Posts

Showing posts from July 15, 2018

महाड येथे वृक्षारोपण व मुल्यमापन पाहणी अभ्यास राज्यस्तरीय प्रशिक्षण संपन्न

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.21 -   महाराष्ट्र शासनाचे 13 कोटी वृक्ष लागवड या संकल्पनेतून वृक्ष लावगड मोहिम जिल्हाभरात वेगवेगळ्या ठिकाणी राबविण्यात येत आहे. जिल्हा नियोजन विभागामार्फत महाड येथे काल (दि.20) रोजी शासकीय गोदाम परिसरात अपर संचालक मुल्यमापन मुंबई विजय आहेर यांच्या हस्ते वृक्षरोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास उपायुक्त नियोजन, कोकण विभाग बापूसाहेब सबनिस, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव आदि उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रमानंतर महाड येथे मुल्यमापन पाहणी अभ्यास राज्यस्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत विविध कामांची मुल्यमापन सन 2018-19 मध्ये आयोजित करावयाचे आहे. या प्रशिक्षणासाठी कोकण विभागातील सर्व जिल्हा नियोजन अधिकारी उपस्थित होते. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 40.83 मि.मि.पावसाची नोंद

     अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.21 -   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 40.83 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2160.19 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 22.00 मि.मि., पेण-55.00 मि.मि., मुरुड-14.00 मि.मि., पनवेल-32.40 मि.मि., उरण-31.00 मि.मि., कर्जत-79.30 मि.मि., खालापूर-71.00 मि.मि., माणगांव-25.00 मि.मि., रोहा-40.00 मि.मि., सुधागड-27.00 मि.मि., तळा-30.00 मि.मि., महाड-24.00 मि.मि., पोलादपूर-39.00 म्हसळा-43.60 मि.मि., श्रीवर्धन-28.00 मि.मि., माथेरान-92.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 653.30 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 40.83 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   68.74 टक्के इतकी आहे. 00000

लोकराज्यच्या ‘वारी’ विशेषांकाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.20 - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या लोकराज्यच्या   ‘ आषाढी वारी ’   विशेषांकाचे आज जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकाशन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपजिल्हाधिकारी श्रीधर बोधे, विश्वनाथ वेटकोळी, सर्व प्रांताधिकारी तसेच तहसिलदार   आदी उपस्थित होते. आषाढी वारीचा संग्राह्य विशेषांक पंढरपुरची आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार आहे. यंदाच्या वारीत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत   ‘ संवादवारी ’   हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लोकराज्यच्या या विशेषांकाचे आज प्रकाशन करण्यात आले. या विशेषांकाचे अतिथी संपादक असलेल्या महसूल मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी   ‘ रंगले हे चित्त माझे विठुपायी ’   असे म्हणत वारकऱ्यांसाठी संदेश दिला आहे. अंकामध्ये श्रीपाद अपराजित ,   डॉ. द. ता. भोसले ,   श्रीधरबुव

भात पिकासाठी विमा; 24 पर्यंत मुदत शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन

            अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.20 - बदलते हवामान व येणाऱ्या नैसर्गीक आपत्तीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने, पंतप्रधान पीक विमा योजना सुरु केली आहे. तरी बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी भात पिकाचा विमा, मंगळवार दि. 24 पुर्वी काढावा. यात भात पिकासाठी 70 टक्के जोखीम स्तर असुन प्रती हेक्टरी संरक्षित रक्कम 42 हजार 100 रुपये आहे. याकरीता 0.50 टक्के विमा हप्ता दर असुन शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 210 रुपये 50 पैसे रक्कम भरावयाची आहे. तरी शेतकऱ्यांनी भात पिकाचा विमा काढावा व आर्थीक नुकसान टाळावे, असे आवाहन खोपोली येथील उपविभागीय कृषि अधिकारी डी. बी. पाटील यांनी केले आहे. जोखमीच्या बाबी   पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गीक आग, वीज कोसळणे, गारपीट,   चक्रीवादळ, पूर,   भु्खलन,   दुष्काळ, पावसातील खंड व कीड रोग इत्यादी बाबींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणारी घट. हवामान घटकांच्या प्रतीकूल परीस्थीतीमुळे पिकांची पेरणी व लावणी न होणे व त्यामुळे होणारे नुकसान काढणीपश्चात तसेच नैसर्गीक आपत्तीमुळे होणारे नुकसान, या बाबी करीता रायगड जिल्ह्यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स कं. लि.

