Posts

Showing posts from April 22, 2018

रंग दे महाराष्ट्र द्वारे रंगल्या शाळांच्या भिंती: सामाजिक एकोपा हीच परिवर्तनाची गुरुकिल्ली- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.28:- जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. मात्र सामाजिक परिवर्तन घडवून प्रगती साधायची असेल तर गावात एकोपा असणे आवश्यक आहे. गाव एक झालं तर काहीही साध्य करु शकते. सामाजिक एकोपा हीच खरी परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे', असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज मुठवली ता. माणगाव येथे केले.यावेळी ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक उपस्थित होते. या अभियानांतर्गत निवडलेल्या निवडक गावातील कामांची पाहणी करुन ग्रामस्थांशी चर्चा या पथकाने आज केली. त्या अंतर्गत आज सकाळी मुठवली या गावी आज सकाळी ग्रामस्थांशी सर्व अधिकाऱ्यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्यासह जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव,प्रांताधिकारी देगावकर, तहसिलदार उर्मिला पाटील, गटविकास अधिकारी खेडकर,उपविभागीय कृषि अधिकारी येवले तसेच स्वदेस फाऊंडेशचे तुषार ईनामदार तसेच ग्राम सामाजिक परिवर्तक लहू दोलताडे यांच्यासह ग्रामस्थ महिला, पुरुष मोठ्

पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.28- राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड हे सोमवार दि.30 एप्रिल रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे- सोमवार   दि.30 रोजी   रात्री साडे नऊ वा.शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे आगमन व राखीव. मंगळवार दि.1 मे रोजी सकाळी आठ वाजता महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिन उत्सवानिमित्त राष्ट्रध्वजवंदन व संचलन समारंभास उपस्थिती.स्थळ: पोलीस परेड ग्राउंड, अलिबाग. सकाळी सव्वा नऊ वा,. अलिबाग जि. रायगड येथून मोटारीने पलावा, डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण. ०००००

कामगार मंत्री ना.संभाजी पाटील निलंगेकर यांचा जिल्हा दौरा

अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.28- कौशल्य् विकास व उद्योजकता,कामगार,भूकंप पुनर्वसन मंत्री ना. संभाजी पाटील निलंगेकर हे रविवार दि.29 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे- रविवार दि. 29 रोजी सकाळी 10 वाजता सी.के.टी पनवेल हायस्कुल, पनवेल जि.रायगड येथे आगमन. भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे 22 वे त्रैवार्षिक अधिवेशनास उपस्थिती.स्थळ: सी.के.टी पनवेल हायस्कुल, पनवेल.दुपारी बारा वाजता सी.के.टी पनवेल हायस्कुल, पनवेल येथून मुंबईकडे प्रयाण. ०००००

अनधिकृत शाळांची यादी जाहीर

अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.27:- शासनाच्या परवानगी शिवाय रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी अनधिकृत शाळा सुरु आहेत. अशा अनधिकृत शाळा शैक्षणिक वर्ष 2017-18 या मध्ये शासनाची परवानगी प्राप्त झाल्याशिवाय संबंधित संस्थांनी सुरु करु नयेत. अशा अनधिकृत प्राथमिक शाळा सुरु असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित गट शिक्षणाधिकारी यांनी RTE-2009 च्या कायद्याप्रमाणे व याबाबतच्या महाराष्ट्र शासन नियमावली 2011 नुसार उचित कार्यवाही करावी. पालकांनी आपल्या पाल्यांस अशा शाळांना मान्यता नसल्यामुळे प्रवेश घेवू नये. अन्यथा अनधिकृत शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा अन्य मान्यता प्राप्त प्राथमिक शाळेतून घेतली जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान   झाल्यास त्यास पालकच जबाबदार राहतील याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शेषराव बढे, यांनी केले आहे. शिक्षण विभागाने दिलेली जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी याप्रमाणे- अनधिकृत शाळांची नावे पुढीलप्रमाणे- पाली- रुता गावंड संस्था लिटील वंडर्स स्कूल परळी, रोहा-1) रायगड एज्युकेशन सोसा.इग्लिश मिडियम स्कूल

