Posts

Showing posts from April 29, 2018

दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे दुचाकी वाहनांच्या नोंदणी क्रमांकाची मालिका संपत असल्याने दुचाकी वाहनांसाठी MH- 06 /BY ही नवीन मालिका बुधवार दि.9 मे, पासून सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहन धारकांना आपल्या वाहनांसाठी या मालिकेतून आकर्षक वा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असेल त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज पत्याचा पुरावा, फोटो ओळखपत्र, पॅनकार्ड व पसंतीच्या क्रमांकासाठीच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांचे नावे काढलेल्या फी च्या राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासह दि.9 मे   रोजी सकाळी 11 ते दुपारी अडीच या कालावधीत सादर करावे. जनतेच्या माहितीसाठी उपलब्ध क्रमांक व आकारले जाणारे शुल्क याची माहिती कार्यालयात इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दर्शविण्यात येत आहे. एकाच नोंदणी क्रमांकासाठी एका पेक्षा जास्त अर्ज आल्यास महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार नियमित फी व्यक्तिरिक्त सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करण्याऱ्यास सदर नोंदणी क्रमांक देण्यात येईल. दुचाकी मालिकेतून इतर वाहनांसाठी तिप्पट शुल्क भरुन आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करता

महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन सोहळा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Image
          अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1-   महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन दि नाचा रायगड जिल्हास्तरीय मुख्य शासकीय समारंभ आज अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर मोठ्या उत्साहा त पार पडला. या समारंभात राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते   ध्वजवंदन करण्यात आले.   या सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा पोलीस अधिक्षक   अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपजिल्हाधिकारी भूसंपादन विश्वनाथ वेटकोळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शेषराव बढे, तसेच स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी ना. चव्हाण यांच्या ह

जिल्ह्यातील सर्व बीचेसवर समुद्रात 'फ्लोटींग बोयाज' पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नाविण्यपूर्ण योजनेतून उपक्रम

Image
अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.29:- पर्यटकांचा समुद्रात पोहण्यासाठी सुरक्षित हद्दीची कल्पना यावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख समुद्र किनाऱ्यांवर (बीचेस) फ्लोटींग बोयाज बसविण्यात येत आहेत.   अद्याप मुरुड आणि काशिद या दोन बीचेसवर हे बोयाज बसविण्यात आले असून यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपुर्ण योजनेतून 5 लाख 20 हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पर्यटक सुरक्षा व्यवस्था अंतर्गत बीच वर पोहण्याचे सुरक्षित क्षेत्र दर्शविण्यासाठी फ्लोटिंग बोयाज लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातील नागाव, आक्षी, काशिद, मुरुड, अलिबाग, वरसोली, मांदवा, हरेश्वर, किहिम, रेवदंडा, कोर्लई इ.सर्व प्रमुख समुद्र किनाऱ्यांवर हे बोयाज लावण्याचे काम सुरु आहे. येत्या 15 दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे. समुद्रात पोहण्याचे सुरक्षित क्षेत्र दर्शविणे तसेच धोकादायक पातळी दर्शविण्यासाठी याचा वापर होतो. काठापासून साधारणतः 50 ते 60 मिटर अंतरावर किंवा भरती ओहटीच्या पातळ्यांच्या अभ्यास करुन व स