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचा रायगड जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.20 - महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबई विजय कांबळे ( भा.पो.से.), विधी सदस्य न्यायमूर्ती सी.एल.थुल, सेवा सदस्य मधुकर गायकवाड, रमेश शिंदे हे सोमवार दि. 30   व   मंगळवार दि.31   रोजी   जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे सोमवार दि.30 रोजी सायं.साडे सात वा. अलिबाग येथे आगमन व शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे मुक्काम. मंगळवार दि.31 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा परिषद   रायगड मधील अनुसूचित जाती जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजना तसेच अनुसूचित जाती   जमाती भरती, बढती, अनुशेष बाबत आढावा बैठक, स्थळ :- जिल्हा परिषद सभागृह. दुपारी साडे बारा   वा. जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड यांच्या समवेत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा, नागरी हक्क संरक्षण अन्याय/ अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याचा आढावा व लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या आर्थिक मदतीबाबत आढावा, स्थळ :- जिल्हा परिषद सभागृह . दुपारी दोन ते तीन वा. दरम्यान राखीव. सायं. सोईनुसार मुंबईकडे रवाना.

गायी-म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम 21 ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्याचे पशुपालकांना आवाहन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.20 -   जिल्ह्यातील गायी-म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत सर्व समावेशक अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील पशुपालकांनी सहभागी होण्यासाठी 21 ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागा मार्फत सन 2018-19 मध्ये राज्यातील गायी/म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्व समावेशक अनुवंशीक सुधारणा कार्यक्रम राबविला जात आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग होण्यासाठी जिल्ह्यातील पशुपालकांकडून नाव नोंदणी अर्ज मागविण्यात आले आहेत. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या पशुपालकांच्या अतिउत्कृष्ट गायी/म्हशींना उत्कृष्ट वळूचे रेत मात्रा वापरुन गर्भधारणा झाल्यानंतर पशुधन विकास मंडळ अकोला मार्फत क्षार मिश्रण जंत नाशके वाटप केले जाणार आहेत व जन्मलेल्या कालवडीस पहिल्या सहा महिन्यामध्ये कालवडी वजन 110 ते 120 किलो झाल्यानंतर पाच हजार रुपये प्रति कालवड या प्रमाणे   मालकास प्रोत्साहन मानधन दिले जाते. नर वासरास उत्कृष्ट वजन व अनुवंशीक माता पित्यांचे गुणधर्म प्राप्त झाल्यास

सहकारी संस्थांनी 31 जुलै पूर्वी लेखापरीक्षण अहवाल सादर करावे - जिल्हा उपनिबंधक खोडका

            अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.20 -   जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांनी 31 जुलै पर्यंत लेखापरीक्षण पूर्ण करुन अहवाल जिल्हा विशेष लेखा परीक्षक कार्यालयास सादर करावेत असे आवाहन जिल्हा उपनिबंधक पी.एम.खोडका यांनी केले आहेत. या संदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सर्व सहकारी संस्थांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 75(1) मधील तरतुदीनुसार वित्तीय वर्ष समाप्त झाल्यापासून चार महिन्यांच्या मुदतीत म्हणजे 31 जुलै पर्यंत संस्थेचे लेखापरीक्षण पूर्ण करुन घेणे वैधानिक दृष्टया बंधनकारक आहे.   तसेच वित्तीय वर्ष समाप्त झाल्यापासून सहा महिन्याच्या मुदतीत (म्हणजे 30 सप्टेंबर ) वार्षिक सर्वसाधारण सभा घेणेसुध्दा बंधनकारक आहे. याशिवाय कलम 79 (1अ) मधील तरतुदीनुसार 30 सप्टेंबर पूर्वी कलम 79 (1अ) च्या (क) ते (च) मध्ये नमूद केल्याप्रमाणे वार्षिक अहवाल आर्थिकपत्रके   इत्यादी विवरणपत्रे निबंधकास ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे.   कलम 79 (1ब) नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील वर्षासाठी (वर्ष सन 2018-19 साठी) संस्थेचे लेखापरीक्षण करु

