Posts

Showing posts from July 16, 2023

आर्थिक मदतीचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

    अलिबाग,दि.22(जिमाका):-   इर्शा लवाडी दुर्घटनेतील नागरिकांना पुन्हा उभारी देण्यासाठी समाजातील सामाजिक संस्था/ट्रस्ट/फाँऊंडेशन्स/सी एसआर/दानशूर व्यक्ती यांच्याकडून आर्थिक  स्वरुपात मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे. रायगड जिल्हा प्रशासनाकडून पुढील खाते नंबर व पत्ता उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ज्यांना आर्थिक स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी  नाव :- जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी (District Disaster Response Fund),  बँकचे नाव :- स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा,अलिबाग (State Bank of India, Alibag), बँक खात्याचा नंबर:-38222872300, IFSC Code:-SBIN0000308या बँक खात्यामध्ये निधी जमा करावा. अधिक माहितीसाठी  उपविभागीय अधिकारी, कर्जत श्री.अजित नैराळे,मो.8390090040, खालापूर तहसिलदार श्री.आयुब तांबोळी, मो.क्र.9975751076 यांच्याशी संपर्क करावा. ००००००००

शेतकऱ्यांना आता केवळ 1/- रुपयात पिक विमा मिळणार योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत दि.31 जुलै पर्यंत--जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले

    अलिबाग, दि.22 (जिमाका):-    जिल्हयात प्रधानमंत्री पिक विमा योजना Cup & Cap Model (80:110) नुसार खरीप 2023 ते रब्बी 2025 26 हंगामातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार रायगड जिल्हयात चोलामंडलम एम.एस.जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पिक ॲपव्दारे आपल्या पिकांची नोंदी 7/12 उताऱ्यावर करणे आवश्यक असल्याने या नोंदी लवकरात लवकर करुन घेवून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी (दि.19 जुलै) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथील पत्रकार परिषदेत दिली.   योजनेची उद्दीष्टे:- नैसर्गिक आपत्ती, किड आदि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. योजनेची वैशिष्टे व लाभार्थी पात्रता :-  कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कुळाने अथवा भ

दहावी व बारावीच्या 20 जुलै च्या रद्द पुरवणी परीक्षा अनुक्रमे दि.2 व दि.11 ऑगस्ट रोजी होणार

  अलिबाग,दि.22(जिमाका) :-  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट-2023 मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) दि.18 जुलै दि.1 ऑगस्ट 2023 व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) पुरवणी परीक्षा दि.18 जुलै दि.10 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार या परीक्षेचे वेळापत्रक महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले असून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहे. तथापि राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दि.20 जुलै 2023 रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला होता. त्यामुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) पुरवणी परीक्षेतील वेळापत्रकामध्ये दि.20 जुलै 2023 च्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला असून तो पुढीलप्रमाणे आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) वेळापत्रकामध्ये निश्चित केलेला दिनांक,वार व दिनांक, सत्र व वेळ-  गुरुवार, दि.20 जुलै 2023 सकाळ सत्र 11.00 ते दुपारी 2.00 या दिवशी असलेले सर्व विषयांचे पेपर . वेळापत्रकाबाबत सुधारित तपशिल वार व दिनांक, सत्

जिल्ह्यामध्ये कृषी दिन साजरा करीत बँक ऑफ इंडिया रायगड विभागाने रु.25 कोटींचे कर्ज केले वाटप

