Posts

Showing posts from July 14, 2024

दि.22 ते दि.28 जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताहाचे आयोजन

  रायगड जिमाका दि.19:-   राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दि.22 ते दि.28 जुलै 2024 या कालावधीत शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी दिली आहे.  शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे. रायगड जिल्ह्यामधील शाळांमध्ये उपक्रम राबविण्यात येणार आहे.  शिक्षण सप्ताहामध्ये पुढीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सोमवार, दि.22 जुलै 2024 रोजी, अध्ययन अध्यापन साहित्य दिवस.  मंगळवार, दि.23 जुलै 2024 रोजी, मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस. बुधवार, दि.24 जुलै 2024 क्रीडा दिवस, गुरुवार, दि. 25 जुलै 2024 रोजी सांस्कृति दिवस,  शुक्रवार, दि. 26 जुलै 2024 रोजी कौशल्य व डिजीटल उपक्रम दिवस,  शनिवार, दि.27 जुलै 2024, रोजी मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब,शालेय पोषण दिवस, रविवार, दि. 28 जुलै 2024, रोजी समुदाय सहभाग दिवस. याप्रम

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता दि.25 जुलै पर्यंत अर्ज सादर करावेत

  रायगड जिमाका दि.19:-   सन-2023-24 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, अभियांत्रिकी व वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांतर्गत 60 टक्के गुण प्राप्त केलेल्या मातंग समाजातील मांग, मातंग, मिनीमादींग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता दि.25 जुलै 2024 पर्यंत जिल्हा व्यवस्थापक, रायगड यांचे कार्यालय, श्रीरामसमर्थ गृहनिर्माण संस्था, मर्यादित, सदनिका क्र.2 तळमजला, मारुती मंदिराच्या मागे, चेंढरे, अलिबाग येथे सकाळी 11.00 ते सांयकाळी 5.00 या वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक वंदना राणे यांनी केले आहे. ज्येष्ठता व गुणक्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यांस निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate), मार्कशिटस, 2 छायाचित्र व पुढील वर्गात प्रव

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी जास्तीत जास्त पात्र महिलांनी अर्ज करावेत --महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे

  रायगड जिमाका दि.18:-   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ जुलै महिन्यात केला आहे. या योजनेपासून एकही पात्र लाभार्थी महिला वंचित राहणार नाही, यासाठी जास्तीत जास्त पात्र महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कॅम्पच्या उद्घाटन प्रसंगी  दरबार हॉल ,पंचायत समिती मुरुड येथे  केले. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य मनोज भगत, माजी सभापती श्रीमती ठाकूर,महिला व बालविकास अधिकारी (जि. प.) श्रीमती निर्मला कुचिक, तहसीलदार रोहन शिंदे,गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार खटाल आदि मान्यवर उपस्थित होते.  यावेळी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या, की राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून आतापर्यंत राज्यात 40 लाख अर्ज प्राप्त झाले असून रायगड जिल्ह्यात 2 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेत 2.5 लक्ष  पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व महिला अर्ज करू शकणार आहेत. अर्ज भरणाऱ्या  अंगणवाडीसेविका,आशा वर्कर सेवि

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धांना अलिबाग मध्ये सुरुवात

    रायगड जिमाका दि.18:-   क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे वतीने जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धाना जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आज सुरुवात करण्यात आली.  या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक विजय बाविस्कर राखीव यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र आतनूर, धर्मेंद्र सातवदे, राजाराम कुंभार, मनोहर टेमकर, अमित विचारे, कुमारी तपस्वी गोंधळी, पंच साहिल कांबळे, नितेश जगताप, रितेश ठाकूर, प्रथमेश पाटील,  देव सातवदे, विराज देशमुख इत्यादी मान्यवर व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.  उपस्थित खेळाडूंना विजय बाविस्कर म्हणाले की, खेळाडूंनी चांगल्या खेळाडूंनी खेळाडू वृत्ती जोपासावी तसेच खेळताना दुखापत होणार नाही याची काळजी घेऊन चांगल्या खेळाचे प्रदर्शन करावे.  विजयी होणाऱ्या संघांनी पुढील स्तरावर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा अशा शुभेच्छा त्यांनी खेळाडूंना दिल्या. यावेळी खेळाडूंमध्ये उत्साह दिसून आला. सन 2024-25 मधील शालेय क्रीडा स्पर्धांना या स्पर्धेने सुरुवात झाल्यामुळे खेळाडू आनंदित झाले आहे. 

उद्योजकता वाढीसाठी सर्व सहकार्य- पालकमंत्री उदय सामंत

    रायगड जिमाका दि.18:-  राज्याचे धोरण उद्योगस्नेही आहे. उद्योगांना गुंतवणूक वाढ, प्रकल्प विस्तारासाठी सहकार्य करण्यावर शासनाचा भर आहे. उद्योजकांनीही आपली जबाबदारी ओळखून स्थानिकांच्या रोजगार संधी आणि हिताला प्राधान्य द्यावे. रायगड जिल्ह्यातील उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असून राज्यशासनामार्फत संपूर्ण सहकार्य देण्यात येईल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत  यांनी आज केले. उद्योग विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती व्हावी यासाठी इग्नाईट या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले होते. या कार्यशाळेला राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड उदय सामंत (दृरदूष्यप्रणालीद्वारे)उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशन जावळे,उद्योग सह संचालक, कोकण विभाग, ठाणे श्रीमती विजु सिरसाठ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळया तसेच जिल्ह्यातील उद्योजक, शेतकरी उपस्थित होते.  यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, जिल्ह्यातील सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घ

एक रुपयात पीक विमा शेतकरी नोंदणीला दि.31 जुलै पर्यंत मुदतवाढ

  रायगड(जिमाका)दि.16:-  नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, याकरीता कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.  या योजनेंतर्गत खरीप हंगाम 2024 करीता शेतकरी नोंदणी करिता दि.15 जुलै अंतिम तारीख होती. परंतु आता एक रुपयात पीक विमा शेतकरी नोंदणीला दि.31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती कोकण विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक,ठाणे अंकुश माने यांनी दिली आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणी न होणे तसेच पुर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरीता विमा संरक्षण मिळणार आहे. ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नियुक्त युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर, पालघर व रायगड जिल्ह्यामध्ये चोलामंडलम एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. ठाणे, पालघर, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी भात पिकासाठी विमा संरक्षित

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेकडून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ची प्रभावी अंमलबजावणी

    रायगड जिमाका , दि.15: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची शासनाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देशानुसार रायगड जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेमध्ये सध्या ऑफलाइन पद्धतीने मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झालेले आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी दिली आहे. शासनाच्या निर्देशानुसार योजनेच्या अनुषंगाने गाव पातळीवर समित्या गठित करण्यात आलेल्या असून शासकीय कार्यरत यंत्रणांची प्रत्येक गाव, वॉर्ड स्तरावर बैठका घेवून नियोजन करण्यात आलेले आहे. सर्व अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. मोहीम स्वरूपात योजनेच्या अंमलबजावणीसाठी कॅम्पचे आयोजन करण्याबाबत सरपंच, नगरसेवकांना आवाहन करण्यात आलेले आहे. गावातील अथवा त्या त्या वार्ड मधील सर्व पात्र लाभार्थ्यांचे ऑफलाइन पद्धतीने हार्ड कॉपी अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्यात येत आहेत. अर्जाची नोंद अंगणवाडी स्तरावर घेण्यात येत असून त्याबाबतच्या नोंदी नोंदवहीत ठेवण्यात येत आहेत. प्रत्येक शनिवारी सर्व नोंद झालेल्या लाभार्थ्यांच्या नावांचे चावडी वाचन करू

जिल्ह्यातील सर्व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटकाचे उद्योजक, शेतकरी,नवउद्योजकांरिता कार्यशाळेचे आयोजन

      रायगड(जिमाका)दि.15:- उद्योगाच् या विकासाकरीता राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम व योजना उद्योग संचालनालयामार्फत राज्यात राबवण्यात येत आहेत. सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्व विभागांच्या सहकार्याने  दि.18 जुलै रोजी  जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे सकाळी 9.30 वा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे  उद्घाटन  राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड उदय सामंत यांच्या शुभहस्ते व  जिल्हाधिकारी किशन जावळे,  मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ.भरत बास्टेवाड,  जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, उद्योग सह संचालक, कोकण विभाग, ठाणे श्रीमती विजु सिरसाठ, महाव्यवस्थापक जी.एस. हरळया यांच्या उपस्थितीत राहणार आहेत.  इग्नाईट महाराष्ट्र या कार्यशाळेत डी.जी.एफ.टी. (DGFT), मैत्री (MAITRI), अॅपेडा (APEDA), न्यू इंडिया इशुरन्स (New India Insurance), इंडियन पोस्ट (Indian Post), फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन (FIEO) इ. संज्ञाद्वारे मार्गदर्शनाचे सादरीकरण होणार आहे.  या कार्यशाळेकरीता जिल्ह्यातील सर्व सुक्ष्म, लघु व मध्यम

पाली नगर पंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर

    रायगड(जिमाका)दि.15:- महाराष्ट्र नगरपालिका नियम 1966 यातील नियम 4 व 5 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकान्वये जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे यांनी जिल्हयातील पाली नगरपंचायतीच्या पोटनिवडणूकांसंदर्भात निवडणूक कार्यक्रम जारी केला आहे. नगरपंचायतीचे नाव-पाली,  प्रभाग क्र. 10, आरक्षण सर्वसाधारण महिला. निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय अधिकारी रोहा उपविभाग रोहा, ता. रोहा, जि. रायगड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, मुख्याधिकारी, पाली नगरपंचायत, ता.सुधागड, जि. रायगड. नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चीत केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरीता उपलब्ध असण्याचा कालावधी-दि.18 जुलै 2024 (गुरुवार) सकाळी 11.00 ते दि.24 जुलै 2024 (बुधवार) दुपारी 2.00 पर्यंत.  वरील नार्मानर्देशनपत्रे स्विकारण्याचा कालावधी-दि.18 जुलै 2024 (गुरुवार) ते दि.24 जुलै 2024 (बुधवार) (सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 पर्यंत.  दि.20 जुलै 2024 (शनिवार), दि.21 जुलै 2024 (रविवार) या सुट्टींच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशन पत्र स्विकारण्याचे, नामनिर्देशन पत्राची छाननी करणे व मागे घेण्याचे ठिकाण- नगरपंचाय

खालापूर नगर पंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर

    रायगड(जिमाका)दि.15:- महाराष्ट्र नगरपालिका नियम 1966 यातील नियम 4 व 5 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकान्वये जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे यांनी जिल्हयातील खालापूर नगरपंचायतीच्या पोटनिवडणूकांसंदर्भात निवडणूक कार्यक्रम जारी केला आहे. नगरपंचायतीचे नाव-खालापूर,  प्रभाग क्र.01, आरक्षण अनुसूचित जाती. निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय अधिकारी कर्जत, उपविभाग कर्जत, ता. कर्जत, जि. रायगड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, मुख्याधिकारी, खालापूर नगरपंचायत, ता.खालापूर, जि. रायगड. नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चीत केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरीता उपलब्ध असण्याचा कालावधी-दि.18 जुलै 2024 (गुरुवार) सकाळी 11.00 ते दि.24 जुलै 2024 (बुधवार) दुपारी 2.00 पर्यंत.  वरील नार्मानर्देशनपत्रे स्विकारण्याचा कालावधी- दि.18 जुलै 2024 (गुरुवार) ते दि.24 जुलै 2024 (बुधवार) (सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 पर्यंत.  दि.20 जुलै 2024 (शनिवार), दि.21 जुलै 2024 (रविवार) या सुट्टींच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशन पत्र स्विकारण्याचे, नामनिर्देशन पत्राची छाननी करणे व मागे घेण्याचे ठिका

पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचाही होणार शुभारंभ

  रायगड(जिमाका)दि.15 :-   राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री उदय सामंत हे मंगळवार, 16 जुलै 2024 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11.00 वा. जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक तर दुपारी 1.00 वा. रायगड जिल्हा डोंगरी विभाग विकास समिती बैठक होणार आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ कार्यक्रम पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मंगळवार दि.16 जुलै रोजी दु.2  वाजता आर.सी.एफ.हॉल कुरुळ, अलिबाग येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना प्रतिनिधिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद सेस निधीतून विविध घटकांना ई शॉप वाहन वितरण करण्यात येणार आहे. सोमवार, दि.15 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6 वा.पालकमंत्री उदय सामंत हे खेड येथून मोटारीने अलिबागला पोहोचणार असून शासकीय विश्रामगृह, अलिबाग येथे मुक्कामी राहाणार आहेत. 0000000