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 27.26 मि.मि.पावसाची नोंद

     अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.20 -   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 27.26 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2119.36 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 4.00 मि.मि., पेण-25.00 मि.मि., मुरुड-11.00 मि.मि., पनवेल-19.80 मि.मि., उरण-5.00 मि.मि., कर्जत-18.00 मि.मि., खालापूर-41.00 मि.मि., माणगांव-29.00 मि.मि., रोहा-22.00 मि.मि., सुधागड-10.00 मि.मि., तळा-33.00 मि.मि., महाड-40.00 मि.मि., पोलादपूर-41.00 म्हसळा-70.20 मि.मि., श्रीवर्धन-23.00 मि.मि., माथेरान-44.20 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 436.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 27.26 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी  67.44 टक्के इतकी आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 35.01 मि.मि.पावसाची नोंद

  अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.18 -   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 35.01 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2063.36 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 5.00 मि.मि., पेण-27.20 मि.मि., मुरुड-12.00 मि.मि., पनवेल-39.00 मि.मि., उरण-18.00 मि.मि., कर्जत-53.40 मि.मि., खालापूर-84.00 मि.मि., माणगांव-35.00 मि.मि., रोहा-19.00 मि.मि., सुधागड-17.00 मि.मि., तळा-24.00 मि.मि., महाड-41.00 मि.मि., पोलादपूर-70.00 म्हसळा-35.80 मि.मि., श्रीवर्धन-18.00 मि.मि., माथेरान-61.80 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 560.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 35.01 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   65.66    टक्के इतकी आहे. 00000

राष्ट्रीय लोक अदालत 1254 प्रलंबित प्रकरणात 13 कोटी 43 लाख रुपयांची वसुली 15 हजार 674 दाखलपूर्व प्रकरणात 41 कोटी रुपयांची वसुली

      अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.16 -   राष्ट्रीय लोक अदालत शनिवारी (दिनांक 14) पार पडली. यात संपूर्ण जिल्ह्यात 1254 प्रकरणात 13 कोटी 43 लाख 72 हजार 939 रुपयांची वसुली झाली. तसेच दाखलपूर्व 15 हजार 674 प्रकरणात 41 कोटी 25 लाख 7 हजार 572 रुपयांची वसुली झाली अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप मोहिते यांनी दिली आहे.               यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, रायगड जिल्ह्यात लोक अदालतीचे आयोजन शनिवारी करण्यात आले. जिल्हाभरात या लोकअदालतीचे कामकाज पाहण्यासाठी तेवीस कक्षांचे आयोजन करण्यात आले होते.   या लोक अदालतीत राष्ट्रीयकृत बँका, टेलिफोन कंपन्या, महावितरण कंपनी , विमा कंपन्या, भूसंपादन अधिकारी आदि सहभागी झाले होते.   यात भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी प्रकरणे , कलम 138 एन.आय.ॲक्ट विवाह प्रकरणे, तडतोड पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व फौजदारी अपीले, सहकार, कामगार, न्यायालयातील प्रकरणे, बँका, दूरसंचार कंपनी, ग्रामपंचायती यांची वाद पूर्व प्रकरणे तडजोडीसाठी   ठेवण्यात आले होते.   यात एकूण 1254 प्रकरणांपैकी न्यायालयात प्रलंबित भूसंपादनाच्या 42 प्रकरणा

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 79.69 मि.मि.पावसाची नोंद

      अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.16 -   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 79.69 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 1978.53 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 29.00 मि.मि., पेण-120.00 मि.मि., मुरुड-16.00 मि.मि., पनवेल-119.20 मि.मि., उरण-25.00 मि.मि., कर्जत-93.00 मि.मि., खालापूर-64.00 मि.मि., माणगांव-85.00 मि.मि., रोहा-57.00 मि.मि., सुधागड-38.00 मि.मि., तळा-61.00 मि.मि., महाड-64.00 मि.मि., पोलादपूर-125.00 म्हसळा-75.60 मि.मि., श्रीवर्धन-42.00 मि.मि., माथेरान-262.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1275.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 79.69 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   62.96    टक्के इतकी आहे. 00000