Posts

Showing posts from December 25, 2022

पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत— पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह

    अलिबाग,दि.29 (जिमाका):- विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक/शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द असलेल्या शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्ष ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरू करण्यात आली आहे. आता याबरोबर जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी ही संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत इच्छुकांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.

गोवर रुबेला लसीकरण विशेष मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे

    अलिबाग,दि.29 (जिमाका) :- जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून गोवर रुबेला लसीकरणासाठी दि.15 ते 25 डिसेंबर 2022 आणि दि.15 ते दि.25 जानेवारी 2023 या कालावधीत जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबविली जाणार आहे. या विशेष मोहिमेत आरोग्य विभागाकडून दि.26 जानेवारी 2023 पर्यंत सर्व लाभार्थी मुलांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून लसीकरण करण्यासाठी जिल्ह्यामध्ये पथके कार्यरत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे व जिल्हा माताबालसंगोपन अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी दिली आहे. या मोहिमेत 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील डोस देण्याचे राहिलेल्या मुलांना घरोघरी सर्वेक्षण करून नजिकच्या लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे.   यामध्ये शिल्लक राहिलेला पहिला किवा दुसरा डोस देण्यात येणार आहे.   त्यानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून पूर्व तयारी करण्यात आली आहे.   तसेच जिल्ह्यात 74 विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहेत.   त्याचप्रमाणे नियमित 1 हजार 760 लसीकरण सत्रामध्ये गोवर लसीकरण केले जाईल. या सर्वेक्षणात जिल्ह्यात आरोग्य विभागाकडे एकूण 9 महिने ते 5 वर्

जिल्हाधिकारी कार्यालयात “मुख्यमंत्री सचिवालय कक्ष” स्थापन जिल्ह्यातील नागरिकांनी शासनस्तरावर प्रलंबित कामाविषयी अर्ज, निवेदने सादर करावीत --जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

      अलिबाग,दि.29 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य   जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे व त्यानुषंगाने मुख्यमंत्री महोदयांना उद्देशून दिलेले अर्ज, निवेदने, संदर्भ इत्यादी स्विकारण्यासाठी माहे जानेवारी 2020 पासून विभागीय आयुक्त कार्यालय स्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे व त्या संदर्भात होणारे अर्ज निवेदन इत्यादीवर कार्यवाही करण्यात येणार आहे. या कार्यवाहीमध्ये अधिकाधिक, प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटार होण्यासाठी शासन महसूल व वन विभागाकडील दि.16 डिसेंबर 2022 च्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला आहे.   तरी रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या कामाविषयी त्यांचे अर्ज, निवेदने जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग ये

रायगड जिल्हा परिषद येथे स्वदेस श्रेष्ठ शाळा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

      अलिबाग,दि.29 (जिमाका) :- जिल्हा परिषद रायगड येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व स्वदेस फाउंडेशनच्या संस्थापिका झरीना स्क्रूवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव, उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, स्वदेस उपसंचालक तुषार इनामदार यांच्या हस्ते स्वदेस श्रेष्ठ शाळा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. स्वदेस फाउंडेशनच्या वतीने माध्यमिक व प्राथमिक शाळांसाठी स्वदेस श्रेष्ठ शाळा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, यामध्ये 126 प्राथमिक व माध्यमिक शाळा सहभागी झाल्या होत्या. सहभागी शाळांचे मूल्यांकन शाळा सिद्धी व स्वदेस ध्येयांच्या   धर्तीवर करण्यात आले होते. यानुसार अंतिम फेरीमध्ये 26 शाळा पोहोचल्या होत्या, यांचे मूल्यावर शिक्षण तज्ञांकडून करण्यात आले होते. प्राथमिक शाळेमध्ये माणगाव तालुक्यातील रानवडेकोंड व माध्यमिक शाळेमध्ये तळा तालुक्यातील अभिनव ज्ञानमंदिर, उसर खुर्द या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला....! श्रेष्ठ शाळा पुरस्कार पुरस्कार प्राप्त व सहभागी शाळा- प्राथमिक शाळा विभाग- रायगड जिल्हा परिषद शाळा, रानवडे कोंड, माणग

शालेय विद्यार्थ्यांसाठी “सर्प आणि निसर्गासोबत सहजीवन” विषयावर आरसीएफ विद्यालय येथे कार्यशाळा संपन्न

                       अलिबाग,दि.29 (जिमाका) :- वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून अलिबाग तालुक्यात वन्यजीव विशेषत: साप, पक्षी, सस्तन प्राणी यांचा बचाव तसेच औषधोपचर करण्याचे सेवाभावी कार्य करीत आहे. रायगड वनविभागाच्या सहकार्याने वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग या संस्‍थेतर्फे (शनिवार, दि. 17 डिसेंबर 2022) रोजी आरसीएफ विद्यालय येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी “ सर्प आणि निसर्गासोबत सहजीवन ” या विषयावरील कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत डॉ.प्रसाद दाभोळकर, ओमकार कामतेकर, अदिती सगर, सुजित लाड आणि समीर पालकर यांनी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना सापांबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली.     परिसरात साप आढळून आल्यास त्याला मारु नये, काय करावे तसेच सर्पदंश झाल्यास कोणती काळजी घ्यावी, याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. ०००००००

मोटार वाहन निरीक्षकांचा जानेवारी ते जून 2023 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम

      अलिबाग, दि.29 (जिमाका) :- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा माहे जानेवारी ते माहे जून 2023 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. माहे जानेवारी-2023 : बुधवार, दि.11 जानेवारी 2023, ता.रोहा, मंगळवार, दि.10 जानेवारी 2023, ता.मुरुड, शुक्रवार, दि.6 जानेवारी व शुक्रवार, दि.27 जानेवारी 2023 ता.अलिबाग, सोमवार, दि.9 जानेवारी व सोमवार दि.16 जानेवारी 2023 ता.महाड, मंगळवार, दि.17 जानेवारी 2023 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.18 जानेवारी 2023, ता.माणगाव. माहे फेब्रुवारी-2023 : बुधवार, दि.15 फेब्रुवारी 2023, ता.रोहा, मंगळवार, दि.14 फेब्रुवारी 2023, ता.मुरुड, शुक्रवार, दि.10 फेब्रुवारी व शुक्रवार, दि.24 फेब्रुवारी 2023 ता.अलिबाग, सोमवार, दि.13 फेब्रुवारी व सोमवार दि.20 फेब्रुवारी 2023 ता.महाड, मंगळवार, दि.21 फेब्रुवारी 2023 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.22 फेब्रुवारी 2023, ता.माणगाव. माहे मार्च-2023 : बुधवार, दि.15 मार्च 2023, ता.रोहा, मंगळवार, दि.14 मार्च 2023, ता.मुरुड, शुक्रवार, दि.10 मार्च व शुक्रवार, दि.24 मार्

अलिबाग तालुक्यातील को.ए.सो च्या ना.ना.पाटील हायस्कूल पोयनाडने दिल्लीत उंचावली महाराष्ट्राची मान ना.ना पाटील हायस्कूलच्या एन.सी.सी.कॅडेट्स ची प्रजासत्ताक दिनाच्या राजपथवरील परेडसाठी निवड... हा बहुमान मिळविणारे रायगडमधील पहिले विद्यालय

  अलिबाग,दि.29 (जिमाका):- दिल्लीत दि.26 जानेवारी रोजी राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी व्हावे, असे अनेक कॅडेट्सचे स्वप्न असते. एन.सी.सी.मध्ये “ रिपब्लिकन डे परेड अर्थात आर.डी परेड ” ही अत्यंत मानाची समजली जाते. या आर.डी.परेडसाठी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथील को.ए.सो.ना.ना.पाटील हायस्कूल मधील सार्जंट जय महेश पाटील व कॅडेट गौरव दत्तेश डिंगणकर या दोन कॅडेट्सची निवड झाली आहे.    या कॅडेट्सने औरंगाबाद येथे झालेल्या “ एक भारत श्रेष्ठ भारत ” या देशपातळीवरील शिबिरामध्ये सांस्कृतिक सादरीकरणामध्ये सूवर्णपदक मिळविले होते. त्यानंतर त्यांना पुणे येथे होणाऱ्या आर.डी.परेड पूर्वतयारी शिबिर निवड प्रक्रियेसाठी बोलाविण्यात आले.   त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 116 कॅडेट्सची निवड करण्यात आली. यात ज्युनिअर डिव्हिजनच्या 35 कॅडेट्सची निवड   झाली असून   त्यातील दोन कॅडेट्स रायगड जिल्ह्याचे आहेत.     या कॅडेट्सना शाळेचे अधिकारी श्री. समाधान शिवाजी भंडारे यांनी मार्गदर्शन केले. तसेच 6-महाराष्ट्र बटालियनचे कमांडंट कर्नल मनीष अवस्थी व त्यांच्या सर्व परेड मा

शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतन प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी दि.5 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय पेन्शन अदालतीचे आयोजन

    अलिबाग,दि.20(जिमाका):- शिक्षण विभाग, माध्यमिक यांच्या अधिनस्त जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर   अधिकारी-कर्मचारी हे सन-2022-2023 मध्ये निवृत्त होणार आहेत किंवा झालेले आहेत. त्यानुषंगाने प्रलंबित सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे जलद गतीने निपटारा करण्याकरिता दि.5 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11.30 वा. माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, चौथा मजला, पोस्ट ऑफिस समोर, अलिबाग येथे   जिल्हास्तरीय पेन्शन अदालत ” आयोजित करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणांचा निपटारा करण्याच्या दृष्टीने सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या पेन्शन अदालतीसाठी दि.5 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11.30 वा. माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, चौथा मजला, पोस्ट ऑफिस समोर, अलिबाग येथे उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रायगड जिल्हा परिषद ज्योत्सना शिंदे यांनी केले आहे. ०००००००

बोकडविरा येथील आदिवासी बांधवांना रेशनकार्डचे वाटप कार्यक्रम संपन्न

Image
  अलिबाग,दि.29 (जिमाका): कातकरी उत्थान अभियान सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत कोकण विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी रायगड डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार उरण तालुक्यातील बोकडवीरा येथे पनवेल उपविभागीय अधिकारी श्री.राहुल मुंडके, तहसिलदार श्री.भाऊसाहेब अंधारे, नायब तहसिलदार श्री.नरेश पेडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून (दि.21 डिसेंबर 2022) रोजी बोकडविरा येथील आदिवासी वाडीवरील आदिवासी बांधवांना रेशन कार्ड चे वाटप करण्यात आले. कातकरी उत्थान अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना आतापर्यंत जवळपास 1 लाखांपेक्षा जास्त विविध शासकीय दाखल्यांचे वाटप पूर्ण झाले आहे. 0000000

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडा ज्योत रॅलीचे किल्ले रायगडवरून आयोजन

Image
  अलिबाग,दि.29 (जिमाका): महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.02 ते दि.12 जानेवारी 2023 या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे तसेच इतर जिल्ह्यांमध्ये “ महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां ” चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण 39 क्रीडा प्रकारांचा समावेश असून एकूण 10 हजार 546 खेळाडू, मार्गदर्शक, पंच सहभागी होणार आहेत. एकूण 39 क्रीडा प्रकारांपैकी 19 क्रीडा प्रकारांचे आयोजन हे शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे होणार आहे.   तर मुख्य क्रीडा ज्योत रॅली दि.04 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 9.00 वा. किल्ले रायगड येथून सुरु होऊन पुणे येथे सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळूंगे येथे पोहोचणार आहे. या मुख्य क्रीडाज्योतीच्या आयोजनाकरिता जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे जी.टी.सी.सी.सदस्य आणि क्रीडा ज्योत समन्वयक श्री.अमित गायकवाड पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड श्र

