चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांच्या मदत वाटपासाठी दि.20 व 21 जून या शासकीय सुट्टयांच्या दिवशीही शासकीय कार्यालये राहणार सुरु




अलिबाग,जि.रायगड, दि.18 (जिमाका) : रायगड जिल्ह्यामध्ये दि.3 जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिके, मालमत्तेचे नुकसान झाले असून जिल्हा प्रशासनाकडून तातडीने शेती पिके, मालमत्तांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज पाहता झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत वाटप करणे आवश्यक आहे.
 दि. 20 व 21 जून या दिवशी शासकीय सुट्टी आहे. मात्र नुकसानग्रस्त जनतेला मदत वाटपावर या शासकीय सुट्टीचा परिणाम होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणे, पंचनामे मंजूर करणे, मंजूर पंचनाम्याप्रमाणे व शासनाच्या आदेशानुसार आपदग्रस्तांना द्यावयाच्या मदतीची देयके तयार करणे, ही देयके कोषागारात सादर करुन मंजूर करून घेणे व मंजूर रक्कम संबंधित बँकेमार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करणे, या सर्व कामांसाठी दि. 20 व 21 जून या शासकीय सुट्टीच्या दिवशीही सर्व कार्यालये सुरू ठेवून मदत वाटपाची कार्यवाही सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
 यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, जिल्हा कृषी अधीक्षक व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व क्षेत्रीय कार्यालये, जिल्हा व तालुका कोषागार कार्यालये, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारी सर्व कार्यालये, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, पेण, उपविभागीय अभियंता, भारत संचार निगम लिमिटेड,अलिबाग, सर्व गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग तसेच सर्व संबंधित बँकांचे व्यवस्थापक यांच्यासाठी हे आदेश लागू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड