Posts

Showing posts from February 20, 2022

रोहा, तळा तालुका हद्दीतील खाडीपट्ट्यात जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाची यशस्वी कारवाई

Image
    अलिबाग, दि.23 (जिमाका):- रोहा, तळा तालुका हद्दीतील कांडणे खुर्द ठिकाणी अलीकडच्या काळात काही व्यक्तींकडून अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरू होती. स्थानिकांना रोजगार नाही, बाहेरचे रेती व्यावसायिक अवैध रेती उत्खनन करीत असल्याने सक्शन पंपावर जप्तीची कारवाई करावी, अशा तक्रारी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर तसेच रोहा प्रांताधिकारी डॉ.यशवंतराव माने यांच्याकडे प्राप्त झाल्या. यापूर्वी कुंडलिकेच्या खाडीपट्ट्यात महसूल विभागाने अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरूद्ध धडक कारवाई केली होती. आताही प्राप्त तक्रारींची तातडीने दखल घेवून, मंगळवार, दि.22 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने यांच्या आदेशान्वये तहसिलदार कविता जाधव व त्यांच्या पथकाने सर्वात मोठी कारवाई केली. या पथकाने केलेल्या कारवाईत 4 सक्शन पंप, 7 होड्या जाळून नष्ट करण्यात आल्या. महसूल पथकाने कांडणे खुर्द, खाजणी खाडीपट्ट्यातील रेती उत्खनन यंत्रणेवर धडक कारवाई केल्याने बेकायदेशीर रेती उत्खनन करणाऱ्या व्यावसायिकांना अवैध गोष्टी थांबविण्याचा थेट इशाराच मिळाला आहे.

दिव्यांग व्यक्तींनी महा-शरद (MAHA-SHARAD) वेब पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन - मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील

अलिबाग, दि.23 (जिमाका):- दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 मधील कलम 2 (झेडसी) अन्वये दिलेल्या परिशिष्टामध्ये दिव्यांगत्त्वाचे 21 प्रकार आहेत. दिव्यांग व्यक्तींना त्यांचे जीवन जगणे सुलभ व्हावे, यासाठी विविध सहाय्यक उपकरणांची आवश्यकता असते. जेणेकरून ते त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करू शकतील व जनसामान्यांप्रमाणे जीवन जगू शकतील. त्यांना दिव्यांगत्वावर मात करण्यासाठी कोणत्या सहाय्यक उपकरणांची आवश्यकता आहे, हे जाणून घेण्यासाठी आवश्यक ती वैद्यकीय चाचणी करून घेणे व त्या आधारे सहाय्यक उपकरणे निश्चित करणे आवश्यक असते. समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संघटना या दिव्यांगांना सुगम्यता प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधनांचा पुरवठा करू इच्छितात. त्यासाठी दानशूर व्यक्ती व दिव्यांग लाभार्थी यांच्यामध्ये दुवा साधला जाण्यासाठी तसेच दिव्यांग व्यक्तींमध्ये जनजागृती करून त्यांची माहिती उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय व विशेष न्याय विभागाने "महा-शरद वेब पोर्टल" वर नोंदणी करण्याचे अभियान सुरू केलेले आहे. याकरिता दिव्यांग व्यक्ती तसेच दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करू

सारळ डाक विभागातील निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या निवारणासाठी पेन्शन डाक अदालतचे 18 मार्च ला आयोजन

अलिबाग, दि.23 (जिमाका):- डाक विभागाच्या कुटुंब निवृतीवेतनधारक व निवृत्ती वेतनधारकाच्या समस्या सोडवण्यासाठी पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई रिजन यांच्याद्वारे पेन्शन अदालत शुक्रवार, दि.18 मार्च रोजी दुपारी 12.00 वाजता पोस्ट मास्टर जनरल, नवी मुंबई रिजन कार्यालय, 2 रा मजला, पनवेल मुख्य पोस्ट ऑफिस इमारत, पनवेल, रायगड येथे आयोजित करण्यात आली आहे. कोविड-19 महामारीच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वयोमानाप्रमाणे स्वत:ची काळजी घेऊन पेन्शन अदालतीला प्रत्यक्ष उपस्थित राहणे टाळावे. यामध्ये निवृत्तीधारकांच्या वेतन व इतर लाभाशी संबधित तक्रारी तसेच जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला आहे, ज्यांना तीन महिन्याच्या आत निवृतीवेतनाची पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणाचा या डाक अदालतीमध्ये निपटारा करण्यात येणार आहे. तसेच न्यायालयात असणारी, कायदेशीर प्रलंबित असणारी प्रकरणे या अदालतीमध्ये समाविष्ट करता येऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे पेन्शनर असोसिएशनकडून आलेल्या प्रकरणावरही या अदालतीमध्ये निर्णय घेता येत नाही. अशी माहिती पोस्ट विभागाकडून देण्यात आली आहे. तक्रारदाराने अर्ज करताना न

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या तातडीच्या निर्णयामुळे बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी

Image
  अलिबाग, दि.23 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या तातडीच्या निर्णयामुळे मुरुड तालुक्यातील मौजे भोईघर येथील टेंभोंडे आदिवासीवाडी येथे होणारा बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले. या घटनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी जनतेला आवाहन केले आहे की, बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना बळी पडू नका. जिल्ह्यातील कातकरी आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना सर्व प्रकारचे शासकीय लाभ, दाखले मिळवून देण्यासाठी, आरोग्य सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी, त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी, त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकारातून कातकरी उत्थान अभियान व सप्तसूत्री कार्यक्रम सर्व स्तरांवरून राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांना दि.21 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 08.00 वाजताच मौजे भोईघर येथील टेंभोंडे आदिवासीवाडी येथे बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी तातडीने मौजे भोईघर येथील टेंभोंडे आदिवासीवाडी येथे जा

संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाचे अभिवादन

Image
  अलिबाग, दि.23 (जिमाका):-   आधुनिक काळातील महान संत, स्वच्छ भारताचे प्रणेते संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तहसिलदार विशाल दौंडकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार संतोष पाटील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 00000

नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे आपले प्रथम कर्तव्य -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Image
      अलिबाग, दि.22, (जिमाका):- कोरोना अजून संपलेला नाही, मास्कची सक्ती कधी काढणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय, मात्र आताच काही   सांगता येत नाही. आता आपल्याला हा जो काळ मिळाला तो लसीकरण वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. साथ शिखरावर असताना लसीकरण करणे कितपत योग्य हे डॉक्टर सांगतील परंतू आता लाट कमी होत असताना लसीकरण वाढविणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे, हे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दूरदृष्यप्रणालीद्वारे केले. अलिबाग तालुक्यातील उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचा भूमीपूजन सोहळा दूरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.22 फेब्रुवारी) रोजी संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दूरदृष्यप्रणालीद्वारे तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती योगिता प