Posts

Showing posts from July 22, 2018

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 0.84 मि.मि.पावसाची नोंद

           अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.29 -   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.84 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2235.34 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 0.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-7.00 मि.मि., माणगांव-0.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-1.00 मि.मि., महाड-1.00 मि.मि., पोलादपूर-2.00 म्हसळा-0.00 मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-2.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 13.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 0.84 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   71.13    टक्के इतकी आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 6.31 मि.मि.पावसाची नोंद

          अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.27 -   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.31 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2228.20 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 0.00 मि.मि., पेण-10.00 मि.मि., मुरुड-3.00 मि.मि., पनवेल-5.00 मि.मि., उरण-7.00 मि.मि., कर्जत-3.20 मि.मि., खालापूर-7.00 मि.मि., माणगांव-5.00 मि.मि., रोहा-4.00 मि.मि., सुधागड-2.00 मि.मि., तळा-7.00 मि.मि., महाड-4.00 मि.मि., पोलादपूर-13.00 म्हसळा-12.00 मि.मि., श्रीवर्धन-6.00 मि.मि., माथेरान-12.80 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 101.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 6.31 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   70.90    टक्के इतकी आहे. 00000

रोजगार मेळावेःभूमिपूत्रांच्या रोजगार, स्वयंरोजगारासाठी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)26-    त्या त्या जिल्ह्यात होणाऱ्या औद्योगिक विकासात स्थानिक भूमिपूत्रांना रोजगार उपलब्ध व्हावा, नव्हे तो त्यांचा हक्क आहे, अशीच शासनाची भूमिका राहिली आहे. त्यासाठी शासनाने वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करुन   या बाबीस चालनाही दिली आहे.   त्यादृष्टीने स्थानिकांना त्या त्या औद्योगिक क्षेत्रात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी   रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्यांचे जिल्हास्तरावर   तसेच औद्योगिक क्षेत्रनिहाय आयोजन करण्यात येणार आहेत.   त्या त्या जिल्हा कार्यक्षेत्रात व औद्योगिक क्षेत्रात स्थानिकांना रोजगार देण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे दिल्या आहेत. त्यानुसर जिल्ह्यातील   औद्योगिक क्षेत्रातील मोठे/ मध्यम उद्योग, विविध औद्योगिक संघटना, व्यापारी आस्थापना, हॉटेल्स, रुग्णालये, मॉल्स, बांधकाम व्यावसायिक आदींकडून आवश्यक मनुष्यबळाची निकड, त्यासाठी असणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कौशल्य आदींबाबत माहिती उद्योग संचालनालय, कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभाग यांनी समन्वयाने   उपलब्ध करुन घ्यावयाची आहे. त्यानंतर महाराष्ट्

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 5.65 मि.मि.पावसाची नोंद

           अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.26 -   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5.65 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2221.89 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 1.00 मि.मि., पेण-7.00 मि.मि., मुरुड-2.00 मि.मि., पनवेल-4.80 मि.मि., उरण-1.00 मि.मि., कर्जत-4.20 मि.मि., खालापूर-6.00 मि.मि., माणगांव-5.00 मि.मि., रोहा-4.00 मि.मि., सुधागड-5.00 मि.मि., तळा-2.00 मि.मि., महाड-7.00 मि.मि., पोलादपूर-8.00 म्हसळा-5.80 मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-27.60 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 90.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 5.65 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   70.70    टक्के इतकी आहे. 00000

पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)26- राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न,नागरी पुरवठा  आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा ना. रविंद्र चव्हाण हे शनिवार दि.28 रोजी  जिल्ह्या च्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा  कार्यक्रम याप्रमाणे- शनिवार दि.28 रोजी शासकीय वाहनाने सकाळी 11 वा. पनवेल येथे आगमन व भाजपा जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. स्थळ : रामशेठ ठाकूर सभागृह, मार्केट यार्ड, पनवेल.   दुपारी चार वा. जिल्हा मोर्चा व प्रकोष्ठ बैठक. स्थळ : रामशेठ ठाकूर सभागृह, मार्केट यार्ड, पनवेल.    सायं. सात वा. भाजपा नगरसेवक पनवेल महानगरपालिका बैठक. स्थळ : रामशेठ ठाकूर सभागृह, मार्केट यार्ड, पनवेल.    रात्री सव्वा नऊ वा. पनवेल येथून पलावा डोंबिवली निवासस्थाकडे  प्रयाण. 00000

राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयाची प्रवेश पात्रता परीक्षा 1 व 2 डिसेंबर रोजी

          अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.26 -   राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय डेहराडून (उत्तरांचल) येथे इयत्ता आठवीसाठी प्रवेश पात्रता परीक्षा दिनाक 1 व 2 डिसेंबर 2018 रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. ही परीक्षा फक्त मुलांसाठीच आहे. या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांचे वय 1 जुलै 2019 रोजी अकरा वर्ष सहा महिने पेक्षा कमी तेरा वर्षापेक्षा अधिक नाही (म्हणजेच जन्म दिनांक 2 जुलै 2006 ते 1 जानेवारी 2008 या कालावधीत असावा)  असे विद्यार्थी या परीक्षेस पात्र समजण्यात येतील.  विद्यार्थी दिनांक 1 जुलै 2019 ला कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता सातवी या वर्गात असावा किंवा सातवी उत्तीर्ण असावा.              परीक्षेसाठी कमांडंट, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तरांचल 248003 यांच्याकडून विहित नमुन्यातीलच आवेदनपत्रे घ्यावयाची आहेत.  विद्यार्थ्यांनी अनुसूचित जाती, जमातीसाठी रुपये 555/- (जातीच्या दाखल्याच्या सत्यप्रतीसह) आणि जनरल संवर्गातील विद्यार्थ्यांनी रुपये 600/- चा डिमांड ड्राफ्ट देणे आवश्यक आहे.  सदर ड्राफ्ट फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचाच “ कमांडंट आर.आय.एम.सी.डेह

दिव्यांगांसाठी मतदान व्हावे सुलभ- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)26-   मतदान हा सर्व मतदारांचा अधिकार आहे. हा अधिकार बजावतांना मतदारांना कोणतीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी निवडणूक यंत्रणेने खबरदारी घ्यायची असते. त्यातही जर मतदार हा दिव्यांग असेल तर त्यांना मतदान करणे हे सुलभ व्हावे यासाठी विशेष उपाययोजना करणे हे निवडणूक यंत्रणेचे कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले. दिव्यांग मतदारांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणे सुलभ व्हावे यासाठी ‘ सुलभ निवडणूका’ या जिल्हास्तरीय चर्चासत्राचे आयोजन आज   जि ल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी वैशाली माने,   साईनाथ पवार, अकिल पठाण, एस.आर .सोनकर, के. एम. कुलकर्णी, तपस्वी गोंधळी   तसेच जिल्ह्यातील विविध अपंग संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित दिव्यांग संघटना प्रतिनिधींनी दिव्यांगांना सुविधा निर्माण करण्याबाबत आपले विचार मांडून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.   यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की,   जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदा

सैनिकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती; 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज मागविले

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) 25 :- सन 2017-18 मघ्ये इयत्ता 10 वी   व 12 वी व पदवी / पदविका परिक्षेत किमान 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेणा ऱ्या तसेच विद्यापिठाने मान्य केलेल्या विषयांमघ्ये संशो धन पर अभ्यासक्रम करणा ऱ्या ( पीएचडी व तत्सम ) माजी सैनिक , विधवांच्या पाल्यांना शैक्षणिक वर्ष 2018-2019 मध्ये प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमासाठी अभ्यासक्रम पू र्ण होईपर्यंत दरवर्षी शैक्षणिक शिष्य वृती देण्यात येणार आहे . या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी माजी सैनिक , माजी सैनिक विधवांनी 1) वैयक्तिक अर्ज . 2) डी डी -40 अर्ज ( कार्यालयात उपलब्ध आहे .). 3) ओळखपत्राची पाठपोठ छायांकित प्रत . 4) स ध्या पाल्य ज्या वर्गात शिकत आहे त्या वर्गाचे बोनाफाईड स र्टी फिकेट . 5) उत्तीर्ण झालेल्या वर्गाच्या गुणपत्रिकेची प्रमाणित सत्यप्रत . 6) डिसचार्ज पुस्तकातील कुटूंबातील सदस्यांची नावे असलेल्या पानांची प्रमाणित छायांकित प्रत . 7) इतर कोणतीही शिष्यवृती मिळत नसलेबाबतचा कॉलेजचा दाखला .या कागदपत्रासह आपले अर्ज दिनांक 15 ऑक्टोबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय , रायगड - अलिबाग येथे

