Posts

Showing posts from January 28, 2018

आदिवासी विकास मंत्री ना.विष्णू सवरा यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 2:- मा.ना.विष्णू सवरा, मंत्री,आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांचा दि.3 रोजीचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि.3फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता वाडा निवासस्थान येथून शासकीय वाहनाने दहिवली-कर्जतकडे प्रयाण.(अघई,आटगांव,आसनगांव,मुरबाड,कोडिंबे,कडाव मार्गे दहिवली-कर्जत ). दुपारी दोन वाजता दहिवली कर्जत  येथे आगमन व मा. मुख्यमंत्री यांच्या समवेत भव्य कार्यकर्ता मेळावा व जाहिर पक्ष प्रवेश समारंभास उपस्थिती. स्थळ: मार्केटयार्ड मैदान दहिवली-कर्जत जि. रायगड.सोईनुसार कर्जत दहिवली येथून वाडा निवासस्थानकडे प्रयाण. 0000

राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2:- मा.ना. रविंद्र चव्हाण बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री यांचा दि.3 रोजीचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि.3फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता डोंबिवली  येथून पलावा, डोंबीवली निवासस्थान येथून मोटारीने पनवेल चौक फाटा मार्गे कर्जत जि. रायगड कडे प्रयाण. दुपारी साडेबारावाजता मार्केटयार्ड मैदान, दहीवली- कर्जत जि.रायगड येथे आगमन.दुपारी दोन वाजता भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे जाहीर पक्षप्रवेश समारंभास उपस्थिती. स्थळ: मार्केटयार्ड मैदान दहिवली –कर्जत जि. रायगड सायंकाळी पाच वाजता कर्जत जि.रायगड येथून चौक फाटा पनवेल मार्गे पलावा डोंबीवलीकडे प्रयाण. 0000

पनवेल येथे अद्यावत क्रिकेट अकॅडमी तयार करणार-शालेय शिक्षण आणि क्रीडामंत्री ना.विनोद तावडे

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.02 - पनवेल येथे अद्यावत क्रिकेट अकॅडमी तयार करणार अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण,उच्च व तंत्रशिक्षण,वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे यांनी पनवेल येथील तालुका क्रीडा संकुल बहुउद्देशीय हॉल लोकार्पण सोहळ्यात दिली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर,उपमहापौर चारुशिला घरत, तहसिलदार दिपक आडके, कार्य अधिकारी मंत्रालय कविता नांवदे,उपसंचालक क्रीडा व युवक   एन.बी.मोटे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, क्रीडा अधिकारी श्री.राठी, क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना मंत्रीमहोदय म्हणाले की, शासन खेळाडूंना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.  क्रीडा संकुलामध्ये खेळाडूंना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील.  खेळाडूंनी आपले नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर करावे. जे खेळाडू जिल्हा पातळीवर,राज्य पातळीवर तसेच देश पातळीवर खेळतील त्यांना दहावी,बारावीच्या परिक्षेमध्ये 25/15 मार्क देण्यात येतील.   तसेच पुरस्कार प्राप्त

‘सोशल मीडिया महामित्र’ उपक्रमात युवकांनी मोठ्या संख्येने नोंदणी करावी

          अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1 राज्य शासनाच्या   ‘सोशल मीडिया महामित्र’ या अभिनव उपक्रमात कोकण विभागातील जास्तात जास्त युवकांनी सहभागी होऊन नोंदणी करण्याचे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आले आहे. हा उपक्रम कशासाठी ? आधुनिक काळात सोशल मीडिया अत्यंत प्रभावी झाला आहे. बहुतांश युवक मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडिया आता मनोरंजनाचे साधन न राहता ज्ञान उपलब्ध करुन घेण्याचे प्रभावी साधन ठरले आहे. लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे अनेकदा सिध्द झाले आहे. देशातील बहुतांश युवक फेसबुक, व्हॉट्ॲप,   इन्स्टाग्राम,   ट्विटर आदींचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे शासनाने सोशल मीडियाची ताकद जाणून   ‘सोशल मीडिया महामित्र’   उपक्रम राबविण्याचा ठरविले आहे. नोंदणी   अशी करा या उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता   Google Playstore   अथवाApple   च्या   Appstore   वर   MahaMitra   हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करावे लागेल. या ॲप्लीकेशनमध्ये नाव,   वय,   पत्ता हे तपशील देऊन नोंदणी करावयाची आहे. ही नोंदणी प्रक्रिया   1   फेब्रुवारी 2018   रोजी सुरु होणार असून 18 फेब्र

केंद्रीय मंत्री ना.अनंत गीते यांचा जिल्हा दौरा

          अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे शुक्रवार दिनांक 2  रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. शुक्रवार दि.2 रोजी सकाळी साडेनऊ वाजता मुंबईहून अलिबाग जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी साडेबारा वाजता अलिबाग जि. रायगड येथे आगमन. रात्रौ साडेसात वाजता अलिबाग जि. रायगड येथून मुंबईकडे प्रयाण. 0000

उद्योग मंत्री ना.सुभाष देसाई यांचा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 1:- राज्याचे उद्योग, खनिकर्म मंत्री ना. सुभाष देसाई  हे   रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि.2 रोजी दुपारी तीन वाजता गेटवे येथून स्पीड बोटीने अलिबाग जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी पाऊणे चार वाजता अलिबाग येथे आगमन व राखीव. शासकीय विश्रामगृह अलिबाग. सायंकाळी चार ते सहा वाजता अलिबाग येथील मेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी सहा वाजता अलिबाग येथून स्पीडबोटीने मुंबईकडे प्रयाण . 0000

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 वंचित शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी आणखी एक संधी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.31 - राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना -2017 अंतर्गत शेतकरी सभासदांनी राज्य शासनाने पोर्टलवर ऑनलाईन माहिती भरुन अर्ज सादर केले आहेत. तसेच बँकेने शासनाला सादर केलेल्या त्यांच्या माहितीशी शेतकऱ्यांनी दिलेली माहिती जुळत नसल्याने अशा शेतकऱ्यांची यादी राज्य् शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,राष्ट्रीयकृत व खाजगी बँक,महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे पाठविली आहे.या याद्यां वरील बँकांच्या सर्व संबंधित शाखा स्तरावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. राज्य शासनाने पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या ज्या शेतकऱ्यांचे नाव आतापर्यंत राज्यशासनाने कर्जमाफी मंजूर केलेल्या लाभार्थींचे यादीमध्ये नाही, अशा शेतकऱ्यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राष्ट्रीयकृत व खाजगी बँक,महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या संबंधित बँक शाखांशी त्वरीत संपर्क साधून बँकेने नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये आपले नाव असल्यास आवश्यक कागदपत्रांसह योग्य माहिती बँकांच्या शाखांना सादर करावी  ज्या आधारे बँक शाखांना पुढील कार्यवाही करता येईल.कार्यवाहीचा अंतिम  दिना

उंबर्डे येथे शनिवारी एकात्मिक राज्य जलआराखडा कार्यशाळा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.31 - उंबर्डे ता. पेण येथील हेटवणे मध्यम प्रकल्प उपविभाग येथे शनिवार दि.3 फेब्रुवारी रोजी पश्चिम वाहिनी नदी खोरे विकासासंदर्भात एकात्मिक राज्य जलआराखडा कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.             पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातील पाताळगंगा,अंबा, कुंडलिका, म्ह्सळा, सावित्री, भारजा या उपखोऱ्यांचा एकात्मिक राज्य जल आराखडा प्रारुप स्वरुपात  तयार करण्यात आला आहे. जल आराखडा मसुद्यावर  उपखोऱ्यातील संबंधित लाभार्थी, पाणी वापरकर्ते यांचेशी सल्ला मसलत करुन जल आराखडा विषयी मते जाणून घेण्याकरिता शनिवार दि.3 फेब्रुवारी रोजी हेटवणे मध्यम प्रकल्प उपविभाग, पेण उंबर्डे,जि.रायगड येथे  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यशाळेस उपस्थित राहावे,असे आवाहन इंजि.प्र.बा.मिसाळ,अधिक्षक अभियंता,उत्तर कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ,कळवा, ठाणे, यांनी केले आहे. 00000

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नवीन जागेत स्थलांतरीत

                                                                        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.31 -प्रकल्प् अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण जि. रायगड हे कार्यालय पूर्वी आवास्कर बिल्डिंग, एम.एस.ई.बी. समोर दोंदे मार्ग येथे कार्यरत होते. आता  कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नवीन जागेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. तरी शासकीय कामासाठी नवीन पत्त्यावर प्रत्यक्ष संपर्क साधावा.असे प्रकल्प् अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण जि. रायगड यांनी कळविले आहे.        नवीन जागेचा पत्ता- प्रकल्प् अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प् पेण जि. रायगड,कृषी उत्पन्न बाजार समिती, पहिला मजला, पेण-धरमतर रोड पेण जि.रायगड 0000

जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम सत्पात्रि दान….पारदर्शक व्यवहार

Image
पाली, महड, हरिहरेश्वर देवस्थानात ई-दान पेटी सुविधा         अलिबाग,जि. रायगड (डॉ.मिलिंद दुसाने) दि.31- दिलेले दान हे सत्पात्रि असावे, हा पुराणातला संकेत आहे. आपण देत असलेले दान हे सत्पात्रि तर असावेच पण ते व्यवहाराच्या दृष्टिने पारदर्शकही असावे, असे विज्ञान युगाचे संकेत आहेत. रायगड जिल्हा प्रशासनाने यासाठी पुढाकार घेत, जिल्ह्यातील पाली- बल्लाळेश्वर, महडचा वरदविनायक आणि श्रीवर्धनचे हरिहरेश्वर या तीन प्रमुख देवस्थानात भाविकांना दानधर्मासाठी ई- दान पेटीची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. यामुळे भाविकांचे दान हे सत्पात्रि जातांनाच ते पारदर्शक व्यवहार ही ठरणार आहे.             भारत सरकारच्या भिम (BHEEM- Bharat Interface For Money) ॲप ही युपीआय (Uniform Payment Interface) बेस  अदाता प्रणाली आहे. कोणत्याही ॲण्ड्रॉईड मोबाईलवर हे ॲप डाऊनलोड करुन त्याद्वारे आपण इच्छित  बॅंक खात्यात आपल्या बॅंक खात्यातून रक्कम अदा करु शकतो. याच प्रणालीचा वापर करुन मंदिर- देवस्थानात येथे भाविक दानधर्म करीत असतात अशा ठिकाणी पारदर्शक व्यवहाराद्वारे दानधर्म व्हावा यासाठी जिल्हाधिकारी ड

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या अर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी आवश्यक त्या याद्या व रकमा सर्व बँकाना ऑनलाईन पद्धतीने वितरीत करण्यात आलेल्या आहेत व त्यानुसार अंमलबजावणी सुरु आहे.             या प्रक्रीयेमध्ये ज्या प्रकरणी बँकाना पुरविलेल्या कर्ज खात्यांच्या माहितीतील त्रुटी तसेच शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये असलेल्या अपुऱ्या माहितीमुळे ताळमेळ होऊ शकला नाही अशा प्रकरणातील शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रक्रीया होऊन निर्णय घेणे शक्य होत नाही.  अशा प्रकरणांतील शेतकऱ्यांच्या अर्जातील माहितीची,बँकेकडील असलेल्या माहितीच्या आधारे शहानिशा करुन त्याची पात्रता,अपात्रता निश्चित करण्याची जबाबदारी तालुकास्तरीय समितीकडे सोपविण्यात आली आहे. याबाबत बँकेने त्यांच्या प्रत्येक शाखेमध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही त्यांच्या याद्या बँक स्तरावर प्रसिद्ध करण्यात आल्या असून जे शेतकरी या योजनेस पात्र आहेत त्यांनी ऑनलाईन अर्ज देखील भरणा केला आहे. परंतु बँकेच्या चूकीच्या माहिती भरणामुळे किंवा शेतकऱ्यांनी ऑनल

जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्म्यांना आदरांजली

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30- देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिवस म्हणून पाळण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हुतात्मा दिनानिमित्त 2 मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.             या प्रसंगी तहसिलदार के.डी. नाडेकर तहसिलदार (पुनर्वसन) मिलिंद गांगुर्डे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 00000

