उद्योजकता वाढीसाठी सर्व सहकार्य- पालकमंत्री उदय सामंत

 

 

रायगड जिमाका दि.18:- राज्याचे धोरण उद्योगस्नेही आहे. उद्योगांना गुंतवणूक वाढ, प्रकल्प विस्तारासाठी सहकार्य करण्यावर शासनाचा भर आहे. उद्योजकांनीही आपली जबाबदारी ओळखून स्थानिकांच्या रोजगार संधी आणि हिताला प्राधान्य द्यावे. रायगड जिल्ह्यातील उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असून राज्यशासनामार्फत संपूर्ण सहकार्य देण्यात येईल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत  यांनी आज केले.

उद्योग विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती व्हावी यासाठी इग्नाईट या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले होते. या कार्यशाळेला राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड उदय सामंत (दृरदूष्यप्रणालीद्वारे)उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशन जावळे,उद्योग सह संचालक, कोकण विभाग, ठाणे श्रीमती विजु सिरसाठ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळया तसेच जिल्ह्यातील उद्योजक, शेतकरी उपस्थित होते. 

यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, जिल्ह्यातील सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटकाचे उद्योजक, शेतकरी, नवउद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील उद्योजकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. रायगड जिल्हा हा भौगोलिकदृष्टया महत्वाचा जिल्हा आहे. जिल्ह्यात औद्योगिकरणासाठी  वातावरण चांगल्याप्रकारे आहे.  औद्योगिकरणात देशाला व राज्याला पुढे नेण्यामध्ये रायगड जिल्ह्याचा मोलाचा वाटा आहे.   उद्योजकांना काही समस्या, अडचणी असतील तर त्या सांगाव्यात त्याचे लवकरात लवकर निराकरण केले जाईल.  जगप्रसिध्दी असलेल्या पेण तालुक्यातील गणपतीला जीआय मानांकन प्राप्त झाले असून त्याचा मन:स्वी आनंद होत आहे. तसेच अलिबागच्या  पांढऱ्या कांद्याला आधी जीआय मानांकन मिळाले असून येथील शेतकऱ्यांना पांढरा कांदा लागवडीचे क्षेत्र कसे वाढेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसेच मुरुड तालुक्यात बाबूंची लागवड करण्यात येणार आहे.  यासाठी बचतगटांच्या माध्यमातून बाबूंची नर्सरी तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असेही श्री जावळे यांनी सांगितले.

 यावेळी पेण येथील गणपती उद्योगाला भारत सरकार तर्फे प्राप्त झालेले जीआय मानांकन प्रमाणपत्र जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.

उद्योग सह संचालक, कोकण विभाग, ठाणे श्रीमती विजु सिरसाठ आपल्या प्रास्ताविकात म्हणाल्या की, जिल्ह्यातील उद्योगांना चालना मिळावी, उद्योग गुतंवणूक वाढावी, रोजगार निर्मिर्ती वाढावी हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे.  उद्योग करण्यासाठी लागणाऱ्या विविध शासकीय विभागांच्या परवानगीसाठी सहकार्य केले जाईल असेही त्या म्हणाल्या.  जिल्हा उद्योग केंद्राकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ उद्योजकांनी घ्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

            आभार जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळया यांनी मानले.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड