अलिबाग येथील शासकीय वसतिगृहाकरिता हवी भाडेतत्वावर इमारत


 

अलिबाग,दि.20 (जिमाका) :-  सन-2023-24या शैक्षणिक वर्षाकरिता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विमुक्त मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांकरिता 01 व विद्यार्थींनीकरिता 01 अशी एकूण दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे सुरू करावयाची आहेत. या वसतिगृहासाठी 100 विद्यार्थ्यांना पुरेशी अशी सर्व सोयीसुविधांयुक्त इमारत भाडेतत्वावर मिळणे आवश्यक असून इमारतीमध्ये अंदाजे 10 खोल्या, 10 स्वछतागृहे, वीजेची व पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे.

तरी इच्छुक इमारत मालकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड यांचे कार्यालय, कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिर, सेंटमेरी स्कूलसमोर, श्रीबाग रोड, अलिबाग येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुनिल जाधव यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक