Posts

Showing posts from January 5, 2020

नारी शक्ती पुरस्कार नामनिर्देशन सादर करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2020

अलिबाग दि.9, विशेषत: अपवादात्मक परिस्थितीमध्ये महिलांच्या आर्थिक व सामाजिक सबलीकरणाच्या क्षेत्रांमध्ये किंवा या विषयाशी संबंधीत किंवा आनुषंगीक उत्कृष्ट कार्य करणारे व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना हे नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र आहेत. 01/11/2019 रोजी ज्या व्यक्तीचे वय किमान 25 वर्षे आहे आणि ज्यांना यापूर्वी नारी शक्ती पुरस्कार, स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही, तसेच ज्या संस्था, गट, संघटना यांनी किमान 5 वर्षे संबंधित   क्षेत्रात काम केलेले आहे आणि ज्यांना यापूर्वी नारी शक्ती, स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही असे व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना उपक्रम हे नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र आहेत. पारंपारीक व अपारंपारीक क्षेत्रामध्ये कौशल्य विकासासाठी महिलांना प्रोत्साहित करणे, ग्रामीण महिलांसाठी मुलभूत सुविधा सुकर करणे, विज्ञान व तंत्रज्ञान, क्रिडा, कला, संस्कृती इ. अपारंपारिक क्षेत्रामध्ये ठसेपणे व सार्थपणे बचाव व सुरक्षा, आरोग्य व निरोगीपणा, शिक्षण, कौशल्य विकास, जीवन कौशल्य, महिलांचा आदर व प्रतिष्ठा इ. बाबत कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना, उपक्रम यांना ना

शहीद वीर यशवंतराव घाडगे यांच्या स्मारकासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जाईल -पालकमंत्री आदिती तटकरे

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.09 (जिमाका) -   दुसऱ्या महायुध्दात अभुतपूर्व शौर्य दाखवून आपल्या देशाची धाडसी परंपरा दाखवून देशसेवेसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या माणगाव तालुक्यातील पळस गावचे शहीद वीर   यशवंतराव घाडगे यांच्या स्मारकासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही राज्याच्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा श्रीमती आदिती तटकरे यांनी आज येथे दिली.    माणगाव   येथील जुने तहसिलदार कार्यालय येथे आयोजित शहीद वीर यशवंतराव घाडगे व्हिक्टोरिया क्रॉस मानचिन्हधारक ( मरणोत्तर) यांच्या जयंती समांरभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.   यावेळी आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्षा श्रीमती योगिता चव्हाण, ब्रिगेडियर सुधीर सावंत, कर्नल सी.जे.रानडे, बेळगाव येथील सुभेदार अनिल भोसले, उपविभागीय अधिकारी माणगाव श्रीमती प्रशाली दिघावकर, तहसिलदार श्रीमती प्रियांका अहिरे आदि उपस्थित होते. यावेळी   पालकमंत्री श्रीमती तटकरे म्हणाल्या की, रायगड जिल्ह्यातील अनेक सुपूत्रांनी देशासाठी प्राणार्पण केले असून देश

वाहन कर, पर्यावरण कर थकलेल्या आणि स्क्रॅप वाहनांचा लिलाव

अलिबाग (जिमाका)दि.7:- सदर जाहीर नोटीस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये नोंदणी प्राधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारात जारी करण्यात येत आहे.   सदर नोटिशीद्वारे वाहन मालकाना, ताबेदारांना वित्तदात्यांना जाहिररित्या कर व दंड भरुन वाहने सोडवून नेण्यासाठी अवगत केले आहे.   वायुवेग पथकांनी वेळोवळी अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या वाहन मालकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोचदेय डाकेने नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. मोटार वाहन कायदा 1988 मधील तरतूदीनुसार वाहन मालकांनी पत्त्यातील बदल नोंदणी प्राधिकाऱ्यास कळविणे बंधनकारक असताना देखील सदर वाहनांच्या मालकानी या कार्यालयास तसे कळविले नाही. त्यासाठी ही जाहीर नोटीस जारी करण्यात येत आहे. वाहनाच्या मालकांनी, ताबेदाराना, वित्तदात्यांनी लिलावाच्या दिनांकापर्यंत कार्यालयात थकीत कर व दंडाच्या रक्कमेचा भरणा करुन वाहने सोडवून घ्यावीत किंवा लिलावास हरकत घ्यावयाची असल्यास दि.18/01/2020 पर्यंत लेखी हरकत घ्यावी. अन्यथा त्यांच्या वाहनांचा लिलाव दि.22/01/2020 रोजी दुपारी 3.00 ते 5.00 या वेळेत करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तद्नंतर वाहन मालकाची कोणतीही तक्रा

