Posts

Showing posts from June 14, 2020

चक्रीवादळामुळे झालेले नुकसान व प्रशासन करीत असलेल्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक संपन्न

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19- जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामुळे झालेले नुकसान व प्रशासन करीत असलेल्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.        यावेळी खा.सुनिल तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, सर्जेराव मस्के पाटील (सा.प्र.),   जिल्हा कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बी.के आर्ले, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा आर.पी.कोळी, शाखा अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा परिषद प

“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 1 हजार 451 जणांनी केली करोनावर मात, सध्याची रुग्ण संख्या 525

वृत्त क्रमांक :- 687                                                                                                 दिनांक :- 18 जून 2020          अलिबाग,जि.रायगड, दि.18 (जिमाका) : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 451 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 84 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve   असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-297, पनवेल ग्रामीण-89, उरण-29, खालापूर-4 कर्जत-19, पेण-26, अलिबाग-27, मुरुड-4, माणगाव-6,   रोहा-2, म्हसळा-11, महाड-11 अशी एकूण 525 झाली आहे.             कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-780, पनवेल ग्रामीण-246, उरण-167, खालापूर-10, कर्जत-26, पेण-21, अलिबाग-38 मुरुड-13, माणगाव-51, तळा-12, रोहा-23, सुधागड-2, श्रीवर्धन-9, म्हसळा-18, महाड-15 पोलादपूर-20 अशी एकूण 1 हजार 451 आहे.                      आज दिवसभरातही

चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांच्या मदत वाटपासाठी दि.20 व 21 जून या शासकीय सुट्टयांच्या दिवशीही शासकीय कार्यालये राहणार सुरु

अलिबाग,जि.रायगड, दि.18 (जिमाका) : रायगड जिल्ह्यामध्ये दि.3 जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिके, मालमत्तेचे नुकसान झाले असून जिल्हा प्रशासनाकडून तातडीने शेती पिके, मालमत्तांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज पाहता झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत वाटप करणे आवश्यक आहे.   दि. 20 व 21 जून या दिवशी शासकीय सुट्टी आहे. मात्र नुकसानग्रस्त जनतेला मदत वाटपावर या शासकीय सुट्टीचा परिणाम होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणे, पंचनामे मंजूर करणे, मंजूर पंचनाम्याप्रमाणे व शासनाच्या आदेशानुसार आपदग्रस्तांना द्यावयाच्या मदतीची देयके तयार करणे, ही देयके कोषागारात सादर करुन मंजूर करून घेणे व मंजूर रक्कम संबंधित बँकेमार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करणे, या सर्व कामांसाठी दि. 20 व 21 जून या शासकीय सुट्टीच्या दिवशीही सर्व कार्यालये सुरू ठेवून मदत वाटपाची कार्यवाही सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.   यासाठी जिल्ह्यात

चक्रीवादळात नुकसान झालेल्या रोहा तालुक्यातील नुकसानग्रस्तांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते पत्रे वाटप

अलिबाग,जि.रायगड, दि. 18 (जिमाका) :-  जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे  जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे.  सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लि.रोहा व कर्वे सामाजिक संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चक्रीवादळात नुकसान झालेल्या रोहा तालुक्यातील बारसोली आदिवासी वाडीतील लाभार्थ्यांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते पत्र्याचे वाटप करण्यात आले. यावेळी गाव कमिटी अध्यक्ष नामदेव म्हसकर, सरपंच सचिन रटाटे, यशवंत रटाटे, उपसरपंच, रोहिदास पाशीलकर, उत्तम म्हसकर,  बी.एन. कदम, सी.बी.जोशी, दीपक चिपळूणकर आदि उपस्थित होते. ०००००

चक्रीवादळात नुकसान झालेल्या पेण तालुक्यातील नुकसानग्रस्तांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द

Image
अलिबाग,जि.रायगड, दि. 18 (जिमाका) :-   जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे   जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे.   या चक्रीवादळात नुकसान झालेल्या   पेण तालुक्यातील भिक्या धर्मा पवार, बेलवडे बुद्रुक (प्रधानवाडी), रु.1 लाख 50 हजार, नथू रामदास वाघमारे, मुंगोशी (प्रधानवाडी), रु.72 हजार, वामन नामदेव आधान, अंधार्ने, रु. 1 लाख, सोमा गणपत वाघमारे, बोरगाव, रु.1 लाख 50 हजार,   असे एकूण 4 लाख 72 हजार   रुपयांचे   मदतीचे धनादेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार रवींद्र पाटील, डी.बी.पाटील, जि.प.सदस्य प्रभाकर म्हात्रे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार डॉ.अरूणा जाधव, मुख्याधिकारी अर्चना दिवे, वसुधा पाटील, दयानंद भगत, वैकुंठ पाटील, चैताली पाटील, अविनाश म्हात्रे, परशुराम मोकल, अरुण नाईक, नरेश गावंड आदि उपस्थित होते. 0000

चक्रीवादळात नुकसान झालेल्या पनवेल तालुक्यातील नुकसानग्रस्तांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द

अलिबाग,जि.रायगड, दि. 17 (जिमाका) :-  जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे  जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे.  या चक्रीवादळात नुकसान झालेल्या  पनवेल तालुक्यातील खैरवाडी गारमाळ येथील महादीबाई गोमा थोराड, पूर्णतः नुकसान रक्कम 1 लाख 56 हजार 100, पिंट्या मारुती थोराड पूर्ण नुकसान रक्कम रुपये 1 लाख 13 हजार 500, पोशा आंबो थोराड मध्यम नुकसान  रूपय 95 हजार 100, अंबो नामा थोराड मध्यम नुकसान रक्कम रुपये 39 हजार 100 असे एकूण 4 लाख 3 हजार 800 रुपयांचे  मदतीचे धनादेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी, पनवेल दत्तात्रय नवले, तहसिलदार, अमित सानप, नायब तहसिलदार, राहुल सूर्यवंशी, विजय कुमार साळवे, प्र.गटविकास अधिकारी, श्री. भोळे आदि उपस्थित होते. 0000

उप प्रादेशिक परिवह कार्यालय, पेण येथे वाहन विषयक व लायसन्स विषयक सर्व कामे सुरु

अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका)- करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी परिवहन कार्यालयातील गर्दी कमी करणे आवश्यक असल्याने प्रतिबंधात्मक व खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनमुळे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथील वाहन व लायसन्स   विषयक कामकाज   स्थगित करण्यात आले होते.               उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे दि.18 मे 2020 पासून नवीन नोंदणी विषयक तर दि01 जून 2020 पासून परिवहन वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देणे व नुतनीकरण करण्याचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. तसेच दि.18 जून 2020 पासून शिबीर कार्यालयातील कामे वगळता उर्वरित सर्व कामे जसे अनुज्ञप्ती जारी करणे, दुय्यम अनुज्ञप्ती देणे, अनुज्ञप्ती नुतनीकरण, पत्ता बदल, वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहन विषयक सर्व कामे, परवाना विषयक सर्व कामे व वायुवेग पथक कामकाज सुरु करण्यात येत आहेत.             या सर्व कामकाजाकरिता आगाऊ वेळ निर्धारण प्रणालीवर (अपॉईटमेंट प्रणालीवर) निर्धारित करणे आवश्यक राहील. शिकाऊ अनुज्ञप्ती व ड्रायव्हींग टेस्टसाठी येणाऱ्या अर्जदारांनी मास्क व हँडग्लोव्हज घातलेले असतील तरच अर्जदारांना कार्यालयात प्

पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा दौरा कार्यक्रम

अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका)- उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे.   बुधवार दि.17 जून, 2020 रोजी दुपारी 2.30 वा. सुनिती शासकीय निवासस्थान येथून मोटारीने पनवेल, जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. पनवेल येथे आगमन व मौजे खैरवाडी, ता.पनवेल येथे निसर्ग चक्रीवादळाने बाधित भागाची पाहणी. सायं. 4.00 वा. खैरवाडी ता.पनवेल येथून बिड, ता.खालापूरकडे प्रयाण. (हाळरबुग मार्गे). सायं. 4.30 वा. बिड येथे आगमन व जामरुंग आदिवासीवाडी येथे निसर्ग चक्रीवादळ बाधित भागाची पाहणी. सायं. 5.00 वा. बिड, ता.खालापूर येथून खोपोली नगरपरिषदेकडे प्रयाण. सायं. 5.15 वा. खोपोली नगरपरिषदेस भेट व अधिकाऱ्यांसमवेत कोविड-19 च्या संक्रमणाबाबत चर्चा. सायं. 5.45 वा. खोपोली येथून चिंचवली, गोहे आदिवासीवाडी, ता.खालापूरकडे प्रयाण. सांय. 6.00 वा. चिंचवली गोहे आदिवासीवाडी येथील निसर्ग चक्रीवादळ बाधित भागाची पाहणी. सायं. 6.30 वा. चिंचवली येथून पाली-वाकण-कोलाड मार्गे सुतारवाडी ता.रो

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान भरपाईबाबत एनडीआरएफच्या निकषात बदल करून मदत करावी कु. तटकरे यांची केंद्रीय पथकाकडे मागणी

                अलिबाग,जि.रायगड, दि.17 (जिमाका) : रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणत मदतीची अपेक्षा आहे .    केंद्र शासनाने एनडीआरएफ    निकषात बदल करून सुधारित निकषानुसार मदत करावी ,   अशी मागणी उद्योग ,   खनिकर्म ,   पर्यटन ,   फलोत्पादन ,   विधी व न्याय राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी केंद्रीय पथकाचे अध्यक्ष श्री.रमेश कुमार जी (सह सचिव ,   राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) यांना निवेदनाद्वारे केली.                रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी केंद्र शासनाचे आंतर मंत्रालयीन पथक काल पासून तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आले आहे. काल आदिती तटकरे यांनी पथकाची भेट घेवून रायगड जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.              चक्रीवादळामुळे झालेले नुकसान हे मोठे असून नुकसानग्रस्तांचे झालेल्या नुकसानीनुसार पंचनामे सुरू आहेत अशी मागणी देखील केंद्रीय पथकाला केली आहे.                कु.तटकरे म्हणाल्या ,   1891   नंतरचे   सर्वात मोठे असे चक्रीवादळ दि.  

तळा नगरपंचायतीला मिळणार वावे धरणातून पाणी; नवीन पाणी पुरवठा योजनेला मंजूरी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांना यश

अलिबाग,जि.रायगड (जिमाका) दि.17 :- तळा नगरपंचायत हद्दीतील पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी तसेच नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यास आज शासनातर्फे मंजूरी मिळाली आहे. वावे लघुपाटबंधारे योजनेतून तळा नगरपंचायतीला पाणीसाठा आरक्षित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.   रायगड जिल्ह्यातील तळा नगरपंचायत हद्दीत पाण्याचासाठा कमी असल्याकारणाने पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने नगरपंचायतीने मौजे वावे हवेली येथील लघु पाटबंधाऱ्यातून पाणीसाठा उपलब्ध व्हावा, याकरिता नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता.                   यासंदर्भात तळा नगरपंचायतीच्या वतीने लोकप्रतिनिधींनी राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांची भेट घेवून समस्या मांडली होती. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तात्काळ दखल घेत राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्याकडे संबंधित विषयावर बैठक घेवून वावे लघुपाटबंधारे योजनेतून तळा नगरपंचायतीस पाणीसाठा उपलब्ध करून देण्याकरिता नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून मिळणेबाबत मागणी केली होती. या मागणीला अनुसरून आज तळा नगरपंचायतीस वावे लघुपा

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 13 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 13.55 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 333.86 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 8.00 मि.मि., पेण-8.00 मि.मि., मुरुड-25.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-66.40 मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-7.00 मि.मि., रोहा-6.00 मि.मि., सुधागड-13.00 मि.मि., तळा-2.00 मि.मि., महाड-9.00 मि.मि., पोलादपूर-7.00, म्हसळा-12.00मि.मि., श्रीवर्धन-32.00 मि.मि., माथेरान-16.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 216.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 13.55 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   10.62 टक्के इतकी आहे. 0000

उरण तालुक्यातील तांडेलनगर-चाणजे परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.17 (जिमाका) : जिल्ह्यातील उरण तालुक्यातील तांडेलनगर-चाणजे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहत असलेले तांडेलनगर-चाणजे ता.उरण येथील रुग्ण राहत असलेल्या घराचा परिसर, प्रितम बळीराम खाडे यांचे घर, पूर्वेस महेंद्र राम पाटील यांचे घर, पश्चिमेस रिकामा परिसर, दक्षिणेस दयानंद तुकाराम म्हात्रे यांचे घर, उत्तरेस कमल मंगल परदेशी यांचे घर हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारव

उरण तालुक्यातील जेएनपीटी टाऊनशिप परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.17 (जिमाका) : जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जेएनपीटी टाऊनशिप येथे दोन व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहत असलेले जेएनपीटी टाऊनशिप ता.उरण येथील रुग्ण राहत असलेल्या घराचा परिसर, जेएनपीटी टाऊनशिप, सेक्टर-1, बिल्डिंग नं.22, पूर्वेला 20 व 22 बिल्डिंग मधील गल्ली, पश्चिमेस बिल्डिंग 22 कडे जाणारा मुख्य रस्ता, दक्षिणेस प्लॉट नं.बी-25, सेक्टर-1, बिल्डिंगमध्ये जाणारा रस्ता हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 18

उरण तालुक्यातील चाणजे डाऊरनगर परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.17 (जिमाका) : जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चाणजे डाऊरनगर येथे दोन व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहत असलेले चाणजे डाऊरनगर ता.उरण येथील रुग्ण राहत असलेल्या घराचा परिसर, रवि गोपीनाथ जाधव यांचे घर, पूर्वेला सुरेंद्र आत्माराम पाटील यांचे घर, पश्चिमेला सदानंद दामोदर कोळी यांचे घर, उत्तरेला शेतजमीन, दक्षिणेला गावाचा उर्वरित भाग हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात

उरण तालुक्यातील नागाव परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.17 (जिमाका) : जिल्ह्यातील उरण तालुक्यातील नागाव येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहत असलेले नागाव ता.उरण येथील रुग्ण राहत असलेल्या घराचा परिसर, विराज अनिल घरत यांचे घर, पूर्वेला मोकळी जागा, पश्चिमेला खाजगी रस्ता व मोकळी जागा, उत्तरेला मोकळी जागा, दक्षिणेला हर्षद म्हात्रे यांचे बंद घर हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस

उरण तालुक्यातील कोटनाका येथील मातृछाया,साई-तिसाई बिल्डिंग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.17 (जिमाका) : जिल्ह्यातील उरण तालुक्यातील कोटनाका येथे दोन व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहत असलेले कोटनाका ता.उरण येथील मातृछाया बिल्डिंग, साई-तिसाई बिल्डिंग, दुसरा मजला ही इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. ००००

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 28 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 28.54 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 320.31 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 28.00 मि.मि., पेण-18.00 मि.मि., मुरुड-34.00 मि.मि., पनवेल-2.20 मि.मि., उरण-2.00 मि.मि., कर्जत-42.00 मि.मि., खालापूर-45.00 मि.मि., माणगांव-25.00 मि.मि., रोहा-25.00 मि.मि., सुधागड-12.00 मि.मि., तळा-28.00 मि.मि., महाड-12.00 मि.मि., पोलादपूर-25.00, म्हसळा-42.00मि.मि., श्रीवर्धन-65.00 मि.मि., माथेरान-51.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 456.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 28.54 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   10.19 टक्के इतकी आहे. 0000

एआरटी केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे एचआयव्ही संसर्गितांना धान्याचे वाटप

अलिबाग,जि.रायगड, दि.16(जिमाका) : आधार ट्रस्ट पनवेल संस्थेमार्फत एआरटी केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे नियमित एआरटी औषधे घेण्याकरीता आलेल्या एचआयव्ही संसर्गितांना जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग, डॉ. प्रमोद गवई यांच्या मार्गदर्शनानुसार अत्यंत आवश्यक अशा धान्याचे वाटप (दि.15 जून रोजी) करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, संजय माने, जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक नवनाथ लबडे,    जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, रायगड, पांडुरंग शिंदे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, डॉ.नालंदा तसेच आधार ट्रस्ट पनवेलचे   सुनील पटेल, जागृती गुंजाळ, हेमंत माळी आणि   जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, रायगड व एआरटी   अलिबाग येथील कर्मचारी उपस्थित होते.             आधार ट्रस्ट पनवेल यांच्याकडून अलिबाग येथील एआरटी केंद्रामध्ये   उपचाराकरीता आलेल्या   40 एचआयव्ही संसर्गित यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे   पनवेल, खालापूर, कर्जत येथील 110 एचआयव्ही संसर्गित यांना तांदूळ 3 किलो, गहू 5 किलो, तूरडाळ 1 किलो, मुगडाळ 1 किलो, चणाडाळ 2 किलो,

जिल्ह्यातील 1 हजार 53 गावांना तर जवळपास 4 लाख वीज ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीतपणे सुरु

अलिबाग,जि.रायगड, दि.15(जिमाका) : जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे   जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झाली. गावोगावी मोठ्या प्रमाणावर विजेच्या खांबांचे नुकसान झाल्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.   मात्र प्रशासनाने जलदगतीने कामाला सुरुवात करुन   वादळामुळे झाडे पडून बंद पडलेले रस्ते झाडे बाजूला करुन पूर्ववत सुरु करण्यासाठी तसेच जिल्ह्यातील वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरु करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु केले. निसर्ग   चक्रीवादळामुळे   वीजपुरवठा खंडित झालेल्या जिल्ह्यातील 1   हजार 976   गावांपैकी 1 हजार 53 गावातील वीजपुरवठा सुरु करण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. जिल्ह्यातील 6 लाख 38 हजार 859 वीज ग्राहकांपैकी 4 लाख 25 हजार 305 वीज ग्राहकांना वीज पुरवठा सुरळीतपणे मिळण्यास प्रारंभ झाला आहे. चक्रीवादळामुळे बंद पडलेले अति उच्च दाबाचे चारही उपकेंद्रे पूर्ववत सुरू झाले आहेत.   जिल्ह्यातील 32 उपकेंद्र बंद पडले होते. त्यापैकी 29 उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. नादुरुस्त झालेल्या   6 हजार 773 रोहित्रांपैक

“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 1 हजार 345 जणांनी केली करोनावर मात, सध्याची रुग्ण संख्या 426

         अलिबाग,जि.रायगड, दि.15(जिमाका) : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 345 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 63 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve   असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-262, पनवेल ग्रामीण-71, उरण-15, खालापूर-3, कर्जत-15, पेण-13, अलिबाग-13, मुरुड-4, माणगाव-7,   रोहा-1, म्हसळा-11, महाड-11 अशी एकूण 426 झाली आहे.             कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-709, पनवेल ग्रामीण 225, उरण-166, खालापूर-10, कर्जत-25, पेण-18, अलिबाग-36, मुरुड-13, माणगाव-49, तळा-12, रोहा-23, सुधागड-2, श्रीवर्धन-9, म्हसळा-18, महाड-10 पोलादपूर-20 अशी एकूण 1 हजार 345 आहे.                      आज दिवसभरातही पनवेल मनपा-36, पनवेल ग्रामीण-5, उरण-7, पेण-5, माणगाव-3, असे   एकूण   56 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत

चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान पाहणीसाठी केंद्र शासनाचे आंतर मंत्रालयीन पथक येणार रायगड जिल्ह्यात

अलिबाग,जि.रायगड, दि.15 (जिमाका) :   जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे   जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्याकरिता केंद्र शासनाचे आंतर मंत्रालयीन पथक रायगड जिल्ह्यात दि. 16   जून रोजी येणार आहे. त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे :- मंगळवार दि.16 जून, 2020 रोजी सकाळी 9.00 वा. भाऊचा धक्का, मुंबईकडे प्रयाण. सकाळी 9.15 वा. भाऊचा धक्का, मुंबई येथे आगमन व रो-रो बोटीने मांडवा जेट्टी, जि.रायगड कडे प्रयाण.   सकाळी 10.00 वा. मांडवा जेट्टी जि.रायगड येथे आगमन व मोटारीने नागाव ता.अलिबागकडे प्रयाण. सकाळी 10.40 वा. नागाव येथे आगमन व नुकसानग्रस्त भागाची पाहणी.   सकाळी 11.20 वा. चौल येथे आगमन व नुकसानग्रस्त भागाची पाहणी.   दुपारी 12.20 वा. काशिद ता.मुरुड येथे आगमन व नुकसानग्रस्त भागाची पाहणी.   दुपारी 1.10 वा. मुरुड येथे आगमन.   दुपारी 1.10 ते 2.00 वा. जिल्हाधिकारी यांचे जिल्ह्यातील चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबतचे सादरीकरण व राखीव मुरुड. दुपारी 2.00 वा. दिवेआगर,ता.श्रीवर्धनकडे प्रयाण. दुपारी 3.0

उरण तालुक्यातील सुरकीचा पाडा, चाणजे वगळले Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) प्रतिबंधित क्षेत्रातून

अलिबाग,जि.रायगड, दि.11 (जिमाका) : जिल्ह्यातील उरण तालुक्यातील सुरकीचा पाडा, चाणजे येथे करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या घराच्या पूर्वेला शंकर अर्जून कोळी यांच्या घराशेजारील गल्ली तसेच गोरख आयत्या पाटील व हरिश्चंद्र आयत्या पाटील यांच्या घरामधील गल्ली, पश्चिमेला प्रभाकर गजानन थळी व रविंद्र धर्मा थळी तसेच दयानंद हॉटेलची गल्ली यांच्या घरामधील गल्ली, दक्षिणेला किशोर काशिनाथ म्हात्रे व संजय धनाजी चव्हाण यांच्या दुकानामधील गल्ली तसेच मच्छिंद्र बाळाराम पाटील ते जितेंद्र हरि नाखवा यांच्या घरामधील गल्ली व भवानी चौक येथील जेटीकडे जाणारा अर्धा रस्ता, उत्तरेला उर्वरित सुरकीचा पाडा   तसेच या झोन मधील क्षेत्र वाढवून ते करोना बाधित रुग्ण राहत असलेल्या घरापासून पूर्वेला डॉ.प्रकाश नाखवा यांचे घराजवळील रस्ता, पश्चिमेला संजय मधुकर नाखवा व सत्यम गजानन कोळी यांचे घरामधील गल्ली, दक्षिणेला जेटी कडील भवानी चौक, उत्तरेला रामेश्वर प्रोव्हिजन स्टोअर बाजूची गल्ली हा वाढीव परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बा

कर्जत तालुक्यातील मौजे नेरळ ममदापूर परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.13 (जिमाका) : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे नेरळ ममदापूर येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहत असलेले मौजे नेरळ ममदापूर, ता.कर्जत येथील सुधीर जाधव, गोकुळदा इ विंग यांचे घर, उत्तरेस शेती मोकळी जागा पर्यंत, दक्षिणेस प्रदिप ढगे यांच्या बंगल्यापर्यंत, पूर्वेस सेंट्रल रेल्वे पर्यंत, पश्चिमेस इमारतीचे काम चालू आहे हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येई

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 15 मि.मि.पावसाची नोंद

      अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 15.80 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 291.78 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 2.00 मि.मि., पेण-21.00 मि.मि., मुरुड-38.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-4.80 मि.मि., खालापूर-22.00 मि.मि., माणगांव-61.00 मि.मि., रोहा-5.00 मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-16.00 मि.मि., महाड-27.00 मि.मि., पोलादपूर-13.00, म्हसळा-10.00मि.मि., श्रीवर्धन-24.00 मि.मि., माथेरान-9.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 252.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 15.80 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   9.28 टक्के इतकी आहे. 0000

चक्रीवादळात नुकसान झालेल्या रोहा तालुक्यातील नुकसानग्रस्तांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द

Image
अलिबाग,जि.रायगड, दि. 14 (जिमाका) :-   जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे   जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे.   या चक्रीवादळात नुकसान झालेल्या रोहा तालुक्यातील ऐनघर ग्रामपंचायतीतील नुकसानग्रस्त विश्वनाथ विनायक गायकवाड-हेदवली रु.15 हजार, हिरा दयाराम वारगुडी-खैरवाडी रु.15 हजार, तानाजी गुणाजी वारगुडी-खैरवाडी रु.15 हजार, लक्ष्मण मोरा शिर्के-ऐनघर रु.15 हजार, मंगला दिनेश कातकरी-सुकेली आवाडी रु.15 हजार, संगिता गंगाराम बावदाने- सुकेली धनगरवाडी रु.15 हजार, देवूबाई शंकर बावदाने- सुकेली धनगरवाडी रु.15 हजार, पार्वती काशिराम शिद- सुकेली गणपतीवाडी रु.15 हजार, सुरेश भाग्या वाघमारे-हेदवली मांडवशेत रु.15 हजार, असे एकूण 1 लाख 35 हजार रुपयांचे   मदतीचे धनादेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य किशोरशेठ जैन, पं.स.सदस्य संजय भोसले, मा.सभापती सदानंद गायकर, ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत तानू शिंदे, उपसरपंच दिनेश धोंडू जाधव व ग्रा.पं.सदस्य अरुण तांडेल, मंगेश साळवी, प्रांताधिका

चक्रीवादळात नुकसान झालेल्या माणगाव तालुक्यातील नुकसानग्रस्तांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द

Image
अलिबाग,जि.रायगड, दि. 14 (जिमाका) :-   जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे   जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झाली. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे.   या चक्रीवादळात नुकसान झालेल्या माणगाव तालुक्यातील माणगाव तहसिलअंतर्गत असलेल्या गावांमधील नुकसानग्रस्त नागरिकांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे धनादेश, दहा किलो गहू, दहा किलो तांदूळ वितरित करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, तहसिलदार प्रियांका आयरे,सुभाष केकाने, माजी जिल्हा परिषद सदस्य अस्लम राऊत, पंचायत समिती सदस्य शैलेश बोरकर, शेखरशेठ देशमुख, इक्बाल शेठ धनसे, काका नवगणे, दीपक जाधव, उदय अधिकारी, दीपक महाजन सरपंच इंदापूर, नगराध्यक्षा योगिता चव्हाण, रत्नाकर उभारे, नगरसेवक रवी मोरे उपस्थित होते.   0000

चक्रीवादळात नुकसान झालेल्या तळा तालुक्यातील नुकसानग्रस्तांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द

Image
अलिबाग,जि.रायगड, दि. 14 (जिमाका) :-   जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे   जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झाली. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे.   या चक्रीवादळात नुकसान झालेल्या तळा तालुक्यातील नुकसानग्रस्त देवला रामा वालेकर, रहाटाड रु. 1 लाख 50 हजार, गणेश बबन जाधव वालेकर, रहाटाड रु. 1 लाख 50 हजार,   विठोबा महादेव करंजे, रहाटाड रु. 1 लाख 50 हजार, विलास पांडूरंग मालुसरे, मांदाड, रु. 1 लाख 50 हजार, प्रतिक्षा प्रकाश दिवेकर, मांदाड, रु. 1 लाख 50 हजार, सुनिल लक्ष्मण जगताप, पिटसई, रु. 1 लाख 50 हजार, सतिश हरिश्चंद्र शिंदे रु. 1 लाख 50 हजार,   सर्जेराव भागोजी जाधव रु. 15 हजार, देवजी परसू शिंदे रु. 1 लाख 50 हजार, शशिकांत शंकर शिगवण रु. 1 लाख 50 हजार, सुवर्णा सहादेव मांडवकर रु. 1 लाख 50 हजार, जनार्दन गंगाराम म्हामुणकर रु. 1 लाख 50 हजार, भिकीबाई जनार्दन शिगवण रु. 1 लाख 50 हजार असे एकूण 18 लाख 15 हजार रुपयांचे   मदतीचे धनादेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.