माथेरान सनियंत्रण समितीची बैठक 2 फेब्रुवारीला

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 29- भारत सरकारच्या पर्यावरण व वन विभागाकडील अधिसूचनेन्वये संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित  केलेल्या प्रदेशातील सर्व विकास विषयक कामे, सर्व बांधकामे व बांधकामाचे नुतनीकरण, संवेदनशील क्षेत्रात करावयाचे कोणतेही खाणकाम, तसेच भूगर्भातील पाण्याची विक्री. या कामांना सनियंत्रण समितीच्या पूर्व मान्यतेची आवश्यकता असते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील माथेरान ता.कर्जत येथे संनियंत्रण समितीची बैठक शुक्रवार दि.2 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या समितीकडे कोणास काही तक्रारी करावयाच्या असतील तर त्यांनी अर्ज जिल्हाधिकारी रायगड यांचेकडे अलिबाग येथे सपूर्द करावेत. असे अर्ज सनियंत्रण समितीच्या बैठकीत विचारार्थ घेतले जातील. तसेच विकास करावयाच्या उपरोक्त नमूद कामासाठी सनियंत्रण समितीची मान्यता घेण्याच्या दृष्टीने आपले प्रस्ताव 10 प्रतीत जिल्हाधिकारी रायगड अलिबाग तथा सदस्य सचिव सनियंत्रण समिती यांचेकडे सनियंत्रण समितीच्या बैठकीपूर्वी किमान 05 दिवस अगोदर प्राप्त होणे आवश्यक आहेत. त्या दृष्टीने ज्यांचे असे प्रस्ताव असतील त्यांनी त्यांचे प्रस्ताव सनियंत्रण समितीकडे तात्क

क्षयरोग नियंत्रणासाठी आरोग्ययंत्रणांचा समन्वय आवश्यक-जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 29- सन 2025 पर्यंत देशातून क्षयरोग निर्मुलन करण्यासाठी प्रत्येक क्षयरुग्णाचे उपचाराच्या सनियंत्रण करुन उपचार पुर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी क्षयरुग्णांवर उपचार करावे, शासकीय, खाजगी वैद्यकीय यंत्रणा,औषध विक्रेते यंत्रणेसाठी समन्वय राखावा व प्रत्येक रुग्णांवर पुर्ण उपचार होईल याकडे लक्ष द्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिले. जिल्हा क्षयरोग नियंत्रणासंदर्भात आज जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई,जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ.एस.के.देवकर,जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ.अमित कराड, आयएमए  अलिबागचे डॉ.सुधाकर बडगिरे,अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहा.आयुक्त डॉ.गिरीष हुकरे,पनवेल येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.पद्मिनी येवले आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.देवकर यांनी माहिती दिली की, देशातून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी

खांदेश्वर येथे 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान जिल्हा कृषि महोत्सव

          अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29-   शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी चालना देणे,नवीन कृषि तंत्रज्ञानाची ओळख करणे, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि शेतकरी यांच्यात विचारविनिमय घडविणे, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री संकल्पनेवर आधारीत धान्य, फळे, भाजीपाला आदी विक्रीची सुविधा करणे यासाठी जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन 'आत्मा' प्रकल्पाअंतर्गत करण्यात येते. यंदा रायगड जिल्ह्यातील कृषि उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी 23 ते 28 फेब्रुवारी दरम्यान खांदेश्वर ता. पनवेल येथे जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शेळके,  उपजिल्हाधिकारी  (रोहयो) विश्वनाथ वेटकोळी, प्रकल्प संचालक आत्मा मंगेश डावरे, कर्जत संशोधन केंद्राचे डॉ. एल.एस. चव्हाण,  व्ही.आर. साळवे, उपविभागीय कृषि अधिकारी पांडुरंग शिगेदार आदी उपस्थित होते. यावेळी  सदर महोत्सव हा दि.23 ते 28 फेब्रुवारी दरम्यान खांदेश्वर  येथे रेल्वेस्टेशन जवळील मै