मोटार वाहन निरीक्षकांचा जानेवारी ते जून 2023 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम

       अलिबाग, दि.27 (जिमाका) :-  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा माहे जानेवारी ते माहे जून 2023 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. माहे जानेवारी-2023 :  बुधवार, दि.11 जानेवारी 2023, ता.रोहा, मंगळवार, दि.10 जानेवारी 2023, ता.मुरुड, शुक्रवार, दि.6 जानेवारी व शुक्रवार, दि.27 जानेवारी 2023 ता.अलिबाग, सोमवार, दि.9 जानेवारी व सोमवार दि.16 जानेवारी 2023 ता.महाड, मंगळवार, दि.17 जानेवारी 2023 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.18 जानेवारी 2023, ता.माणगाव. माहे फेब्रुवारी-2023 :  बुधवार, दि.15 फेब्रुवारी 2023, ता.रोहा, मंगळवार, दि.14 फेब्रुवारी 2023, ता.मुरुड, शुक्रवार, दि.10 फेब्रुवारी व शुक्रवार, दि.24 फेब्रुवारी 2023 ता.अलिबाग, सोमवार, दि.13 फेब्रुवारी व सोमवार दि.20 फेब्रुवारी 2023 ता.महाड, मंगळवार, दि.21 फेब्रुवारी 2023 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.22 फेब्रुवारी 2023, ता.माणगाव. माहे मार्च-2023 :  बुधवार, दि.15 मार्च 2023, ता.रोहा, मंगळवार, दि.14 मार्च 2023, ता.मुरुड, शुक्रवार, दि.10 मार्च व शुक्रवार, दि.24 मार्च 2023

डॉ. भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
        अलिबाग, दि. 27 (जिमाका):-स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री, शिक्षण महर्षी   डॉ.भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात   त्यांच्या प्रतिमेला तहसिलदार विशाल दौंडकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.    यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. 00000

कृषी विस्तार कार्यक्रमांतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व स्वदेस फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार

Image
    अलिबाग,दि.27 (जिमाका :- जिल्ह्यातील 7 तालुक्यांमधील शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी   अधिकारी कार्यालय, रायगड व स्वदेस फाउंडेशन यांच्यात कृषी विकास कार्यक्रमांतर्गत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. सामंजस्य करारावर स्वदेस फाउंडेशनच्या संस्थापक झरीना स्क्रूवाला व प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले   यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी उपसंचालक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय काळभोर, उपसंचालक आत्मा तथा नोडल अधिकारी (स्मार्ट) सतीश बोऱ्हाडे आणि पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ, जिल्हा अंमलबजावणी कक्ष ( स्मार्ट) भाऊसाहेब गावडे, स्वदेस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, संचालक प्रदीप साठे, उपसंचालक तुषार इनामदार, नीता हरमलकर, महाव्यवस्थापक प्रसाद पाटील, अफशान शेख उपस्थित होते.   सामंजस्य करारांतर्गत रायगड जिल्ह्यामध्ये स्वदेस फाउंडेशन काम करीत असलेल्या गावांमध्ये तीन वर्षांमध्ये पोलादपूर , महाड, माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन   व सुधागड तालुक्यामधील शेतकऱ्यांसाठी कृषी विस्तार कार्यक्रमांतर्गत मँगो नेट नोंदणी, मॅंग

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने पथनाट्यातून जनजागृती कार्यक्रम संपन्न