क्रीडा नैपुण्य चाचणी कार्यक्रम जाहीर

            अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.26- क्रीडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य , पुणे अंतर्गत संपुर्ण राज्यात शारिरीक शिक्षण व क्रीडा क्षेत्राचा दर्जा उंचविण्यासाठी आणि राज्यातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी वैज्ञानिक पद्धती , अद्यावत उपकरणे आणि प्रशिक्षण यावर अधिकाधिक प्रमाणात भर देण्याची गरज आहे . या उद्देशाने राज्यातील खेळ , परंपरा , अंत : सामर्थ्य व खेळ सुविधा लक्षात घेऊन राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा आणि इंग्लिश मिडीयम शालेय शिक्षणासह बालेवाडी , पुणे येथे शिवछत्रपती क्रीडापीठाची स्थापना केली आहे .             शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत राज्यात विविध ठिकाणी क्रीडा प्रबोधीनी सुरू आहेत . या क्रीडा प्रबोधीनीमध्ये  ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुला - मुलींची भारतीय क्रीडा प्राधिकरणाने पुरस्कृत केलेल्या बॅटरी ऑफ टेस्ट द्वारे निवड करून त्यांना विविध खेळाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाद्वारे दिले जाते . या खेळाडूच्या निवास , भोजन , प्रशिक्षण , शिक्षण व इतर संपूर्ण खर्च महाराष्ट्र शासन कर

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम

अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.26- महाराष्ट्र विधान परिषदेच्या सहा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणूक-2018 चा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहिर केला असून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. या निवडणूकीसाठी स्थानिक मतदारांची  कार्यक्रम पुढीलप्रमाणे- अधिसूचना जारी करणे दि.26 एप्रिल, नामांकन दाखल करण्याचा अंतिम दिनांनक गुरुवार दि.3 मे, दाखल उमेदवारी अर्जांची छाननी 4मे , अर्ज माघारीचा अंतिम दिनांक 7 मे, मतदान दिनांक 21 मे, मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी चार वा. निवडणूक प्रक्रिया पुर्ण करण्याचा दिनांक 29 मे 2018. ०००००

मे महिन्यात लोकशाही दिन नाही

अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.26- रायगड जिल्ह्यात विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंध द्विवार्षिक निवडणूक-2018भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या दिनांकापासून निवडणूकीचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत दि.(20 एप्रिल ते 29 मे 2018) पर्यंत आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मे -2018 मधील दिनांक सोमवार दि.7 मे रोजीचा लोकशाही दिन रद्द् करण्यात आला आहे,असे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, रायगड यांनी कळविले. ०००००

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम

अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.26- राज्य निवडणूक आयोगाने जून ते सप्टेंबर 2018 पर्यंत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका, सरपंच पदासह सर्व सदस्य् पदांसाठी तसेच रिक्त पदांच्या पोट निवडणूकांसाठी निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे . यात रायगड जिल्ह्यातील 187 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत तर 158 जागांसाठी पोटनिवडणूका होणार आहेत. निवडणुक कार्यक्रम याप्रमाणे- निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करणे- शुक्रवार दि.27 एप्रिल. नामनिर्देशन पत्रे मागविण्याचा व सादर करणे- सोमवार दि 7 मे ते शनिवार 12 मे  2018 रोजी. सकाळी 11 ते दुपारी साडेचार वा.पर्यंत.नामनिर्देशन पत्रांची छाननी- सोमवार दि.14 मे रोजी सकाळी 11 ते छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी)बुधवार दि.16 मे रोजी दुपारी तीन  वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविण्याऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ- बुधवार दि. 16 मे रोजी दुपारी तीन वाजल्यानंतर. आवश्यक असल्यास मतदान रविवार दि.

केंद्रीय मंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.26- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे शनिवार दि. 28 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. शनिवार दि.28 रोजी दुपारी दीड वाजता महाड एमआयडीस, तालुका महाड जि.रायगड येथे आगमन.सायं. सहा वा. महाड एमआयडीसी, तालुका महाड जि.रायगड येथून फाईव्ह् स्टार एमआयडीसी सॅडोज कंपनी महाड कडे प्रयाण. सायं.सहा वा. पंचवीस मि.नी फाईव्ह स्टार एमआयडीसी सॅडोज कंपनी ता. महाड येथे आगमन. सायं. सात वा. फाईव्ह स्टार एमआयडीसी सॅडोज कंपनी महाड येथून रेवदंडा ता.अलिबागकडे प्रयाण. रात्री नऊ वा. नाना नानी पार्क, रेवदंडा पारनाका,क्रिकेट ग्राऊंड, तालुका अलिबाग जि.रायगड येथे आगमन.रात्री साडेनऊ वा. रेवदंडा पारनाका, अलिबाग येथून साळाव मुरुड कडे प्रयाण. रात्री दहा वा. वेलस्पन,विश्रामगृह साळाव (मुरुड)ता. अलिबाग जि. रायगड येथे आगमन. रविवार दि.29 रोजी सकाळी साडेनऊ वाजता  वेलस्पन,विश्रामगृह साळाव (मुरुड) ता. अलिबाग जि. रायगड  येथून मुंबईकडे प्रयाण. ०००००

महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन मुख्य शासकीय समारंभ सकाळी आठ वा.

अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.26- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन दिनानिमित्त रायगड जिल्हास्तरीय मुख्य शासकीय समारंभ  मंगळवार दि.1 मे रोजी अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न ,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते  मुख्य शासकीय ध्वजारोहण  कार्यक्रम होणार आहे. यावेळी राष्ट्रध्वज वंदन, संचलन ही होणार आहे. या मुख्य सोहळ्यास सर्व नागरिकांना उपस्थित राहता यावे यासाठी मुख्य शासकीय समारंभ राज्य भर एकाच वेळी सकाळी आठ  वा. आयोजित करण्यात आला आहे. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ आयोजित करावासा वाटल्यास त्यांनी तो सकाळी सव्वा सात वाजण्यापूर्वी किंवा सकाळी नऊ वाजेनंतर करावा. जास्तीत जास्त व्यकतींना या मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे यासाठी सकाळी सव्वा सात ते 9 वा.दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करु नये.  असे शासनाने परिपत्रकाद्वारे सूचित

जागतिक हिवताप दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम

Image
अलिबाग, जि. रायगड, (जिमाका) दि.25- जागतिक हिवताप दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हिवतापासंदर्भात जनजागृतीसाठी प्रभातफेरी, किटकजन्य आजारांचे प्रदर्शन करण्यात आले.  या कार्यक्रमासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.देसाई, डॉ.फुटाणे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.पाटील मॅडम, हिवताप पर्यवेक्षक नांदेडकर, वर्तक व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. डासांमार्फत पसरणारे विविध आजारांमध्ये पूर्वी केवळ हिवताप (मलेरीया) हा आजार सर्वज्ञात होता. परंतु आता डासांमार्फत पसरणारे विविध आजार जनतेस भेडसावू लागले आहेत. डेंग्यू, चिकुनगुनिया, जापनीज मेंदूज्वर, हत्तीरोग इत्यादी आणि या आजारांवर वेळीच उपचार न घेतल्यास नागरीकांचे आरोग्य धोक्यात येते. प्रसंगी त्यांचे प्राणही जाऊ शकतात. डासांमार्फत पसरणारे आजार पावसाळ्यात डासोत्पत्ती वाढल्याने वाढू शकतात. त्यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वीच अशा आजारांबाबत जनजागृती होण्यासाठी 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षाचे घोषवाक्य आहे, 'तयारी हिवतापास हर

गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अलिबाग, जि. रायगड, (जिमाका) दि.25- महाराष्ट्र शासनाने शासन निर्णयाद्वारे संपूर्ण राज्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्याचे धोरण निश्चत केले आहे. या योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत. या योजने अंतर्गत जिल्ह्यातील 0 ते 250 हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या असलेल्या गाव तलाव, पाझर तलाव, साठवण तलाव, लघु पाटबंधारे योजने मधील गाळ फक्त लाभधारकाच्या (शेतकरी, ग्रामपंचायत, शासनाचे सर्व विभाग) क्षेत्रात टाकणे अभिप्रेत आहे. सदर योजने अंतर्गत लाभधारकांना आवश्यक गाळ काढण्याच्या यंत्र सामुग्रीचे इंधन खर्च शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे. गाळ वाहतूक खर्च संबंधित लाभधारकाने स्व:खर्चाने करणे अपेक्षित आहे. या योजनेच्या मागणी करीता ऑफलाईन पध्दतीने संबंधित तहसीलदार यांचेकडे मागणी करता येईल. ऑनलाईन पध्दतीने महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या पोर्टलवर मागणी करता येईल. ही मागणी वर्षभरात केव्हाही करता येणार आहे. तरी इच्छुक लाभधारकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचे जिल्हा स्तरीय समिती सदस्य सचिव  यांनी केले आहे. ०००००

कृषि विभागाचा उपक्रम तालुकास्तरावर 2 मे रोजी किसान कल्याण कार्यशाळा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25-   प्रधानमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार देशभरात दि.14 एप्रिल ते दि.5 मे या कालावधीत “ ग्राम स्वराज्य अभियान ” राबविण्यात येत आहे. या अभियान कालावधीत  बुधवार दि.2 मे रोजी राज्यात सर्व तालुकास्तरावर किसान कल्याण कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी कृषि व कृषि सलग्न विभागाशी संबंधित विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्यासाठीचे धोरण, कृषि विभागाच्या विविध योजना या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याच दिवशी राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत खरीप नियोजन बैठक आयोजित केली आहे.  तालुकास्तरावर आयोजित कार्यशाळेत मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण व यामध्ये देण्यात आलेल्या खत व्यवस्थापन करणेसाठी आवश्यक प्रशिक्षण, कीटक नाशके फवारताना घ्यावयाची काळजी, शेतमाल काढणी पश्चात घ्यावयाची काळजी, शेतमाल स्वच्छता व प्रतवारीसाठी आवश्य