सैनिकांच्या गुणवंत पाल्यांना पुरस्कार

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) 25 :- शैक्षणिक वर्ष 2017-2018 मध्ये इयत्ता 10 वी व 12 वी   बोर्डाच्या परिक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करूण उत्तीर्ण झालेले माजी सैनिक , विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही . ए . पाटकर विशेष गौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे .         सदरील पुरस्कार प्राप्त करण्यासाठी माजी सैनिक विधवांनी 1) माजी सैनिक विधवेचा हस्तलिखित अर्ज . 2 ) डी डी 40 फॉर्म .   3 ) माजी सैनिक विधवा ओळखपत्र.   4) एस एस सी / एच एस सी बोर्डाच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत.   5) एस एस सी / एच एस सी बोर्डाच्या गुण पत्रकाची छायांकित प्रत ही कागदपत्रे दिनांक   15 सप्टेंबर    पुर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय , रायगड - अलिबाग येथे सादर करून या संधीचा लाभ घ्यावा , असे आवाहन मेजर प्रांजळ जाधव ( निवृत ) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी , रायगड - अलिबाग यांनी केले आहे . 000000

अनुसूचित जाती,जमाती आयोग यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)25- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे अध्यक्ष विजय कांबळे (भा.पो.से.), मा.न्यायमूर्ती सी.एल.थूल, सदस्य (विधी) मधुकर गायकवाड, सदस्य (सेवा) रमेश शिंदे, संपर्क अधिकारी   हे   जि ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे- सोमवार दि.30 रोजी मुंबई येथून दुपारी सोडतीन वा. वाहनाने रायगड (अलिबाग)कडे प्रयाण.   सायंकाळी साडे सात वा. रायगड (अलिबाग) येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व मुक्काम .   मंगळवार दि.31 रोजी सकाळी 11 वा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड विभागातील अनुसूचित जाती, जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध विकासात्मक योजना तसेच अनुसूचित जाती, जमाती भरती, बढती,अनुशेषबाबत जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आढावा बैठक. दुपारी साडेबारा वा.जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याबरोबर जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा तसेच जिल्ह्यामध्ये नागरी हक्क संरक्षण, अन्याय,अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आढावा व लाभार्थ्यांना देण्यात आलेली आर्थिक

केंद्रीय मंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)25- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते हे शनिवार दि.28 रोजी  जि ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा  कार्यक्रम याप्रमाणे- शनिवार दि.28 रोजी मुंबई येथून दुपारी तीन वा. उरण जि.रायगडकडे प्रयाण.  सायं. पाच वा. उरण येथे आगमन.  सात वाजता ता.उरण येथून मुंबईकडे प्रयाण. 00000

जिल्हास्तरीय बँक समन्वय समिती बैठक : बँकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे : जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांचे निर्देश

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.24 -   जिल्ह्यातील एकूण खातेधारक शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता पिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या खूप कमी आहे. शेतकऱ्यांना हंगामात योग्य वेळी पतपुरवठा झाल्यास त्याचा योग्य विनियोग करुन ते त्यांच्या पिक उत्पादनात वाढ करु शकतात. तरी बँकांनी स्वत:हून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे व त्यांना पतपुरवठा करावा. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे‍ दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बँक समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी अध्यक्षस्थानी उपस्थित होते.   यावेळी रिजर्व बँकेचे समन्वयक एम.मून, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक ए.एम.निंबेकर, बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रिय व्यवस्थापक सी.के.पिनाते, नाबार्डचे सुधाकर रघतवान, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचे संचालक विजयकुमार कुलकर्णी, जिल्हा उपनिबंधक पी.एम.खोडका तसेच सर्व बँकांचे   जिल्हास्तरीय प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, शासन विविध योजनांमार्फत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढविणे, रोजगार-स्वयं रोजगाराला चालना देणे, ग्रामी

प्रधानमंत्री पिक विमा योजना सहभागासाठी 31 पर्यंत मुदतवाढ

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.24 : खरीप हंगाम 2018 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.  या योजनेत बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक 31 जुलै 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी बँक व ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (डिजीटल सेवा केंद्र) यांचेमार्फत विमा  अर्ज दाखल करता येतील.  शेतकऱ्यांनी आपला बचत खात्याचा तपशील आणि आधार क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे.  योजनेतील सहभागासाठी नजिकच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच नाजिकच्या बँक, ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (डिजीटल सेवा केंद्र)  यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त कृषि महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे. 00000