Image
    अलिबाग,दि.27 (जिमाका :- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अलिबाग समुद्र किनाऱ्यावर ग्राहकांचे अधिकार व ग्राहक संरक्षण अधिनियम-2019 याविषयावर (शनिवार, दि.24 डिसेंबर 2022) रोजी जिल्हा पुरवठा विभाग तथा जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड- अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्यावतीने पथनाट्यातून “ जागो ग्राहक, जागो ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी कार्यक्रमास प्रभारी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी   ज्ञानदेव यादव, नायब तहसिलदार मानसी पाटील, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या   अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी, अव्वल कारकून विनायक सर्णेकर, नयन नाईक, हेमंत पाटील, दीपक मुळे, दिलीप शहापूरकर, महसूल सहाय्यक प्रेरणा पाटील, अनेश पाटील, गणेश पाटील, विजय नाईक आदि उपस्थित होते. या पथनाट्यातून प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या कलाकारांनी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर व अलिबाग बस स्थानक येथे जनजागृती केली. पथना

अलिबाग तालुक्यातील को.ए.सो च्या ना.ना.पाटील हायस्कूल पोयनाडने दिल्लीत उंचावली महाराष्ट्राची मान ना.ना पाटील हायस्कूलच्या एन.सी.सी.कॅडेट्स ची प्रजासत्ताक दिनाच्या राजपथवरील परेडसाठी निवड... हा बहुमान मिळविणारे रायगडमधील पहिले विद्यालय

    अलिबाग,दि.27 (जिमाका):- दिल्लीत दि.26 जानेवारी रोजी राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी व्हावे, असे अनेक कॅडेट्सचे स्वप्न असते. एन.सी.सी.मध्ये “ रिपब्लिकन डे परेड अर्थात आर.डी परेड ” ही अत्यंत मानाची समजली जाते. या आर.डी.परेडसाठी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथील को.ए.सो.ना.ना.पाटील हायस्कूल मधील सार्जंट जय महेश पाटील व कॅडेट गौरव दत्तेश डिंगणकर या दोन कॅडेट्सची निवड झाली आहे.    या कॅडेट्सने औरंगाबाद येथे झालेल्या “ एक भारत श्रेष्ठ भारत ” या देशपातळीवरील शिबिरामध्ये सांस्कृतिक सादरीकरणामध्ये सूवर्णपदक मिळविले होते. त्यानंतर त्यांना पुणे येथे होणाऱ्या आर.डी.परेड पूर्वतयारी शिबिर निवड प्रक्रियेसाठी बोलाविण्यात आले.   त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 116 कॅडेट्सची निवड करण्यात आली. यात ज्युनिअर डिव्हिजनच्या 35 कॅडेट्सची निवड   झाली असून   त्यातील दोन कॅडेट्स रायगड जिल्ह्याचे आहेत.     या कॅडेट्सना शाळेचे अधिकारी श्री. समाधान शिवाजी भंडारे यांनी मार्गदर्शन केले. तसेच 6-महाराष्ट्र बटालियनचे कमांडंट कर्नल मनीष अवस्थी व त्यांच्या सर्व परे

पोलादपूर तालुक्यातील चांढवे बुद्रुक येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Image
    अलिबाग,दि.27(जिमाका):- महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा रायगड अंतर्गत सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र महाड यांच्या माध्यमातून, प्राथमिक आरोग्य केंद्र दासगाव यांच्यामार्फत महिला बचतगटातील महिलांकरिता पोलादपूर तालुक्यातील चांढवे बुद्रुक येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले.   या शिबिराकरिता सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापक सौ.मीनल साळवी, सहयोगिनी सुप्रिया मोरे,आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी हाके, नर्स वनिता जाधव, प्राजक्ता चव्हाण, चांढवे गावचे सरपंच व महिला बचत गटातील महिला उपस्थित होत्या. आपल्या प्रास्ताविकात सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापक सौ.मीनल साळवी यांनी महिलांनी आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी, याकरिता कोणता आहार घ्यावा व सकस आहाराचे महत्व याविषयांवर उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले.   आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी हाके यांनी अनेमिया म्हणजे नेमके काय, हिमोग्लोबिन कसे वाढवावे व परसबागेतून कोणत्या भाज्या घेऊ शकतो, ज्यातून महिलांचे आरोग्य सदृढ राहील यावर मार्गदर्शन केले. या आरोग्य तपासणी शिबिरात महिलांचे हिमोग्लोबिन