Posts

Showing posts from April 21, 2024

लोकसभा निवडणूक सन 2024 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 257 गुन्हे नोंद, 256 आरोपीना अटक 71 लाख 86 हजार 841 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

    रायगड(जिमाका)दि.24:-  लोकसभा निवडणूक सन 2024 च्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने केलेल्या कारवाईत रायगड जिल्हयात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून दि.16 मार्च ते  दि.22 एप्रिल 2024 पर्यत एकूण 257 गुन्हे नोंदविण्यात आले असून 256 आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग आर.आर.कोले यांनी सांगितले. संपूर्ण कारवाईमध्ये 1 लाख 12 हजार 872 लिटर दारु व 13 वाहने जप्त करण्यात आली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत रुपये 71 लाख 86 हजार 841 आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण 145 गुन्हे नोंद करण्यात येवून 45 लाख 39 हजार 415 रुपये किंमतीचा मुद्देमाल व मावळ मतदारसंघात एकूण 112 गुन्हे नोंद करण्यात आले असून रुपये 26 लाख 47 हजार 426  किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 च्या कलम 149 खाली एकूण 596 संशयित व सराईत गुन्हेगारांना नोटीस बजाविण्यात आली आहे. अवैध मद्याच्या व्यवसायात गुंतलेल्या सराईत व्यक्ती विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील कलम 93 अंतर्गत एकूण 221 प्रस्ताव लोकसभा मतदारसंघातील उपविभागीय दंडाधिकारी यांच्

32 रायगड लोकसभा मतदारसंघ मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

Image
रायगड दि.23(जिमाका):- 32 रायगड लोकसभा मतदारसंघासाठी  मतदान सात मे रोजी होणार असून यासाठी प्राप्त मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे , निवडणूक निरीक्षक सर्वसाधारण संजीव कुमार झा , निवडणूक खर्च निरीक्षक धीरेंद्रमणी त्रिपाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संपन्न झाली. 32 रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणुकीतील मतदान प्रक्रियेसाठी मतदार संघात एकूण 3 हजार 47 बॅलेट युनिट, 3 हजार 47 कंट्रोल युनिट व 3 हजार 206 व्हीव्हीपॅट  प्राप्त प्राप्त झाले आहेत. त्याची प्रथम सरमिसळ प्रक्रिया यापूर्वी झाली आहे. आजच्या प्रक्रियेदरम्यान मतदार केंद्र निहाय देण्यात येणाऱ्या मतदान यंत्राच्या क्रमांकाची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सरमिसळ प्रक्रिया करण्यात आली. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी राहुल कदम,आदर्श आचारसंहिता कक्षाचा नोडेल अधिकारी श्रीमती जोत्स्ना पडीयार, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांच्या सह राजकीय पक्षाचे उमेदवार व  प्रतिनिधी, विविध पोलीस

निवडणूक प्रक्रियेत सूक्ष्म निरीक्षक यांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण

    रायगड,दि.23(जिमाका):-  सार्वत्रिक लोकसभा निवडणूकी मध्ये  निवडणूक सूक्ष्म निरीक्षक (मायक्रो आब्जव्हर्स) यांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण आहे.त्यामुळे त्यांनी आपली जबाबदारी नि:पक्षपातीपणे पार पाडावी, असे निर्देश 32 रायगड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक संजीवकुमार झा यांनी दिले. रायगड लोकसभा मतदार संघात निवडणूक प्रक्रिया सुरळीत पणे पार पडावी, यासाठी सूक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी डॉ.ज्योस्त्ना पडियार,उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे, परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी दुर्गा देवरे आदी उपस्थित होते. यावेळी निवडणूक निरीक्षक झा म्हणाले, नि:पक्ष आणि मोकळया वातावरणात होणाऱ्या निवडणूकीचे सूक्ष्म निरीक्षक हे साक्षीदार आहेत. त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण नसून ते निवडणूक निरीक्षक आणि आयोगास उत्तरदायी आहेत.  मतदान केंद्रावर तसेच गृह मतदानाच्या वेळी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येकाने आपली जबाबदारी पा

आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन

  रायगड,दि.23(जिमाका):- मा.भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि.16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्याल आली आहे. 32- रायगड /33 मावळ लोकसभा मतदार संघामधील विधानसभा मतदार संघामध्ये नागरिकांकडून येणाच्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी पुढीलप्रमाणे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून या नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. विधानसभा मतदार संघ - 188 पनवेल, नियंत्रण कक्ष क्रमांक 022-27452399, 189-कर्जत, नियंत्रण कक्ष क्रमांक 9373922909, 190-उरण, नियंत्रण कक्ष क्रमांक 9892538409, 191-पेण, नियंत्रण कक्ष क्रमांक 02143. 253032, 192- अलिबाग, नियंत्रण कक्ष क्रमांक 02141-222042, 193- श्रीवर्धन, नियंत्रण कक्ष क्रमांक 02147-222226/7249579158, 194-महाड, नियंत्रण कक्ष क्रमांक 7385815210, 263- दापोली, नियंत्रण कक्ष क्रमांक 02352-226248,264- गुहागर, नियंत्रण कक्ष क्रमांक 02356-264888 त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, रायगड यांचे कार्यालयात निवडणूकीसंदर्भात नागरिकांकडून येणाऱ्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रार

32-रायगड लोकसभा निवडणूक-2024 उमेदवारांच्या खर्च विषयक तक्रारीचे निवारण व भरारी पथकाने जप्त केलेली रोख रक्कम परत करण्याच्या कार्यवाहीसाठी समित्या गठीत

    रायगड,दि.23(जिमाका):- आगामी लोकसभा निवडणूक-2024च्या अनुषंगाने 32-रायगड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत उमेदवारांच्या खर्च विषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी खर्च नियंत्रण समित्ती गठीत करण्यात आली असून या खर्च नियंत्रण समितीमध्ये  श्री.धिरेंद्र मनी त्रिपाठी, खर्च निरीक्षक (अध्यक्ष), श्री.किशन जावळे (भा.प्र.से.), जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रायगड, श्री.राहुल केशय कदम, खर्च संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. आगामी लोकसभा निवडणूक- 2024 च्या अनुषंगाने 32-रायगड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत उमेदवारांच्या खर्च विषयक लेख्यांची तपासणी करण्यासाठी उमेदवारांना पुढीलप्रमाणे वेळापत्रक आखून देण्यात आले आहे. तपासणी वेळापत्रक पुढीलप्रमाणे  पहिली तपासणी- दि.25 एप्रिल 2024, वेळ सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00. दुसरी तपासणी- दि.30 एप्रिल 2024, वेळ सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00. तिसरी तपासणी-दि.04 मे 2024, वेळ सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 होणार आहे. सर्व उमेदवारांनी आपल्या प्रचार मोहिमेच्या कालावधीतील सर्व लेखे/खर्चाच्या नोंदवह्या अद्ययावत करून नमूद केलेल्या तारखांना राजस्व सभागृह, जिल

32 रायगड लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवार निवडणूक रिंगणात 8 जणांनी घेतली माघार --जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे मतदार संघात एकूण 16 लक्ष 68 हजार 372 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

    रायगड,दि.22(जिमाका):-लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यासाठी  32-रायगड लोकसभा मतदारसंघात आजच्या नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर 13 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.  निवडणूक निर्णय अधिकारी यांचे समक्ष स्वतः उपस्थित राहून एकूण 21 वैध उमेदवारांपैकी 8 जणांनी  माघर घेतली आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहामध्ये निवडणूक प्रक्रिये बाबत माहिती देताना पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी श्री. जावळे बोलत होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते. रायगड लोकसभा मतदारसंघात 13 उमेदवारांमध्ये निवडणुकीची लढत होणार असून उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे-- 1) श्री.अनंत पद्मा गिते (अपक्ष)( गळ्याची टाय), 2)श्री.अनंत बाळोजी गिते (अपक्ष)( चिमणी), 3) श्री.अनंत गंगाराम गिते, (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे) ( मशाल), 4) श्री.नितीन जगन्नाथ मयेकर, (अपक्ष) (पत्रपेटी), 5) श्री.