स्वच्छता सर्वेक्षणात नागरिकांनी सहभागी व्हावे जि.प.अध्यक्ष आदिती तटकरे यांचे आवाहन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.24 - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने ‘ स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) 2018 ’ ची घोषणा करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2018 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. राज्यातील 340 गावांत हे सर्वेक्षण होणार असून या कालावधीत रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सर्वेक्षण मोहिम राबविण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात उत्कृष्ट ठरणाऱ्या जिल्ह्यांना 2 ऑक्टोबर   2018 रोजी म.गांधी जयंती दिनानिमित्त सन्मानित करण्यात येणार आहे. याकरिता जिल्ह्यातील नागरिकांनी या सर्वेक्षण कार्यक्रमात सक्रीय सहभाग द्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष कु.आदितीताई तटकरे यांनी केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 मध्ये देशभरातील सर्व 698 जिल्हे सहभागी असून प्रत्येक जिल्हयांतून 10 गावे याप्रमाणे 6,980 गावांचा समावेश असणार आहे.    देशभरातील एकूण 34,900 सार्वजनिक ठिकाणांचे सर्वेक्षण   करण्यात येणार आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यांची क्रमवारी ठरविण्यासाठी एकात्मक व्यवस्थापन प्रणाली(आयएमआयएस) विकसित करण्यात आली आहे.या प्रणाली

स्थानिक तरुणांना नोकरीची संधी; कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.24 - जिल्ह्यात स्थापित व कार्यरत असणाऱ्या उद्योगांत स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी जिल्ह्यातील उद्योजकांना लागणारे कौशल्यपूर्ण मनुष्य बळाची आवश्यकता लक्षात घेऊन त्यानुसार जिल्ह्यातील तरुणांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील जिल्हा उद्योग केंद्र, कौशल्य विकास, स्वयंरोजगार व उद्योजकता विकास विभाग यांनी संयुक्तपणे कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले. जिल्ह्यात रोजगार व स्वयंरोजगार मेळावे आयोजन करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली   कार्यबल समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती देवराज, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक निंबेकर, जिल्हा रोजगार स्वरोजगार, कौशल्य व उद्योजकता विकास विभागाचे सहाय्यक संचालक एस. जी. पवार तसेच उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. स्थानिक तरुणांना उद्योजकांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षित करुन त्यांना मनुष्यबळ उपलब्ध   करुन देता येईल, यातून स्थानि

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 9.49 मि.मि.पावसाची नोंद

          अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.24 -   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.49 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2208.39 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 3.10 मि.मि., पेण-6.00 मि.मि., मुरुड-4.00 मि.मि., पनवेल-7.40 मि.मि., उरण-4.00 मि.मि., कर्जत-7.00 मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-10.00 मि.मि., रोहा-12.00 मि.मि., सुधागड-15.00 मि.मि., तळा-6.00 मि.मि., महाड-11.00 मि.मि., पोलादपूर-6.00 म्हसळा-17.40 मि.मि., श्रीवर्धन-3.00 मि.मि., माथेरान-35.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 151.90 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 9.49 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   70.27    टक्के इतकी आहे. 00000

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे चित्रकला स्पर्धा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.23 : स्त्रीभ्रूण हत्या थांबविणे,माहिलांचे सक्षमीकरण करणे, त्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देणे याबाबत  मुलांमध्ये याबाबत प्रबोधन व्हावे यासाठी जिल्हा विधि सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग यांनी जिल्हा स्तरावर ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ तथा ‘लेक वाचवा लेक‍ शिकवा’ या विषयांवर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये दि.23 ते 25 जुलै 2018 या कालावधीत चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ही पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या दोन गटात विभागून आयोजित करण्यात आली आहे.   प्रत्येक तालुक्यातील तीन उत्कृष्ट चित्रांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल असे जयदीप ज.मोहिते, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे. 00000

स्थानिक सुट्या जाहि

र अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.23 : रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीमधील शासनाच्या सर्व खात्यातील कार्यालयाकरिता स्थानिक सुट्टया जाहिरात करण्यात आल्या असून त्या पुढीलप्रमाणे आहेत.             सोमवार दिनांक 3 सप्टेंबर 2018 रोजी गोपाळकाला, सोमवार दिनांक 17 सप्टेंबर 2018 रोजी गौरी विसर्जन, सोमवार दिनांक 08 ऑक्टोंबर 2018 रोजी सर्वपित्री अमावस्या. 00000

लोकमान्य टिळक यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.23 -   लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या   जयंतीनिमित्त आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.               जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस   तहसिलदार के.डी.नाडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नायब तहसिलदार श्री.वैशंपायन तसेच कर्मचारी वर्ग आदि उपस्थित होते. 00000