रायगड जिल्हयात विषय समिती सभापती पदासाठी 15 जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी

अलिबाग (जिमाका)दि.7:- रायगड जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्राची छाननी कार्यक्रम बुधवार दि.15 जानेवारी 2020 रोजी होणार आहे. छाननी पत्र तपशिल पुढील प्रमाणे- 1.) विषय समिती सभापती पदासाठी नामनिर्देशनपत्रे   दाखल करणे- बुधवार दि.15 जानेवारी 2020 रोजी सकाळी अकरा वाजता ते दुपारी एक वाजेपर्यंत. ठिकाण- कै.प्रभाकर पाटील सभागृह, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग 2.) विषय समिती सभापती पदाचे निवडीसाठी बैठक- बुधवार दि.15 जानेवारी 2020 रोजी दुपारी दोन वाजता. 3.) प्राधिकृत अधिकारी यांचेमार्फत दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी करणे.- बुधवार दि.15 जानेवारी 2020 रोजी दुपारी दोन वाजता बैठक सुरु झाल्यानंतर. 4.) वैधरित्या नामनिर्देशन उमेदवारांची नावे त्यांच्या सूचकासह वाचून दाखविणे - नामनिर्देशन पत्रांची छाननी   पूर्ण झाल्यानंतर. 5.)उमेदवारी मागे घेणे- अ.क्र.4 व 5 चे काम पूर्ण झाल्यानंतर., 6.) आवश्यक असल्यास विषय समिती सभापती (एक) पदासाठी निवडणूक घेणे.-अ.क्र.4 व 5 चे काम पूर्ण झाल्यानंतर.7.) आवश्यक असल्यास विषय समिती सभापती (दोन)पदासाठी निवडणूक घेणे- अ.क्र.6 चे काम पूर्ण झाल्यान

ग्रामीण जनतेसाठी रायगड डाक विभागाची 9 ते 11 जानेवारीला मोहीम

अलिबाग, जि. रायगड, दि. 07 (जिमाका)- भारतीय डाक विभागाच्या सोबतीने निघालेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेची घोडदोड आता ग्रामीण भागात करण्याकरता विविध स्वरूपाचे कार्यक्रमचा एक भाग म्हणून ग्रामीण व शहरी विभागात खास मोहीम आयोजित केली जात आहे. रायगड डाक विभागाने याबाबत पुढाकार घेताना लोकांच्या दारा पर्यन्त जाऊन आपली सेवा देताना इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक चे खाते उघडण्यासाठी मर्यादित ठिकाणी एक विशेष मोहीम आयोजित केली होती गेल्या महिन्यात त्याला मिळालेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद बघून चालू वर्षाच्या सुरवातीलाच जानेवारी मध्ये पुन्हा एकदा अशाच विशेष मोहिमेचे आयोजन केले जाणार आहे. वैशिष्टपूर्ण असणारी ही मोहीम म्हणजे आता रायगड विभागात सर्वांनाच सामावून   घेणारी ठरणार आहे. रायगड विभागात असणाऱ्या सर्व पोस्ट ऑफिस मधून 9 ते 11 जानेवारीला दरम्यान अशी विशेष मोहिम राबऊन रायगड विभागातील प्रत्येक पोस्ट ऑफिस यात सहभागी होणार आहे. 1 मुख्य-डाकघर, 44 उप-डाकघरे व 286 शाखा- डाकघरे या