रशांत ठाकूर,   उपमहापौर चारुशिला घरत व अन्य पदाधिकाऱ्यांसोबत घटनास्थळाला भेट दिली व पाहणी केली. स्थानिकांची विचारपूस करुन त्यांना धीर दिला.

उद्योग मंत्री ना.सुभाष देसाई आज रायगडमध्ये

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23 - उद्योग व खनिकर्म मंत्री   ना.सुभाष देसाई, हे   आज रायगड जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि. 23 मार्च रोजी रात्रौ आठ वा.तीस मिनिटांनी नवी मुंबई येथून मोटारीने माणगांवकडे (जि.रायगड) प्रयाण. रात्रौ दहा वाजता माणगांव येथे आगमन व मुक्काम. शनिवार दि.24 मार्च   रोजी सकाळी नऊ वाजता माणगांव येथून मोटारीने श्रीवर्धनकडे   प्रयाण. दहा वाजता श्रीवर्धन येथे आगमन. दहा वा.तीस मिनिटांनी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या समवेत बैठक. स्थळ: दर्या रेस्ट् हाऊस, श्रीवर्धन. अकरा वाजता मेळावा. स्थळ: नगर परिषद कार्यालयाजवळ, श्रीवर्धन. दुपारी दोन वाजता मोटारीने माणगांव जि. रायगडकडे प्रयाण. दुपारी तीन वाजता माणगांव येथे आगमन व राखीव. सायंकाळी चार वाजता माणगांव येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.    00000

'ट्राय'च्या कार्यशाळेत ग्राहकांना दुरध्वनी सेवांची माहिती

Image
अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.23- टेलिकॉम रेग्युलेटरी ॲथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) यांनी आज भाग्यलक्ष्मी मंगळ कार्यालय, अलिबाग येथे ग्राहक जागरुकता   कार्यक्रम आयोजित केला होता.   स्वत:च्या हक्क व अधिकारांची नागरिकांना माहिती होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन ट्रायच्या बंगळूर कार्यालयातर्फे करण्यात आले होते.    यावेळी विविध दूरसंचार सेवांची माहिती व त्यासंदर्भातील ग्राहकांचे अधिकार, हक्क याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.   या कार्यशाळेस कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र क्षेत्राचे प्रमुख श्रीनिवास एस.गाडगीळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.   कर्नाटक केरळ क्षेत्राचे सल्लागार यांनी क्षेत्रीय कार्यालयाच्या भूमिका व कार्यपध्दती तसेच दूरध्वनी ग्राहक संरक्षणासंदर्भात आतापर्यंत घेतलेल्या पुढाकारांची माहिती दिली.   या कार्यक्रमामध्ये ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.   तसेच दूरध्वनी सेवा पुरविणारे शासकीय अधिकारी व संस्थांचे कर्मचारी, उद्योग क्षेत्रातील सदस्य तसेच स्वयंसेवी संस्था सहभागी होत्या.   कार्यक्रमा दरम्यान दूरध्वनी संबंधित मोबाईल नंबर पोर्टबिलाटी, अनसॉलिसिटेड कमर्शियल कम्युनिके