  अलिबाग,दि.22(जिमाका) :-   किसान माह म्हणून बँक ऑफ इंडिया तर्फे दरवर्षी जुलै महिना साजरा केला जातो .बँक राष्ट्रीयीकरण दिवसाचे औचित्य साधून दि.19 जुलै हा दिवस शेतकरी, कष्टकरी यांना समर्पित  “ किसान दिवस ”  म्हणून साजरा केला जातो . या दिवसाचे औचित्य साधून जिल्ह्याची अग्रणी बँक,बँक ऑफ इंडिया रायगड विभाग आणि साकव पेण प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा, आमटेम ता.पेण येथे किसान दिवस नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक श्री.एम.कार्तिकेयन, श्री.एस. के. रॉय, महाप्रबंधक एन.बी.जी.पश्चिम 1, विभागीय प्रमुख श्री.मुकेश कुमार, उप विभागीय प्रमुख श्री.जॉन लोबो, जिल्हा अग्रणी प्रबंधक श्री.विजयकुमार कुलकर्णी, साकव संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.धुमाळ, सचिव  अरुण शिवकर,  मंजुळा ताई, लक्ष्मण तांबोळी आमटेम सरपंच  आमटेम, परशुराम मोकल  सरपंच डोलवी तसेच माविम् चे पदाधिकारी, उमेदचे पदाधिकारी, बँकेचे शाखाधिकरी, साकवचे बचत गटातील महिला, महिला आर्थिक विकास महामंडळ( माविम) महिला, उमेद मधील महीला तसेच सूक्ष्म व लघु उद्योग कर्जचे लाभार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  य

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यास इच्छूक लाभार्थ्यांनी कर्ज प्रस्ताव सादर करावेत --जिल्हा व्यवस्थापक प्रवीण आहीर

  अलिबाग,दि.22(जिमाका) :-   संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित यांच्यामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) यांच्या आर्थिक शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी राज्य व केंद्र शासनाकडून (एन.एस.एफ.डी.सी.)विविध कर्ज योजना राबविल्या जातात. जिल्हा कार्यालय रायगड यांच्यामार्फत सन 2023 -24 या आर्थिक वर्षाकरिता या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) इच्छूक अर्जदारांकडून  कर्ज प्रस्ताव दि.28 जुलै 2023 पर्यंत मागविण्यात येत आहे. 50 टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना, मुदतीकर्ज योजना, लघुऋण वित्त योजना,  महिला समृद्धी योजना, महिला अधिकारीकरिता योजना, शैक्षणिक कर्ज योजना या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इ.)असावा. तसेच अर्जदाराने यापूर्वी मंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराने आवश्यकतेनुसार कागदपत्रांची पूर्तता करून शासकीय योजनांचे तीन प्रतीत अर्ज मूळ कागदपत्रांसह संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळा

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन लवकर व्हावे यासाठी प्रयत्न करणार --- विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

Image
    अलिबाग,दि.22(जिमाका) :-  इर्शाळवाडी दुर्घटनेतील मुले, मुली, महिला, पुरुष, एकल स्त्रिया या सर्वांचे सर्व्हेक्षण करून अधिकाऱ्यांनी त्याची व्यवस्थित नोंद ठेवावी. या ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे, यासाठी तात्काळ कार्यवाही सुरु करावी असे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या मुलांची उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी नढळ गावात जाऊन भेट घेत त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांच्या तात्पुरत्या राहण्याची सोय असलेल्या ठिकाणी जाऊन भेट देत उपलबद्ध सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी स्वतः तत्परतेने व संवेदनशीलतेने तात्काळ भेट दिली होती. याबाबत त्यांनी सविस्तर निवेदन विधान सभेमध्ये केले होते व प्रत्येक मृत व जखमी कुटुंबाला शासनाची सर्वोतोपरी मदत जाहिर केली होती.  विधानभवनात माझी भेट घेऊन सविस्तर माहिती ही दिली होती. या भेटी वेळी त्यांनी अपादग्रस्त लोकांना तात्काळ मदत पोहचत आहे का ? तसेच सर्व मुले व महिलांना आवश्यक सुविधा दिल्या आहेत का? याबाबत या ठिकाणी जाऊन  पाहणी करण्याचेही सांगितले असल्याचे डॉ. गोऱ्हे य

इर्शालवाडी दुर्घटनेतील बचावलेल्या मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्विकारले --विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Image
  अलिबाग,दि.22(जिमाका) :-   इर्शाळवाडी ता.खालापूर जि रायगड येथे  दुर्घटनेत बचावलेल्या अनाथ मुलांचे पालकत्व राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्विकारले असून अचानक कोसळलेल्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये देखील शासन मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.   विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज नढळ येथे दुर्घटनेतील पीडितांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने त्यांनी पालकत्व स्विकारल्याचे यावेळी जाहीर केले. यावेळी आमदार मनीषा  कायंदे, आमदार महेंद्र थोरवे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहीरराव, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे  उपस्थित होते. या मुलांशी संवाद साधताना डॉ.गोऱ्हे यांनी मुलांना लगेच कामाला न जाता शिक्षण पूर्ण करण्याबाबत सांगितले.  काहीही लागल्यास त्यांच्या फोनवर संपर्क साधण्याकरिता स्वतःचा नंबर अनाथ मुलांना दिला. तसेच गावातील स्थानिक व्यक्ती ज्याल

इरसाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील---जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे

Image
    अलिबाग,दि.21 (जिमाका):- इर्शाळगडाच्या पायथ्याला डोंगरात वसलेल्या दुर्घटनाग्रस्त आदिवासी पाड्यावर बचाव व मदत कार्य युध्दपातळीवर सुरु असून यासाठी शासकीय यंत्रणा संपूर्ण प्रयत्नशील आहे. या गावातील नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन होईपर्यंत जुने मुंबई-पुणे महामार्गावरील चौक गावानजिक असलेल्या शासकीय जागेत तात्पुरत्या स्वरुपात पुनर्वसन करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ती सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. तसेच इरसाळवाडीसाठी एक स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून अद्यापही शोध न लागलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती  जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे उपस्थित होते. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी समिती इरसाळवाडीच्या दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर जिल्हा प्रशासन तातडीने घटनास्थळी पोहोचले होते.  या गावांतील 43 कुटुंबातील 229 लोकांपैकी 143 व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून अद्यापही 86 नागरिकांचा शोध कार्य सुरु आहे. सदर

खालापूर तालुक्यातील इरसाळवाडी येथील दरडग्रस्त नागरिकांना आर्थिक व जीवनावश्यक साहित्यासाठी मदत करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

    अलिबाग,दि.20(जिमाका) :-   दि.19 जुलै 2023 रोजी खालापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे मौजे चौक-नानिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील मौजे इरसाळवाडी ता.खालापूर येथे दरड कोसळून मोठयाप्रमाणात जनजीवन विस्कळीत होवून पशुधनाची व खाजगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. अशावेळी त्यांना आधार देवून आयुष्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी समाजातील सामाजिक संस्था/ट्रस्ट/फाँऊंडेशन्स/सी एसआर/दानशूर व्यक्ती यांच्याकडून आर्थिक मदत व साहित्याच्या स्वरुपात मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुढील खाते नंबर व पत्ता उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ज्यांना आर्थिक स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी खात्याचे नाव :- जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी (District Disaster Response Fund), • बँकचे नाव :- स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा,अलिबाग (State Bank of India, Alibag), बँक खात्याचा नंबर:-38222872300, IFSC Code:-SBIN0000308या बँक खात्यामध्ये निधी जमा करावा. ज्यांना साहित्य स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी उपविभागीय अधिकारी, कर्जत श्री.अजित नैराळे,मो.8390090040, खालापूर तहसिलदार श्री.आयुब तांबोळी, मो.क्र.9975751076 यांच्याशी संपर्क करुन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत फूड पॅकेटस, ब्लॅकेटस्, कंटेनर यासह मदत साहित्याचा ओघ जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुविधांसाठी साहित्य इर्शाळगड वाडी घटनास्थळाकडे रवाना

    अलिबाग,दि.20(जिमाका) :-   इर्शाळगडाच्या पायथ्याला डोंगरात वसलेल्या दुर्घटनाग्रस्त आदिवासी पाड्यावर बचाव व मदत कार्यासाठी शासन यंत्रणा संपूर्ण प्रयत्नशील असून येथे मदत कामासाठी कार्यरत प्रत्यक्ष मनुष्यबळासाठी व दुर्घटनेतील वाचलेल्या नागरीकांसाठी घटना स्थळावर तात्पुरते निवारे, अन्न, मदत साहित्य यांची तातडीने उपलब्धता केली जात आहे. यामध्ये   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रायगड जिल्ह्यातील उद्योग व संस्थापुढे आल्या आहेत        जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुविधा निर्माण करण्यासाठी साहित्य घटनास्थळाकडे पाठविले जात आहेत. यामध्ये मदत साहित्य व निवाऱ्यासाठी    घटनास्थळाच्या बेसकॅम्पकडे 20 X 10 आकाराचे 4 कंटेनर, 40 X 10 चे 2 व इतर दोन कंटेनर पाठविण्यात येत आहेत. सदर कंटेनर उरण, जेएनपीटी, रत्नागिरी एमआयडीसी, जेएसडब्लू समूह येथून रवाना झाले आहे. चौक , खालापूर येथील तात्परती निवाराव्यवस्था केली जात आहे. घटनास्थळ हे उंचावर असून मशिनरी साहित्या पोहचत नसल्याने दरड कोसळल्याने निर्माण झालेले मातीचे ढिगारे दूर करणेसाठी पनवेल येथून 80 अनुभवी कारागीरांचे पथक अवजारांसह दुपारनंतर घट

दि.01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर

    अलिबाग,दि.20(जिमाका):-   मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि.01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पुनरिक्षण-पूर्व उपक्रम - मतदार यादी संदर्भातील सर्व कायदे आणि मार्गदर्शक सूचना तसेच नविनतम IT Applilcation आणि प्रणालीबाबत मतदार नोंदणी अधिकारी/सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी/मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्रशिक्षण कालावधी दि.01 जून 2023 (गुरुवार) पासून दि.20 जुलै 2023 (गुरुवार).  मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी दि.21 जुलै 2023 (शुक्रवार) ते दि.21 ऑगस्ट, 2023 (सोमवार). मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणिकरण, मतदार यादी/मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे इ.,आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे तसेच अस्पष्ट/अंधूक छायाचित्र बदलून त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे, विभाग/भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करुन मतदान केंद्राच्या सीमांचे पुनर्रचना तयार करून मतदान केंद्

पनवेल व उरण येथे दि.25 जुलै रोजी होणार जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव

    अलिबाग,दि.20(जिमाका):-   कोणत्या ही प्रकारची मशागत न करता लागवडी शिवाय व रासायनिक खत, कीडनाशकांशिवाय उगवलेल्या भाज्या म्हणजे रानभाज्या. कोकण भागात वनक्षेत्र भरपूर असून जैवविविधता देखील आहे. त्यामुळे प्राचिन काळापासूनच अशा आरोग्यवर्धक व सुरक्षित रानभाज्या औषधी म्हणून व रोजच्या आहारात देखील वापरल्या जात असत. आजही आदिवासी शेतकरी रानभाज्या जतन करत आहेत. या रानभाज्यांचे जंगलालगतचे आदिवासी आजही पारंपारीक अन्न म्हणून वापर करतात, म्हणूनच त्यांचे आरोग्य देखील उत्तम असते. कोकणात प्रामुख्याने टाकळा, करटोली, शेवळी, अळू, अळंबी, कुरडू, फोडशी, भारंगी, सुरण, कुडा, बांबूचे कोंब, इ. रानभाज्या आढळून येतात. परंतु काही रानभाज्या जसे वाघारी, पेंढरी, तीरकमळ, मौले या काळासोबत नष्ट झाल्या आहेत. या भाज्यांप्रमाणे इतर रानभाज्या नष्ट होऊ नयेत, त्यांचा मानवी आहारात समावेश असावा तसेच पुढील पिढीला या औषधी ठेव्याचे महत्व व माहीती असावी याकरिता रानभाज्यांचे संरक्षण व संवर्धन गरजेचे असून त्यांचाच एक भाग म्हणून कृषी विभागाकडून दरवर्षी जुलै-ऑगस्ट दरम्यान जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या वर्षीचा

दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण गरजू दिव्यांगानी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा

    अलिबाग,दि.20(जिमाका):-   दिव्यां ग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा परिषद, सांगली अंतर्गत कार्यरतत शासकीय प्रौढ़ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबई यांची शासन मान्यता आहे. या संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील FICCI AWARD 1999 हा प्राप्त झाला आहे. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे. माफक जागा असल्याने त्वरीत संपर्क साधा. प्रवेशासाठी नियम अटी व सवलती आणि शैक्षणिक  पात्रता पुढीलप्रमाणे- सर्टिफिकेट इन कॉम्युटर ऑपरेशन वुईथ एम.एस. ऑफिस (संगणक कोर्स) किमान इ. 8 वी पास, मोटार अॅंड आमेंचर वायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज, (इलेक्ट्रीक कोर्स)किमान इ. 9 वी पास असे आवश्यक आहे. यासाठी वयोमर्यादा  16 से 40 वर्ष, प्रशिक्षण कालावधी-1 वर्ष, फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जातो. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्यावत व

अलिबाग येथील शासकीय वसतिगृहाकरिता हवी भाडेतत्वावर इमारत

  अलिबाग,दि.20 (जिमाका) :-     सन-2023-24या शैक्षणिक वर्षाकरिता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विमुक्त मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांकरिता 01 व विद्यार्थींनीकरिता 01 अशी एकूण दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे सुरू करावयाची आहेत.  या वसतिगृहासाठी 100 विद्यार्थ्यांना पुरेशी अशी सर्व सोयीसुविधांयुक्त इमारत भाडेतत्वावर मिळणे आवश्यक असून इमारतीमध्ये   अंदाजे 10 खोल्या, 10 स्वछतागृहे, वीजेची व पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. तरी इच्छुक इमारत मालकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड यांचे कार्यालय, कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिर, सेंटमेरी स्कूलसमोर, श्रीबाग रोड, अलिबाग येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुनिल जाधव यांनी केले आहे. 000000

शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी दि.10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

    अलिबाग,दि.20(जिमाका):-   अल्पसं ख्यांक विकास विभागाकडून धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन-2023-24 साठी प्रस्ताव सादर करण्यासाठी दि.17 जुलै 2023 च्या शासन परिपत्रकानुसार दि.10 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी रायगड जिल्ह्यातील इच्छूक शाळांनी सन-2023-24 या आर्थिक वर्षाकरिता विहीत नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्याकडे दि.10 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती, रायगड-अलिबाग श्री.ज.द.मेहेत्रे यांनी केले आहे. ००००००

महाज्योतीच्या 20 प्रशिक्षणार्थ्यांची विक्रीकर सहाय्यक पदी निवड! राहुल विजय जेंगठे राज्यात प्रथम

    अलिबाग,दि.20(जिमाका):-   महाराष् ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ,   नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग ,  विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना   राज्यात तसेच केंद्र शासनात सेवेची संधी प्राप्त व्हावी याकरीता एम.पी.एस.सी   परीक्षा प्रशिक्षण   योजना राबविण्यात येते. या योज नें तर्गत विद्यार्थ्याच्या आर्थिक तसेच शैक्षणिक गरजा लक्षात घेता विद्यावेतनही पुरवल्या जाते. वर्ष  2020-21  या आर्थिक वर्षात    इतर मागास वर्ग ,  विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी परिक्षा प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेत सहभाग घेण्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून   नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांकडून महाज्योतीच्या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येतात.   पात्र विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी   परीक्षा प्रशिक्षण   योजनेत सहभाग दिला जातो. नुकतेच   एम.पी.एस.सी   परीक्षा प्रशिक्षणातून  20   प्रशिक्षणार्थ्यांची विक्रीकर सहाय्य